वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 ६/१ पृ. ३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • बायबलमध्ये जुगाराचा निषेध करण्यात आला आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • इंडेक्सच्या साहाय्याने आपले राज्याचे उपाध्यपण पूर्ण करणे
    आमची राज्य सेवा—१९९१
  • जुगाराबद्दल देवाला काय वाटतं?
    सावध राहा!—२०१५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 ६/१ पृ. ३१

वाचकांचे प्रश्‍न

ख्रिस्तीजण पैशाची पैज लावीत नाही, तर त्यांनी तिकिटाचा स्वीकार करणे किंवा ज्यात त्यांना बक्षीस मिळेल असे ड्रॉ काढणे, यात सहभाग घेऊ शकतात का?

हा असा प्रश्‍न आहे जो वेळोवेळी उद्‌भवलेला आहे, यामुळे आमच्या प्रकाशनात तो आधीच आलेला आहे. काही भाषेत आम्ही आमच्या प्रकाशनांची सूची उपलब्ध केलेली आहे, जसे की वॉचटावर पब्लिकेशन इन्डेक्स १९३०-१९८५ (आणि १९८६-१९९० पर्यंत). एखाद्या ख्रिश्‍चनाकडे त्याच्या भाषेत ही सूची असेल तर त्वरीत समाधानकारक उत्तरे मिळण्यासाठी हे अतिशय उपयोगी असू शकते.

वर विचारलेला प्रश्‍न हे याचे उदाहरण आहे. १९३०-१९८५ च्या सूची मधील “वाचकांचे प्रश्‍न,” या मथळ्याखालील “‘ड्रॉ काढणे,’ याची तिकीटे ख्रिश्‍चन स्वीकारू शकतात का?” वाचकाला फेब्रुवारी १५, १९७३, पृष्ठ १२७ च्या द वॉचटावर मधील “वाचकांचे प्रश्‍न” हे सदर पडताळण्यासाठी निर्देश करते.a अनेक साक्षीदारांजवळ १९७३ चा खंड (किंवा सुटे अंक) आहेत, किंवा अनेक राज्य सभागृहातील ग्रंथालयाचा उपयोग करु शकतात.

प्रकाशित केलेल्या १९७३च्या चर्चेने दर्शविले की, ख्रिश्‍चनांनी घोड्याच्या शर्यतीवर लावलेल्या जुगारीला टाळले पाहिजे किंवा ड्रॉ काढणे ज्यात तिकीटे काढून ती विकून ज्याला त्याच्या तिकीटावरील क्रमांक लागेल त्याला ती वस्तू देणे किंवा ती घेण्यासाठी पैशाचा वापर करणे याचा त्यात समावेश होतो. स्पष्ट सांगावयाचे म्हणजे, लोभिष्टपणाचे वक्‍तव्य असल्यामुळे आम्ही जुगार टाळतो.—१ करिंथकर ५:११; ६:१०; इफिसकर ४:१९; ५:३, ४.

जाहिरातबाजी करण्याचे साधन म्हणून दुकान किंवा एखादा व्यापार अशा “ड्रॉ” चा वापर करील. काहीही खरेदी न करता एखाद्या व्यक्‍तीला एखादा फॉर्म किंवा तिकीट पाठवून त्याचे नाव दाखल करावे लागते. ड्रॉ काढणे हे जाहिरातबाजीच्या योजनेचा भाग आहे; कोणाला बक्षीस किंवा बक्षीसे दिली जातील असा कोणताही पक्षपात न करता रचना केलेली पद्धत असते. व्यापारी दुकानातून जाहिरातीसाठी कार्यक्रमात वापरत असलेल्या मोफत नमुन्यांचा किंवा इतर बक्षीसाचा जसे ते स्वीकार करतात तसेच जुगारीचा संबंध नसलेले ड्रॉ काढून बक्षीसे स्वीकारता येतील. असे काही ख्रिश्‍चनांना वाटू शकेल.

तथापि, काही ख्रिश्‍चन अशा प्रकारातील सर्व गोष्टींपासून दूर राहतील, कोणाला अडखळविण्याचे किंवा गोंधळात पाडण्याचे आणि नशीबावर विश्‍वास ठेवण्याच्या कोणत्याही मोहापासून दूर राहण्याचे इच्छितील. यशया ६५:११ प्रकट करते की, देवाचे सेवक स्वतःचे संबंध “भाग्यदेवते” किंवा “दैवाच्या देवते” बरोबर जोडणार नाहीत. विजेत्याला मिळालेल्या ख्यातीचा सहभाग इतरांसोबत करण्यात देखील ते भाग घेणार नाहीत. ज्यांना असे वाटते त्यांनी, ज्या ख्रिस्ती व्यक्‍तीला किंवा ख्रिश्‍चनाला अशा प्रकारचा ड्रॉ काढण्यात त्यांचा विवेक परवानगी देत आहे तर अशांबद्दल टिका करणारे होऊ नये.—पडताळा रोमकर १४:१-४.

[तळटीपा]

a हेच साहित्य “ॲडव्हरटाइझिंग,” “बिझनेस,” आणि “गॅम्बलिंग,” या सदराखाली मिळू शकते, यास्तव एखादी माहिती शोधण्यासाठी सूचीतील विविधता मदत करते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा