वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ३/१५ पृ. २४-२५
  • त्याच्या अंतःकरणातील इच्छेची पूर्तता झाली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्याच्या अंतःकरणातील इच्छेची पूर्तता झाली
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मशीही भविष्यवाद आशा देतात
  • अजूनही मशीहा आला नाही!
  • भक्‍तीमान मनुष्य
  • शिमोनाचे भविष्यवादित शब्द
  • शिमोनाने मरीयेला केलेले विधान
  • शिमोन मशीही भविष्यवादांचा अवलंब करतो
  • वचनयुक्‍त संतान
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • वचनयुक्‍त संतान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • वृद्धांनो—मंडळीसाठी तुम्ही मोलाचे आहात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • देवासोबत जवळचा नातेसंबंध निश्‍चितच शक्य आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ३/१५ पृ. २४-२५

त्याच्या अंतःकरणातील इच्छेची पूर्तता झाली

मशीही राज्य सबंध पृथ्वीवर आपले अधिपत्य गाजवीत आहे हे पाहण्याची तुमची अंतःकरणपूर्वक इच्छा आहे का? तसे आहे तर, तुम्ही त्या स्वर्गीय राज्य वर्चस्वाखाली वचन देण्यात आलेल्या पृथ्वीवरील आशीर्वादाकडे तळमळीने पाहत असाल व त्यासाठी प्रार्थनाही करीत असाल. यास्तव, धीर धरा, कारण “इष्टप्रप्ती जीवनाचा वृक्ष आहे.”—नीतीसूत्रे १३:१२; याकोब ५:७, ८.

साधारण २,००० वर्षांपूर्वी, यरुशलेमात शिमोन नावाचा एक “नीतीमान व भक्‍तीमान” मनुष्य राहात होता. त्याचा मशीही भविष्यवाण्यांवर विश्‍वास होता व तो अगदी धीराने “इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता.”—लूक २:२५.

मशीही भविष्यवाद आशा देतात

पहिल्या मशीही भविष्यवाणीबद्दल यहोवा जबाबदार होता, व या भविष्यवाणीने पापी व मर्त्य मानवजातीसाठी आशा दिली. देवाने त्याची “स्त्री” म्हणजे सार्वत्रिक संघटनेमार्फत एक संतान येण्याचे अभिवचन दिले.—उत्पत्ती ३:१५.

त्याची अब्राहामाचे संतान म्हणून ओळख मिळाली आणि याकोबाने त्याच्या येण्याचे भाकीत केले. (उत्पत्ती २२:१७, १८; ४९:१०) मशीही राज्याच्या वैभवांची स्तोत्रांमध्ये उच्च प्रकाराने स्तुती करण्यात आली आहे. (स्तोत्रसंहिता ७२:१-२०) संतानाचा जन्म कुमारीद्वारे होईल असे यशयाने भाकीत केले, आणि मीखाने हा जन्म यरुशलेमात होईल असे भविष्यकथन केले. (यशया ७:१४; मीखा ५:२) ह्‍या मशीही भविष्यवाण्यांपैकी काही आहेत.

अजूनही मशीहा आला नाही!

गतकाळाकडे नजर टाका, व सामान्य युगाचे पहिले शतक उदयास येत आहे अशी कल्पना करा. देवाने मशीहाबद्दल दिलेला भविष्यवाद आता ४,००० वर्षे जुना झाला आहे. यहूद्यांनी यहोवाच्या मंदिराच्या नाशाचा, त्यांचे स्वगृह उजाड होण्याचा, बाबेलातील ७० वर्षांच्या बंदिवासाचा, तसेच ५०० पेक्षा अधिक वर्षे विदेशी सत्ताधिशांच्या अंकित राहण्याचा अनुभव घेतला. तरीही मशीहा कोठे दिसला नाही!

देवभिरु यहूदी, मशीहाच्या येण्याबद्दल किती आतुरतेने वाट पाहात होते! त्याच्याकडून त्यांना व सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळणार होते.

भक्‍तीमान मनुष्य

मशीहाच्या येण्याबद्दल इच्छा धरणाऱ्‍या व त्याबद्दल प्रार्थना करणाऱ्‍या भक्‍तीमान यहूद्यात शिमोन, हा यहूदीयाच्या राजधानीच्या शहरात राहणारा यहोवाचा वृद्ध विश्‍वासू सेवक होता. शिमोनाच्या बाबतीत काहीतरी खास घडले.

देवाने आपला पवित्र आत्मा शिमोनावर ठेवला होता व त्याला एक प्रकटीकरण दिले. जो मशीहा होणार आहे त्याला पाहिल्याशिवाय शिमोनाला मरण येणार नव्हते. पण दिवस व महिने तर उलटून चालले. शिमोन तर आता वयोवृद्ध झाला आहे व अधिक काळ जिवंत राहू शकणार नव्हता. मग, देवाने त्याला दिलेले वचन पूर्ण होणार होते का?

एके दिवशी (सा.यु.पू. २ मध्ये) बेथलहेमातून एक विवाहीत जोडपे आपल्या छोट्या बाळाला घेऊन मंदिरात आले. आता पवित्र आत्मा शिमोनाला प्रकटवितो की, बऱ्‍याच काळापासून वाट पाहात असलेला दिवस हाच आहे. मंदिरात गेल्यावर तो, संदेष्ट्यांनी ज्याच्याबद्दल लिहिले होते त्याला पाहू शकणार होता. लगेच, आपल्या वृद्ध देहाला जितक्या लगबगीने चालवेल तितक्या घाईने तो मंदिरात येतो आणि योसेफ, मरीया व बाळाला बघतो.

शिमोन केवढ्या आनंदाने येशू बाळाला आपल्या हाती घेतो! हाच तो, वचनदत्त मशीहा—“यहोवाचा ख्रिस्त”—होणार होता. इतक्या म्हातारपणी शिमोनाला, येशू आपले पृथ्वीवरील कार्य कसे करतो ते पाहता येणार नव्हते. तरीही त्याला बाळ म्हणून पाहणे हे त्याला खूप आनंदविणारे आहे. मशीहाच्या भविष्यवाण्यांची पूर्णता होण्यास आरंभ झाला आहे. शिमोनाला किती आनंद झाला आहे! आता त्याला मरणातील निद्रावस्थेत, पुनरुत्थानापर्यंत सुखाने जाता येईल.—लूक २:२५-२८.

शिमोनाचे भविष्यवादित शब्द

यहोवाची स्तुती गाण्यासाठी शिमोन आपला स्वर उंचावतो तेव्हा आम्ही त्याच्या तोंडून हे ऐकतोः “हे [सार्वभौम, न्यूव] प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस; कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीयांस प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे.” या शब्दांबद्दल येशूचा दत्तक पिता व त्याची आई मरीया ही आश्‍चर्य व्यक्‍त करतात.—लूक २:२९-३३.

शिमोनाची मुद्रा योसेफ व मरीया यांना आशीर्वाद देतेवेळी उजळते, त्यांनी मुलाबद्दलची आपली जबाबदारी पूर्ण करण्यामुळे त्यांच्यावर यहोवाचा आशीर्वाद येवो अशी त्याची इच्छा स्पष्ट दिसते. यानंतर या वृद्ध माणसाची मुद्रा गंभीर होते. आपले बोलणे केवळ मरीयेला अनुलक्षून तो असे म्हणतो: “पाहा, इस्राएलात अनेकांचे पडणे व पुन: उठणे होण्यासाठी व ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी ह्‍याला नेमिले आहे. ह्‍यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे (आणि तुझ्या स्वतःच्याही जिवातून तरवार भोसकून जाईल).”—लूक २:३४, ३५.

शिमोनाने मरीयेला केलेले विधान

मरीयेला ते ऐकून कसे वाटले असावे याचा जरा विचार करा. शिमोनाच्या बोलण्याचा काय अर्थ होता? काही जण ख्रिस्ताचा स्वीकार करतील व त्यांना त्यांच्या आधीच पतित झालेल्या परिस्थितीतून उठवले जाईल. तथापि, इतर त्याचा धिक्कार करतील, त्याजसंबंधाने अडखळतील व पडतील. आधी भाकीत केल्याप्रमाणे येशू पुष्कळ यहूद्यांसाठी अडखळण्याचा धोंडा झाला. (यशया ८:१४; २८:१६) शिमोनाच्या म्हणण्याचा असा अर्थ होत नव्हता की, काही इस्राएली प्रथमतः अविश्‍वासात पडतील व मग ख्रिस्ताचा स्वीकार करण्यामुळे त्यांचे विश्‍वासात उत्थान होईल. उलट, त्याच्याबद्दल वेगवेगळे लोक वेगवेगळी प्रतिक्रिया दाखवतील, त्याद्वारे त्यांच्या अंतःकरणाची स्थिती उघड होऊन देवाकरवी चांगला किंवा वाईट असा दंड त्यांना मिळेल. विश्‍वास न राखणाऱ्‍या लोकांसाठी तो एक चिन्ह, किंवा तिरस्काराचा विषय असेल. त्याच्यावर विश्‍वास प्रदर्शित करण्यामुळे इतर लोक पाप व अपराध्याच्या मृतप्राय स्थितीतून परत उठवले जातील, व ते देवासोबत नीतीमान भूमिकेचा आनंद घेतील. मशीहाबद्दल लोकांनी आचरलेली कृती त्यांच्या अंतःकरणात त्याच्याविषयी काय भावना आहेत हे प्रदर्शित करील.

पण शिमोनाने जे शब्द उच्चारले की, “तुझ्या स्वतःच्याही जिवातून तरवार भोसकून जाईल,” त्याबद्दल काय? मरीयेच्या जिवात तरवार भोसकली गेल्याची कसलीही खरी घटना शास्त्रवचनात नमूद नाही. तरीही, येशूचा बहुतेकांनी केलेला नकार तिला बऱ्‍याच यातना देणारा ठरणार होता. तसेच, येशूला वधस्तंभावर खिळले गेले तेव्हा तिला किती यातना झाल्या होत्या! हे जणू तिच्यातून तरवार भोसकली गेल्यासारखे होते.

शिमोन मशीही भविष्यवादांचा अवलंब करतो

देवाच्या आत्म्याने शिमोनाला मशीही भविष्यवादांचा अवलंब येशूच्या बाबतीत करण्यास प्रवृत्त केले. शिमोन आता शांतीने किंवा समाधानाने मरू शकत होता, कारण ‘त्याच्या डोळ्यांनी देवाने सर्वांसमक्ष सिद्ध केलेले तारण तसेच परराष्ट्रीयांस प्रकट होण्यासाठी उजेड आणि इस्राएल लोकांचे वैभव पाहिले होते.’ (लूक २:३०-३२) हे यशयाच्या भविष्यवादित शब्दांना किती तंतोतंतपणे लागू होणारे होते!

त्या संदेष्ट्याने असे म्हटले: “परमेश्‍वराचे [यहोवा, न्यूव] गौरव प्रगट होईल आणि सर्व मानवजाति एकत्र मिळून ते पाहील.” “मजकडून [यहोवा] होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला [मशीहा] राष्ट्रांचा प्रकाश असे नेमितो.” (यशया ४०:५; ४२:६; ४९:६; ५२:१०) ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने तसेच भौतिक पुरावे यांनी मशीहा येशू ख्रिस्त हा राष्ट्रांचा खरा प्रकाश, आध्यात्मिक काळोख घालवून देणारा आणि लोकांना तारण देणारा असल्याचे सिद्ध केले आहे.

देवाचे वचन पुढे वृद्ध शिमोनाबद्दल काही सांगत नाही. ख्रिस्ताने स्वर्गीय जीवनाचा मार्ग उघडा करण्याआधी त्याचा मृत्यू झाला असावा हे उघड आहे. पण लवकरच शिमोनाचे या पृथ्वीवर जीवनासाठी पुनरूत्थान करण्यात येईल. तेव्हा देवाच्या मशीही राज्याच्या अंमलामध्ये नव्या पृथ्वीत त्याला तसेच तुम्हाला देखील केवढा आनंद अनुभवण्यास मिळेल!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा