ईश्वरी शिक्षण विजय मिळवते
“तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील. ‘हाच मार्ग आहे; याने चला’, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल.”—यशया ३०:२०, २१.
१. यहोवाच्या सूचनांना उचितपणे ईश्वरी शिक्षण का म्हणता येऊ शकते?
यहोवा देव कोणालाही प्राप्त करता येऊ शकेल अशा उत्तम शिक्षणाचा स्रोत आहे. तो विशेषपणे त्याच्या वचनातून बोलत असताना आम्ही ऐकले तर, तो आमचा महान शिक्षक होऊ शकेल. (यशया ३०:२०) इब्री शास्त्रवचने त्याला “देवाधिदेव” असे देखील म्हणतात. (स्तोत्रसंहिता ५०:१) या कारणास्तव, यहोवाच्या सूचना “ईश्वरी शिक्षण” आहेत.
२. केवळ देवच बुद्धिमान आहे हे कोणत्या अर्थाने सत्य आहे?
२ जगाला त्याच्या अनेक शैक्षणिक संघटनाविषयी फार गर्व आहे, परंतु त्यातील कोणतीही ईश्वरी शिक्षण देत नाही. मानवजातीने संपूर्ण इतिहासात प्राप्त केलेले ज्ञान, ईश्वरी शिक्षणावर आधारित असलेल्या यहोवाच्या असीम बुद्धिच्या तुलनेत अगदीच अल्प आहे. रोमकर १६:२७ म्हणते की, देव एकटाच बुद्धीमान आहे, आणि हे केवळ यहोवाबद्दल खरे आहे कारण त्याच्या एकट्याजवळच अमर्याद बुद्धी आहे.
३. येशू ख्रिस्त हा पृथ्वीवर वावरलेला सर्वथोर शिक्षक का आहे?
३ देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त बुद्धिचा उत्कृष्ट नमुना आहे आणि तो पृथ्वीवर वावरलेला सर्वथोर शिक्षक आहे. यात आश्चर्य नाही! कारण यहोवा स्वर्गामध्ये अनेक युगापासून त्याचा शिक्षक होता. खरे पाहता, त्याची पहिली सृष्टी, त्याच्या एकुलत्या एका पुत्राला देवाने शिकवण्यास सुरू केले तेव्हाच ईश्वरी शिक्षणाची सुरुवात झाली. यास्तव येशू म्हणू शकला: “पित्याने शिकवल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो.” (योहान ८:२८; नीतीसूत्रे ८:२२, ३०) पवित्र शास्त्रात येशूचे स्वतःचे शब्द ईश्वरी शिक्षणाच्या आमच्या ज्ञानात भर टाकतात. येशूने शिकवल्याप्रमाणे त्याचे अभिषिक्त अनुयायी त्यांच्या महान शिक्षकाचे आज्ञापालन करतात. सर्व मंडळ्यांद्वारे “देवाचे नानाविध ज्ञान” जाहीर करावे अशी त्याची इच्छा आहे.—इफिसकर ३:१०, ११; ५:१; लूक ६:४०.
बुद्धिसाठी शोध
४. मेंदूच्या ग्रहणशक्तीबद्दल काय म्हटले आहे?
४ ईश्वरी शिक्षणापासून मिळणारी खरी बुद्धी प्राप्त करण्याकरता देवाने दिलेल्या विचार करण्याच्या कार्यक्षमतेला योग्यपणे वापरण्याची हाक आहे. अर्थातच, हे शक्य आहे, कारण मेंदूमध्ये अतिशय सामर्थ्य आहे. याविषयी द इनक्रेडिबल मशीन हे पुस्तक म्हणते: “आम्ही कितीही गुंतागंतीच्या संगणकाचे स्वप्न पाहिले तरी तो मानवी मेंदूच्या गुंतागुंतीपुढे व लवचिकपणापुढे फिक्काच पडेल . . . तुमच्या मेंदूत कोणत्याही क्षणाला जाणाऱ्या लाखो संवेदनात्मक लहरींच्या माध्यमाने माहितीचा अपूर्व साठा नेला जातो. त्या तुमच्या शरीराच्या आतील तसेच बाहेरील वातावरणात काय चालले आहे ते सांगत असतात: तुमच्या पायाच्या बोटातील वात किंवा कॉफीचा सुगंध, किंवा मित्राचे गंमतीदार भाष्य. इतर काही लहरी, माहितीचे पृथक्करण व परीक्षण करुन त्यामधून भावना, आठवणी विचार व योजना निर्माण करतात की ज्यामुळे एखाद्या निर्णयाला येता येते. मेंदूतून निघणाऱ्या संवेदना तेव्हाच तुमच्या शरीराला काय करायचे हे लगेच सांगतात: तुमच्या पायाच्या बोटांना त्वरीत हालविणे, कॉफी घ्या, हसा, किंवा विनोदी प्रत्युत्तर द्या. याकाळात, तुमचा मेंदू, तुमचा श्वासोच्व्छास, रक्ताचे रासायनिक गुणधर्म, तापमान आणि तुम्हाला जाणीव नसलेल्या अशा इतर गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. तुमच्या सभोवतालची परिस्थिती कायम बदलणारी असताना देखील, तो तुमचे शरीर स्थिर आणि चांगले ठेवण्यास आज्ञा देतो. तो भविष्यातील मागणीविषयी देखील तयारी करतो.”—पृष्ठ ३२६.
५. शास्त्रवचनाच्या अर्थाने बुद्धी काय आहे?
५ निसंशये, मानवी मेंदूत अद्भुत योग्यता असली तरी, आमच्या मनाचा वापर आम्ही चांगल्याप्रकारे कसा करू शकतो? आम्ही स्वतःला पूर्णपणे एखादी भाषा, इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान किंवा तुलनात्मक धर्माचा अभ्यास करण्यासाठी गुंतवून घेऊ नये. आम्ही आमच्या विचार करण्याच्या कार्यशक्तीचा प्राथमिक उपयोग ईश्वरी शिक्षण प्राप्त करण्यासाठी केला पाहिजे. हेच केवळ अस्सल बुद्धीत परिणामित होऊ शकते. परंतु खरी बुद्धी काय आहे? शास्त्रवचनीय अर्थानुसार, बुद्धी हा शब्द अचूक माहिती व समजूतदारपणा यावर आधारित असलेला योग्य निर्णय यावर जोर देतो. ज्ञान आम्हाला माहिती आणि समजूतदारपणाचा वापर समस्या यशस्वीपणे सोडविण्यासाठी, त्यापासून अलिप्त राहण्यासाठी, किंवा त्या टाळण्यासाठी, इतरांना सल्ला देण्यासाठी आणि ध्येये प्राप्त करण्यासाठी मदत करते. यथायोग्यपणे, पवित्र शास्त्र, बुद्धी आणि मूर्खता व वेडेपणा यांच्यात तफावत दाखवते—या गुणांना आम्ही खात्रीने टाळले पाहिजे.—अनुवाद ३२:६; नीतीसूत्रे ११:२९; उपदेशक ६:८.
यहोवाचे श्रेष्ठ पाठ्यपुस्तक
६. आम्हाला खरी बुद्धी प्रदर्शित करावयाची असल्यास, कशाचा चांगला वापर केला पाहिजे?
६ आमच्या सभोवती पुष्कळ जगीक ज्ञान आहे. (१ करिंथकर ३:१८, १९) या जगातील, शाळा आणि ग्रंथालये लक्षावधी पुस्तकांनी भरलेली आहेत! यातील पुष्कळ पाठ्यपुस्तके भाषा, गणित, विज्ञान आणि इतर क्षेत्रातील ज्ञानाविषयी माहिती देतात. परंतु महान शिक्षकाने दिलेले पाठ्यपुस्तक, त्याचे प्रेरित वचन पवित्र शास्त्र इतर सर्व पाठ्यपुस्तकापेक्षा अधिक वरचढ आहे. (२ तीमथ्य ३:१६, १७) ते इतिहास, भूगोल आणि वनस्पतीशास्त्र या विषयाचा अचूक उल्लेख करते केवळ त्यामुळेच नव्हे तर भवितव्यात काय होईल हे सांगण्यातदेखील त्याची अचूकता दिसते. याशिवाय, ते आम्हाला आता देखील आनंदी आणि उपयुक्त जीवन जगण्यास मदत करते. अर्थातच, जगीक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे पाठ्यपुस्तकाचा उपयोग करावा लागतो त्याप्रमाणे आम्ही “देवाने [यहोवा, न्यूव] शिकवलेले” असणाऱ्यांसारखे खरे ज्ञान प्रदर्शित करण्यासाठी देवाच्या श्रेष्ठ पाठ्यपुस्तकाशी चांगले परिचित झाले पाहिजे.—योहान ६:४५.
७. पवित्र शास्त्राच्या विषयाबरोबर बौद्धिक परिचय पुरेसा नाही असे तुम्ही का म्हणता?
७ तरीसुद्धा, पवित्र शास्त्राबरोबर असलेला बौद्धिक परिचय ईश्वरी शिक्षणाची खरी बुद्धी आणि मान्यता नाही. उदाहरणार्थ: सतराव्या शतकातील कर्नेलियस वेनʹडरस्टेनʹ नावाच्या कॅथोलिक माणसाने जेसूट शिक्षक होण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची उंची कमी असल्यामुळे त्याला नाकारले गेले. द जेसूट हिस्ट्री ॲण्ड लिजन्ड ऑफ द सोसायटी ऑफ जिझस या त्यांच्या पुस्तकात मॅनʹफ्रेट बारʹटल म्हणतात: “समितीने वेनʹडरस्टेनʹच्या उंचीच्या आवश्यकतेचा आग्रह धरण्याचे सोडले, परंतु एक शर्त त्यांनी ठेवली की संपूर्ण पवित्र शास्त्र त्याने तोंडपाठ म्हणून दाखवले पाहिजे. जर वेनʹडरस्टेनʹने ही हट्टीपणाची मागणी मान्य केली असती तर ही गोष्ट सांगण्यात काही तथ्य राहिले नसते.” संपूर्ण पवित्र शास्त्राला तोंडपाठ करण्यात किती प्रयत्न करावे लागले! तथापि, देवाचे वचन तोंडपाठ करण्याऐवजी ते समजणे निश्चितच अतिशय महत्त्वाचे आहे.
८. आम्हाला ईश्वरी शिक्षणापासून फायदा मिळवण्यासाठी व खरी बुद्धी प्रदर्शित करण्यासाठी काय मदत करील?
८ आम्हाला ईश्वरी शिक्षणापासून पूर्ण लाभ मिळवून खरी बुद्धी प्रदर्शित करावयाची असल्यास, शास्त्रवचनांच्या अचूक ज्ञानाची गरज आहे. आम्ही यहोवाच्या पवित्र आत्म्याने किंवा कार्यकारी शक्तीने मार्गदर्शित होण्यास हवे. हे आम्हाला “देवाच्या गहन गोष्टी,” गूढ सत्ये समजण्यास मदत करील. (१ करिंथकर २:१०) या कारणास्तव, यहोवाच्या श्रेष्ठ पाठ्यपुस्तकाचा चांगल्याप्रकारे अभ्यास करण्यासाठी श्रम तसेच पवित्र आत्म्याद्वारे त्याचे मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रार्थना करू या. नीतीसूत्रे २:१-६ च्या अनुषंगाने, आपण ज्ञानाकडे लक्ष देऊ या, सुज्ञानाकडे आपले मन लावू, आणि विवेकाला हाक मारू या. गुप्त निधीप्रमाणे शोधण्याद्वारे आम्ही हे करण्याची गरज आहे, तरच मग आम्हाला ‘परमेश्वराच्या [यहोवा, न्यूव] भयाची जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान प्राप्त होईल.’ ईश्वरी शिक्षणाच्या विजयाच्या काही फायद्यांचा विचार केल्याने देवाने दिलेल्या बुद्धिसाठी ते आमची गुणग्राहकता वाढवील.
प्रगतीशील समज
९, १०. देवाने उत्पत्ती ३:१५ मध्ये काय म्हटले, व त्या वचनाची उचित समज काय आहे?
९ यहोवाच्या लोकांना प्रगतीशीलपणे शास्त्रवचनांची समज दिल्यामुळे ईश्वरी शिक्षण विजय मिळवत आहे. उदाहरणार्थ, एदेन बागेत सर्पाद्वारे बोलणारा दियाबल सैतान होता, व मना केलेले फळ खाल्ल्यामुळे मृत्यूची शिक्षा दिली जाईल असे म्हटले तेव्हा देवाने लबाडी केली असा खोटा आरोप त्याने लावला हे आम्ही शिकलो. तरीसुद्धा, आम्ही हे पाहतो की यहोवा देवाला अवज्ञाकारी राहिल्यामुळे मानवजातीवर मृत्यू ओढावला. (उत्पत्ती ३:१-६; रोमकर ५:१२) तथापि, देव, सर्प आणि सैतानाला बोलला तेव्हा मानवजातीला त्याने याप्रमाणे आशा दिली: “तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.”—उत्पत्ती ३:१५.
१० त्या वचनात सामावलेले रहस्य, ईश्वरी शिक्षणाद्वारे प्रगतीशीलपणे प्रकट होणार होते. यहोवाने त्याच्या लोकांना पवित्र शास्त्राचा प्रमुख विषय, अब्राहाम आणि दावीदाचा वंशज, राज्याधिपत्य करण्यासाठी कायदेशीर हक्क असलेल्या संतानाकरवी यहोवाच्या सार्वभौमतेचे समर्थन हा आहे हे शिकवले आहे. (उत्पत्ती २२:१५-१८; २ शमुवेल ७:१२, १३; यहेज्केल २१:२५-२७) आमच्या महान शिक्षकाने येशू ख्रिस्त हा “स्त्री”चे, देवाच्या विश्वव्यापी संस्थेचे प्रमुख संतान आहे, याविषयी आम्हाला शिकवले आहे. (गलतीकर ३:१६) सैतानाने त्याच्यावर आणलेल्या कोणत्याही परीक्षेला न जुमानता, येशू मृत्यूपर्यंत म्हणजे, संतानाची टाच फोडेपर्यंत सत्वपरीक्षेत टिकून राहिला. सैतानाचे, ‘जुनाट सापाचे’ डोके फोडण्यामध्ये मानवजातीतून घेतलेले १,४४,००० राज्याचे सहवारीस येशूसोबत भाग घेतील हे देखील आम्ही शिकलो. (प्रकटीकरण १४:१-४; २०:२; रोमकर १६:२०; गलतीकर ३:२९; इफिसकर ३:४-६) देवाच्या वचनाच्या ज्ञानाची आम्हाला किती कदर वाटते!
देवाच्या अद्भुत प्रकाशात
११. लोकांना आध्यात्मिक प्रकाशात आणण्याद्वारे ईश्वरी शिक्षण विजय मिळवते असे का म्हटले जाऊ शकते?
११ लोकांना आध्यात्मिक प्रकाशात आणण्याद्वारे ईश्वरी शिक्षण विजय मिळवत आहे. अभिषिक्त ख्रिश्चनांना याचा अनुभव पहिले पेत्र २:९ ची पूर्णता करण्यामध्ये आला होता: “तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे ‘स्वतःचे लोक’ असे आहा; ह्यासाठी की, ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.’” देवाने दिलेल्या प्रकाशाचा आनंद आज, नंदनवनमय पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याची इच्छा असलेला “मोठा लोकसमुदाय” देखील लुटत आहे. (प्रकटीकरण ७:९; लूक २३:४३) देव त्याच्या लोकांना शिकवत असताना, नीतीसूत्रे ४:१८ खरे शाबीत होते: “धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे.” शिक्षकाच्या चांगल्या मदतीमुळे विद्यार्थी ज्याप्रमाणे व्याकरण, इतिहास किंवा इतर विषयात प्रगती करतात तसेच ही प्रगतीशील शिकून घेण्याची रीत आमची ईश्वरी शिक्षणाची समज शुद्ध करते.
१२, १३. ईश्वरी शिक्षणाने कोणत्या सिद्धांतासंबंधीच्या धोक्याविरूद्ध यहोवाच्या लोकांचे रक्षण केले आहे?
१२ ईश्वरी शिक्षण आणखी एका मार्गाने विजय मिळवते व ते म्हणजे, नम्र जनांचे ‘भूतांच्या शिक्षणापासून’ ते संरक्षण करते. (१ तीमथ्य ४:१) पण तेच, ख्रिस्ती धर्मजगताकडे पाहा! रोमचे कॅथोलिक धर्माधिकारी जॉन हेन्री न्यूमॅन यांनी १८७८ मध्ये लिहिले: “ख्रिश्चनत्वाच्या सामर्थ्याने दुष्टाच्या प्रभावाला विरोध करण्यात आणि सुवार्तिकाच्या उपयोगासाठी पिशाच्च-उपासनेत साहित्य व रितीरिवाजाचे पूर्ण रुपांतर करुन . . . परिस्थिती उद्भवल्यास, ते स्वीकारण्यास किंवा त्याचे अनुकरण करण्याविषयी किंवा सामान्य लोकांच्या अस्तित्वात असलेल्या विधी आणि प्रथा तसेच सुशिक्षित लोकांचे तत्त्वज्ञान याविषयी चर्चच्या नेत्यांनी अगदी प्राचीन काळापासून तयारी केली होती.” न्यूमॅन यांनी भर टाकली की, पवित्र पाणी, धर्मोपदेशकाची अधिकार वस्रे आणि मूर्त्या “या सर्वांचा उगम मूर्तीपूजकातून आहे आणि चर्चमध्ये त्याचा स्वीकार करून त्यांना पवित्र केले आहे.” ईश्वरी शिक्षण अशा धर्मत्यागापासून देवाच्या लोकांचे रक्षण करत असल्यामुळे ते फार कृतज्ञ आहेत. ते पिशाच्चवादाच्या सर्व प्रकारावर जय मिळवत आहे.—प्रे. कृत्ये १९:२०.
१३ ईश्वरी शिक्षण धार्मिक चुकांवर सर्व प्रकारे विजय मिळवते. उदाहरणार्थ, देवाने शिकवलेले या नात्याने, आम्ही त्रैक्यावर विश्वास ठेवत नाही परंतु यहोवा परमप्रधान आहे, येशू त्याचा पुत्र आहे, आणि पवित्र आत्मा देवाची कार्यकारी शक्ती आहे असे आपण मानतो. आम्ही नरकाग्नीला भीत नाही, तर आम्हाला माहीत आहे की नरक मानवजातीची सर्वसाधारण कबर आहे. खोट्या धर्माचे लोक, मानवाचा जीव अमर आहे असे म्हणत असले तरी, मृतांना काही कळत नाही हे आम्हाला माहीत आहे. ईश्वरी शिक्षणाद्वारे प्राप्त झालेल्या सत्याची ही यादी अशीच वाढत जाते. खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य, मोठी बाबेलच्या आध्यात्मिक दास्यत्वापासून मुक्त असणे किती आशीर्वादाचे आहे!—योहान ८:३१, ३२; प्रकटीकरण १८:२, ४, ५.
१४. देवाचे सेवक आध्यात्मिक प्रकाशात चालत का राहू शकतात?
१४ ईश्वरी शिक्षण, धार्मिक चूकांवर विजय मिळवत असल्यामुळे, देवाच्या लोकांना आध्यात्मिक प्रकाशात चालण्यासाठी मदत मिळते. याच्या परिणामात ते त्यांच्या मागून येत असलेल्या वाणीला असे म्हणताना ऐकतात की: “हाच मार्ग आहे, याने चला.” (यशया ३०:२१) देवाचे शिक्षण त्याच्या लोकांचे खोट्या तर्कापासून देखील संरक्षण करते. करिंथच्या मंडळीत “खोटे प्रेषित” त्रास देत असताना प्रेषित पौलाने लिहिले: “आमच्या युद्धाची शस्रे दैहिक नाहीत तर, तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरूद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो.” ( २ करिंथकर १०:४, ५; ११:१३-१५) मंडळीमध्ये सौम्यपणे दिलेले शिक्षण आणि बाहेरील लोकांना राज्याच्या सुवार्तेचे आमचे प्रचारकार्य ईश्वरी शिक्षणाच्या विरूद्ध असणाऱ्या तर्कवितर्काला जमीनदोस्त करते.—२ तीमथ्य २:२४-२६.
आत्म्याने व खरेपणाने भक्ती करा
१५, १६. यहोवाची भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने करण्याचा अर्थ काय होतो?
१५ राज्य प्रचाराच्या कार्यात वाढ होत असताना, “आत्म्याने व खरेपणाने” देवाची उपासना कशी करावी हे नम्र जनांना दाखविण्याद्वारे ईश्वरी शिक्षण विजय मिळवते. सुखार शहराच्या जवळील याकोबाच्या विहीरीजवळ येशूने एका शोमरोनी स्त्रीला म्हटले की, तो तिला सार्वकालिक जीवन देणारे पाणी देईल. शोमरोनी लोकांना उद्देशून त्याने आणखी म्हटले: “तुम्हाला ठाऊक नाही अशाची तुम्ही उपासना करता . . . तरी खरे उपासक आत्म्याने आणि खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे, कारण आपले उपासक असे असावेत अशी पित्याची इच्छा आहे.” (योहान ४:७-१५, २१-२३) येशूने तेव्हा स्वतःची ओळख मशीहा अशी करुन दिली.
१६ परंतु देवाची उपासना आम्ही आत्म्याने कशी करू शकतो? त्याच्या वचनाच्या अचूक ज्ञानावर आधारित असलेल्या प्रीतीने भरलेल्या कृतज्ञ अंतःकरणाने त्याची शुद्ध उपासना करण्याद्वारे. धार्मिक लबाड्यांना नाकारुन आणि यहोवाच्या श्रेष्ठ पाठ्यपुस्तकात प्रकट केलेली ईश्वरी इच्छा करण्याद्वारे आम्ही त्याची उपासना आत्म्याने करु शकतो.
परीक्षा आणि जगावर विजय
१७. ईश्वरी शिक्षणाने यहोवाच्या सेवकांना परीक्षांचा सामना करण्यासाठी मदत केली हे तुम्ही कसे शाबीत करु शकता?
१७ देवाचे लोक परीक्षांचा सामना करत असताना ईश्वरी शिक्षण पुनःपुन्हा विजय मिळवते. याचा विचार करा: सप्टेंबर १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या आरंभास, यहोवाच्या सेवकांना त्याच्या श्रेष्ठ पाठ्यपुस्तकातून खास सुक्ष्मदृष्टिची गरज होती. नोव्हेंबर १, १९३९ च्या वॉचटावर मधील लेखाने मोठी मदत दिली, कारण त्यात ख्रिस्ती तटस्थतेबद्दल स्पष्ट ईश्वरी शिक्षण प्रस्तुत केले गेले. (योहान १७:१६) अशाचप्रकारे, १९६० च्या आरंभास, वॉचटावर लेखाने, सरकारी “वरिष्ठ अधिकाऱ्यांना” सापेक्ष अधीनता दाखवण्याचे सांगितले व यामुळे देवाच्या सेवकांना सामाजिक अस्वस्थतेचा सामना करतेवेळी ईश्वरी शिक्षणाचे पालन करण्यास मदत मिळाली.—रोमकर १३:१-७; प्रे. कृत्ये ५:२९.
१८. दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकात तथाकथित ख्रिश्चनांनी हिणकस मनोरंजनाकडे कोणत्या दृष्टीने पाहिले, आणि त्या बाबतीत आज ईश्वरी शिक्षणाने कोणती मदत पुरवली आहे?
१८ ईश्वरी शिक्षण आम्हाला खासपणे हिणकस मनोरंजनाच्या मोहावर विजय मिळवण्यास मदत करते. आमच्या सामान्य युगाच्या दुसऱ्या व तिसऱ्या शतकात ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्यांनी काय म्हटले ते लक्षात घ्या टर्टुलियनने लिहिले: “सर्कशीतील मूर्खपणा, नाट्यगृहातील निर्लज्जपणा आणि आखाड्यातील रानटी अवस्थेबद्दलचे बोलणे, पाहणे आणि ऐकणे याविषयी आम्हाला काही करावयाचे नाही.” त्याच काळातील दुसऱ्या एका लेखकाने विचारले: “दुष्टतेचा विचारही करायचा नसताना अशा हिणकस मनोरंजनाविषयी एखादा विश्वासू ख्रिस्ती व्यक्ती काय करु शकतो? तीव्र वासनांच्या प्रतिनिधीत्वात सुखविलासी होण्यात त्याला काय आनंद मिळेल?” हे लेखक पहिल्या शतकातील ख्रिश्चनांच्या काही काळानंतर राहत असतानाही त्यांनी हिणकस मनोरंजनाबद्दल धिक्कार व्यक्त केला. आज, ईश्वरी शिक्षण आम्हाला अश्लील, अनैतिक आणि हिंसक मनोरंजन टाळण्याची बुद्धी देते.
१९. ईश्वरी शिक्षण जगावर विजय मिळवण्यासाठी आम्हाला कसे मदत करते?
१९ ईश्वरी शिक्षणाचे पालन केल्याने जगावरही विजय मिळवण्यास ते आम्हाला मदत करते. होय, आमच्या महान शिक्षकाच्या शिक्षणाचे पालन केल्याने सैतानाच्या अधीन असलेल्या ह्या जगाच्या दुष्ट प्रभावांवर विजय मिळवण्यास आम्हाला ते साहाय्य करते. (२ करिंथकर ४:४; १ योहान ५:१९) इफिसकर २:१-३ म्हणते की, आम्ही आपल्या पातकांमुळे मृत झालेलो होतो व त्या पातकांमध्ये आपण पूर्वी चालत होतो, अर्थात अंतरिक्षातील राज्याच्या अधिपतीच्या धोरणाप्रमाणे चालत असताना देवाने आम्हाला जिवंत केले. जगीक इच्छांवर आणि त्याचा व आमचा शत्रू—आद्य लबाडी करणारा, दियाबल सैतानापासून बाहेर निघणाऱ्या आत्म्यावर विजय मिळवण्यासाठी ईश्वरी शिक्षण आम्हाला मदत करते यास्तव आम्ही यहोवाचे आभार मानतो!
२०. कोणते प्रश्न पुढे विचार करण्याच्या योग्यतेचे आहेत?
२० अशाप्रकारे, ईश्वरी शिक्षण अनेक मार्गात स्पष्ट विजय मिळवते. खरोखर, त्याच्या सर्व विजयांना उद्धृत करणे अशक्य आहे. सर्व जगभरातील लोकांवर ते परिणाम करते. परंतु ते तुमच्यासाठी काय करत आहे? ईश्वरी शिक्षणाचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होत आहे?
तुम्ही काय शिकलात?
▫ खऱ्या बुद्धीची व्याख्या कशी केली जाऊ शकते?
▫ देवाने उत्पत्ती ३:१५ च्या बाबतीत प्रगतीशीलपणे काय प्रगट केले?
▫ ईश्वरी शिक्षणाने आध्यात्मिक गोष्टीत कसा विजय मिळवला आहे?
▫ देवाची आत्म्याने आणि खरेपणाने भक्ती करण्याचा अर्थ काय होतो?
▫ ईश्वरी शिक्षणाने यहोवाच्या सेवकांना परीक्षांवर आणि जगावर विजय मिळवण्यास कशी मदत केली आहे?
[१० पानांवरील चित्रं]
येशूची टांच संततीने फोडेपर्यंत—मृत्यूपर्यंत—त्याने सत्त्व राखले