वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ६/१ पृ. ८-९
  • वचनयुक्‍त संतान

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वचनयुक्‍त संतान
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • मिळती जुळती माहिती
  • वचनयुक्‍त संतान
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • तिनं या सर्व गोष्टी आपल्या “अंतःकरणात ठेवल्या”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • तिने ‘मनन करून ते आपल्या अंतःकरणात ठेवले’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • तिला यहोवाची उदंड कृपा लाभली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ६/१ पृ. ८-९

येशूचे जीवन व उपाध्यपण

वचनयुक्‍त संतान

नासरेथ येथे परत जाण्याऐवजी योसेफ आणि मरिया बेथलहेमातच राहतात. येशू आठ दिवसांचा झाल्यावर देवाने दिलेल्या मोशेच्या नियमांनुसार ते त्याची सुंता करवितात. बाळक आठ दिवसांचे झाल्यावर त्याचे नांव ठेवण्याची चाल प्रचलित होती असे दिसते. याकारणास्तव, गॅब्रीएल देवदुताने आधीच सांगितल्याप्रमाणे ते त्याचे नांव येशू ठेवतात.

एक महिन्यापेक्षा अधिक काळ उलटतो आणि आता येशू ४० दिवसांचा होतो. त्याचे आईवडिल त्याला कोठे घेऊन जात आहेत बरे? यरूशलेमातील मंदिराकडे, जे त्यांच्या रहत्या घरापासून थोड्याच मैलावर आहे. देवाने दिलेल्या मोशेच्या नियमाप्रमाणे, बाळकाला जन्म देवून ४० दिवस झाल्यावर त्याच्या मातेने मंदिरात शुद्धीकरणाचे अर्पण आणण्याची गरज होती.

तेच आता मरियादेखील करीत आहे. पण तिने दोन पारव्याची पिले अर्पणाकरिता आणली आहेत. याद्वारे योसेफ व मरिया यांची आर्थिक परिस्थिती उघड होते. मोशेचे नियमशास्त्र दाखविते की एक तरूण मेंढा जो पारव्याच्या पिलांपेक्षा बहुमूल्य आहे तो अर्पिला जाण्यास हवा. पण जर त्या मातेला हे देता येत नसेल तर होल्याचा जोडा अथवा पारव्याची दोन पिले त्याएवेजी देता येत होती.

मंदिरामध्ये एक वृद्ध माणूस येशूला आपल्या हातात घेतो, त्याचे नांव शिमोन आहे. यहोवाच्या ख्रिस्ताला किंवा मशीहाला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही असे देवाने त्याला प्रगट केले होते. त्या दिवशी शिमोन मंदिरात येतो तेव्हा त्याला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, योसेफ व मरिया यांच्या जवळ असणाऱ्‍या बाळकाकडे निरविले जाते.

शिमोन येशूला हातात घेऊन देवाचे आभार मानतो. तो म्हणतो: “आता तू आपल्या वचनाप्रमाणे केले आहेस; कारण माझ्या डोळयांनी तू तयार केलेले तारणाचे माध्यम पाहिले आहे.” हे ऐकून योसेफ व मरिया यांना आश्‍चर्य वाटते. नंतर शिमोन त्या दोघांना आशिर्वाद देतो व मरिया हिला तिच्या मुलाबद्दल म्हणतो. “इस्त्राएलात अनेकांचे पडणे व पुनः उठणे होण्यासाठी ह्‍याला नेमले आहे.” आणि ते दुःख तिच्या स्वतःच्याही जिवांतूव तलवारीसारखे भोसकून जाईल.

याचप्रसंगी ८४ वर्षाची हन्‍ना नावाची संदेष्ट्री तेथे उपस्थित आहे. खरे म्हणजे, ती मंदिर सोडून कोठेही जात नाही. याच वेळी ती जवळ येते व देवाचे आभार मानते. आणि जे जे ऐकत होते त्या त्या सर्वास ती येशूविषयी सांगू लागते.

मंदिरातील या घटनांनी योसेफ व मरीयाला केवढे आनंदी बनविले! त्यावरून त्यांना, ते बाळक देवाचे वचनयुक्‍त संतान आहे ही खात्री मिळते. लूक २:२१–३८; लेवीय १२:१–८.

◆ इस्राएली बाळकाचे नांव केव्हा ठेवण्याची चाल होती असेदिसते?

◆ जेव्हा इस्राएली मातेचा पुत्र ४० दिवसांचा होई तेव्हा तिच्याकडून कशाची अपेक्षा असे, आणि या गरजेच्या परिपूर्तीने मरियेच्या आर्थिक परिस्थिती विषयी कशी स्पष्टता केली?

◆ या प्रसंगी येशूला कोणी ओळखले व कसे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा