जगातील सर्वोत्तम नियतकालिके सादर करा
१ टेहळणी बुरुजचा उद्देश नमूद केल्याप्रमाणे, “यहोवा देवास सार्वभौम सत्ताधारी प्रभू या नात्याने उंचावणे,” हा आहे. अवेक! हे “सबंध कुटुंबाच्या ज्ञानप्रसारासाठी आहे. . . . हे नियतकालिक, निर्माणकर्त्याच्या शांतीदायक व सुरक्षित नवीन जगाच्या अभिवचनावरील आत्मविश्वास वाढवते.” ही अवतरणे त्या नियतकालिकांमधील आहेत. या ध्येयांचा पाठलाग केल्यामुळे ती, लाखो वाचकांसाठी सांत्वनाचा स्रोत ठरली आहेत.
२ एप्रिल आणि मे दरम्यान आमच्या दारोदारीच्या कार्यात आम्ही, शक्य होईल तितके या नियतकालिकांची वर्गणी सादर करणार आहोत. यात प्रभावकारी असण्यासाठी, आम्हाला त्यात असलेल्या गोष्टींशी चांगल्यारितीने परिचित होण्याची गरज आहे. प्रत्येक अंक वाचा. त्यांना सादर करताना तुम्ही वापरू शकाल अशा मुद्यांची नोंद करा. लोक कशाबद्दल चिंतीत आहेत याचा विचार करा. तुमच्या बहुतेक शेजाऱ्यांच्या विचारांवर कोणते सामाजिक, कौटुंबिक किंवा भावनिक विषय वर्चस्व राखून आहेत? त्यांच्या हृदयाला स्पर्श करील असे काही सांगण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यामध्ये, अधिक शिकून घेण्याची इच्छा उत्तेजित करा. तसेच, तुम्हासोबत पुरेशा वर्गणीच्या पावत्या नेण्याची खात्री करा.
३ एप्रिल १ चे टेहळणी बुरुज ठळकपणे दाखवणे: (पाक्षिक आवृत्त्या.) पुष्कळ लोक, एका उत्तम जगासाठी उत्कंठित आहेत, जे त्यांचा सध्याचा आनंद बहुधा नेहमीच हिरावून घेणाऱ्या पुष्कळ समस्यांरहित असेल.
स्वतःचा परिचय करून दिल्यावर, तुम्ही असे म्हणू शकता:
▪“‘चांगले जग—केवळ एक स्वप्न?’ हा विषय असलेल्या लेखातून मला तुम्हाला एक फारच मनोरंजक विवेचन दाखवण्यास आवडेल. ते म्हणते: ‘हे जग, आमचे जग, निश्चितच एक उत्कृष्ट ठिकाण नाही. . . . सध्याच्या अनर्थाची यादी अंतहीन आहे असे दिसते.’ (लेखातील परिच्छेद ३ पाहा.) ही परिस्थिती आम्हास भविष्याबद्दल आशावादी होण्यास नाउमेद बनवते, नाही का? तरीपण, स्तोत्रसंहिता ३७:११ भविष्याबद्दल काय सांगते ते मला तुम्हाला दाखवू द्या.” शास्त्रवचन वाचल्यावर, घरमालकाला या अभिवचनाबद्दल कसे वाटते ते विचारा. त्याने अनुकूल रितीने प्रतिसाद दिल्यास, पान ४ वरील “चांगले जग—जवळ आहे!,” या लेखाकडे वळा आणि म्हणा: “आपण आताच स्तोत्रसंहिता ३७:११ वाचले त्याचप्रमाणे यात पुष्कळ शास्त्रवचने दिली आहेत. ही नियतकालिके नियमितपणे वाचण्यास तुम्हाला आवडेल असा माझा विश्वास आहे.” मग टेहळणी बुरुजची एका वर्षाची वर्गणी, ६०.०० रुपये देणगीने सादर करा.
४ एप्रिल १५ चे टेहळणी बुरुज ठळकपणे दाखवणे: पाक्षिक आवृत्तींमधील पान ४ वरील लेख विचारतो: “तुम्हाला विश्वसनीय मार्गदर्शन कोठे मिळू शकेल?”
स्वतःचा परिचय करून दिल्यावर, तुम्ही म्हणू शकता:
▪“आज जगात कितीतरी समस्या आहेत, जसे की, [सध्या समाजाला चिंता वाटणाऱ्या एखाद्या गोष्टीचा किंवा बातम्यातील ठळक मुद्याचा उल्लेख करा]. यामुळे, या गोंधळातून बाहेर निघण्याचा मार्ग कोणाला कधी सापडेल काय याचे आपण आश्चर्य करतो. परंतु ही आनंदाची गोष्ट आहे की, २ तीमथ्य ३:१६, १७ आम्हाला खात्री देते की, पवित्र शास्त्र हे आनंदी व सुरक्षित जीवनमार्गाचे मार्गदर्शक आहे.” ही वचने वाचून झाल्यावर, पवित्र शास्त्र हे विश्वसनीय मार्गदर्शक का आहे हे समजण्यात टेहळणी बुरुज आमची मदत कशी करते ते दाखवा. टेहळणी बुरुजच्या मासिक आवृत्तींच्या वर्गण्या सादर करताना अशाच प्रस्तावनांचा उपयोग केला जाऊ शकतो.
५ तुम्हाला अवेक! सादर करण्यास आवडेल तर, तुम्ही मे ८ च्या अंकातील “रियल होप फॉर द चिल्ड्रन?” हा लेख उपयोगात आणाल. तसेच तुम्हाला आढळेल की, मुलांच्या गरजांनी पालक चिंताग्रस्त आहेत. त्यांची मदत करण्यास काय केले जाऊ शकते हे ते जाणू इच्छितात. प्रत्येक नियतकालिकेचे पुष्कळ अंक सोबत नेल्यामुळे, प्रकाशित केलेल्या विविध लेखांकडे तुम्ही त्यांचे लक्ष आकर्षित करू शकता. यामुळे वर्गणी स्वीकारण्यास लोकांना प्रोत्साहन मिळेल. वर्गणीची सादरता नाकारण्यात आली तर, घरमालकाने निदान काही प्रती किंवा टेहळणी बुरुज व अवेक! यांची किरकोळ प्रत तरी घ्यावी असे नक्की सुचवा.
६ आमची नियतकालिके ही जगातील सर्वात उत्तम अशी आहेत. आम्ही त्यांच्याबाबतीत उत्साही असलो तर, इतरांना ती देण्यास आम्ही आतुर असू. यामुळे, ते देखील राज्य आशेला स्वीकारतील आणि विश्वाचा सार्वभौम प्रभू या नात्याने यहोवाला उंचावण्यात सहभागी होतील.—स्तोत्र. ८३:१८.