वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ३/१५ पृ. २६-२८
  • विल्यम व्हिस्टन पाखंडी की प्रामाणिक प्रामाण्य?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विल्यम व्हिस्टन पाखंडी की प्रामाणिक प्रामाण्य?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पवित्र शास्त्र प्रामाण्य
  • विभिन्‍न प्रकारची व्यक्‍तीमत्वे
  • वाळीत टाकणे
  • शेवटपर्यंत वितंडवादी
  • तुम्हाला आठवते का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन —पुन्हा प्रकाशात आलेली आशा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • त्रैक्याच्या तत्त्वाची कशी वाढ झाली?
    तुम्ही त्रैक्य मानावे का?
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ३/१५ पृ. २६-२८

विल्यम व्हिस्टन पाखंडी की प्रामाणिक प्रामाण्य?

तुम्ही आपल्या विश्‍वासासाठी स्वतःच्या ध्येयाचा त्याग कराल का? विल्यम व्हिस्टनने केला.

त्याचा चर्च ऑफ इंग्लंडशी पवित्र शास्त्र शिक्षणासंबंधाने १८ व्या शतकाच्या आरंभाला वाद झाला तेव्हा तो धार्मिक मतभेदाचा ठळक व्यक्‍ती बनला. याचा परिणाम हा घडला की, त्याला पाखंडी म्हणण्यात आले. त्याच्या मतप्रणालीने एकीकडे तो उपहासाचा विषय बनला तर दुसरीकडे त्याला आदरही मिळाला.

हा विल्यम व्हिस्टन कोण होता? त्याने काय साध्य केले?

पवित्र शास्त्र प्रामाण्य

विल्यम व्हिस्टन हा, सर आयझक न्यूटनचा केंब्रिज विश्‍वविद्यालयातील बुद्धिमानी विद्यार्थी मित्र होता. तुम्ही पहिल्या शतकातील यहूदी इतिहासकार फ्लेवियस जोसेफस यांच्या इंग्रजी आवृत्तीच्या लिखाणाचा संदर्भ घेतला तर, व्हिस्टनने १७३६ मध्ये केलेल्या भाषांतरास वाचण्याची शक्यता आहे. इतर भाषांतरे अस्तित्वात असली तरी त्याचे विद्वत्तापूर्ण भाषांतर, त्याच्या नोंदी व निबंध या सर्व गोष्टी श्रेष्ठ असून त्यांचे अद्याप मुद्रण होत आहे. पुष्कळांना व्हिस्टनने साध्य केलेल्या गोष्टी परमावधीच्या वाटतात.

तथापि, प्राचीन नवा करार (इंग्रजी) या व्हिस्टनच्या ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनाच्या भाषांतराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ते त्याच्या ७८ व्या वर्षी, म्हणजे १७४५ मध्ये प्रकाशित झाले. व्हिस्टनने चार शुभवर्तमाने व प्रेषितांची कृत्ये यांचे भाषांतर कोडेक्स बिझाय, पौलाची पत्रे क्लेरेमाँट कोडेक्स व प्रकटीकरणासहित बाकीचा भाग अलेक्झांड्रियाच्या हस्तलिखित प्रतींवरून भाषांतरीत केला. त्याने १ योहान ५:७ चा बनावट भाग काळजीपूर्वकतेने काढून टाकला. व्हिस्टनने ही तीन ग्रीक लिखाणे, त्याच्या काळात उपलब्ध असणारी सर्वोत्तम लिखाणे म्हणून निवडली.

व्हिस्टनने जे केले त्यामधून त्याची पवित्र शास्त्राबद्दल असणारी प्रीती दिसून येते. त्याच्या काळात आस्तिकतावाद, देवावरील विश्‍वास राखण्यास आधार म्हणून कारण हेच शिक्षण पुरे आहे, अशी गोष्ट प्रचलित होती. विल्यम व्हिस्टन—प्रामाणिक न्यूटनवादी (इंग्रजी) या पुस्तकानुसार, “पवित्र शास्त्र प्राचीन इतिहासाचा अचूक उगम आहे असा सांप्रदायिक दृष्टिकोन” त्याने अगदी जोरदारपणे उचलून धरला होता. येथे नमूद असणारी “न्यूटनवादी” ही संज्ञा आयझक न्यूटनचा संदर्भ देते, जो त्याच्या प्रिन्सीपिया पुस्तकाबद्दल प्रसिद्ध आहे, यात त्याने विश्‍वातील गुरुत्वाकर्षणाचा नियम विस्तारीतपणे सांगितला आहे. न्यूटनच्या विचारसरणीने विल्यम व्हिस्टनवर गहन परिणाम घडवून आणला. कशाप्रकारे?

विभिन्‍न प्रकारची व्यक्‍तीमत्वे

विल्मय व्हिस्टन १६६७ मध्ये जन्मला, तो चर्च ऑफ इंग्लंडच्या पाळकाचा मुलगा होता. तो केंब्रिज विश्‍वविद्यालयात, गणितशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आणि न्यूटनचा सहकारी होण्यासाठी, १६९३ मध्ये त्याची अँग्लीकन पाळक म्हणून दिक्षा झाल्यावर परतला. या दोघात घनिष्ठ नाते निर्माण झाले. साधारण तीन वर्षांनी जेव्हा न्यूटनने गणिती लूकॅझन प्राध्यापकपणाचा राजीनामा दिला, तेव्हा त्याच्या या जागेवर व्हिस्टनची नेमणूक होत आहे याची त्याने खात्री केली. आपले ध्येय अनुसरत असताना व्हिस्टनने खगोलशास्त्र व गणितशास्त्रावर व्याख्याने दिली, पण न्यूटनच्या प्रभावामुळे त्याला पवित्र शास्त्राचा इतिहास व तत्त्वे याबद्दल देखील अधिक रस घेण्याची प्रेरणा मिळाली.

न्यूटन धार्मिक मनुष्य होता. पवित्र शास्त्रात नमूद असणाऱ्‍या हजार वर्षांच्या राज्यकिर्दीवर गाढ विश्‍वास राखणारा असल्यामुळे त्याने दानीएल व प्रकटीकरण यातील भविष्यवाण्यांवर विस्तारीत रुपाचे लिखाण केले. तथापि, त्याच्या या लिखाणांना त्याच्या जीवनमानात क्वचितच प्रसिद्धी मिळाली. त्याने त्रैक्याच्या तत्त्वाचा अवमान केला. पण जेव्हा त्रैक्याविरुद्ध त्याने गोळा केलेला पुरावा प्रसिद्ध करण्याची वेळ आली तेव्हा, “आपली त्र्यैक्याबद्दलची प्रतिकूल मते जाहीर होतील याचे भय वाटून न्यूटनने माघार घेतली,” असे द न्यू एन्साक्लोपिडिआ ब्रिटॅनिका कळवते. हीच गोष्ट एफ. ई. मॅनुएल त्यांच्या इतिहासकार आयझक न्यूटन, (इंग्रजी) या पुस्तकात अशी देतात: “न्यूटनच्या गटाने आपली मते गुप्त ठेवली किंवा त्याबद्दलचा उत्साह दाबून ठेवला होता. . . . न्यूटन गुपिते ठेवत होता, तर व्हिस्टन ते चवाठ्यावर आणत होता.” या दोन्ही माणसांठायी भिन्‍न व्यक्‍तिमत्व होते.

वाळीत टाकणे

जुलै १७०८ मध्ये व्हिस्टनने कँटरबरी व यॉर्कच्या आर्चबिशपांना लिहून कळवले की, अथेनेशियन संप्रदायानुसार असणारे त्रैक्याचे तत्त्व खोटे असल्यामुळे चर्च ऑफ इंग्लंडने आपल्या शिक्षणप्रणालीत सुधारणा घडवून आणावी. यास्तव, त्याला सावध राहण्यासाठी तंबी मिळाली असावी हे उघड आहे. तरी व्हिस्टनने आपला जोर लावला. “मी याचा मुळापासून शोध घेतलेला आहे,” असे त्याने म्हटले, “आणि मला हे स्पष्टपणे उमगले आहे की, ख्रिस्ती चर्चची या गोष्टींमुळे बऱ्‍याच काळापासून फसवणूक होत आहे, आणि देवाची कृपा असल्यास, व ते माझ्या कह्‍यात असल्यास अशी फसवणूक मी येथून पुढे होऊ देणार नाही.”

न्यूटनला स्वतःच्या सामाजिक व विद्यालयीन प्रतिष्ठेची काळजी वाटत होती. पण व्हिस्टन मात्र दुसऱ्‍या बाजूस वेगळाच होता. त्रैक्याविरुद्ध आपली मतप्रणाली ठरवल्यामुळे आपले दृष्टिकोन त्याने एका पत्रकात लिहिले. तथापि, ऑगस्ट १७०८ मध्ये केंब्रिज विद्यालयाने व्हिस्टनला ही माहिती, कर्मठ स्वरुपातील नसल्यामुळे प्रसिद्ध करण्यासाठी परवाना नाकारला.

मग, १७१० मध्ये व्हिस्टनवर, चर्च ऑफ इंग्लंडच्या तत्त्वप्रणालीविरुद्ध शिक्षण देतो असा आरोप करण्यात आला. त्याला दोषी ठरवले गेले, त्याचे प्राध्यापकत्व काढून घेण्यात आले व केंब्रिजमधून काढून टाकण्यात आले. तथापि, त्याच्याविरुद्ध साधारणपणे पाच वर्षे कायदेशीर इलाज अवलंबले जात होते तरी, तो पाखंडी असल्याचे कधीच शाबीत होऊ शकले नाही.

न्यूटनचे त्रैक्याविरुद्ध असणारे दृष्टिकोन व्हिस्टनच्या दृष्टिकोनांशी जुळणारे होते तरी, न्यूटनने आपल्या मित्राच्या वतीने बोलण्याची बाजू घेतली नाही, त्यामुळे व्हिस्टनला शेवटी त्याने वाळीत टाकले. न्यूटनचा मृत्यु झाल्यावर २७ वर्षांनी म्हणजे १७५४ मध्ये, त्याने त्रैक्याचे खोटेपण उघड करणारे केलेले पवित्र शास्त्राधारीत लिखाण प्रसिद्ध झाले. पण याचा व्हिस्टनसाठी काहीही उपयोग होऊ शकला नाही, कारण या प्रसिद्धीच्या दोन वर्षाआधीच त्याचाही मृत्यू झाला होता.

व्हिस्टनला प्रतिष्ठित रॉयल सोसायटीतून बाहेर काढण्यात न्यूटनला जबाबदार धरले जाते. पण यामुळे व्हिस्टन निराश झाला नाही. तो आपल्या कुटुंबासह लंडनमध्ये निघून गेला व तेथे त्याने सोसायटी फॉर प्रोमोटिंग प्रिमिटिव्ह ख्रिश्‍चॅनिटी या संस्थेची स्थापना केली. त्याने आपली सर्व शक्‍ती, त्या काळी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या लिखाणासाठी पणाला लावून प्राचीन ख्रिस्ती धर्माचे पुनरुज्जीवन (इंग्रजी) याचे चार खंड पूर्ण केले.

शेवटपर्यंत वितंडवादी

व्हिस्टनने शास्त्रज्ञ या नात्याने समुद्रावरील खलाशांना रेखांश ठरवता यावे म्हणून वेगवेगळ्या मार्गांने काम केले. त्याच्या कल्पनांना इतके उचलून धरण्यात आले नसले तरी, त्याचा सातत्याचा परिणाम बिनचूक कालमापन करणाऱ्‍या खलाशी यंत्राचा शोध लावण्यात घडला. पवित्र शास्त्र भविष्यवाण्यांबद्दल व्हिस्टनचे बहुतेक दृष्टिकोन त्याच्या समकालीन लोकांप्रमाणेच त्रूटीचे असल्याचे दिसले तरी, त्याने सत्याचा शोध करण्यात आपली कसलीही कसर मागे सोडली नव्हती. त्याने धुमकेतूच्या प्रदक्षिणेबद्दल लिहिलेल्या पत्रिका व नोहाच्या काळातील झालेल्या जलप्रलयाच्या परिणामाबद्दल गृहीत धरलेले तत्त्व, या गोष्टी वैज्ञानिक व पवित्र शास्त्रीय सत्याच्या समर्थनाबद्दल केलेल्या लिखाणापैकी एक आहेत. तथापि, या पलिकडे असणारी त्याची लिखाणे त्रैक्याचे शिक्षण अशास्त्रीय आहे हे उघड करून दाखवणारी आहेत.

व्हिस्टनला नेहमी वाटत होते तसे त्याने १७४७ मध्ये चर्च ऑफ इंग्लंड सोडले. त्याने पाळकासारखे अथेनेशियन संप्रदायाचे वाचन करीत अक्षरशः व लाक्षणिकरित्या चर्चमधून आपले पाऊल बाहेर टाकले. एक धार्मिक विश्‍वकोष (इंग्रजी) व्हिस्टनबद्दल म्हणतो: “त्याचा स्वभाव, त्याच्या जीवनातील सुसंगतता, आणि त्याची सरळ प्रवृत्तीची वागणूक या सर्व गोष्टींचे मर्दानी थेटपण व सत्यता याबद्दल एखाद्याला कौतुक वाटेल.”

व्हिस्टनच्या बाबतीत सत्याची हातमिळवणी करता येऊ शकत नव्हती, आणि लोकांच्या प्रशंसा व वाहवा यापेक्षा त्याला व्यक्‍तिगत धोरण अधिक महत्त्वाचे वाटत होते. व्हिस्टन जरी वितंडवादी वाटत असला तरी तो प्रामाणिक प्रामाण्य होता, ज्याने पवित्र शास्त्र हे देवाचे वचन असल्याचे निर्भिडपणे सांगण्याची आघाडी घेतली होती.—२ तीमथ्य ३:१६, १७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा