वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 २/१ पृ. ४-७
  • दुष्टतेचे प्रतिनिधी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दुष्टतेचे प्रतिनिधी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पहिले बंड
  • इतर देवदूतांचे बंड
  • मनुष्यजातीचे शत्रू
  • त्यांचे किती काळापर्यंत सहन करावे लागणार?
  • आत्मिक क्षेत्रातील अधिपती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • सार्वकालिक जीवनाचा शत्रू
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • देवदूत आणि दुरात्मे यांच्याबद्दलचं सत्य
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 २/१ पृ. ४-७

दुष्टतेचे प्रतिनिधी

मानवांच्या व्यवहारात असलेल्या दुरात्म्यांच्या भूमिकेविषयी पवित्र शास्त्राचे स्पष्टीकरण दुष्टांविषयीच्या मुलभूत प्रश्‍नांची उत्तरे देते, जी अन्यथा निरूत्तर राहिली असती. उदाहरणार्थ, बाल्कनमध्ये चालू असलेल्या युद्धाविषयी इंटरनॅशनल हेरल्ड ट्रिब्यून मधील विधानाचा विचार करा: “युरोपातील समाजाच्या अन्वेषकांच्या संघाने असा निष्कर्ष काढला की, त्या [सैनिकांनी] २०,००० मुसलमान स्त्रिया तसेच मुलींवर बलात्कार केला . . . घाबरवणे व त्यांची निकृष्ट स्थिती करण्यासाठी दहशतीची पद्धतशीर योजना करून घरे सोडण्यास त्यांना भाग पाडले.”

टाईम मासिकातील एका निबंधाने ही परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी खात्री न पटण्यासारखा प्रयत्न केला: “काहीवेळा, युद्धातील तरूण मनुष्य, त्यांच्या प्रौढांना, अधिकाऱ्‍यांना खूष करण्यासाठी बलात्कार करण्याची शक्यता असते, व याद्वारे ते जणू एकप्रकारे पिता-पुत्रामधील संमती प्राप्त करून घेतात. बलात्कार हे, एका विशिष्ट लष्करी गटातील क्रुरतेच्या कराराचा पुरावा आहे. गटाच्या हातमिळवणी करता न येण्याजोग्या उद्देशाप्रमाणे करण्यासाठी, जी तरुण व्यक्‍ती कुरूप गोष्टी करण्यास इच्छूक असते ती त्याच्या स्वःतच्या विवेकाला खालच्या दर्जावर नेते. दुष्कृत्य करण्याद्वारे एखादा मनुष्य त्याच्या निष्ठेची खात्री करतो.”

परंतु “गटाचा हातमिळवणी करता न येण्याजोगा उद्देश” एखाद्याच्या वैयक्‍तिक विवेकापेक्षा अधिक हिणकस का असतो बरे? व्यक्‍तिगतपणे, बहुतकरून प्रत्येकाची त्याच्या शेजाऱ्‍यासोबत शांतीत राहण्याची इच्छा असते. तर मग, युद्धाच्या वेळी, लोक बलात्कार, यातना व एकदुसऱ्‍यांना ठार का मारतात बरे? याचे मुख्य कारण म्हणजे दुरात्मिक शक्‍ती कार्य करते हे आहे.

दुरात्म्यांची भूमिका समजल्यामुळे काहींनी संबोधलेला “वेदान्तीयांची समस्या,” यावर देखील उपाय पुरवते. तीन विधानांचा समेट कसा करावा ही एक समस्या आहे: (१) देव सर्वशक्‍तीमान आहे; (२) देव प्रेमळ आणि चांगला आहे; व (३) भयंकर गोष्टी घडतात. काहींचे असे मत आहे की, यापैकी कोणत्याही दोन्हींबरोबर समेट करणे शक्य आहे तरी, तुम्ही तिन्ही बरोबर कधीच समेट करू शकत नाही. देवाचे वचन स्वतः उत्तर देते, व या उत्तरात अदृश्‍य आत्मे, दुष्टतेच्या प्रतिनिधींचा समावेश होतो.

पहिले बंड

पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की, देव स्वतः एक आत्मा आहे. (योहान ४:२४) काही काळात तो लाखो इतर आत्मिक व्यक्‍तींचा, देवपुत्रांचा निर्माणकर्ता झाला. देवाचा सेवक दानीएल, याने, दृष्टांतात दहा कोटी देवदूतांना पाहिले. यहोवाने निर्माण केलेले सर्वच आत्मिक व्यक्‍ती धार्मिक व त्याच्या इच्छेनुरूप असणारे होते.—दानीएल ७:१०; इब्रीयांस १:७.

नंतर, देवाने “पृथ्वीचा पाया घातला,” तेव्हा देवाच्या या पुत्रांनी “मिळून गायन केले” व “जयजयकार” करण्यास सुरवात केली. (ईयोब ३८:४-७) परंतु त्यांच्यातील एकाने, जी भक्‍ती यथार्थपणे देवाला मिळाली पाहिजे ती स्वतःला मिळण्याविषयीची इच्छा विकसित केली. देवाच्या विरुद्ध बंडाळी करण्याद्वारे, या देवदूताने स्वतःला सैतान (म्हणजे “विरोधक”) व दियाबल (म्हणजे “निंदक”) बनवले.—पडताळा यहेज्केल २८:१३-१५.

एदेनात पहिली स्त्री, हव्वा हिच्याबरोबर बोलण्यासाठी सर्पाचा उपयोग करून, सैतानाने, बागेतील विशिष्ट झाडाचे फळ न खाण्याची देवाची थेट आज्ञा मोडण्यासाठी तिचे मन वळवले. त्यानंतर तिचा पती यात सामील झाला. अशाप्रकारे, पहिले मानवी जोडपे, यहोवा विरुद्ध बंडाळी करण्यात देवदूताला जाऊन मिळाले.—उत्पत्ती २:१७; ३:१-६.

एदेनातील घटना आज्ञाधारकतेचा सरळ धडा वाटत असल्या तरी, सैतानाने तेथे दोन नैतिक वादविषयांना उपस्थित केले होते. पहिला, सैतानाने यहोवाचे शासन त्याच्या मनुष्यप्राण्यांवर न्यायीपणाने व त्यांच्या चांगल्या हितासाठी चालवले जात होते का याविषयी वादविवाद केला. कदाचित मानव स्वतःवर चांगला कारभार चालवू शकले असते. दुसरा, आज्ञाधारकपणा कोणतेही भौतिक फायदे आणणारी वाटत नसली तर कोणीही बुद्धिमान मनुष्यप्राणी देवाला विश्‍वासू आणि निष्ठावान राहणार नाही, यावर सैतानाने प्रश्‍न केला.a

एदेनमध्ये उपस्थित झालेल्या वादविषयाची स्पष्ट समज तसेच ज्ञान, शक्‍ती व प्रीती या देवाच्या गुणांसोबत दुष्टाच्या अस्तित्वाचा समेट करण्याचा “वेदान्तीयांची समस्या” यावर उपाय समजण्यास मदत करतो. यहोवाजवळ अमर्याद शक्‍ती असताना देखील, तो प्रीतीचा उत्कृष्ठ नमुना आहे, व बुद्धिमान आणि न्यायी देखील आहे. या चार गुणांना तो पूर्णतेच्या संतुलनात वापरतो. अशाप्रकारे, त्याने त्याच्या अनिवार्य शक्‍तीचा उपयोग करून त्या तीन बंडखोरांना तात्काळ नाश केले नाही. ते न्यायी असले असते परंतु असे करणे अवश्‍य संमजसपणाचे किंवा प्रीतीचे नसते. शिवाय, क्षमा करून ती गोष्ट विसरणे हे प्रेममय झाले असते असे काहींना जसे वाटते ते त्याने केले नाही. कारण असे करणे देखील समंजसपणाचे किंवा न्याय्य झाले नसते.

सैतानाने उपस्थित केलेल्या वादविषयांना मिटवण्यासाठी वेळेची जरुरी होती. मनुष्य, देवापासून स्वतंत्र राहून योग्यपणे शासन करू शकतो का हे शाबीत करण्यासाठी वेळ लागणार होता. यहोवाने, तीन बंडखोरांना जिवंत राहू देण्यास परवानगी देण्याद्वारे, विश्‍वासूपणे देवाची सेवा कठीण परिस्थितीत करण्याद्वारे सैतानाच्या दाव्याला खोटे शाबीत करण्यात भाग घेण्यासाठी देखील मनुष्यप्राण्यांना शक्य करुन दिले.b

यहोवाने आदाम आणि हव्वेला, त्यांनी जर मना केलेले फळ खाल्ले तर ते मरतील हे स्पष्टपणे सांगितले होते. सैतानाने हव्वेला ती मरणार नसल्याचे सांगितले होते तरी ते मरण पावले. सैतानाला देखील मृत्यूची शिक्षा दिलेली आहे; त्या दरम्यान मनुष्यजातीला तो सतत फसवत आहे. वस्तुतः पवित्र शास्त्र म्हणते: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.”—१ योहान ५:१९; उत्पत्ती २:१६, १७; ३:४; ५:५.

इतर देवदूतांचे बंड

एदेनातील घटनेला फार काळ झाला नव्हता, तेव्हा इतर देवदूत यहोवाच्या सार्वभौमत्त्वाविरुद्ध बंडाळी करण्यात सामील झाले. पवित्र शास्त्र म्हणते: “नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली आणि त्यांस कन्या झाल्या, तेव्हा मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, व त्यांच्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.” दुसऱ्‍या शब्दात सांगावयाचे झाल्यास, या देवदूतांनी “आपले वसतिस्थान [स्वर्गातील] सोडले” व देहधारण करून ते पृथ्वीवर आले, व स्त्रियांबरोबरील वैषयिक आनंद उपभोगला.—उत्पत्ती ६:१, २; यहूदा ६.

उत्पत्ती ६:४ मध्ये अहवाल पुढे म्हणतो: “त्या काळी भूतलावर महाकाय होते; पुढे देवपुत्र मानवकन्यांपाशी गेले तेव्हा त्यांस पुत्र झाले ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरूष होऊन गेले.” देवदूतांकडून स्त्रियांना झालेले हे मिश्रजातीय पुत्र वाजवीपेक्षा जास्त शक्‍तीशाली, “महाकाय” होते. ते हिंसाचारी मनुष्य, किंवा नेफि·लीमʹ होते, व या इब्री शब्दाचा अर्थ, “इतरांना खाली पाडण्यास कारणीभूत ठरणारे” असा होतो.

ही घटना इतर प्राचीन संस्कृतीच्या दंतकथांमध्ये सापडते हे लक्षात घेण्याजोगे आहे. उदाहरणार्थ, ४,००० वर्षे जुने असलेले बाबेली महाकाव्य, गिलगामेशच्या अमानुष महत्कृत्याचे वर्णन करते. तो एक शक्‍तीशाली हिंसक यक्ष होता, “ज्याने एकीलाही तिच्या प्रियकरासाठी कुमारी ठेवले नव्हते.” दुसरे उदाहरण, ग्रीसच्या दंतकथेतील अमानुष हर्क्यूलस (किंवा हॅरक्युलस) याचे आहे. झेयस देवाकडून ॲलस्‌मेनला तो एक मानव म्हणून जन्मला. मूर्खतेमुळे त्याने त्याच्या पत्नी व मुलांना ठार मारल्यानंतर हिंसाचाराच्या धाडसी मालिकांची सुरवात केली. अशा कथा एका पिढीने दुसऱ्‍या पिढीला सांगितल्या जात असताना त्यांचा मोठ्या प्रमाणात अर्थाचा अनर्थ झाला असला तरी, पवित्र शास्त्र सांगते त्याप्रमाणे त्यांचा संबंध नेफिलीम व त्यांच्या बंडखोर देवदूतांच्या पित्याशी जुळतो.

दुष्ट देवदूत आणि त्यांच्या अमानुष पुत्रांच्या प्रभावामुळे, पृथ्वीवरील हिंसाचारात इतकी वाढ झाली की, मोठ्या जलप्रलयाद्वारे जगाचा नाश करण्याचे यहोवाने ठरवले. सर्व अनीतिमान मानवांसोबत नेफिलीमचा नाश झाला; परंतु बचावलेले मानव, केवळ धार्मिक नोहा व त्याचे कुटुंबच होते.—उत्पत्ती ६:११; ७:२३.

तरीसुद्धा, दुष्ट देवदूत मेले नाहीत. उलटपक्षी त्यांच्या मानवी देहाचा त्याग करून ते आत्मिक क्षेत्रात परतले. त्यांच्या आज्ञाभंजकपणामुळे देवाच्या कुटुंबातील धार्मिक देवदूतांमध्ये त्यांना परत येऊ दिले नाही; तसेच नोहाच्या दिवसात जसे त्यांनी देहधारण केले होते तसे करण्यास देखील त्यांना अनुमती दिली नाही. तरीपण, “भूतांचा अधिपती,” दियाबल सैतानाच्या अधिकाराच्या अधीन मानवी व्यवहारात ते विध्वंसक प्रभाव सतत चालवत राहिले.—मत्तय ९:३४; २ पेत्र २:४; यहूदा ६.

मनुष्यजातीचे शत्रू

सैतान आणि दुरात्मे सर्वदा खुनी व क्रूर असे आहेत. सैतानाने विविध मार्गाने ईयोबाच्या गुराढोरांची दाणादाण केली व त्याच्या बहुतेक चाकरांना ठार केले. नंतर, ‘प्रचंड वारा’ आणून ज्या घरात ईयोबाची दहा मुले होती ते त्यांच्यावर कोसळवण्याद्वारे त्याने त्यांना ठार मारले. त्यानंतर, सैतानाने ईयोबास “मोठमोठ्या गळवांनी नखशिखांत अतिशय पीडिले.”—ईयोब १:७-१९; २:३, ७.

दुरात्मे देखील त्यासारखीच दुष्ट मनोवृत्ती दाखवतात. येशूच्या दिवसात, त्यांनी लोकांचा आवाज व दृष्टी हिरावून घेतली होती. त्यांनी एका मनुष्याला, स्वतःस दगडधोंड्यांनी ठेचून घेण्यास कारणीभूत केले होते. त्यांनी मुलाला जमिनीवर आपटले व “पिळून टाकले” होते.—लूक ९:४२; मत्तय ९:३२, ३३; १२:२२; मार्क ५:५.

सर्व जगभरातील अहवाल दाखवतो की सैतान आणि त्याचे दुरात्मे पूर्वीपेक्षा अधिक मत्सरी बनले आहेत. काही लोकांना ते आजारपणाचा तडाखा देतात. ते इतरांची झोप हिरावून घेण्याद्वारे किंवा भयानक स्वप्ने पाडण्याद्वारे किंवा लैंगिकरित्या दुरूपयोग करण्याद्वारे त्यांना जेरीस आणतात. आणखी इतरांना त्यांनी विवेकभ्रष्टता, खून, किंवा आत्महत्या करायला लावले आहे.

त्यांचे किती काळापर्यंत सहन करावे लागणार?

सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांचे सर्वकाळासाठी सहन करावे लागणार नाही. यहोवाने त्यांना आमच्या दिवसापर्यंत चांगल्या कारणासाठी परवानगी दिली आहे, परंतु आता त्यांचा वेळ थोडा आहे. या शतकाच्या आरंभास, त्यांच्या कार्यक्षेत्रावर मर्यादा घालण्यासाठी गंभीर पाऊल उचलले गेले. प्रकटीकरणाचे पुस्तक याची स्पष्टता करते: “मग स्वर्गात युद्ध सुरू झाले: मीखाएल [पुनरूत्थित येशू ख्रिस्त] व त्याचे दूत अजगराबरोबर [सैतान] युद्ध करण्यास निघाले, आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले तरी त्यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकविणारा जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला, व त्याबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले.”—प्रकटीकरण १२:७-९.

याचा परिणाम काय झाला? अहवाल पुढे सांगतो: “म्हणून स्वर्गांनो व त्यात राहणाऱ्‍यांनो उल्लास करा!” येथून पुढे सैतान आणि त्याचे दुरात्मे स्वर्गात नसल्यामुळे धार्मिक देवदूत आनंद करू शकत होते. परंतु पृथ्वीवरील लोकांबद्दल काय? पवित्र शास्त्र म्हणते: “पृथ्वी व समुद्र ह्‍यावर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.”—प्रकटीकरण १२:१२.

त्यांच्या क्रोधात सैतान आणि त्याचे हस्तक, यांच्या तात्काळ होणाऱ्‍या नाशाआधी, होता होईल तितका अनर्थ आणीत आहेत. या शतकामध्ये, दोन महायुद्धे होऊन गेली व दुसरे महायुद्ध संपल्यानंतर १५० पेक्षा जास्त लहान युद्धे झाली. या पिढीच्या हिंसाचाराचा विचार करताना, आमच्या शब्दसंग्रहात वाक्प्रचार आले आहेत: “युद्धामध्ये अपायकारक सुक्ष्मजीवांचा शस्त्राप्रमाणे उपयोग,” “संपूर्ण विनाश,” “किलींग फिल्ड,” “बलात्काराच्या छावण्या,” “क्रमागत खून करणारा,” आणि “अणुबॉम्ब.” बातम्या, अमली पदार्थ, खून, बॉम्बहल्ला, मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या व्यक्‍तीकडून स्वजातीभक्षण, हत्याकांड, दुष्काळ व यातना या गोष्टींनीच भरलेल्या असतात.

या गोष्टी अल्पकालिन आहेत ही आनंदाची वार्ता आहे. नजिकच्या भवितव्यात, देव पुन्हा एकदा सैतान आणि त्याच्या दुरात्म्याविरूद्ध कार्य करील. देवाकडील दृष्टांताचे वर्णन करताना प्रेषित योहानाने म्हटले: “नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरतांना पाहिले, त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखळदंड होता. त्याने दियाबल, व सैतान म्हटलेला जुनाट साप, म्हणजे तो अजगर ह्‍यास धरले, आणि त्याने एक हजार वर्षांपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले. आणि ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांस आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडले पाहिजे.”—प्रकटीकरण २०:१-३.

त्यानंतर, दियाबल व त्याच्या दुरात्म्यांना “थोडा वेळ सोडले पाहिजे,” मग त्यांचा सर्वकाळाकरता नाश केला जाईल. (प्रकटीकरण २०:३, १०) किती अद्‌भुत तो काळ असेल! सैतान व त्याचे दुरात्मे सर्वकाळासाठी नाश झालेले असल्यामुळे, यहोवा “सर्वांना सर्वकाही” होईल. व प्रत्येक जण खरेपणाने “उदंड शांतीसुखाचा उपभोग घेतील.”—१ करिंथकर १५:२८; स्तोत्रसंहिता ३७:११.

[तळटीपा]

a नंतर, सैतानाने देवाचा सेवक ईयोबाविषयी जे म्हटले ते तेव्हा स्पष्ट झाले की: “त्वचेसाठी त्वचा, मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल. तू आपला हात पुढे करुन त्याच्या हाडामांसास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.”—ईयोब २:४, ५.

b देवाने दुष्टपणाला परवानगी का दिली, याच्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाळ जगू शकाल हे वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट्‌ सोसायटीने प्रकाशित केलेले पुस्तक पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा