वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ४/१५ पृ. २१-२६
  • अलास्काच्या शेवटल्या सरहद्दीवरचा बुरखा उचलणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अलास्काच्या शेवटल्या सरहद्दीवरचा बुरखा उचलणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • एक दुःखदायक स्थित्यंतर
  • साक्ष देण्यासाठी सुरवातीला केलेले प्रयत्न
  • अनपेक्षित मदत येते
  • अल्युटन बेटांच्या साखळीकडे
  • हळुवारपणे उबदार होत चाललेला कल
  • सरहद्दीवर पाऊल टाकणे
  • ते मोलाचे ठरले का?
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ४/१५ पृ. २१-२६

अलास्काच्या शेवटल्या सरहद्दीवरचा बुरखा उचलणे

आम्ही चौघेजण, दोन दिवसांसाठी आता, अलास्का, नोमच्या सोन्याच्या लव्हाळ्याच्या विख्यात शहरातील एका छोट्याशा खोलीत दाटीवाटीने बसलोत. १८९८ मध्ये, ४०,००० पेक्षा अधिक पूर्वेक्षक येथे, एकच गोष्ट शोधण्यासाठी आले, व ती गोष्ट होती—सोनं! परंतु आम्ही एक वेगळा खजिना शोधण्यासाठी आलो आहोत.

आमची आस्था, त्या क्षणापुरती, बेरिंग सामुद्रधुनीतील पश्‍चिमेकडून ३०० किलोमीटर दूर, सेंट लॉरेन्स बेटावरील गॅमबेल आणि सवुंगना नावाच्या एकाकी गावांमध्ये वसलेल्या “निवडक वस्तु” शोधण्यात आहे. (हाग्गय २:७) तेथे ईन्युट लोक आर्टिकच्या बर्फाळ पाण्याला मोठ्या धाडसाने तोंड देतात, आणि आधीच्या सोव्हिएत संघराज्यापासून काही किलोमीटर दूर देवमाश्‍याची शिकार करतात. परंतु वाहणारा बर्फ आणि धुक्याचे दाट राखट आच्छादन आम्हाला रोखून ठेवते. आमचे विमान थांबून राहिले आहे.

आम्ही थांबून असताना, मागील काही वर्षांमध्ये घडलेल्या घटनांवरील विचारात माझे मन गुरफटून जाते आणि ह्‍या विखुरलेल्या व विरळ स्थायिक क्षेत्रात झालेल्या साक्षीकार्यावर यहोवा देवाने त्याचा आशीर्वाद दिला यासाठी मी त्याचे आभार मानतो. काही जण म्हणत असलेले जगाची सर्वात शेवटली सरहद्द—अलास्का—येथे आता १५० विरळ वसाहतींमध्ये मूळचे ६०,००० पेक्षा अधिक लोक राहतात. ते १६,००,००० चौरस किलोमीटरच्या अशा रानात पसरलेले आहेत, ज्याला कोणत्याच प्रकारचे रस्ते येऊन मिळत नाहीत. वॉचटावर संस्थेच्या विमानाच्या साहाय्याने आम्ही, या एकाकी असलेल्या गावांच्या एक तृतीयांश भागात आधीच पोहचून, देवाच्या राज्याची सुवार्ता त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो.—मत्तय २४:१४.

या विरळ वस्त्यांमध्ये जाण्यासाठी, विमानाला अनेक दिवसांसाठी झाकून ठेवू शकणाऱ्‍या ढगांतून व धुक्यातून खाली उतरावे लागते. जमिनीवर एकदा उतरल्यावर आणखी एका धुक्यातून आम्हाला आत शिरकाव करायचा आहे. त्या धुक्याने एका बुरख्याप्रमाणे, या दयाळू व शांतीप्रिय लोकांच्या मनाला व हृदयाला झाकून टाकले आहे.—पडताळा २ करिंथकर ३:१५, १६.

एक दुःखदायक स्थित्यंतर

अलास्काचा हा दाट प्रदेश ईन्युट, अल्युटस्‌ आणि अमेरिकन इंडियन्सने वसलेला आहे. यातील प्रत्येकांची त्यांच्या स्वतःच्या रूढी व व्यक्‍तिगत वंशानुरूप विशिष्ट लक्षणे आहेत. आर्टिकच्या हिवाळ्यातून वाचण्यासाठी, शिकार, मासेमारी, आणि देवमाश्‍यांची शिकार करण्याद्वारे, हे लोक त्या प्रदेशाची साधनसंपत्ती असताना आणि नसताना देखील जीवन जगण्यास शिकले आहेत.

या लोकांवर, १७०० च्या मध्यात विदेशी प्रभाव पडला. रशियाच्या मऊ लोकरीच्या व्यापाऱ्‍यांना, प्राण्यांच्या कातड्यांचा पोशाख घातलेले व सील प्राण्याच्या चरबीने बनवलेल्या तेलाचा, त्यांच्या अंगाचा वास येणारे लोक सापडले, जे बर्फाच्या बनवलेल्या ईग्लूत नव्हे तर निम्म्या जमिनीत आत मध्ये बनवलेल्या, गवतांचे छत असलेल्या व भुयारी प्रवेशद्वार असलेल्या गवताळ घरात राहत होते. त्या व्यापाऱ्‍यांनी, या मृदू व सौम्य आवाजाच्या, पण तगड्या लोकांना पुष्कळ गंभीर समस्यांमध्ये ढकलले, ज्यामध्ये नव्या रूढी, आणि नवे आजार होते व यामुळे काही जातींची लोकसंख्या अर्धा टक्क्यांनी कमी झाली. दारूबाजी लवकरच लोकांना एक शाप ठरली. या नव्या आर्थिक शास्त्राने जीवनाच्या उपजिविकेस शेतीच्या उत्पादनापासून सरळ आर्थिक व्यवहारात बदलून टाकले. आजपर्यंत काहींना, हे एक दुःखदायक स्थित्यंतर आहे असे वाटते.

ख्रिस्ती धर्मजगताचे मिशनरी येथे आल्यावर, मूळच्या अलास्काच्या रहिवाश्‍यांवर दुसऱ्‍या प्रकारचा बदल लादला गेला. काहींनी त्यांचे पारंपारिक धार्मिक विधी म्हणजे, हवा, बर्फ, अस्वल, गरूढ आणि इतर, यांच्या जीवांची भक्‍ती नाखूश होऊन सोडून दिली तरी, इतरांनी कल्पनांच्या भेसळीत वाढ केली ज्याचा परिणाम धार्मिक कल्पनांचे एकीकरण आणि गोंधळ झाला. या सर्वांचा परिणाम अनेक वेळा, तिऱ्‍हाईताचा संशय घेणे व अविश्‍वास यात झाला. काही खेड्यांमध्ये एखाद्या पाहुण्याचे नेहमीच चांगले स्वागत होत नाही.

तथापि, आमच्यासमोर एक आव्हान होते की, या विस्तृत सरहद्दीच्या मूळ रहिवाश्‍यांपर्यंत आम्ही कसे पोंहचू शकू? आम्ही त्यांचा संशय कसा दूर करू शकू? बुरखा उचलण्यासाठी आम्ही काय करू शकतो?

साक्ष देण्यासाठी सुरवातीला केलेले प्रयत्न

१९६० च्या सुरवातीला, अलास्काच्या पुष्कळ तगड्या साक्षीदारांनी, भयंकर वारा, शून्याखालील तापमान, व केवळ गडद रंगाच्या वस्तुच केवळ दिसतात असे वातावरण असणाऱ्‍या महाभूतांना, अगदी धैर्याने सहन केले व ते, उत्तरेकडील खेड्यात विखुरलेल्यांपर्यंत प्रचाराच्या दौऱ्‍यावर जाण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या मालकीचे एक एंजिन असलेले विमान चालवत होते. या गोष्टींची उजळणी केल्यावर हे समजून येते की, हे धैर्यवान बांधव स्वतः खरोखरच प्रचंड धोक्याला समोरे जात होते. एंजिनचा बिघाड झाला तर निश्‍चितच अनर्थ ओढवला असता. विमानाचे सुरक्षितपणे जमिनीवर उतरणे शक्य असले तरी, शून्य तापमानाच्या वातावरणात हे अलास्काचे साक्षीदार इतक्या किलोमीटर दूरवर असत की, त्यांना मदत मिळू शकत नव्हती व पायी चालतही जाऊ शकत नव्हते. अन्‍न आणि निवारा मिळण्यावरच त्यांचा बचाव अवलंबून होता आणि तेच फार दुर्लभ होते. कोणतेही गंभीर प्रसंग घडले नाहीत याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, परंतु अशा प्रकारचे धोके टाळता येण्याजोगे नव्हते. याच कारणास्तव, वॉचटावर संस्थेच्या अलास्काच्या शाखा दप्तराने, अशा प्रकारे प्रचार कार्य करण्यास मनाई केली.

हे काम पुढे चालू ठेवण्यासाठी, फेअरबँक्स व उत्तर ध्रुव मंडळीतील विश्‍वासू बांधवांनी, नोम, बॅरो, आणि कोट्‌सबू यासारख्या मोठमोठ्या खेड्यांपर्यंत पोंहचण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांवर लक्ष एकाग्र केले. व्यापारी विमान वाहतूक, प्रवाश्‍यांची या खेड्यांपर्यंत ने-आण करते. ते बांधव या भागात स्वखर्चाने गेले, जे उत्तरेकडून आणि पश्‍चिमेकडून ७२० किलोमीटर दूर आहे. त्यांच्यातील काहीजण आस्थेवाईक लोकांसोबत पवित्र शास्त्र अभ्यास चालवण्यासाठी नोममध्ये पुष्कळ महिन्यांसाठी राहिले. बॅरो येथे, शून्याखाली ४५ अंश सेल्सियसच्या थंड तापमानात आश्रय देण्यासाठी एक बंगला भाड्याने घेतला. पृथ्वीच्या दिगंतापर्यंत सुवार्तेचा प्रचार करण्याच्या येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन करणाऱ्‍यांनी, अनेक वर्षांपासून, १५,००० डॉलर पेक्षा अधिक खर्च केले.—मार्क १३:१०.

अनपेक्षित मदत येते

अधिकाधिक एकांतवासाच्या वसाहतींपर्यंत पोंहचण्यासाठी मार्ग शोधण्याचे काम चालू असताना, यहोवाने मार्ग खुला करून दिला. दोन एंजिन असलेले एक विमान उपलब्ध झाले, अलास्का रांगेचा खडक सुरक्षितपणे पार करण्यासाठी याचीच आम्हाला अत्यंत गरज होती. अलास्का येथे ४,२०० मीटर उंचीचे पुष्कळ पर्वत आहेत आणि सर्वात प्रसिद्ध मॅक्किन्ले पर्वताचा शिखर, समुद्र सपाटीपासून ६,१९३ मीटर उंच आहे.

आणि शेवटी ते विमान आले. परंतु जीर्ण झालेले, जुने, व मोडकळीस आल्यामुळे त्यालाच ठिगळे लावून तयार केलेले हे विमान, जमिनीवर उतरल्यावर आमची किती निराशा झाली असेल याचा जरा विचार करा. हे विमान हवेत उडण्याजोगे होते का? आम्ही आमच्या बांधवांचे प्राण याच्या हवाली करू शकतो का? पुन्हा एकदा, यहोवाचा हात उणा पडला नाही. अनुज्ञप्ती मिळालेल्या यांत्रिक वर्गाच्या मार्गदर्शनाखाली, जवळजवळ २०० बांधवांनी स्वयंसेवकाचे काम करून, संपूर्ण विमानाला तकाकणारे करण्यासाठी हजारो तास खर्च केले.

हे देखणे विमान पाहण्यास आम्हाला किती आनंद झाला! अलास्काच्या गगनात भरारी घेणारे ते तकाकणारे विमान, त्याच्या शेपटीवर 710WT हा नोंदणीचा नंबर लिहिलेला होता! सात आणि दहा हा आकडा पवित्र शास्त्रात पूर्णत्वाला सूचित करण्यासाठी वापरला असल्यामुळे, अंधकाराने पूर्णपणे झाकलेल्या हृदयावरचा बुरखा काढण्यासाठी यहोवाच्या संघटनेने दिलेल्या पाठिंब्यावर जोर देण्यासाठी ७१० हा नंबर कदाचित घेतला असेल.

अल्युटन बेटांच्या साखळीकडे

विमान मिळाल्यामुळे, आम्ही ५४ खेड्यांपर्यंत राज्याची सुवार्ता व पवित्र शास्त्र साहित्यांचे वाटप करून ८०,००० किलोमीटरचे रानमाळ उरकले. हे, अमेरिकेचे खंड १९ वेळा पार करण्याच्या बरोबरीचे आहे!

आम्ही, प्रशांत महासागर आणि बेरिंग समुद्राला वेगळे करणारे १,६००- किलोमीटर लांबीचे अल्युटन बेट तीन वेळा उरकले. बेटांची साखळी बनलेल्या जवळजवळ २०० पेक्षा अधिक वृक्षरहित बेटे, केवळ अल्युटच्या लोकांचेच घर नाही तर हजारो समुद्राचे पक्षी, बाल्ड गरुड, बर्फासारखे पांढरे शुभ्र डोके व पांढरी आणि काळी पिसे असलेले एम्परर गीझ यांचेही ते घर आहे.

परंतु त्या परिसराचे भुरळ पाडणारे सौंदर्य त्याच्या धोक्यांविना नाही. समुद्रावरून उडत असताना विमानातून आम्ही, बर्फाळ पाण्यावर तीन ते पाच मीटरच्या पांढरा फेस असलेल्या लाटा पाहू शकत होतो. त्या इतक्या थंड होत्या की एखादा व्यक्‍ती, उन्हाळ्यात देखील त्यामध्ये केवळ १० ते १५ मिनिटांसाठीच जगू शकेल. शिवाय खाली उतरण्याचा प्रयत्न केला तर, वैमानिकाला केवळ एक खडबडीत, खडकांचे बेट किंवा थंड, भयानक समुद्र या दोहांतील एकाची निवड करावी लागेल. एअरक्राफ्ट ॲण्ड एंजिन मेकानिक्सचे प्रमाणप्रत मिळालेल्या आमच्या कुशल यांत्रिकी बांधवांचे आम्ही किती आभार मानतो जे त्या विमानाला उत्कृष्ट आकार देण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करतात!

दौऱ्‍यावर असताना एकदा, आम्ही डच हार्बर आणि अनलास्काच्या मासेमारी करणाऱ्‍या खेड्यात गेलो. तो परिसर, प्रत्येक तासाला १३०-१९० किलोमीटर वेगाने वाहत असलेल्या वाऱ्‍यासाठी प्रसिद्ध आहे. त्या दिवशी तो शांत होता ही आनंदाची गोष्ट आहे, परंतु आम्हाला अनेक वेळा अस्वस्थ करण्यासाठी तर तो खवळलेला होता. विमानाची धावपट्टी दिसू लागल्यावर आम्हाला त्याचे किती आश्‍चर्य वाटू लागले—डोंगर कपारीतून काढलेली ती केवळ एक खांच होती! धावपट्टीच्या एका बाजूला दगडाचा उभा कडा होता, दुसऱ्‍या बाजूला, बेरिंग समुद्राचे बर्फाळ पाणी! आम्ही खाली जमिनीवर उतरलो तेव्हा ती धावपट्टी पाण्याने चिंब भिजली होती. तेथे वर्षातून २०० पेक्षा अधिक दिवस पाऊस पडत असतो.

त्या क्षेत्रातील रहिवाश्‍यांसोबत देवाच्या वचनाची आणि उद्देशाची चर्चा करणे किती आनंददायक होते! अनेक वृद्ध लोकांनी, युद्ध नसलेल्या जगाच्या आशेबद्दल कृतज्ञता व्यक्‍त केली. दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी जपानने डच हार्बरवर केलेल्या बॉम्ब हल्ल्याची त्यांना अजूनही, स्पष्ट आठवण आहे. अशा प्रकारच्या साक्षीकार्याच्या दौऱ्‍यांतील आमच्या आठवणी देखील त्याचप्रमाणे अविस्मरणीय आहेत.

हळुवारपणे उबदार होत चाललेला कल

पुन्हा एकदा हवामानाचा अंदाज केल्यावर, आम्हाला दिसून आले की, तापमानात उष्णतेचे थोडेसे प्रमाण वाढले होते. हे बघून मला विखुरलेल्या व विरळ स्थायिक क्षेत्रात केलेल्या कार्याची आठवण होते. हळुवार परंतु अविचलपणे आम्ही लोकांच्या हृदयातील होणारी उबदार प्रगती पाहिली.

अनोळख्यांविषयी असलेला लोकांचा संशय आणि अविश्‍वास काढून टाकण्यासाठी पुष्कळ वेळ गेला. आमच्या सुरवातीच्या प्रयत्नांमध्ये, आमचे विमान खाली उतरल्यावर त्या खेड्याच्या चर्चच्या पुढाऱ्‍यांनी आम्हाला येऊन भेटणे, आमच्या भेटीचा उद्देश विचारून घेणे, आणि मग अनपेक्षितपणे आम्हाला जाण्यास सांगणे ही काही असामान्य गोष्ट नव्हती. अशा प्रकारचे स्वागत निश्‍चितच निराशजनक होते. परंतु आम्ही मत्तय १०:१६ मध्ये येशूने दिलेल्या सल्ल्याची आठवण केली की: “तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरूपद्रवी व्हा.” या कारणामुळे, आम्ही लेटअस (कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक प्रकारचा पाला), टमाटे, लहान खरबूज, व स्थानिकरीत्या सहज उपलब्ध होत नाहीत अशा इतर गोष्टींनी गच्च भरलेल्या विमानाने पुन्हा आलो. पूर्वी विरोध करणाऱ्‍या लोकांना आता आमच्याकडचा माल पाहून आनंद झाला.

एक बांधव, ताज्या मालासाठी देणग्या स्वीकारत “दुकान” सांभाळत असताना, इतर पुष्कळ बांधव दारोदारी जाऊन घरमालकांना ताजा माल आल्याची खबर देण्यासाठी गेले. दारांवर त्यांनी असे देखील विचारले: “बरं, तर मला सांगा की, तुम्ही पवित्र शास्त्राचे वाचन करता का? मला माहीत आहे की तुम्हाला पवित्र शास्त्राचे हे साहित्य वाचावयास नक्की आवडेल ज्यामध्ये देवाने आमच्यासाठी एका नंदनवनाचे अभिवचन दिल्याचे दाखवले आहे.” मोहात पाडणारी अशी सादरता कोण नाकारू शकेल? शारीरिक तसेच आध्यात्मिक अन्‍नाबद्दल प्रत्येकांनी कृतज्ञता व्यक्‍त केली. आमचे स्वागत सुखकर होते, भरपूर साहित्यांचे वाटप झाले, आणि थोड्याच हृदयांना उब मिळाली.

सरहद्दीवर पाऊल टाकणे

पलिकडील युकॉन क्षेत्रात, व्हाईटहॉर्स मंडळीने आम्हाला कॅनडात ‘येऊन’ उत्तर-पश्‍चिम क्षेत्रातील दूरवरच्या काही भागांना भेट देण्यासाठी ‘मासेदोनियाचे’ आमंत्रण दिले. (प्रे. कृत्ये १६:९) टुकटोयॉकटुकच्या दिशेने प्रवास करण्यासाठी आम्ही पाच जण निघालो. हे खेडे, आर्टिक वृत्ताच्या उत्तरेकडे, ब्यू फोर्ट समुद्रावरील मॅकेन्झी उपसागराजवळ आहे.

आम्ही तेथे आल्याबरोबर, ‘तुम्ही हे विचित्र नाव कसे उच्चारता?’ याविषयी विचार करत होतो.

“टुक्‌,” असे मोठ्याने हसून एका तरूण माणसाने उत्तर दिले.

“आम्ही असा विचार का केला नाही बरे?” याचेच आम्हाला आश्‍चर्य वाटू लागले.

टुकटोयॉकटुकचे लोक शास्त्रवचनांसोबत परिचित होते हे पाहिल्यावर आम्हाला आश्‍चर्य वाटले. त्यामुळे, आमच्या अनेक मैत्रीपूर्ण चर्चा झाल्या, पुष्कळ साहित्यांचे वाटपही झाले. आमच्यातील एका तरूण पायनियरचे एका घरमालकासोबत असे संभाषण झाले ज्यामुळे त्याचा संभ्रम दूर झाला.

“मी एक अँग्लिकन आहे,” घरमालकाने म्हटले.

“अँग्लिकन चर्चने समलैंगिकतेला मान्यता दिली आहे याविषयी तुम्हाला जाणीव आहे का?” असे आमच्या पायनियरने विचारले.

तो माणूस चाचरून म्हणाला, “हो का? तर मग एथून पुढे मी अँग्लिकन नाही.” दुसऱ्‍या एका व्यक्‍तिचे हृदय पवित्र शास्त्राची सुवार्ता ग्रहण करण्यास खुले झाले ही आशादायक गोष्ट आहे.—इफिसकर १:१८.

त्या क्षेत्रातील प्रत्येक घरी जाण्याचा आमचा निश्‍चय पाहून एका वृद्ध व्यक्‍तिवर फार प्रभाव पडला. सर्वसामान्यपणे, आम्हाला सर्व कार्य पायी चालत जाऊन करावे लागणार होते. नेहमीप्रमाणे, धाव पट्टी वरून खेड्यात जाण्यासाठी एक किंवा दोन किलोमीटर चालत जावे लागत होते. मग, प्रत्येक घरी जाण्यासाठी आम्हाला वाळूतून किंवा मातीच्या रस्त्यांवरून कष्टाने चालत जावे लागत होते. एका मनुष्याने त्याच्या ट्रकमध्ये आम्हाला बसवले, आणि खरेच तो किती मोठा आशीर्वाद होता! सरहद्दीवर जाऊन कॅनडाच्या क्षेत्रातील लोकांना मदत करण्याचा खूप मोठा सुहक्क होता.

ते मोलाचे ठरले का?

हवामानात बिघाड झाल्यामुळे आम्ही निराधार होतो किंवा खूप उशीर होतो, जसा आता आम्हाला झालेला आहे, किंवा साक्षीकार्यात घालवलेल्या एका संपूर्ण दिवसाने, उदासीनता, कदाचित विरोध या शिवाय आणखी काहीच फलप्राप्ती झालेली नाही असे दिसते, तेव्हा आम्ही विचार करू लागतो, आम्ही घालवलेला वेळ, शक्‍ती, आणि खर्च मोलाचा ठरला का? काही जण आस्था दाखवतात व त्यांच्यासोबत आपण संपर्क साधू असे वचन देतो परंतु विसरून जातो त्या लोकांबद्दल आम्ही विचार करू शकतो. नंतर आमच्या लक्षात आले की त्या गावच्या लोकांची पत्र लिहिण्याची पद्धत नाही, आणि मित्रत्व दाखवल्यामुळे पवित्र शास्त्राच्या संदेशात त्या व्यक्‍तिला आस्था आहे असा गैरसमज सहज होऊ शकतो. कधीकधी किती प्रमाणात यश मिळाले याचा अंदाज काढणे अतिशय कठीण भासते.

इतर राज्य प्रचारकांच्या चांगल्या अनुभवांची आठवण केल्यावर हे नकारात्मक विचार लगेचच नाहीसे होतात. उदाहरणार्थ, फेअरबँक्स येथील एका साक्षीदाराने बॅरोच्या खेड्याच्या उत्तरेकडे दूरवर प्रचार कार्य केले. तेथे तिला एक किशोरवयीन मुलगी भेटली जी कालिफोर्निया येथील तिच्या कॉलेजमधून घरी सुटीसाठी आली होती. त्या भगिणीने या मुलीची आस्था तिच्यासोबत संपर्क ठेवून टिकवून ठेवली व कॉलेजला पुन्हा गेल्यावर देखील, त्या मुलीला उत्तेजन देत राहिली. आज, ही तरूण महिला आनंदी, व बाप्तिस्मा घेतलेली यहोवाची सेविका आहे.

दारावर पडलेली थाप, मला विचारांच्या तंद्रीतून शुद्धीवर आणते व या सर्व गोष्टी मोलाच्या ठरल्या याचा आणखी एक पुरावा देते. तो पहा एलमर दारात उभा आहे. नोम येथे समर्पित व बाप्तिस्मा घेतलेला हा एकच ईन्युट साक्षीदार आहे.

तो मला विचारतो, “तुम्ही जर प्रचारासाठी बाहेर जाणार असाल तर मी देखील तुमच्यासोबत येऊ का?” एकाकी व सर्वात जवळच्या मंडळीपासून ८०० किलोमीटर दूरवर राहत असल्यामुळे, संधी असताना त्याच्या बांधवांसोबत सेवेत भाग घेण्याची त्याची उत्कष्ट इच्छा आहे.

सूर्याची किरणे ढगांना भेदून बाहेर येत आहेत, आणि आम्हाला निघण्यासाठी लवकरच वातावरण स्वच्छ होईल हे दिसत आहे. एलमर जसा विमानात पाय ठेवतो, तसे त्याच्या आनंदी, झळकणाऱ्‍या मुद्रेकडे पाहून आम्हाला उबदारपणा जाणवतो. एलमरसाठी हा खास दिवस आहे. तो आमच्याबरोबर त्याच्या स्वतःच्या ईन्युट लोकांसोबत बोलण्यासाठी आमच्या खेड्यात येत आहे. जगाच्या शेवटल्या सरहद्दीवर राहणाऱ्‍या लोकांच्या हृदयावरचा बुरखा काढण्याच्या आमच्या प्रयत्नात तो देखील आमच्यासोबत सामील झाला.—सौजन्याने.

[Map on page 23]

(For fully formatted text, see publication)

१. गॅमबेल

२. सवुंगना

३. नोम

४. कोट्‌सबू

५. बॅरो

६. टुकटोयॉकटुक

७. फेअरबँक्स्‌

८. अँकरेज

९. अनलास्का

१०. डच हार्बर

[२४ पानांवरील चित्रं]

बहुतेकवेळा एकाकी वसाहतींपर्यंत पोंहचण्यासाठी, अलास्काच्या अनेक पर्वतांच्या रांगा पार कराव्या लागतात

[२५ पानांवरील चित्रं]

बेटी हॉक्स, सोफी मेझाक, आणि कॅरी टिपल्स या तिघींची मिळून पूर्ण वेळची सेवा, एकूण ३० वर्षांपेक्षा अधिक आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा