वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 १०/१ पृ. ३२
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • बायबलमध्ये जुगाराचा निषेध करण्यात आला आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 १०/१ पृ. ३२

वाचकांचे प्रश्‍न

◼ लॉटरी तिकिटांच्या विक्रीचे उत्पन्‍न हे धर्मार्थ संस्थांना जात असेल तर केवळ मनोरंजनाखातर ही तिकिटे ख्रिस्तीजनाने विकत घेणे बरोबर ठरेल का?

योग्य मनोरंजनास पवित्र शास्त्र खचितच मनाई करीत नाही, कारण यहोवा स्वतः “आनंदी देव” आहे. (१ तीमथ्य १:११) त्याच्या लोकांना संगीत, मर्यादशील नाचगाणे, खाणे, पिणे व समतोल क्रिडा व खेळ यांचा आनंद लुटता येईल. (स्तोत्रसंहिता १५०:४; उपदेशक २:२४) तथापि, जुगार हा देवाकडील सूज्ञ सल्ल्याच्या विरुद्ध आहे व हेच लॉटरीविषयीही खरे आहे.

ही लॉटरी प्रत्यक्षात काय असते? तिचे तिकिट विकत घेतल्यामुळे एखादे बक्षीस मिळण्याचा संभव असतो. विजेता कोण हे नंबर काढून किंवा कोणातरी अज्ञात मार्गाने नंबराची निवड करून ठरविले जाते.a कधीकधी तर लाखो रुपयांचे बक्षीस त्यात असते. या प्रचंड स्वरुपी बक्षिसाचे आकर्षण एवढे जबरदस्त आहे की आज लॉटरी ही “व्याप्तरुपी जुगार बनली आहे.” (द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ) करोडो लोक आज लॉटरीद्वारे जुगार खेळत आहेत.

काही लोकांचे असे म्हणणे आहे की, लॉटरी घेण्यात कोणतीच चूक नाही किंवा त्यात काही वावगे नाही. कारण ती तिकिटे एकतर स्वस्त असतात व ती विकत घेणारा आपखुशीने ती घेत असतो. तसेच याकरवी मिळणाऱ्‍या उत्पन्‍नाचा काही भाग हा धर्मार्थ उद्देशास्तव, जसे की, गोरगरीबांसाठी मदत म्हणून वापरला जातो. असे हे समर्थन केवढे साधार आहे?

काही जरी म्हणत असतील की, लॉटरी घेणे ही साधी, स्वस्त दराची करमणूक आहे; पण यामागे जी हाव दडलेली आहे ती कदाचित नाकारता येणार नाही. पुष्कळ पैसा हाती यावा यासाठीच लोक लॉटरी विकत घेत असतात. ही गोष्ट खचितपणे हाव याविषयी जो ईश्‍वरी सल्ला त्याच्याविरुद्ध जाते, कारण ती इतकी गंभीर गोष्ट आहे जी एखाद्याला ‘देवाच्या राज्याचे वतन मिळण्यापासून’ वंचित ठेवू शकेल. या कारणास्तव, कोणी ख्रिस्ती जुगार खेळीत राहून ही हाव प्रदर्शित करीत असला तर त्याला ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत केले जाते. (१ करिंथकर ५:११; ६:१०) पवित्र शास्त्र म्हणतेः “आरंभी उतावळीने [हावेने] मिळविलेल्या धनाचा शेवट कल्याणकारक होत नाही.” (नीतीसूत्रे २०:२१) तद्वत, कोणा ख्रिश्‍चनाला, ‘बघू या बक्षीस लागते का’ असे वाटून लॉटरी घेऊशी वाटली तर त्याने लॉटरीमागील लोभाचा गंभीरपणे विचार करावा. इफिसकर ५:३ म्हणतेः “लोभ याचा तुम्हामध्ये उच्चारही न होवो.” तर मग, ख्रिश्‍चनांनी त्याकडे वळणेच नको.

लॉटरी खेळणारे बहुतेक गरीब वसाहतीतील लोक आढळतात. तिकिटांची किंमत कमी असली तरी अन्‍न, वस्त्र तसेच चांगला वैद्यकीय उपचार या अत्यावश्‍यक कौटुंबिक गरजांसाठी खर्च होणारा पैसाही येथे लावला जातो. कोणी ख्रिस्ती असल्याचे ठासून सांगतो पण अशा कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यात हयगय करीत आहे तो, “विश्‍वास न ठेवणाऱ्‍या इसमापेक्षा वाईट आहे.”—१ तीमथ्य ५:८.

जरी लॉटरी तिकिटांच्या किमतीचा एखाद्याच्या वैयक्‍तीक किंवा कौटुंबिक आर्थिक स्थितीवर परिणाम होणार नसेल तरी दुसऱ्‍यावर याचा काहीच परिणाम होत नाही असा याचा अर्थ नाही. ते कसे? कारण प्रत्येक जण आपल्याला बक्षिस मिळावे याच उद्दिष्टाने लॉटरी घेत असतो. पण त्याची ही बक्षिसाची रक्कम कोठून मिळते? तिकिटाची किंमत दोन रुपये तर बक्षिस एक लाख रुपयांचे असते. याचा अर्थ तो इतर पन्‍नास हजारांच्या तिकिटांचे पैसे आपल्याकडे घेत असतो. तर, शेजाऱ्‍याच्या किंवा इतरांच्या धनाची लालसा धरु नकोस हा जो देवाने नियम दिला आहे त्याच्या सदृश्‍य हे वागणे ठरते का? (अनुवाद ५:२१) खरे म्हणजे, त्याची बक्षिसाची रक्कम देण्यासाठी पन्‍नास हजारांपेक्षा अधिक तिकिटांची विक्री करावी लागते. कारण उत्पन्‍नाचा मोठा भाग तिकिट विक्री व्यवस्थेचा खर्च, धर्मादाय देण्यासाठी वापरावा लागतो. त्यामुळे कोणाला जरी तिकिटामागे दोन रुपये देणे काहीही वाटत नसेल तरी इतर असंख्य लोकांबद्दल काय? याशिवाय त्याला लागलेल्या बक्षिसाविषयी आणखी चारचौघात चर्चा होऊन त्यांनाही लॉटरी घेण्याची इच्छा जडते, तेही एक किंवा दोन नव्हे तर बक्षिस मिळविण्यासाठी अधिक तिकिटे घ्यावी लागतात. हे एखाद्याला परवडणारे नसते.

लॉटरी म्हटली की, विनाकष्टाने मोठे बक्षिस मिळविण्याचे स्वप्न बघणे ही गोष्ट नाकारताच येणार नाही. होय, लॉटरी आळसाला उत्तेजन देणारी आहे व त्याचेच ती अपील करते. पण, पवित्र शास्त्र देवाच्या लोकांस काटकसरी, दिर्घोद्योगी व कष्टाळू असण्यासाठी आर्जविते. ‘काहीही न करता आयते मिळवावे’ अशी वृत्ती राखण्याऐवजी, ते असा सल्ला देतेः “कोणाला काम करण्याची इच्छा नसली तर त्याने खाऊही नये.”—२ थेस्सलनीकाकर ३:१०; नीतीसूत्रे १३:४; २०:४; २१:२५; १ थेस्सलनीकाकर ४:९-१२.

लोक सारासार विचार न करता लॉटरी घेतात तसेच तिला सध्या अधिकृत मान्यता आहे म्हणून ती ख्रिश्‍चनांनी घ्यावी हे समर्थन रास्त नाही. काही सरकार जुगारांच्या प्रकारांना तसेच वेश्‍याव्यवसाय व अनेक बायका करण्यास अधिकृत संमती देऊन आहेत. अशा गोष्टी कायदेशीररित्या मान्य असल्या व अनेक त्यात स्वखुषीने सामील होत आहेत तरी त्या देवाच्या दृष्टीकोणातून बरोबर आहे असा त्याचा अर्थ होत नाही. उलटपक्षी, ख्रिस्तीजनांनी दाविदासारखा दृष्टीकोन राखण्याचा यत्न ठेवावाः “हे यहोवा, तुझ्या वाटा मला दाखीव. तुझे मार्ग मला प्रकट कर. तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे; कारण तू माझा उद्धारक देव आहेस.”—स्तोत्रसंहिता २५:४, ५.

कोणा ख्रिश्‍चनाला गरीबांचे, अपंगांचे व वृद्धांचे साहाय्य करण्याची इच्छा खरीच आहे तर ते त्याने थेट करावे; ज्यात जुगार समाविष्ट आहे त्या मार्गाने करू नये.

[तळटीपा]

a  लॉटरी हे नाव जरी परिचित असले तरी जुगाराच्या या प्रकाराला देशादेशात विविध नावांनी संबोधिले जाते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा