“ईश्वरी शिक्षण” प्रांतिय अधिवेशन
यहोवा कडून शिक्षण प्राप्त करण्यासाठी सर्वजण “ईश्वरी शिक्षण” या प्रांतिय अधिवेशनाची वाट पाहून आहेत. ख्रिश्चनाला ह्या वाढत्या व्यक्तिगत समस्या व जागतिक गडबडीच्या काळात सावध राहण्यास ते चार दिवसांचा कार्यक्रम शास्रीय शिक्षणाचा अर्थपूर्ण दृष्टीकोनाला ठळकपणे मांडून मदत करील. “जे काही सुशिक्षणाविरुद्ध आहे” त्याच्यापासून दृढपणे दूर राहण्यास मदत करील. (१ तीमथ्य १:१०) उपस्थित असलेल्या सर्वांना देवाच्या वचनाचे अधिक चांगले शिक्षक होण्यास ते उत्तेजन देईल.
आम्हाला अनुसरण्यास किती उत्तम उदाहरणे आहेत! महान शिक्षक स्वत: यहोवा यांजशिवाय आणखी कोणी नाही. यामुळेच, एलीहूने अगदी उचितपणे यहोवाबद्दल ईयोबास म्हटले: “जो आम्हास पृथ्वीवरील पशूंहून अधिक शिकवितो आणि आकाशातील पक्ष्यांहून अधिक ज्ञान देतो.” पुढे तो यहोवाच्या बाबतीत असे विचारत म्हणतो की, “त्याच्या समान शिक्षण देणारा कोण आहे?” (ईयोब ३५:११; ३६:२२) यशया ३०:२० मध्ये देवाला “महान शिक्षक” असे संबोधिले आहे.
यहोवा नंतर त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त हा दुसरा शिक्षक आहे. शुभवर्तमानात ५०हून अधिक वेळा त्यांस “गुरुजी” व “शिक्षक” म्हणून संबोधिले आहे. अनेकांना बरे केले, व मोठे चमत्कारही केले तरी येशू एक वैद्य म्हणून नव्हे तर गुरुजी, शिक्षक म्हणून विख्यात होता.—मत्तय ८:१९; लूक ५:५; योहान १३:१३.
येशूने त्याच्या शिष्यांना व प्रेषितांना अगदी उचित कारणामुळेच तो ज्याप्रमाणे शिक्षक होता त्याप्रमाणे शिक्षक होण्यास शिकविले. हे आम्ही मत्तय १०:५ ते ११:१ व लूक १०:१-११ यामध्ये पाहू शकतो. स्वर्गारोहण होण्याच्या काही काळ आधी, मत्तय २८:१९, २० मध्ये नमूद केलेला प्रसिद्ध शिक्षणाची आज्ञा येशूने त्याच्या शिष्यांना दिली: “यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे सर्व काही मी तुम्हांस आज्ञापिले ते पाळावयास त्यास शिकवा.” प्रेषितांची कृत्ये, व ख्रिस्ती ग्रीक शास्र वचनांतील त्यानंतरची सर्व प्रेरित पत्रे, येशूच्या पहिल्या शिष्यांनी शिक्षणाचे कार्य किती आवेशाने, कुशलतेने, व विश्वासाने पूर्ण केले ते सांगतात.
हे शिक्षणाचे काम पहिल्यापेक्षा आज अधिक निकडीचे आहे. आपण युगाच्या समाप्तिच्या शेवटल्या दिवासात जगत आहोत, व यामुळे यात अनेकांचे जीवन गोवलेले आहे. लोकांनी मोठ्या बाबेलच्या पापांचे वाटेकरी होऊ नये व तिच्यातील कोणतीही पीडा त्यांच्यावर येऊ नये म्हणून त्यांना शिकवले पाहिजे व बाबेलातून बाहेर येऊन यहोवा व त्याच्या राज्याची सेवा करण्याचा निर्णय घेण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे.—प्रकटीकरण १८:४.
शिक्षणाचे कार्य अधिक होण्याच्या सर्व यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रयत्नाला यश येण्यासाठी, त्याच्या संस्थेकरवी यहोवाने “ईश्वरी शिक्षण” या प्रांतिय अधिवेशनाची योजना केला आहे. हे चार दिवसांचे अधिवेशन भारतात सप्टेंबर १९९३ पासून सुरु होईल. यहोवाच्या सर्व समर्पित सेवकांनी ह्या अधिवेशनातील एकास तरी उपस्थित राहण्याचा, गुरवारी दुपारच्या सुरवातीच्या गीत व प्रार्थना पासून रविवारी दुपारच्या प्रार्थने पर्यंत उपस्थित राहण्याचा निर्धार करावा.