वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 ८/१ पृ. ९-१४
  • लोभाचा पाश टाळण्यामध्ये यशस्वी व्हा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लोभाचा पाश टाळण्यामध्ये यशस्वी व्हा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा आम्हाला धोक्याविषयी इशारा देतो
  • संपत्ती किंवा मालमत्तेच्या लोभाने पाशात पडलेला
  • जीवनाच्या इतर क्षेत्रातील लोभ
  • लोभ टाळण्यासाठी सतत निश्‍चय राहू द्या
  • “लोभाचे युग”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • लोभविरहीत जगाची कल्पना करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • आपण सैतानाच्या पाशांतून सुटू शकतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • तुम्ही पैशांबद्दल संतुलित दृष्टिकोन कसा राखू शकता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 ८/१ पृ. ९-१४

लोभाचा पाश टाळण्यामध्ये यशस्वी व्हा

“जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत व पाशात सापडतात.”—१ तीमथ्य ६:९

१. पाशाविषयी आम्ही चिंता का केली पाहिजे?

“पाश” हा शब्द आम्हाला, परिस्थितीची जाणीव नसणाऱ्‍या भक्ष्याला पकडण्यासाठी उपयोगात आणीत असलेल्या व फसव्या साधनाचा वापर करणाऱ्‍या शिकाऱ्‍याची आठवण करुन देतो. तथापि, देव हे स्पष्टपणे सांगतो की, आमच्यासाठी असलेले अतिशय घातक पाश अशाप्रकारचे खरोखरचे साधन नाही तर आध्यात्मिक किंवा नैतिकतेत पाशात अडकवू शकतील असे ते आहेत. असे पाश मांडण्यात दियाबल अतिशय तरबेज आहे.—२ करिंथकर २:११; २ तीमथ्य २:२४-२६.

२. (अ) धोकेदायक पाश टाळण्यासाठी यहोवा आम्हाला कशी मदत करतो? (ब) कोणत्या विशिष्ट प्रकारच्या पाशावर आता लक्ष दिले गेले पाहिजे?

२ सैतानाच्या अनेक तसेच विविध पाशातील काहींना ओळखण्यासाठी यहोवा आम्हाला मदत करतो. उदाहरणार्थ, देव आम्हाला इशारा देतो की, आम्ही निर्बुद्धीने, कठोरपणाने किंवा नाही ते बोललो तर आमचे ओठ किंवा तोंड पाश ठरू शकतात. (नीतीसूत्रे १८:७; २०:२५) रागीट मनुष्यांची मैत्री केल्याने याप्रमाणेच गर्व हा पाश ठरु शकतो. (नीतीसूत्रे २२:२४, २५; २९:२५) परंतु आणखी एका पाशाबद्दल आपण पाहू या: “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्‍या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात.” (१ तीमथ्य ६:९) या पाशाच्या मागे काय आहे किंवा त्याचा आधार, या सर्व गोष्टींचा सारांश म्हणजे “लोभ” होय. श्रीमंत होण्याच्या निश्‍चयामुळे जरी अनेकदा लोभ दिसून येत असला तरी, लोभ हा अनेक घटकांबाबत खरा पाश आहे.

यहोवा आम्हाला धोक्याविषयी इशारा देतो

३, ४. लोभाविषयी प्राचीन मानवी इतिहासात कोणते धडे समाविष्ट आहेत?

३ मुलभूतपणे, लोभ ही पैसा, मालमत्ता, अधिकार, लैंगिकता किंवा इतर गोष्टींबाबत असलेली बेसुमार किंवा अधिक हवे असण्याची आधाशी इच्छा आहे. लोभाच्या पाशाच्या धोक्यात असणारे आपण पहिले नाहीत. अनेक काळाआधी, एदेन बागेत, लोभाने प्रथम हव्वेला व नंतर आदामाला जाळ्यात पकडले. जीवनातील अनुभव हव्वेच्या सोबत्याला तिच्यापेक्षा अधिक होता, व यहोवाने वैयक्‍तिकपणे त्याला शिकवले होते. देवाने त्यांना नंदनवनरुपी घर दिले होते. स्वच्छ पृथ्वीवर वाढलेल्या भरपूर तसेच चांगल्या आणि विविध अन्‍नाचा आनंद ते घेऊ शकत होते. अनंतकाळापर्यंत देवाची सेवा त्यांच्या मुलांसोबत करण्यासाठी ते परिपूर्ण मुले प्राप्त करण्याची अपेक्षा करु शकत होते. (उत्पत्ती १:२७-३१; २:१५) हे कोणत्याही मानवाला समाधान मिळण्यासाठी पुरेसे नव्हते का?

४ तथापि, एखाद्याजवळ पुरेसे असले म्हणजे ते त्याला लोभाच्या पाशापासून अटकाव करु शकत नाही. अधिक स्वातंत्र्य व स्वतःचे दर्जे बनविण्याची शक्यता यामुळे हव्वा देवासमान होण्याच्या आशेच्या जाळ्यात अडकली. असे दिसते की काहीही झाले तरी आदामाला त्याच्या सुंदर सहचरीबरोबर अविरत साहचर्य हवे होते. ज्या अर्थी हे परिपूर्ण मनुष्य लोभाच्या पाशात पडले, तर आम्हासाठी लोभ हा किती धोकेदायक असू शकतो याची तुम्ही गुणग्राहकता बाळगू शकता.

५. लोभाचा पाश टाळणे आम्हासाठी किती महत्त्वाचे आहे बरे?

५ लोभाच्या पाशात अडकण्यापासून आम्ही स्वतःला सावध केले पाहिजे कारण प्रेषित पौल आम्हाला इशारा देतो: “अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हास ठाऊक नाही काय? फसू नका; जारकर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरूषसंभोग घेणारे, चोर, लोभी . . . ह्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (१ करिंथकर ६:९, १०) पौलाने आम्हाला हे देखील सांगितले की: “जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्‍यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये.” (इफिसकर ५:३) यास्तव, आमच्या अपरिपूर्ण देहांच्या सुखविलासासाठी लोभिष्टपणाला एक चर्चेचा देखील विषय बनवू नका.

६, ७. (अ) लोभ किती शक्‍तीशाली असू शकतो यावर पवित्र शास्त्राची कोणती उदाहरणे जोर देतात? (ब) ती उदाहरणे आमच्यासाठी इशारा का असली पाहिजे?

६ यहोवाने आम्हाला दक्ष ठेवण्यासाठी लोभाच्या धोक्यांची अनेक उदाहरणे लिखित करुन ठेवली आहेत. आखानाच्या लोभाची आठवण करा. देवाने म्हटले होते की यरीहोचा नाश केला पाहिजे, परंतु त्यातील सोने, चांदी, रुपे आणि लोह त्याच्या भांडारात जमा केली पाहिजेत. सुरवातीला त्या मार्गदर्शनाचे अवलंबन करण्याचा आखानाचा हेतू असेल, परंतु लोभाच्या पाशाने त्याला अडकवले. यरीहोत आल्याबरोबर, त्याला असे वाटले की जणू तो खरेदी करण्याच्या दौऱ्‍यावरच होता, जेथे त्याने विश्‍वास बसणार नाही असा किफायतीचा सौदा पाहिला, ज्यामध्ये त्याला त्याच्यासाठी अगदी योग्य असलेल्या सुंदर वस्राचा समावेश होता. हजारो रुपये किंमतीचे सोने व चांदी त्याने हाती घेतली, तेव्हा त्याने विचार केला असेल की, केवढा हा धनलाभ! हे किती स्वस्त, जणू सहज लुटता येईल. खरे पाहता हे चोरीचे एक कृत्य होते! ज्याचा नाश करायचा होता किंवा जे जमा केले पाहिजे होते त्याची हाव त्याने केली, त्याने देवाकडून ते चोरले व यामुळे त्याला त्याच्या जीवाची किंमत द्यावी लागली. (यहोशवा ६:१७-१९; ७:२०-२६) गेहजी व यहुदा इस्कर्योत यांच्या उदाहरणांचा देखील विचार करा.—२ राजे ५:८-२७; योहान ६:६४; १२:२-६.

७ वर उद्धृत केलेले तिघे यहोवाच्या दर्जांची उपेक्षा करणाऱ्‍यांपैकी मूर्तीपूजक नव्हते या वास्तविकतेकडे आम्ही दुर्लक्ष करता कामा नये. उलटपक्षी, देवाबरोबर ते समर्पित नातेसंबंधात होते. त्या सर्वांनी प्रत्यक्ष चमत्कार पाहिले होते यामुळे देवाचे सामर्थ्य त्याची कृपापसंती टिकवून ठेवण्याच्या महत्त्वाची छाप त्यांच्यावर पडावयास हवी होती. तरीसुद्धा, लोभाचा पाश त्यांचा अधःपात ठरला. आम्ही देखील कोणत्याही प्रकारच्या लोभाच्या पाशात स्वतःला अडकवू दिले तर देवासोबतचा आमचा नातेसंबंध तोडू शकतो. आमच्यासाठी कोणत्या प्रकारचा किंवा स्वरुपाचा लोभ विशेषपणे घातक आहे?

संपत्ती किंवा मालमत्तेच्या लोभाने पाशात पडलेला

८. संपत्तीसंबंधी पवित्र शास्त्र आम्हाला कोणता इशारा देते?

८ अनेक ख्रिश्‍चनांनी, संपत्तीसाठी प्रेम व मालमत्तेसाठी हाव याविरुद्ध पवित्र शास्त्रातील स्पष्ट इशारा ऐकलेला आहे. मत्तय ६:२४-३३; लूक १२:१३-२१; आणि १ तीमथ्य ६:९, १० यातील काहींचे पुनरावलोकन आम्ही का करु नये? तुम्हाला असे वाटेल की तुम्ही तो इशारा स्वीकारून त्याचे अवलंबन देखील करता, पण बहुधा, आखान, गेहजी व यहुदा इस्कर्योत यांनीही त्यांचे याला सहमत आहे असे म्हटले नसेल का? निश्‍चितच आम्ही केवळ बौद्धिक सहमतापेक्षा अधिक काही केले पाहिजे. संपत्ती किंवा मालमत्तेविषयी असलेल्या लोभाचा आमच्या रोजच्या जीवनावर परिणाम होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतली पाहिजे.

९. बाजारहाटासंबंधाने आम्ही आमच्या मनोवृत्तीचे परीक्षण का केले पाहिजे?

९ आमच्या जीवनात आम्हाला वारंवार—अन्‍न, वस्र आणि निवारा यासाठी आवश्‍यक असणाऱ्‍या जिनसा खरेदी कराव्या लागतात. (उत्पत्ती ४२:१-३; २ राजे १२:११, १२; नीतीसूत्रे ३१:१४, १६; लूक ९:१३; १७:२८; २२:३६) परंतु व्यापारी जग अधिक आणि नवनवीन गोष्टींसाठी अभिलाषा वाढवीत आहे. अनेक जाहिराती वर्तमानपत्रे, मासिकातील भरलेली रकाने तसेच दुरदर्शन वरील कार्यक्रम लोभ वाढण्याच्या इच्छेचे आकर्षण दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे आकर्षण दुकानातील कपाटात ठेवलेली, पोलकी, कोट, पोषाख (स्त्रियांचा) आणि स्वेटर, नवीन बुटांची कपाटे, विजेची साधने आणि कॅमेरा याचे देखील असू शकतात. ख्रिश्‍चनांनी स्वतःला हे विचारणे सुज्ञपणाचे ठरेल की, ‘बाजारहाट ही माझ्या जीवनात प्रमुख गोष्ट किंवा मुख्य आनंद आहे का?’ ‘मी जे नवीन साहित्य पाहतो त्याची मला खरीच गरज आहे का, किंवा हे व्यापारी जग माझ्यात लोभाचे बीज पेरीत आहे का?’—१ योहान २:१६.

१०. विशेषपणे पुरूषांसाठी लोभाच्या कोणत्या पाशाचा धोका आहे?

१० खरेदी करणे स्त्रियांसाठी सर्वसाधारण पाश वाटत असला तर अधिक पैसे मिळवणे अनेक मनुष्यांसाठी एक पाश आहे. हा पाश, येशूने ज्याची चांगली मिळकत असूनही ज्याने ‘आपली कोठारे मोडून मोठी बांधली आणि तेथे आपले सर्व धान्य व माल साठविण्याचा’ निश्‍चय केला त्या श्रीमंत मनुष्याचा दृष्टांत देऊन स्पष्ट केला. धोक्याविषयी येशूने कोणताही संशय बाकी ठेवला नाही: “संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा.” (लूक १२:१५-२१) आम्ही श्रीमंत असलो अगर नसलो तरी आम्हाला तो सल्ला ऐकला पाहिजे.

११. अधिक पैशाच्या लोभामुळे एखादा ख्रिस्ती पाशात कसा अडकू शकतो?

११ पैशासाठी किंवा पैसा खरेदी करील त्या गोष्टीसाठी असणारा लोभ अनेकदा फसव्या साधनाद्वारे वाढविला जाऊ शकतो. त्वरीत श्रीमंत होण्याच्या योजना—कदाचित, एका जोखीमेच्या गुंतवणूकीद्वारे जीवनमानात एकदा आर्थिक सुरक्षिततेच्या संधीचा लोभ प्रस्तुत केला जाऊ शकतो. तसेच एखाद्याला प्रश्‍नार्थक किंवा अवैध व्यापाराद्वारे पैसे कमविण्यासाठी मोहीत केले जाऊ शकते. ही लोभिष्ट इच्छा जम बसविणारी व पाशात पाडणारी असू शकते. (स्तोत्रसंहिता ६२:१०; नीतीसूत्रे ११:१; २०:१०) ख्रिस्ती मंडळीतील काहींनी त्यांचा व्यापार या अपेक्षेने सुरू केला की, भरवसा ठेवणारे भाऊच त्यांचे मुख्य गिऱ्‍हाईक असतील. केवळ आवश्‍यक तेच उत्पादन त्यांना पुरविण्याचा मुख्य उद्देश नसला किंवा ‘चांगले ते काम करण्यासाठी त्यांच्या हातांनी कष्ट करुन करीत असलेली सेवा’ नसली, परंतु निष्काळजीपणाने सह ख्रिश्‍चनांचे नुकसान करण्याचा उद्देश असेल तर याचा अर्थ ते हे कार्य लोभासाठी करीत आहेत. (इफिसकर ४:२८; नीतीसूत्रे २०:२१; ३१:१७-१९, २४; २ थेस्सलनीकाकर ३:८-१२) पैशासाठी असलेल्या लोभाने अनेकांना सोडत, घोड्याच्या शर्यतीवर पैसे मिळवणे किंवा लॉटरी अशाप्रकारच्या जुगारीद्वारे पैसे प्राप्त करण्याकडे निरवले आहे. इतरांनी समभावना आणि वाजवीपणा याकडे दुर्लक्ष करुन, एक मोठे बक्षीस किंवा तडजोडीने पैसा मिळवण्याची आशा धरून घाईने खटला सुरू केला.

१२. संपत्तीसाठी असलेल्या लोभावर मात करता येऊ शकते हे आम्हाला का माहीत आहे?

१२ आधीची काही अशी क्षेत्र आहेत जेथे आम्ही स्वतःचे आत्म-परीक्षण करणे उचित आहे, जेणेकडून आम्हामध्ये लोभ कार्य करतो का ते प्रामाणिकपणे आम्ही पाहू शकतो. जरी याप्रमाणे आम्ही करीत असलो तरी बदल होऊ शकतो. जक्कयमध्ये बदल झाला ते लक्षात घ्या. (लूक १९:१-१०) जर एखाद्याने संपत्ती किंवा मालमत्तेसाठी लोभ ही समस्या असल्याचे पाहिल्यास, जक्कयप्रमाणे पाशातून निघण्याचा निश्‍चय केला पाहिजे.—यिर्मया १७:९.

जीवनाच्या इतर क्षेत्रातील लोभ

१३. स्तोत्रसंहिता १०:१८, इतर कोणत्या लोभाच्या पाशावर आमचे लक्ष खेचते?

१३ काहींना इतर गोष्टींपेक्षा पैसे किंवा मालमत्ता यांच्याबाबतीत लोभाच्या पाशाचा धोका सहजपणे दिसतो. एक ग्रीक शब्दकोश असे म्हणतो की “लोभ” किंवा “लोभीपणा” या भाषांतरीत केलेल्या शब्दांचा अर्थ “अधिकार तसेच मिळकत यासंबंधी ‘अधिक असण्याचा हव्यास’” असा होतो. होय, इतरांवर अधिकार गाजविण्याच्या किंवा कदाचित, आमच्या अधिकाराखाली त्यांनी थरथर कापले पाहिजे या लोभिष्टपणाच्या पाशात आपण अडकू शकतो.—स्तोत्रसंहिता १०:१८.

१४. कोणकोणत्या क्षेत्रातील सत्तेबद्दलची इच्छा हानीकारक आहे?

१४ प्राचीन काळापासून अपूर्ण मानवांनी इतरांवर अधिकार गाजविण्यात आनंद मानला. देवाने आधीच पाहिले की मानवी पापाच्या वाईट परिणामामुळे अनेक पती त्यांच्या पत्नींवर “अधिकार” चालवितील. (उत्पत्ती ३:१६, पं. रमाबाई भाषांतर.) तथापि, हे अपयश, वैवाहिक दृश्‍यापेक्षाही पलिकडे पसरले. हजारो वर्षांनंतर पवित्र शास्त्राच्या एका लेखकाने हे निदर्शिले की “एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.” (उपदेशक ८:९) राजकीय आणि लष्कर याच्याबाबतीत हे उचित आहे ते तुम्हाला चांगले माहीत आहे, परंतु आमच्या प्रभावाच्या क्षेत्रावर आम्ही वैयक्‍तिक अधिकार किंवा नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो का?

१५, १६. अधिक अधिकारासाठी असलेल्या अभिलाषेमुळे कशाप्रकारे एखादा ख्रिस्ती पाशात अडकला जाऊ शकतो? (फिलिप्पैकर २:३)

१५ आमचे, इतर सर्व मानवांबरोबर—आमच्या निकटच्या किंवा दूरच्या कुटुंबासोबत, किंवा प्रापंचिक कामात, शाळेत, मित्रांमध्ये व मंडळीत संबंध येतात. मधून मधून किंवा अनेकदा, काय केले पाहिजे तसेच का व कधी ते केले पाहिजे हे ठरविण्यात आमचा आवाज श्रेष्ठ ठरतो. यात काही चूक किंवा हे वाईट देखील नाही. तर मग आम्हाला मिळालेल्या अधिकाराचा वापर अतिरेकीपणाने करण्यात आम्ही आनंद घेतो का? अंतीम निर्णय घेण्यात व अधिकाधिक अपेक्षा करण्यात आम्हाला आवडते असे काही हे असू शकते का? जगीक व्यवस्थापक किंवा बॉस (हुकमत गाजविणारे) अनेकदा ही मनोवृत्ती, स्वतःभोवती होयबांनी, जे मतभेदाचे कोणतेही दृष्टिकोन सादर न करणाऱ्‍या व अधिकारासाठी वरिष्ठांच्या जगीक ध्येयाला (लोभ) कधीही आव्हान न करणाऱ्‍या लोकांची भावगर्दी करुन प्रदर्शित करतात.

१६ सह ख्रिश्‍चनांसोबत व्यवहार ठेवताना हा पाश आम्ही टाळला पाहिजे. येशूने म्हटले: “परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात व मोठे लोकही अधिकार करतात, हे तुम्हांस ठाऊक आहे. तसे तुम्हांमध्ये नाही; तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल.” (मत्तय २०:२५, २६) अशी लीनता ख्रिस्ती वडिलांमध्ये एकदुसऱ्‍यांबरोबर, सेवा-सेवकांसोबत व कळपासोबत वागताना दिसली पाहिजे. अधिकारासाठी असलेली इच्छा कदाचित दिसून येऊ शकते, उदाहरणार्थ, अध्यक्षीय पर्यवेक्षक काही किरकोळ गोष्टींसाठीच इतर वडिलांचा सल्ला घेत असतील परंतु सर्व मुख्य निर्णय ते स्वतःच करतात का? काम सुपूर्त करण्यात ते खरेपणाने स्वेच्छा दाखवतात का? एखाद्या सेवा-सेवकाने क्षेत्रकार्यासाठी असणाऱ्‍या सभेतील भागाची हाताळणी अवाजवी अपेक्षा धरून केली असल्यास किंवा विशिष्ट नियम लादले असल्यास समस्या उद्‌भवू शकतात.—१ करिंथकर ४:२१; ९:१८; २ करिंथकर १०:८; १३:१०; १ थेस्सलनीकाकर २:६, ७.

१७. लोभाच्या पाशाची चर्चा करताना भोजनाविषयी विचार करणे का उचित आहे?

१७ अन्‍न हे आणखी एक असे क्षेत्र आहे जेथे अनेकजण लोभाच्या पाशात अडकले आहेत. अर्थातच, खाण्यात व पिण्यात आनंद करणे हे स्वाभाविक आहे व पवित्र शास्त्राची त्याला मान्यता आहे असे ते सांगते. (उपदेशक ५:१८) तथापि, कालांतराने ह्‍यासंबंधाने असलेली इच्छा वाढणे, आनंदासाठी जे माफक व पुरसे आहे त्यापेक्षा अधिक अपेक्षा करणे हे असामान्य नाही. देवाच्या सेवकांना काळजी करण्यासारखे जर हे उचित क्षेत्र नाही तर मग नीतीसूत्रे २३:२० मध्ये यहोवाचे वचन असे का म्हणते की: “मद्य पिणाऱ्‍यांच्यामध्ये आणि खादाडपणाने मांस खाणाऱ्‍यांच्यामध्ये तू असू नको.” [पं. रमाबाई भाषांतर] तथापि, पाश कसा टाळू शकतो?

१८. आम्ही भोजन आणि पिण्याविषयी कोणते स्व-परीक्षण करु शकतो?

१८ त्याच्या लोकांनी कडकपणे अन्‍नाच्याबाबतीत आरोग्यासाठी घालून दिलेल्या पद्धतीनुसार निर्वाह करावा असे देव सुचवित नाही. (उपदेशक २:२४, २५) परंतु आमच्या रोजच्या संभाषणात व योजनात खाण्यापिण्याविषयीचा प्रमुख भाग असेल तर तो त्याला मान्यता दाखवणार नाही. आम्ही स्वतःला विचारले पाहिजे, ‘मी केलेल्या भोजनाविषयी किंवा ते करण्याची योजना करण्याचे वर्णन करताना मी अनेकदा अतिशय उत्साहपूर्ण असतो का?’ ‘मी नेहमी खाण्यापिण्याविषयीच बोलत असतो का?’ दुसरे एक चिन्ह, आम्ही तयार केले नसेल किंवा त्याच्यासाठी पैसेही दिले नसतील, किंवा कदाचित आम्ही दुसऱ्‍यांच्या घरी पाहूणे म्हणून असू किंवा एखाद्या ख्रिस्ती संमेलनात भोजन करतो अशावेळी आम्ही कशी प्रतिक्रिया दाखवतो त्याद्वारे दिसू शकते. नेहमीपेक्षा अधिक खाण्याकडे आमचा कल असतो का? एसावाने भोजनाला त्याच्या चिरकालिक हानीसाठी जादा महत्त्व दिले याची आठवण ठेवावी.—इब्रीयांस १२:१६.

१९. लैंगिक सुखासंबंधाने लोभ ही एक समस्या कशी होऊ शकते?

१९ आणखी एका पाशाविषयी पौल आम्हाला सुक्ष्म दृष्टी देतो: “पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्‍यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये.” (इफिसकर ४:१७-१९; ५:३) खरोखर, लैंगिक सुखविलासाचा लोभ वाढू शकतो. अर्थातच, हा आनंद उचितपणे वैवाहिक बंधनातच व्यक्‍त केला जाऊ शकतो. या आनंदाबरोबर असलेले हे निकटचे प्रेम पती पत्नीने विवाहाच्या अनेक वर्षांपर्यंत एकदुसऱ्‍यांबरोबर एकनिष्ठ राहण्यासाठी मदत करण्याची भूमिका पार पाडते. आजचे जग लैंगिकतेवर अधिक जोर देत आहे असे असताना, काही लोक याला नाकारतील. ते या गोष्टीला क्षुल्लक समजतात, परंतु पौलाने उद्धृत केलेल्या लोभिष्टपणाचे ते एक प्रतिबिंब आहे. आज अनेक सिनेमा, व्हिडीओ, मासिके तसेच मनोरंजनाच्या ठिकाणी सामान्यपणे दाखविलेली अनैतिकता व बीभत्सपणा यामध्ये स्वतःला विलीन होऊ देतात ते खासपणे लैंगिक सुखाविषयी असलेल्या या चुकीच्या दृष्टिकोनाचा सहजपणे स्वीकार करतात.

२०. लैंगिक गोष्टीसंबंधी लोभिपणाच्या धोक्याविषयी ख्रिश्‍चनांनी ते सावध आहेत हे कसे दाखविले पाहिजे?

२० दाविदाने बथशेबाबरोबर केलेल्या पापाचा अहवाल दाखवतो की लैंगिकतेविषयी असलेल्या लोभाच्या पाशात देवाचा एक सेवक अडकू शकतो. दावीद त्याच्या विवाहात लैंगिक सुखाचा उपभोग घेण्यास मुक्‍त होता तरी त्याने बेकायदेशीर लैंगिक अभिलाषा वाढू दिली. त्याने, उरीयाची पत्नी किती सुंदर होती ते पाहिले, व तिच्याबरोबर बेकायदेशीर लैंगिक सुखाचा आनंद घेण्यासाठी त्याने त्याच्या विचारावर आणि कृत्यांवर नियंत्रण ठेवले नाही. (२ शमूवेल ११:२-४; याकोब १:१४, १५) निश्‍चितच अशाप्रकारचा लोभ आम्ही त्वरीत टाळला पाहिजे. विवाहात देखील आम्ही लोभ टाळणे उचित आहे. यात प्रमाणापेक्षा अधिक लैंगिक कृत्यांना नाकारण्याचा समावेश होतो. या क्षेत्रातील लोभाला टाळण्याचा पतीने निश्‍चय केला तर त्याला त्याच्या सहचरीबद्दल खरी आस्था असेल, कुटुंब नियोजनाच्या बाबतीत त्यांच्यातील कोणी एकाने निवड केल्यास त्यात त्याने स्वतःच्या आनंदाला अधिक महत्त्व न देता पत्नीच्या सद्य आणि भविष्यातील आरोग्याला दिले पाहिजे.—फिलिप्पैकर २:४.

लोभ टाळण्यासाठी सतत निश्‍चय राहू द्या

२१. लोभिपणाच्या आमच्या चर्चेमुळे आम्ही का नाराज होऊ नये?

२१ यहोवा, कोणतीही सावधगिरी किंवा इशारा बेभरवसा वाटतो म्हणून देत नाही. त्याला हे माहीत आहे की त्याच्या समर्पित सेवकांना प्रामाणिकपणे त्याची सेवा करावयाची इच्छा आहे, व त्याचा विश्‍वास आहे की अनेक लोक असे करीत राहतील. त्याच्या एकंदर लोकांसंबंधी, ईयोबाविषयी सैतानाला बोलताना जे उद्‌गार त्याने काढले तसेच तो काढू शकतो: “माझा सेवक ईयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्त्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही.” (ईयोब १:८) आमचा प्रेमाळू विश्‍वासू स्वर्गीय पिता, लोभाबरोबर संबंध असणाऱ्‍या धोकेदायक पाशापासून आम्हाला सावध करतो, कारण त्याची इच्छा आहे की आम्ही त्याला सतत निर्दोष आणि विश्‍वासू राहिले पाहिजे.

२२. आमच्या अभ्यासाने आम्हाला वैयक्‍तिक किंवा कमतरतेच्या धोक्याच्या एखाद्या क्षेत्राला उघड केले आहे तर मग आम्ही काय केले पाहिजे?

२२ आम्हा प्रत्येकाला लोभिपणाची प्रवृत्ती वारशाने मिळालेली आहे व आम्ही त्यात या दुष्ट जगाच्या प्रभावाखाली कदाचित आणखी वाढ केली असेल. लोभिपणाच्या आमच्या अभ्यासाच्या दरम्यान—संपत्तीसंबंधी, मालमत्ता, सामर्थ्य आणि अधिकार, भोजन, किंवा लैंगिक सुख—यातील कमतरतेचे एखादे क्षेत्र तुम्ही पाहिले तर? तर मग येशूचा सल्ला तुमच्या अंतःकरणाप्रत जाऊ द्या: “जर तुझा हात तुला अडखळवीत असेल तर तो तोडून टाक; तुला दोन हात असून तू गेहन्‍नात, . . . जावे यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुला बरे आहे.” (मार्क ९:४३, पं. रमाबाई भाषांतर.) तुम्हाला तुमच्या मनोवृत्तीत किंवा आस्थांच्याबाबतीत कोणतेही बदल करावयाचे झाल्यास ते तुम्ही करा. प्राणघातक लोभाचा पाश टाळा. अशाप्रकारे, देवाच्या मदतीने तुम्ही ‘जीवनात जाऊ’ शकाल.

मी काय शिकलो?

▫ लोभाच्या पाशाबद्दल आम्ही चिंता का केली पाहिजे?

▫ कोणत्या मार्गांनी संपत्ती किंवा मालमत्तेचा लोभ आम्हाला पाशात अडकवू शकतो?

▫ कशाप्रकारे जीवनाच्या इतर क्षेत्रातील लोभ खरे धोके प्रस्तुत करु शकतात?

▫ लोभासंबंधाने आमच्यात असलेल्या कोणत्याही कमतरतेविषयी आमची कोणती मनोवृत्ती असली पाहिजे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा