वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ३/१ पृ. ३१
  • “देव पक्षपाती नाही”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “देव पक्षपाती नाही”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • अतिशय प्रिय असलेली पत्नी
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • प्रेम कुटुंबाचे ऐक्य घडवते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • तुमचं कुटुंब सुखी होऊ शकतं!
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ३/१ पृ. ३१

राज्य घोषकांचा वृत्तांत

“देव पक्षपाती नाही”

एकोणीशे वर्षांआधी, प्रेरित प्रेषित पेत्राने म्हटले: “देव पक्षपाती नाही तर, प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रे. कृत्ये १०:३४, ३५) यहोवाच्या साक्षीदारांमध्ये सर्व वंशाचे आणि धार्मिक पार्श्‍वभूमीचे लोक भेटतात. ते धार्मिकता इच्छितात व देवाचे भय मानतात. यहोवा, त्या सर्वांचे नव्या जगाच्या संस्थेत स्वागत करतो, उदाहरणार्थ, चड येथील एका विशिष्ट स्त्रीचे त्याने स्वागत केले.

ही स्त्री तिच्या धर्मामध्ये समाधानी नव्हती. अनेक वर्षांआधी तिने यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले तुमचे यौवन—त्यातून सर्वोत्तम ते मिळवणे (इंग्रजी) हे पुस्तक स्वीकारले होते, व त्यामधील उत्तम सल्ल्याबद्दल गुणग्राहकता दाखवली. तिच्यासोबत पवित्र शास्त्र अभ्यास चालू करण्यात आला, व ती न चुकता अभ्यासाला बसत होती. परंतु, राज्य सभागृहांमध्ये होणाऱ्‍या सभांना उपस्थित राहण्यासाठी तिला उत्तेजन देण्यात आले तेव्हा, तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. का बरे? तिच्या अभ्यास करण्याला तिच्या पतीने विरोध केला नसला तरी, राज्य सभागृहात होणाऱ्‍या सभांना उपस्थित राहण्यासाठी त्याने परवानगी देण्यास नकार दर्शवला.

पत्नीला जेव्हा विभागीय संमेलनाला उपस्थित राहायचे होते तेव्हा, जी साक्षीदार व्यक्‍ती तिच्यासोबत अभ्यास करत होती तिने पतीला संमेलनाचा कार्यक्रम दाखवला, व तेथे सादर केल्या जाणाऱ्‍या उत्तम सल्ल्याला ठळकपणे सांगितले. त्याने त्याच्या बायकोला “केवळ एकदाच” जाण्याची संमती दिली. ती त्या संमेलनाला उपस्थित राहिली आणि तिने कार्यक्रमाचा पूर्णपणे आनंद लुटला. तिने शिकलेल्या गोष्टींचे स्पष्टीकरण तिच्या पतीला दिल्यावर, त्याने तिला इतर सभांना उपस्थित राहण्यासाठी बांध घातला नाही. मंडळी विविध वंशांच्या गटाच्या लोकांची बनलेली आहे व ते एकमेकांची सखोल काळजी करतात या वस्तुस्थितीला पाहून ती प्रभावीत झाली. नंतर ती प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहिली आणि तेव्हा इतर राष्ट्रातून आलेल्या साक्षीदारांच्या मांडीवर तिची मुले बसलेली पाहून ती थक्क झाली. साक्षीदारांनी मुलांसोबत एकत्रित भोजन केले व त्यांना त्यांच्या कुटुंबाचे सदस्य असल्यासारखेच वागवले. हा तिच्यासाठी कलाटणी देणारा क्षण होता.

परंतु मग विरोधाला सुरवात झाली. बुजऱ्‍या स्वभावाची असतानाही, ती सभांमध्ये अभिप्राय देऊ लागली व नातलग आणि शेजारपाजारचे लोक तिच्याविरूद्ध करत असलेल्या नकारात्मक टीकांना ती धैर्याने उत्तर देऊ लागली. ती इतकी वर्ष तिच्या पतीबरोबर राहत असली तरी, त्यांचा केवळ पारंपारिक संमतीने विवाह झाला होता. कायदेशीरपणे विवाह करून घेण्याच्या विषयाला ती पुढे कशी मांडणार होती? यहोवाला प्रामाणिकपणे प्रार्थना केल्यानंतर, ती तिच्या पतीसोबत याविषयी बोलली, व तो म्हणाला की तो ह्‍या विषयावर नंतर विचार करील. आणि सरतेशेवटी, त्याने लक्ष दिले व त्या जोडप्याने कायदेशीररीत्या विवाह केला.

त्यांच्यासोबत राहणारी तिची नणंद तिला त्रास देऊ लागली, परंतु पतीने त्याच्या पत्नीची बाजू घेतली. सासरे एकदा भेट देण्यास आले. त्यांनी त्यांच्या मुलाला, त्याच्या पत्नीने धर्म बदलल्यामुळे तिला घटस्फोट देण्याची आज्ञा केली. सासऱ्‍यांनी म्हटले की हिच्यापेक्षा “अधिक चांगल्या बायकोसाठी” तो वधू किंमत देण्यास तयार आहे. यावर त्याच्या मुलाचे उत्तर हे होते: “नाही, मी तसे करणार नाही. ती एक चांगली पत्नी आहे. जर तिला जायचे आहे तर ती गोष्ट वेगळी, परंतु मी तिला जा असे म्हणणार नाही.” पत्नी तिच्या सासऱ्‍यांसोबत विनयशील होती, आणि त्यांना त्यांच्या वर्तणूकीची लाज वाटली. परंतु, ते त्यांच्या गावी परतल्यावर, त्यांनी त्यांच्या मुलाला पत्र लिहिले आणि ह्‍या वेळेस तर त्याला एक अखेरची अट घातली. ते म्हणाले की जर त्याने बायकोला पाठवून देण्यास नकार दिला तर, तेथून पुढे तो त्यांचा मुलगा नाही. पुन्हा एकदा मुलाने त्याच्या पत्नीची बाजू घेतली. तिच्या पतीने इतकी दृढ भूमिका घेतल्याचे पाहून, पत्नीला झालेल्या आनंदाची जरा कल्पना करा.

आता त्यांच्या दोन लहान मुलांना त्यांच्या आईसोबत राज्य सभागृहात जाण्यासाठी अतिशय आवडते. त्यांनी त्यांच्या पित्याकडे नेकटाय देखील मागितले, कारण भाषण देणाऱ्‍या प्रत्येक बांधवाने ती घातलेली त्यांनी पाहिली. आज ही स्त्री बाप्तिस्मा घेतलेली एक बहीण आहे.

यहोवाच्या राज्याची सुवार्ता घोषित करणाऱ्‍या चड येथील ३४५ आनंदी साक्षीदारांमधील ती एक आहे, व खरोखर, “देव पक्षपाती नाही,” याची कृतज्ञता बाळगत आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा