स्पर्धात्मक समाजात मनाची शांती
येशू ख्रिस्ताने त्याच्या प्रेषितांना सल्ला दिला की, “जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला व सर्वांचा सेवक झाला पाहिजे.” सर्वात मोठा कोण ह्याविषयी प्रेषितांमध्ये वाद चालला होता. येशूला त्याप्रकारच्या आत्म्याचा तिटकारा आहे हे त्यांना माहीत होते. आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी त्याने कधीच त्याच्या शिष्यांना एकमेकांविरूद्ध प्रतिस्पर्धी म्हणून उभे केले नाही.—मार्क ९:३३-३७.
येशू ख्रिस्ताचा, पृथ्वीवर येण्याआधी, पहिल्या मानवी जोडप्याच्या निर्मितीमध्ये सहभाग होता व त्यांना कसे बनवले गेले हे त्याला ठाऊक होते. (कलस्सैकर १:१५, १६) पहिल्या मानवी जोडप्याला निर्दयीपणे दुसऱ्यांबरोबर स्पर्धा न करता प्रगती करण्याच्या क्षमतेसह निर्मिले होते. मानवांना, त्यांचा मस्तक कोण हे ठरवण्यासाठी आपापसात भांडायची मुळीच गरज नव्हती, किंवा त्यांनी बचावासाठी प्राण्यांसोबतही झगडून स्पर्धा केली नाही.—उत्पत्ती १:२६; २:२०-२४; १ करिंथकर ११:३.
स्पर्धात्मक आत्म्याचा उगम
मग, मानवी समाजात अशा प्रकारचा निर्दयी स्पर्धात्मक आत्मा वर्चस्व गाजवणारा कसा झाला? मानवी इतिहासात झालेला पहिला खून ते सुचवितो. पहिल्या मानवी जोडप्याचा ज्येष्ठ पुत्र काईन याने दाखवलेल्या स्पर्धात्मक आत्म्याने या दुःखद घटनेकडे निरवले. काईनाने त्याचा भाऊ हाबेल याचा खून केला, कारण देव काईनाच्या नव्हे तर हाबेलाच्या बलिदानाने संतुष्ट झाला, तसेच पवित्र शास्त्र सांगते की काईन “त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला.”—१ योहान ३:१२; उत्पत्ती ४:४-८.
होय, स्पर्धात्मक आत्म्याचा जनक व त्याला कारणीभूत ठरणारा तो दुष्ट दियाबल सैतान आहे. उच्च विशेषाधिकार असलेला तो देवाचा देवदूत होता तरीही, त्याला आणखी हवे होते. (पडताळा यहेज्केल २८:१४, १५.) हव्वेला फसविले तेव्हा, त्याने त्याच्या स्वतःच्या इच्छा प्रकट केल्या. तो म्हणाला की, जर तिने ते मना केलेले फळ खाल्ले तर, ती ‘निश्चितच देवासारखी होईल.’ (उत्पत्ती ३:४, ५) वास्तविक पाहता, सैतानालाच यहोवाशी स्पर्धा करून देवासारखे व्हावयाचे होते. देवाविरूद्ध स्पर्धा करण्याच्या आत्म्यानेच त्याला बंड करण्यास उत्तेजित केले.—याकोब १:१४, १५.
हा आत्मा संसर्गजन्य आहे. सैतानाच्या प्रभावाखाली, पहिल्या कौटुंबिक व्यवस्थेला देवाने दिलेली शांती गमावली गेली. (उत्पत्ती ३:६, १६) देवाविरूद्ध केलेल्या त्या बंडाळीपासून आजपर्यंत, दियाबल सैतानाने, पुरूष आणि स्त्रियांना, नाशकारक स्पर्धा यशाची गुरूकिल्ली आहे असा विश्वास करण्यासाठी फुसलावले आहे व स्पर्धात्मक आत्मा जोपासून मानवजातीवर राज्य केले आहे. तथापि, पवित्र शास्त्र स्पष्टीकरण देते: “जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे.” (याकोब ३:१४-१६) अशाप्रकारे सैतानाने मानवाचा आनंद व मनाची शांती हिरावून घेतली आहे.
स्पर्धेविना यश
सैतानाच्या मन वळवण्याच्या शक्तीच्या विरूद्धतेत, पवित्र शास्त्र स्पर्धेविना यशाची उदाहरणे पुरविते. यातील प्रमुख उदाहरण येशू ख्रिस्ताचे आहे. देवाच्या स्वरूपात अस्तित्वात असतानाही, देवाच्या बरोबरचा होण्याचा त्याने कधीच विचार केला नाही, तर दासाचे स्वरूप धारण केले व पृथ्वीवर आला. त्याहूनही अधिक म्हणजे, त्याने वधस्तंभावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञापालन करून स्वतःला लीन केले. स्पर्धात्मक आत्म्याविरहित असणाऱ्या, ह्या आज्ञाधारक मनोवृत्तीने, त्याला ईश्वरी कृपादृष्टी मिळवण्याकडे निरवले. “ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले.” (फिलिप्पैकर २:५-९) कोण इतके मोठे यश प्राप्त करू शकेल? त्याने त्याच्या पित्याची मर्जी येथपर्यंत संपादली की कोणीही इतकी संपादू शकला नसता, व हे सर्व त्याने कोणताही स्पर्धात्मक किंवा चढाओढीचा आत्मा न दर्शविता केले.—नीतीसूत्रे २७:११.
स्वर्गामधील बहुसंख्य विश्वासू देवदूत अशाच प्रकारची मनोवृत्ती दाखवतात. जरी येशू सर्व देवदूतांचा मुख्य होता व, पृथ्वीवर येताना तो त्यांच्याहून कमी दर्जाचा झाला, तरी त्यांनी स्वेच्छेने त्याच्या गरजांची सेवा केली. स्पष्टतः, आद्य देवदूत म्हणून त्याला बाजूला सारून टाकण्याच्या त्या परिस्थितीचा फायदा घेण्याच्या प्रयत्नाचा विचारही त्यांच्या मनाला चाटून गेला नाही.—मत्तय ४:११; १ थेस्सलनीकाकर ४:१६; इब्रीयांस २:७.
काही अपूर्ण मानवांना अमर आत्मिक जीवनापर्यंत उंचावल्यावर या अवस्थेत ते “देवदूतांचा न्यायनिवाडा” करतील या देवाच्या उद्देशाला त्यांनी ज्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे, यावर विचार केल्यानंतर स्पर्धात्मक मनोवृत्तीचा त्यांना किती तिटकारा आहे याचा आम्हाला पुरावा मिळतो. (१ करिंथकर ६:३) यहोवाची सेवा करण्यात देवदूतांकडे अनुभवाचा खजिना आहे व अपूर्ण मानवांपेक्षाही उत्तम गोष्टी साध्य करण्याची त्यांच्याकडे अधिक क्षमता आहे. तरीही, हे देवदूत मानवांना काय मिळणार आहे याचा हेवा न बाळगता, पृथ्वीवरील अभिषिक्त जणांची सेवा आनंदाने करतात. (इब्रीयांस १:१४) त्यांची उत्तम, अस्पर्धात्मक मनोवृत्ती त्यांना, सार्वभौम प्रभू यहोवा याच्या सिंहासनासमोर सेवा करत राहण्यासाठी शक्ती देते.
पुढे, देवाच्या प्राचीन विश्वासू सेवकांचा विचार करा ज्यांना पुनरूत्थित केले जाईल. अब्राहाम विश्वासाचे एक उल्लेखनीय उदाहरण होता व त्याला, ‘विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा बाप’ म्हटले आहे. (रोमकर ४:९, ११, न्यू.व) इयोबाने धीराचे उत्कृष्ठ प्रतीचे उदाहरण मांडले. (याकोब ५:११) मोशे, जो “भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता,” त्याने इस्त्राएल राष्ट्रास मुक्तीकडे निरवले. (गणना १२:३) ह्या पुरूषांपेक्षा, अपूर्ण मानवांमध्ये विश्वास, धीर, व नम्रतेचे आणखी कोणी चांगली उदाहरणे मांडली आहेत? तथापि, देवाच्या राज्याच्या पृथ्वीवरील क्षेत्रामध्ये वतन मिळण्याच्या ते मार्गावर आहेत. (मत्तय २५:३४; इब्रीयांस ११:१३-१६) बाप्तिस्मा करणाऱ्या योहानासारखे, ते “स्वर्गाच्या राज्यात . . . कनिष्ठ,” असे गणले जातील. (मत्तय ११:११) मग, त्यांचाही विश्वास, धीर किंवा नम्रता स्वर्गात ज्यांना जीवन दिले आहे, त्यांच्यासारखाच किंवा त्यांच्यापेक्षाही वरचढ असण्याची कुरकुर करण्याचा विचारही ते करतील का? नि:संशये नाही! देवाच्या राज्याची ते आनंदी पार्थिव प्रजा असतील.
आज देखील, स्पर्धात्मक आत्म्याविना लोकांचा सहवास आल्हाददायक आहे. पहिल्या लेखात उल्लेखलेला यॉसुऑ नावाचा मनुष्य सोन्याच्या सट्टेबाजीमुळे अतिशय कर्जात बुडाला व त्याने त्याची सर्व मालमत्ता गमावली. त्याच्या तथाकथित “मित्रांनी” त्याला सोडून दिले. त्याच्या पत्नीने यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यास चालू केल्यावर, त्याच्या कुटुंबाला खूप कष्ट सहन करावयास लावल्यामुळे, तो पश्चातापी भावनेने त्यांच्या सभांना गेला. सरतेशेवटी, त्याने स्वतःला स्पर्धात्मक मनोवृत्तीपासून दूर केले व यहोवाच्या साक्षीदारांतील एक झाला. आता त्याला ख्रिस्ती मित्रांचा सहवास आहे जे त्याला दुःखात साहाय्य करण्यास स्वेच्छा दाखवतात व यामुळे तो आनंदी आहे.
मनाची शांती कशी टिकवून ठेवावी
ह्या निर्दयी, स्पर्धात्मक समाजात मनाची शांती टिकवून ठेवणे नेहमीच सोपे नाही. देवाच्या राज्याचा वारसा मिळण्यापासून लोकांना अडथळा घालणारी, “देहाची कर्मे” म्हणजे “वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा,” या गोष्टींना पवित्र शास्त्र धिक्कारते याची नोंद घेणे शहाणपणाचे आहे. ही सर्व कामे स्पर्धात्मक आत्म्याच्या बरोबरीने अगदी सहज जातात. आणि त्यात काही आश्चर्य नाही की प्रेषित पौलाने गलतीकरांना असे उत्तेजन दिले: “आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये.”—गलतीकर ५:१९-२१, २६.
या संदर्भात, पौलाच्या पत्राने पोकळ अभिमानाच्या स्पर्धेविरूद्ध लढा देण्याची गुरूकिल्ली दाखवली आहे. तो म्हणाला: “आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे; अशांविरूद्ध नियमशास्त्र नाही.” (गलतीकर ५:२२, २३) आत्म्याची फळे आम्हाला आमची मने स्पर्धेपासून दूर राहण्यासाठी मदत करतात. उदाहरणार्थ, प्रीती, ह्या गुणाचा विचार करा. पौल स्पष्टीकरण देतो: “प्रीती हेवा करीत नाही.” “प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही; ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही.” (१ करिंथकर १३:४-७) प्रीती विकसित केल्याने, स्पर्धात्मक आत्म्याला चालना देणारी जबर शक्ती म्हणजेच हेवा याला आपण मुळातून उपटून टाकू शकतो. आत्म्याची इतर फळे, आमच्या हृदयातून आणि मनातून, नाशकारक स्पर्धात्मक आत्म्याच्या रेंगाळणाऱ्या खुणांना देखील, पूर्णपणे पुसून टाकण्यासाठी मदत करतात. परिणामांकडे लक्ष न देता, कोणत्याही किंमतीवर इतरांविरूद्धच्या स्पर्धेत विजय मिळवण्यासाठी वाढत्या आर्जवण्याला सहनशीलतेसह दडपून टाकले जाऊ शकते!—नीतीसूत्रे १७:२७.
तथापि, ह्या गुणांना विकसित करण्यासाठी, आपण देवाच्या आत्म्याला आपल्यावर कार्य करण्यास अनुमती दिली पाहिजे. प्रार्थनेत तत्पर राहिल्याने व आम्हाला मदत करण्यासाठी देवाच्या आत्म्याची विचारणा करत राहिल्याने ह्या पवित्र आत्म्याच्या सुदृढ कार्यामुळे आम्ही उत्तेजित होऊ. (लूक ११:१३) आमच्या प्रार्थनेच्या प्रतिसादात, देव आम्हाला काय देईल? पवित्र शास्त्र याचे उत्तर देते: “कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना, व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलिकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.”—फिलिप्पैकर ४:६, ७.
येशूच्या प्रेषितांच्या बाबतीत ही गोष्ट खरी होती. येशूने त्याच्या शेवटल्या रात्री, प्रेषितांसह प्रभूच्या सांज भोजनाची सुरवात केली होती तरीही, त्यांच्यापैकी कोण श्रेष्ठ असेल यावर अजूनही वाद होत होते. (लूक २२:२४-२७) येशूने त्यांच्या विचारात सुधार करण्यासाठी विविध प्रसंगी त्यांना मदत दिली, परंतु त्यांच्यामध्ये हा स्पर्धात्मक आत्मा अगदी खोलवर रूजला होता. (मार्क ९:३४-३७; १०:३५-४५; योहान १३:१२-१७) परंतु, वादविवादाच्या जवळजवळ ५० दिवसांनंतर पवित्र आत्मा मिळाल्यावर त्यांची मनोवृत्ती बदलली. पेंटेकॉस्टच्या दिवशी जमलेल्या आतुर जमावासोबत बोलण्यासाठी कोण प्रतिनिधीत्व करील याविषयी कोणताच वाद झाला नाही.—प्रे. कृत्ये २:१४-२१.
ख्रिस्ती मंडळीवर कोणत्याही मानवी वर्चस्वाला परवानगी नव्हती. सुंतेच्या बाबतीत जेव्हा त्यांना एक समस्या सोडवावी लागली तेव्हा, येशूच्या मृत्युच्या वेळी अजूनही शिष्य न झालेल्या याकोबाने त्या महत्त्वपूर्ण सभेवर देखरेख केली. ख्रिस्ती मंडळीच्या नियमन मंडळाच्या त्या सभेत कोण पुढाकार घेईल यावर वाद झाल्याचे कोणतेच चिन्ह दिसले नाही. स्पर्धात्मक आत्म्याचा कलंक असलेल्या प्रेषितांमधील तो केवढा बदल! पवित्र आत्म्याच्या साहाय्याने, त्यांनी येशूच्या शिकवणी स्मरणात आणल्या व त्याने दिलेल्या धड्यांचा अर्थ काय होतो ते समजू लागले.—योहान १४:२६.
हीच गोष्ट आमच्याबाबतीत खरी होऊ शकते. पवित्र आत्म्याच्या मदतीने, इतरांचे नुकसान होइपर्यंतची स्पर्धा करण्याची कोणतीही गळ यावर आम्ही मात करू शकतो. उलटपक्षी, आम्ही सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलिकडे असलेली मनाची शांती प्राप्त करू शकतो. पवित्र शास्त्र आम्हाला याची खात्री पुरविते की ह्या निर्दयी स्पर्धेचा उगम, दियाबल सैतान याला लवकरात लवकर अथांग डोहात टाकून निष्क्रिय केले जाईल. (प्रकटीकरण २०:१-३) शेजाऱ्यांमधील स्पर्धा तेथून पुढे राहणार नाहीत. मग, याच्या परिणामात, कोणतीच प्रगती नसलेला हा समाज असेल का? मुळीच नाही! मानवांना आपापसातील कोणत्याही स्पर्धेने नव्हे तर, येशूच्या खंडणी बलिदानाचा अवलंब केल्याने परिपूर्णतेप्रत नेले जाईल.—१ योहान २:१, २.
आधी उल्लेख केलेला केनॉस्के, ज्याने पूर्वी पुष्कळ कारची विक्री करून जगिक यशाचे वैभव अनुभवले, त्याने स्वतःला मानसिक आणि शारीरिकरित्या दमवून टाकले, परंतु शेवटी त्याने ते काम सोडले. तो म्हणतो, “आता माझे जीवन खऱ्या आनंदाने तुडुंब भरले आहे.” खऱ्या यशाने येशूच्या जीवनाला का चिन्हित केले हे त्याने पाहिले. देवाच्या जगव्याप्त संघटनेत आता तो जे काही करू शकतो त्यात त्याला तजेला मिळत आहे. अशाप्रकारे, स्पर्धा नसलेल्या नव्या जगासाठी त्याची तयारी केली जात आहे. तुमच्या क्षेत्रातील एखाद्या राज्य सभागृहाला भेट देऊन, व यहोवाच्या साक्षीदारांसोबत संगती केल्याने तुम्हाला ह्या नव्या जगाच्या समाजाची झलक पाहता येईल.
[७ पानांवरील चित्रं]
देवाच्या नव्या जगात मानवी समाज शांती आणि सहकार्याचा आनंद लुटेल