न कोमेजणारी सुंदरता
“सुंदरता नाहीशी होते; सुंदरता निघून जाते,” असे वॉल्टर डी ला मरे नावाच्या एका कवीने निरिक्षिले. कॅक्टस नावाच्या उत्कृष्ट फुलाच्या बाबतीत येथे शब्दचित्र रेखाटले आहे. त्याची शोभा लगेचच कोमेजून जाते.
ख्रिस्ती शिष्य याकोब याने लिहिले: “तो [धनवान] गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. सूर्य तीव्र तेजाने उगवला व त्याने ‘गवत कोमेजविले, मग त्याचे फुल गळाले,’ आणि त्याच्या रुपाची शोभा गेली; ह्याप्रमाणेच धनवानही आपल्या उद्योगाच्या भरात कोमेजून जाईल.”—याकोब १:१०, ११.
अशा या अनिश्चित जगात, धनसंपत्ती एका रात्रीत नाहीशी होऊ शकते. याशिवाय, धनवान—कोणाही इतरांप्रमाणेच—‘अल्पायु, व फुलासारखा असतो.’ (ईयोब १४:१, २) येशूने आरामाचे जीवन जगण्यासाठी संपत्ती साठविणात व्यग्र असणाऱ्या मनुष्याचा दृष्टांत येशूने दिला. परंतु आराम करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी त्याच्याजवळ आहे असा त्याने विचार केला तेव्हा तो मरण पावला. यासाठीच, येशूने इशारा दिला: “जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे.”—लूक १२:१६-२१.
“देवविषयक बाबतीत धनवान.” येशूच्या या बोलण्याचा काय अर्थ होत होता? देवाबरोबर एक चांगले नाव असल्यामुळे या प्रकारे धनवान असलेल्या मनुष्याची “स्वर्गात. . .संपत्ती” असते. अशी धनसंपत्ती कधीही नाहीशी होत नाही. (मत्तय ६:२०; इब्रीयांस ६:१०) उलटपक्षी, अशा मनुष्याची तुलना पवित्र शास्त्रात कोमेजणाऱ्या फुलाप्रमाणे नव्हे तर एका झाडाप्रमाणे केली आहे, ज्याची पाने कोमजत नाही. आणि आम्हाला याची खात्री दिली आहे की, “जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.”—स्तोत्रसंहिता १:१-३, ६.