वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 ६/१ पृ. ३२
  • तुम्ही उपस्थित का राहिले पाहिजे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही उपस्थित का राहिले पाहिजे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • “आनंदी स्तुतीकर्ते” यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • “देवाच्या वचनावर विश्‍वास” या प्रांतीय अधिवेशनास तुमचे स्वागत!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • “ईश्‍वरी भय” या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • “ईश्‍वरी जीवनाचा मार्ग” १९९८ चे प्रांतीय अधिवेशन लवकरच!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 ६/१ पृ. ३२

तुम्ही उपस्थित का राहिले पाहिजे

“ईश्‍वरी शिक्षण” प्रांतीय अधिवेशनात तुम्हाला चार दिवस आध्यात्मिक माहितीचा मोबदला मिळेल, संपूर्ण जगभरातील शहरात उन्हाळ्यापासून त्याची आधीच सुरवात झालेली आहे. भारतात या वर्षी १७ अधिवेशनांची योजना केली आहे, त्यांची सुरवात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होऊन ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतील. साधारणपणे, कार्यक्रमाची सुरवात गुरूवारी दुपारी १:२० ला होणार आहे. आणि त्याची समाप्ती रविवारी संध्याकाळी ४:१५ ला होईल. जगाच्या इतर ठिकाणातील अधिवेशनात ह्‍या आनंदाच्या प्रसंगी त्यांच्या घरी परतण्यासाठी मदत केलेल्या मिशनऱ्‍यांच्या अहवालाचा काही भाग ठळकपणे मांडण्यात येईल.

तुम्ही वयस्कर किंवा तरुण—पती, पत्नी, पिता, माता, किशोरवयीन किंवा लहान मूल असा, तुम्हाला फायदा होईल अशा प्रकारे स्पष्टरितीने सादर केलेले शिक्षण प्राप्त होईल. उदाहरणार्थ, अनेक लोक आज विचारतात की जीवनाचा उद्देश काय आहे? शुक्रवारी सकाळी, या प्रश्‍नाची चर्चा करताना ते ऐकण्यात तसेच प्राप्त झालेला विषय इतरांना समजाविण्यासाठी मदत करण्यात तुम्हाला आनंद वाटेल.

शुक्रवारी दुपारी कार्यक्रमात पुढे, “विवाहाला टिकाऊ एकात्मता बनविणे,” “तुमच्या घराण्याच्या तारणासाठी परिश्रमपूर्वक काम करा,” आणि “पालकांनो—तुमच्या मुलांना विशेष लक्ष देण्याची गरज आहे” हे भाग हाताळले जातील. यानंतर लगेचच, तरुण लोक तोंड देत असलेल्या समस्या व त्याचा ते कसा सामना करु शकतील यावर खास लक्ष दिले जाईल. आधुनिक-दिवसातील, आपल्या निर्माणकर्त्याचे आता स्मरण करणारे युवक या नाटकाने त्यांना उत्तेजन मिळाले पाहिजे.

शनिवारी कार्यक्रमात, येशूची शेवटल्या दिवसाची भविष्यवाणी खासपणे: “त्या दिवसातील संकटानंतर लागलेच सूर्य अंधकारमय होईल” या शब्दांवर कार्यक्रमात चर्चा केली जाईल. (मत्तय २४:२९) ते संकट कधी येईल याची चर्चा ऐकण्याचे तुम्ही इच्छिणार. शनिवारचा कार्यक्रम यहोवाच्या साक्षीदारांच्या आधुनिक दिवसातील अहवालाचाही पुनर्विचार करील व त्यांनी काय साध्य केले आहे हे दाखवील.

रविवारी, फसू नका किंवा देवाचा उपहास करु नका हे शिर्षक असलेले नाटक, आजचे लोकप्रिय व्हिडीओ आणि संगीतामुळे एका ख्रिश्‍चनाच्या सात्विकतेला आव्हान याला उद्देशून हे असेल. दुपारच्या जाहीर भाषणाचा विषय “आमच्या कठीण काळात हितकारक शिक्षण” हा असेल. कार्यक्रमाची समाप्ती “ईश्‍वरी शिक्षणाला धरुन राहा” ह्‍या सूचनेद्वारे केली जाईल.

सर्व चार दिवस उपस्थित राहिल्याने निश्‍चितच तुम्हाला फायदा होईल! उपस्थित राहण्यासाठी मनापासून तुमचे स्वागत केले जात आहे. तुमच्या घराच्या जवळील ठिकाण शोधण्यासाठी, यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक राज्य सभागृहाशी संपर्क साधा किंवा या मासिकाच्या प्रकाशकांना लिहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा