तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करत आहात का?
यहोवाचे दोन साक्षीदार, त्यांच्या घरोघरच्या कार्यात एपिस्कोपल चर्चच्या एका पाळकास भेटले. तो जवळजवळ ६० वर्षांचा, दाढी असलेला, त्याच्या चर्चच्या नावाचे कुलसूचक चिन्हांनी सुशोभित केलेले टी-शर्ट घातलेला, आनंदी व्यक्ती होता असे दिसत होते. त्याने एका दमात सांगितले: “वचनाचा प्रसार करण्यात तुमच्या चर्चचे सदस्य ज्याप्रमाणे आवेशी आहेत त्याचप्रकारे आमच्या चर्चचे देखील असावेत अशी माझी इच्छा आहे, परंतु मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की, तुम्ही पुन्हा माझ्या घरी येण्याची काही गरज नाही.”
होय, आज असे अनेक लोक आहेत जे यहोवाच्या साक्षीदारांच्या कामाचे कौतुक करतात व त्यांच्या आवेशाची आणि उत्साहाची प्रशंसा करतात. तरीही, साक्षीदार काय करत आहेत यात त्यांना यर्त्किचितही रस नाही, किंवा ते काम स्वतः करण्याची त्यांची इच्छा देखील नाही. तथापि, ही स्पष्ट विरोधी परिस्थिती काही नवी नाही. येशूच्या दिवसात देखील अशी परिस्थिती असल्याची त्याने नोंद केली आहे, आणि त्याने विचारांना चालना देणाऱ्या एका दृष्टांताद्वारे ह्या मुद्यावर जोरदारपणे भर दिला.
“तुम्हास काय वाटते ते सांगा बरे? एका मनुष्याला दोन मुलगे होते; तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला, ‘मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर.’ त्याने उत्तर दिले, ‘जातो महाराज;’ पण तो गेला नाही. मग दुसऱ्याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले. पण तो म्हणाला, ‘मी नाही जात.’ तरी नंतर त्याला पस्तावा होऊन तो गेला. ह्या दोघांतून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले?”—मत्तय २१:२८-३१.
उत्तर उघड आहे. येशूचे ऐकणाऱ्या समूहाने ज्याप्रकारे उत्तर दिले, त्याप्रकारे आम्हीही, “दुसऱ्या मुलाने” हेच उत्तर देऊ. परंतु स्पष्ट दिसणाऱ्या पलिकडे, त्या दृष्टांताद्वारे येशू आमचे लक्ष, पिता जे इच्छित होता ते करणे जमेस धरण्याकडे वेधवित होता. दुसऱ्या पुत्राला जाण्याची इच्छा नाही असे म्हटले असतानाही, तो गेला आणि याबद्दल त्याची प्रशंसा केली जाते. योग्य प्रकारचे काम करणे हेही तितकेच महत्त्वपूर्ण आहे. पित्याच्या द्राक्षमळ्यात काम करून दुसऱ्या मुलाने कृती केली. त्याने त्याच्या स्वतःच्या द्राक्षमळ्यात जाऊन काम केले नाही.
आम्हा सर्वांसोबत याचा कोणता संबंध आहे? देव आज त्याच्या उपासकांकडून कशाची अपेक्षा करतो? पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करणाऱ्या येशूच्या जीवनापासून आम्ही काय शिकू शकतो? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत, आणि त्यांची योग्य उत्तरे शोधून काढण्याचा अर्थ आमचा चिरकाल लाभ असा आहे कारण, “देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१७; इफिसकर ५:१७.
“देवाची इच्छा” काय आहे?
कॉम्प्रीहेंसीव कॉन्कॉर्डन्स ऑफ द न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स यामध्ये “इच्छा” हे नाम ८० पेक्षा अधिक वेळा आलेले आहे. त्यातील जवळजवळ ६० प्रसंगी (किंवा ७५ टक्के) देवाच्या इच्छेविषयीचा संदर्भ आहे. “देवाची इच्छा,” “माझ्या पित्याची इच्छा,” व “देव इच्छा” अशा प्रकारच्या अभिव्यक्ती २० वेळा आलेल्या आहेत. यावरून आम्ही हे पाहू शकतो की आम्ही ईश्वरी इच्छेला अग्रगण्य महत्त्व देण्यास हवे. देवाची इच्छा पूर्ण करणे ही आमच्या जीवनातील मुख्य कळकळ असली पाहिजे.
“इच्छा” ह्यासाठी, इंग्रजीत असणाऱ्या नामाचा अर्थ, ‘आकांक्षा, वाटणारी भावना, निश्चय, कशाची तरी इच्छा बाळगणे, विशेषतः एक निवड किंवा अधिकार वा शक्ती असलेल्याचा निर्धार’ असा होतो. तर मग, सार्वभौम अधिकारी, यहोवाला इच्छा, आकांक्षा आहेत, किंवा तो निश्चयी आहे. ती कोणती आहे? शास्त्रवचने थोडक्यात आम्हाला असे सांगतात “[देवाची] अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.” (१ तीमथ्य २:४) येशू ख्रिस्त आणि आरंभीच्या ख्रिस्ती जणांनी, इतरांपर्यंत हे अचूक ज्ञान आणण्यासाठी पूर्ण-जीवाने कार्य केले.—मत्तय ९:३५; प्रे. कृत्ये ५:४२; फिलिप्पैकर २:१९, २२.
आज देवाची इच्छा कोण पूर्ण करत आहेत? येशू ख्रिस्ताचे शिष्य असल्याचा दावा करणाऱ्या जवळजवळ दोन अब्ज लोकांपैकी, येशूने दिलेल्या दाखल्यातील त्या धाकट्या मुलासारखे कोण आहेत, ज्याने जाऊन पित्याची इच्छा पूर्ण केली? याचे उत्तर शोधून काढणे इतके कठीण नाही. येशू ख्रिस्ताच्या पदचिन्हांवर खरोखर चालणारे शिष्य, त्याने म्हटले त्याप्रमाणे काम करतील: “प्रथम सर्व राष्ट्रात सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे.” (मार्क १३:१०) संपूर्ण जगभरात, ४५ लाखापेक्षा अधिक संख्येचे यहोवाचे साक्षीदार, शांती आणि सुरक्षिततेची मानवजातीची एकमेव आशा केवळ देवाचे राज्य आहे याकडे अंगुली दर्शवित, त्या राज्याच्या सुवार्तेचा कार्यशीलतेने प्रचार करत आहेत व इतरांना शिकवत आहेत. देवाची इच्छा पूर्ण करण्यात तुमचा पूर्ण सहभाग आहे का? येशूने केले त्याप्रमाणे, तुम्हीही राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करत आहात का?—प्रे. कृत्ये १०:४२; इब्रीयांस १०:७.
देवाची इच्छा पूर्ण करण्यात आनंद मिळवणे
पित्याची इच्छा काय आहे हे शिकत असताना आनंद मिळत असला तरी, देवाच्या इच्छेविषयी इतरांना शिकवण्यामध्ये त्याहीपेक्षा अधिक आनंद आहे. येशूला त्याच्या पित्याविषयी इतरांना शिकवण्यात आनंद मिळाला. त्याच्यासाठी ते अन्नाप्रमाणे होते. (योहान ४:३४) येशूने त्याच्या पित्याकडून ज्या गोष्टी प्राप्त केल्या, त्यांचा प्रचार आणि त्याने शिकवलेल्या गोष्टी इतरांना शिकवणे असे त्याच्याप्रमाणे आपण केल्यास आपणही खऱ्या सौख्यतेचा आनंद लुटू शकतो. (मत्तय २८:१९, २०) येशूने अभिवचन दिल्याप्रमाणे, “जर ह्या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहा.”—योहान १३:१७.
उदाहरणार्थ, अलिकडेच, पूर्ण-वेळेच्या पायनियर सेवेत पुनःप्रवेश केलेल्या एका मातेने म्हटले: “विविध पवित्र शास्त्राच्या सत्याचा, पवित्र शास्त्र विद्यार्थ्याच्या हृदयाला स्पर्श झाल्यावर त्याचे मुख उजळत असताना पाहणे किती हर्षमय आहे! माझी एक पवित्र शास्त्र विद्यार्थीनी अभ्यासाच्या आधी सर्व शास्त्रवचने लिहून काढते व अभ्यासाच्या दरम्यान महत्त्वाच्या गोष्टी लिहून घेते जेणेकडून, नंतर कोणत्याही उजळणी प्रश्नाचे उत्तर ती देऊ शकते. हे पाहून मला अतिशय आनंद होतो.” तिच्या आणखी एका पवित्र शास्त्र विद्यार्थीनीचा सत्याशी संपर्क ती किशोरवयात होती तेव्हा आला होता. आता ती विवाहीत असून काही व्यक्तिगत समस्यांच्या काळजीमुळे, ती साक्षीदारांना भेटण्याचा अतिशय प्रयत्न करत होती. ह्या स्त्रिला ती पायनियर बहीण भेटल्यावर किती आनंद झाला! ती तरूण स्त्री तिचा पवित्र शास्त्र अभ्यास पुन्हा चालू करण्यासाठी हर्षित झाली.
देवाची इच्छा करण्याचा आनंद टिकवणे
प्राचीन इस्त्राएलातील राजा दाविद असा व्यक्ती होता, ज्याने त्याच्या संपूर्ण जीवनकाळात देवाची इच्छा करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर अनेक कठीण परिस्थिती व दबाव आणले तरी, त्याला असे म्हणण्याची प्रेरणा झाली की: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.” (स्तोत्रसंहिता ४०:८) यहोवाची इच्छा करणे त्याच्या अगदी हृदयात, सर्वस्वात होते. यहोवाची सेवा करताना त्याला मिळणाऱ्या न कोमेजणाऱ्या आनंदाचे ते रहस्य होते. देवाची इच्छा करणे दाविदासाठी एक लोढणे नव्हते. उलट, त्याच्यासाठी ती आनंदविणारी, त्याच्या हृदयातून येणारी इच्छा होती. त्याच्या जीवनात, काही वेळा त्याने पाप केले व तो कमी पडला तरी त्याच्या यहोवा देवाची जीवनभर सेवा करण्यात होईल तितके करण्यासाठी तो झटला.
काही प्रसंगी, आमचा आनंद क्षय पावू शकतो. आम्ही थकू शकतो किंवा आमचे धैर्य खचू शकते. कदाचित, गत काळात ज्या गोष्टी झाल्या त्या, आमच्या समोर समस्या उभ्या करत असतील, आमचा विवेक, आम्हाला मागील काळात आम्ही केलेल्या चुकांमुळे सतावत असेल. अनेक वेळा, देवाच्या वचनाचा पूर्णपणे अभ्यास केल्याने अशा प्रकारच्या भावनांवर आम्ही मात करू शकतो. दाविदाने केले त्याप्रमाणे आम्ही देखील आमच्या “अंतर्यामावर” देवाच्या नियमांना कोरण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. पूर्ण अंतःकरणाने, म्हणजेच, होईल तितक्या क्षमतेने देवाची इच्छा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला तर, तो आम्हाला त्याचा मोबदला त्याप्रमाणे देईल कारण, तो विश्वासू आहे.—इफिसकर ६:६; इब्रीयांस ६:१०-१२; १ पेत्र ४:१९.
इब्रीयांस १०:५-७ वचनात, प्रेषित पौलाने स्तोत्रसंहिता ४०:६-८ मधील दाविदाच्या शब्दांचा संदर्भ घेतला व तो येशू ख्रिस्ताच्याबाबतीत लागू केला हे चित्तवेधक आहे. यावरून, येशू त्याच्या पित्याच्या किती निकट होता हे पौलाने दर्शविले. “इच्छा” या इब्री शब्दात ‘आनंद, आकांक्षा, कृपा, किंवा पसंती,’ हे विचार आहेत. यास्तव, ख्रिस्ताविषयी स्तोत्रसंहिता ४०:८ हे वचन असे वाचले जाऊ शकते: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे.”a खरे पाहता, येशू त्याच्या पित्याला संतोषविणाऱ्या गोष्टींना करू पाहत होता. येशूकडून ज्याची मागणी करण्यात आली होती त्याच्याही तो पलिकडे गेला. त्याच्या पित्याच्या हृदयाच्या निकट असलेल्या गोष्टी त्याने केल्या, व त्यात त्याला सुख मिळाले.
येशूचे संपूर्ण जीवन, देवाची इच्छा काय आहे व देवाकडून येणारे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे हे इतरांना शिकवण्याभोवतीच केंद्रित होते. तो पूर्ण वेळेचा प्रचारक आणि शिक्षक होता व ते काम करण्यात त्याला अतिशय आनंद मिळाला. यास्तव, यहोवाचे कार्य आम्ही जितके अधिक करू त्याचा तर्कशुद्ध परिणाम, अधिक आनंद आम्ही प्राप्त करू शकतो हा आहे. तुमचाही आनंद विपुल होण्यासाठी तुम्ही देखील पूर्ण वेळेचे प्रचार कार्य करू शकाल का?
देवाची इच्छा करताना मिळणाऱ्या आनंदाला टिकवून ठेवण्यासाठी आणखी एक साधन म्हणजे, भवितव्यावर मर्मभेदकपणे एकाग्रता केली पाहिजे. येशूनेही तेच केले. “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला.” शेवटपर्यंत देवाला विश्वासू असल्याचे शाबीत करण्यात व नंतर त्याच्या पित्याच्या राजासनाच्या उजवीकडे बसण्याचे प्रतिफळ प्राप्त करण्यात त्याच्यासाठी आनंद होता.—इब्रीयांस १२:२.
देवाची इच्छा सतत करत राहणाऱ्यांना भवितव्यात मिळणाऱ्या आनंदाची कल्पना करा. जे लोक त्यांच्या स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यास झटतात त्यांच्याकडून त्रास सहन करावा लागला तरी, देवाची इच्छा करण्याचा प्रयत्न करणारे लोक, अशा स्वार्थी लोकांचा नाश होत असताना पाहतील. (२ थेस्सलनीकाकर १:७, ८) पुनरूत्थित प्रिय जनांना देवाची इच्छा शिकण्याची व अंमलात आणण्याची संधी प्राप्त करण्यास जो आनंद मिळेल त्याचा जरा विचार करा. किंवा पृथ्वीला नंदनवन बनवण्याच्या देवाच्या उद्देशाचा विचार करा. आणि शेवटी, यहोवाच्या इच्छेचा विरोधक सैतान, याच्या पूर्ण विध्वंसानंतर मिळणाऱ्या स्वातंत्र्याची देखील कल्पना करा.
होय, आज देवाची इच्छा केल्याने सध्या तसेच, भवितव्यात अमर्यादित आनंद मिळतील. प्रचार कार्यात आम्हाला जो प्रतिसाद मिळेल त्याची पर्वा न करता, येशूने त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी जो रस घेतला त्याच्या उदाहरणाचे आम्ही अनुकरण करू या.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीचे, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स—वीथ रेफेरेन्सेस मध्ये स्तोत्रसंहिता ४०:८ वरील तळटीप पाहा.