“वडिलांना बोलवावे”
“तुम्हांपैकी कोणी दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीतील वडिलांना बोलवावे.”—याकोब ५:१४.
१, २. (अ) कोणत्या धोकादायक परिस्थितीत यहोवाचे सेवक स्वतःला पाहात आहेत, आणि त्यांना याचे कसे वाटू शकेल? (ब) कोणत्या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत?
“कठीण दिवस” आता येथे आहेत. या “शेवटल्या काळात” लोक स्वार्थी, भौतिकवादी, गर्विष्ठ तसेच नेहमी अशांतता निर्माण करणारे असे बनत आहेत. (२ तीमथ्य ३:१-५) या दुष्ट व्यवस्थीकरणात खिस्ती या नात्याने जगत असताना आपण स्वतःस तीन मोठ्या धोक्यांना तोंड देत असल्याचे पाहतो: दियाबल सैतान, अभक्त मानवजातीचे जग आणि आपली स्वतःची वारसाने मिळालेली पापी प्रवृत्ती.—रोमकर ५:१२; १ पेत्र ५:८; १ योहान ५:१९.
२ या धोक्याच्या धमकावण्यामुळे कधीकधी आम्हाला कदाचित चिरडून गेल्याप्रमाणे वाटेल. तर मग, विश्वासूपणे सहन करावयास आम्हाला कोठून मदतीचा आधार मिळेल? आमच्या ख्रिस्ती कार्याबाबत आणि आमच्या भक्तीबाबत निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही कोणाकडे मार्गदर्शनासाठी वळावे?
मदत हाताशी आहे
३. आम्हाला कोणाकडून सांत्वनदायी धीर मिळू शकेल, आणि कसा?
३ यहोवा आमच्या सामर्थ्याचा उगम आहे हे ज्ञान आम्हाला सांत्वनदायी धीर देते. (२ करिंथकर १:३, ४; फिलिप्पैकर ४:१३) स्तोत्रकर्ता दावीद ज्याने ईश्वरी मदतीचा अनुभव घेतला, त्याने असे म्हटले: “आपला जीवितक्रम परमेश्वरावर [यहोवा न्यू.व.] सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील.” “तू आपला भार परमेश्वरावर [यहोवा न्यू.व.] टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही.” (स्तोत्रसंहिता ३७:५; ५५:२२) अशाप्रकारच्या आधाराबद्दल आम्ही किती आभारी आहोत!
४. पेत्र व पौल दोघेही कशाप्रकारे सांत्वन देतात?
४ आम्ही अशाप्रकारच्या छळ व धोक्यांना तोंड देणाऱ्यामध्ये एकटे नाहीत हे जाणणे देखील सांत्वन देते. प्रेषित पेत्राने आपल्या सहख्रिश्चनांना आर्जविले होते: “त्याच्याविरुद्ध [दियाबल सैतान], विश्वासात दृढ असे उभे राहा; कारण तुम्हाला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत.” (१ पेत्र ५:९) खात्रीने, प्रत्येक ख्रिश्चनाची विश्वासात बळकट होण्याची इच्छा आहे. प्रेषित पौलाप्रमाणे आम्हाला देखील वारंवार “चोहोकडून येणाऱ्या संकटां” ची जाणीव होते, हे खरे आहे. तरीही, तो “संकुचित झाला” [पं. रमाबाई, मराठी बायबल] नाही. त्याच्या प्रमाणेच, आपणही गोंधळलेले आहोत ‘पण निराश झालेलो नाही.’ जरी आमचा छळ झाला तरी “खाली पडलो,” नाही. आम्ही ‘नाश पावलेलो नाही.’ परिणामत: आम्ही “धैर्य सोडीत नाही.” “आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष” लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. (२ करिंथकर ४:८, ९, १६, १८) आम्ही हे कसे करु शकतो?
५. यहोवा कोणती तीन पदरी मदत पुरवितो?
५ “प्रार्थना ऐकणारा,” यहोवा, तीनपदरी मार्गदर्शन पुरवितो. (स्तोत्रसंहिता ६५:२; १ योहान ५:१४) प्रथम, त्याचे प्रेरित वचन, पवित्र शास्त्र याद्वारे तो मार्गदर्शन सादर करतो. (स्तोत्रसंहिता ११९:१०५; २ तीमथ्य ३:१६) दुसरे, त्याचा पवित्र आत्मा त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यास आम्हाला समर्थ करतो. (पडताळा प्रे. कृत्ये ४:२९-३१.) आणि तिसरे, यहोवाची पृथ्वीवरील संस्था आम्हाला मदत करावयास सतत तयार असते. मग साहाय्य मिळवण्याकरता आम्ही काय केले पाहिजे?
“मानवांमध्ये देणग्या”
६. तबेरा येथे यहोवाने कोणती मदत पुरविली आणि कशी?
६ संदेष्टा मोशेच्या दिवसातील प्रसंग, आम्हाला यहोवा आपल्या सेवकांना मदत पुरवून जी प्रेमळ चिंता व्यक्त करतो त्याची गुणग्राहकता बाळगण्यास मदत करतो. तबेरा या ठिकाणी हे घडले, ज्याचा अर्थ “जळता; वणवा; ज्वाळा,” असा होतो. सिनायच्या या अरण्यवासाच्या ठिकाणी, तक्रार करणाऱ्या इस्राएलाविरुद्ध देवाने ही ज्वाळा भडकवली. मिसरातून बाहेर पडताना जो “मिश्र समुदाय” इस्राएलांसोबत आला त्यांनीही पुरविलेल्या ईश्वरी आहाराबद्दल असंतोष प्रकटविण्यात सहभाग घेतला. देवाचा क्रोध पाहून व लोकांची जबाबदारी व त्यांच्या गरजेचा भार जाणून मोशेने शोक केला: “मला एकट्याला ह्या सर्व लोकांचा भार सहन होत नाही; ते मला फारच जड जात आहे. मला असेच तू वागवणार असलास, तर माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास मला एकदाचा मारून टाक म्हणजे माझी दुर्दशा मला पाहावी लागणार नाही.” (गणना ११:१-१५) यहोवाने कसा प्रतिसाद दाखविला? त्याने ‘इस्राएल लोकांचे सत्तर वडील’ नियुक्त केले आणि त्याचा आत्मा त्यांच्यात घातला जेणेकरून ते योग्यरितीने मोशेसोबत कारभारीपणाचे काम करू शकतील. (गणना ११:१६, १७, २४, २५) अशा गुणसंपन्न पुरुषांना नियुक्त केल्यामुळे इस्राएलांना व ‘मिश्र समुदायाला’ अगदी सहजगत्या मदत मिळू शकली.—निर्गम १२:३८.
७, ८. (अ) “मानवांतील देणगी” यांची प्राचीन इस्राएलात यहोवाने कशी मदत पुरविली? (ब) स्तोत्र ६८:१८ चा पहिल्या शतकात पौलाने कसा अवलंब केला?
७ इस्राएल लोक वचनयुक्त देशात आल्यानंतर पुष्कळ वर्षांनी यहोवा लाक्षणिकरित्या सिनाय पर्वतावर चढला आणि यरुशलेमाला दावीद, राजा असलेल्या नमुनेदार राज्याची राजधानी बनविले. “सर्वसमर्थ,” देवाच्या स्तुतीसाठी, दावीदाने आपला स्वर उंचावला: “तू उच्च स्थानी आरोहण केले आहे; तू पाडाव केलेल्यास कैद करुन नेले आहे; मनुष्यांमध्ये, तुला नजराणे मिळाले आहेत.” (स्तोत्रसंहिता ६८:१४, १८) खरे पाहता, वचनयुक्त देशाला जिंकून घेतल्यामुळे बंदिवासातील लोक हे लेवीय लोकांसोबत काम करण्याकरता मदतगार ठरू शकले.—एज्रा ८:२०.
८ इ. सनाच्या पहिल्या शतकात, स्तोत्रकर्त्याच्या या शब्दाच्या भविष्यवादी पूर्णतेकडे ख्रिस्ती प्रेषित पौलाने लक्ष वेधविले. पौलाने लिहिले: “आपणांपैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिणामाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे. म्हणून तो म्हणतो: ‘त्याने उच्चस्थानी आरोहण केले तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेले व मानवांना देणग्या दिल्या.’ त्याने ‘आरोहण केले,’ ह्यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता, ह्यापेक्षा दुसरे काय समजावे? जो खाली उतरला होता त्यानेच सर्व काही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर ‘आरोहण केले;’” (इफिसकर ४:७-१०) हा “त्यानेच” कोण आहे? यहोवाचा प्रतिनिधी, थोर दावीद आणि मशीही राजा, येशू ख्रिस्त याशिवाय दुसरा कोणीही नाही. हाच तो आहे ज्याला देवाने पुनरुत्थितीत केले व “अत्युच्च” जागेवर नेमिले.—फिलिप्पैकर २:५-११.
९. (अ) पहिल्या शतकातील मानवातील देणग्या कोण होते? (ब) आधुनिक दिवसातील मानवातील देणग्या कोण आहेत?
९ तर मग, “मानवांना देणग्या” (किंवा, “मानवांमध्ये समाविष्ट”) असलेले हे कोण आहेत? पौल याचे स्पष्टीकरण देतो की देवाच्या प्रमुख प्रतिनिधीने “कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले; ते ह्यासाठी की, त्यांनी पवित्रजनांस सेवेच्या कार्याकरीता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरीता सिद्ध करावे.” (इफिसकर ४:११, १२) येशूच्या सर्व अनुयायांनी ईश्वरशासित मार्गदर्शनाखाली प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, मेंढपाळ आणि शिक्षक या नात्याने सेवा केली. (लूक ६:१२-१६; प्रे. कृत्ये ८:१२; ११:२७, २८; १५:२२; १ पेत्र ५:१-३) आमच्या दिवसात, संपूर्ण जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या ७०,००० मंडळ्यामधून आध्यात्मिकरित्या लायक अशा वडीलांची पवित्र आत्म्याद्वारे पर्यवेक्षक म्हणून सेवा करावयास नियुक्ती झालेली आहे. (प्रे. कृत्ये २०:२८) राज्य प्रचाराचे काम नियमितरित्या वेगाने जगभरात विस्तारत असता, जास्तीतजास्त बांधव “अध्यक्षाच्या कामा”सोबत असलेल्या जबाबदारीचा भार उचलण्यासाठी ‘पुढे येत आहेत’ व मदत करत आहेत. (१ तीमथ्य ३:१) त्यांची नियुक्ती झाल्यावर ते देखील मानवांना मिळालेल्या देगणीपैकी एक होतात.
१०. यशयाने वर्णीलेले “सरदार” हे आजच्या ख्रिस्ती वडिलांना कसे लागू होते?
१० हे ख्रिश्चन वडील, किंवा मानवातील देगणी, संदेष्टा यशयाने जेव्हा राज्य अधिपत्याखाली कारभारी म्हणून असलेल्या ‘सरदारां’च्या भूमिकेबद्दल भाकीत केले होते त्याच्या वर्णनाशी अगदी मिळते जुळते आहे. त्यातील प्रत्येकजन हा “वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल; रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाल खडकाची छाया” असे होतील. (यशया ३२:१, २) या नियुक्त मानवांद्वारे किती उभारणीकारक प्रेमळ देखरेख असली पाहिजे हे यावरून स्पष्ट होते. यापासून तुम्हाला जास्तीत जास्त कसा फायदा होऊ शकेल?
पुढाकार घेणे
११. आध्यात्मिकतेत कमकुवत झाल्यास आम्ही कशी मदत घेऊ शकतो?
११ एखादा बुडणारा माणूस सहाजिकच मदतीसाठी ओरडतो. येथे कोणत्याही प्रकारची अनिश्चितता नाही. जीवन हे धोक्यात आहे, तेव्हा मदत माग असे कोणीही पाठीमागून सांगणार नाही. दावीद राजाने वारंवार यहोवाकडे मदत मागितली नाही का? (स्तोत्रसंहिता ३:४; ४:१; ५:१-३; १७:१, ६; ३४:६, १७-१९; ३९:१२) आध्यात्मिक कमकुवत, तसेच निराशेत बुडून गेलेलो असता आपण देखील अशाचप्रकारे यहोवाकडे त्याच्याकडील पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रार्थना व याचना करू शकतो. (स्तोत्रसंहिता ५५:२२; फिलिप्पैकर ४:६, ७) शास्त्रवचनाद्वारे आम्हाला सांत्वन लाभते. (रोमकर १५:४) व्यावहारीक सल्ल्यासाठी आपण वॉचटावर सोसायटीच्या ख्रिस्ती प्रकाशनाचे मार्गदर्शन घेतो. आमच्या स्वतःच्या समस्यांना सोडविण्याची कुवत ते आम्हाला नेहमी पुरवितात. आम्ही समस्यांनी दबून गेलो असलो, तर मंडळीतील नियुक्त वडिलांकडून आपण सल्ला घेऊ शकतो. वस्तुतः अशी वेळ येते की जेव्हा अगदी खरोखर ‘वडिलांना बोलावण्याची’ गरज असते. ख्रिस्ती वडीलांनाच का बोलावावे? आध्यात्मिक सहाय्यतेची गरज असलेल्यांना ते कशी मदत करू शकतात?
१२-१४. (अ) कोणी आजारी असल्यास कोणती हालचाल सुज्ञतेची ठरते? (ब) याकोब ५:१४, प्रमाणे ‘आजारी’ व्यक्तीने काय करण्याचा सल्ला दिला आहे? (क) याकोब ५:१४ कोणत्या प्रकारच्या आजाराचा संदर्भ देते, आणि तुम्ही असे उत्तर का देता?
१२ आपण आजारी पडतो तेव्हा आपल्या शरीराला काम करण्यासाठी शक्ती पुन्हा मिळावी म्हणून आपण विश्रांती घेतो. पण जर आमचा आजार बळावला, तर मात्र चांगली वैद्यकीय मदत घेणे सुज्ञतेचे ठरते. मग जर आम्ही आध्यात्मिकतेत अशक्त बनलो तर असेच करणार नाही का?
१३ याबाबतीत शिष्य याकोब कोणता सल्ला देतो त्याकडे लक्ष द्या. तो म्हणतो: “तुम्हांपैकी कोणी दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या [यहोवा न्यू.व.] नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी.” (याकोब ५:१४) कोणत्या प्रकारच्या आजाराचा येथे याकोब उल्लेख करीत आहे? काही पवित्र शास्त्र भाष्यकार या निर्णयापर्यंत पोहचले की हा शारीरिक आजार आहे, ते असा युक्तीवाद करतात की तेल लावणे ही त्या दिवसातील सामान्य वैद्यकीय कृती होती. (लूक १०:३४) त्यावेळेस याकोबाच्या मनात अद्भुत कृत्यांद्वारे बरे करण्याच्या देणगीचा विचार होता असा ते विश्वास धरतात. हा संदर्भ तरीपण, आपल्याला काय दर्शवितो?
१४ ‘आनंदी असणे’ हे “दुःख भोगणारा” याच्या विरुद्धतेत आहे. याकोब आध्यात्मिक आजाराविषयी जी चर्चा करत होता त्याच्याशी याचा संबंध आहे. (याकोब ५:१३) येथे डॉक्टर किंवा अद्भुतरितीने बरे करण्याचे दान असणाऱ्यांना बोलावण्यास सांगितले नव्हते, तर “मंडळीच्या वडिलांना” बोलावण्यास सांगितले होते. आणि त्यांनी काय करावयाचे होते? याकोब सांगतो: “त्यांनी त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. . . . विश्वासाची प्रार्थना दुःखणाईतास वाचवील.” (याकोब ५:१४, १५; पडताळा स्तोत्रसंहिता ११९:९-१६.) शेवटी हे शाबीत होते की याकोब आध्यात्मिक आजाराचा उल्लेख करतो जो की वस्तुत: पापाचा कबुलीजबाब आहे ज्याचा संबंध बरे होण्याच्या आशेशी आहे. तो लिहितो: “तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा.” जर आध्यात्मिक आजाराचे कारण एखादे गंभीर पातक असेल, तर देवाचे वचन पश्चात्ताप करण्याविषयी जे बजावते त्याला अनुकूल प्रतिसाद दिल्यानेच, आणि त्याच्या पापी मार्गापासून वळल्यानेच केवळ आजारी व्यक्ती बरे होण्याची अपेक्षा करु शकते.—याकोब ५:१६; प्रे. कृत्ये ३:१९.
१५. याकोब ५:१३, १४ मध्ये कोणत्या प्रकारच्या हालचालीची शिफारस केलेली आहे?
१५ याकोबाने दिलेल्या सल्ल्यामध्ये लक्षात घेण्यासारखे आणखी काहीतरी आहे. दुःख भोगीत असता, एखाद्या ख्रिश्चनाने ‘प्रार्थना करावी.’ तो आनंदीत असेल, तर ‘त्याने स्तोत्रे गावी.’ कोणी दुःख भोगीत अथवा आनंद करीत असो—प्रत्येक परिस्थितीत—कृती करण्याची हाक दिलेली आहे. एका बाजूस प्रार्थना करण्याची गरज आहे, तर दुसऱ्या बाजूस आनंद व्यक्त करण्याची गरज आहे. तर मग, याकोब, “तुम्हांपैकी कोणी दुखणाईत आहे काय?” असे विचारतो तेव्हा आमचा प्रतिसाद काय असणार. परत तो सकारात्मक कृती करण्याची होय, पुढाकार घेण्याची शिफारस करतो. “त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे.”—स्तोत्रसंहिता ५०:१५; इफिसकर ५:१९; कलस्सैकर ३:१६.
“वडील” कशी मदत देऊ शकतात
१६, १७. पवित्र शास्त्रीय तत्त्वांचे पालन करावयास वडील आमची कशी मदत करु शकतात?
१६ आमच्या वैयक्तिक परिस्थितीला पवित्र शास्त्रीय तत्त्वे कसे लागू करावयाचे हे काही वेळेस आम्हास कळत नाही. तेव्हा ख्रिस्ती वडील हे बहुमोल मदतीचे उगम ठरतात. उदाहरणार्थ, ते आध्यात्मिकतेत आजारी असलेल्यांसाठी प्रार्थना करतात आणि कुशलतेने देवाच्या वचनाद्वारे मिळणाऱ्या सांत्वनदायी शिक्षणाद्वारे, ‘प्रभूच्या [यहोवा न्यू.व.] नावाने त्याला तेल लावतात.’ या रीतीने, आमच्या आध्यात्मिक बरे होण्यामध्ये वडिलांचा खूप मोठा सहभाग आहे. (स्तोत्रसंहिता १४१:५) बहुतेकदा, आम्ही ज्या मार्गाने युक्तीवाद करतो तो योग्य मार्ग असण्याच्या पुष्टीची गरज असते. एखाद्या अनुभवी वडीलासोबत याविषयी बोलण्यामुळे योग्य ते करण्याच्या आमच्या निर्धाराला बळकटी मिळते.—नीतिसूत्रे २७:१७.
१७ ख्रिस्ती वडिलांना भेटीकरता बोलावले असता, त्यांनी ‘जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर’ देण्याची गरज आहे. त्यांनी ‘अशक्तांना आधार, [आणि] सर्वांबरोबर सहनशीलतेने’ वागावयास हवे. (१ थेस्सलनीकर ५:१४) “वडील” व “अशक्त” असलेल्यामधील जवळच्या व समजधारीच्या नातेसंबंधामुळे आध्यात्मिकतेत पूर्णपणे बरे होण्यात वाढ होण्याची शक्यता असते.
वैयक्तिक जबाबदारी आणि प्रार्थना
१८, १९. गलतीकर ६:२, ५ शी संबंधीत कोणती भूमिका ख्रिस्ती वडील पार पाडत असतात?
१८ ख्रिस्ती वडिलांनी देवाच्या कळपाची जबाबदारी उचलली पाहिजे. त्यांनी आधार देणाऱ्यांपैकी असले पाहिजे. उदाहरणार्थ, पौलाने म्हटले: “बंधूजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहा ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा; तूही परिक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.” प्रेषिताने हे देखील लिहिले की: “प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.”—गलतीकर ६:१, २, ५.
१९ आम्ही स्वतःचा भार वाहत असता एकमेकांचे ओझे कसे वाहू शकतो बरे? “ओझी” व “भार” याकरता भाषांतरीत करण्यात आलेल्या मूळ ग्रीक शब्दाच्या अर्थातील फरक याचे उत्तर देते. जर एखादा ख्रिस्ती आध्यात्मिक समस्येत पडतो जी त्याला ओझ्यासमान आहे, तर वडील शिवाय इतर सहविश्वासू त्याला मार्गदर्शन करू शकतात, म्हणजेच त्याच्या ‘ओझ्याला’ वाहण्यास त्याला मदत करु शकतात. तथापि, देवाबाबतीतल्या जबाबदारीचा “भार” मात्र प्रत्येकाने वैयक्तिकरित्या उचलण्याची अपेक्षा केली जाते.a उत्तेजन, आध्यात्मिक सल्ला आणि प्रार्थना याद्वारे आपल्या बांधवांची “ओझी” वडीलजन आनंदाने उचलतात. तरीही, वडील आमचा वैयक्तिक आध्यात्मिक जबाबदारीचा “भार” आपल्यावर घेत नाहीत.—रोमकर १५:१.
२०. प्रार्थनेकडे का दुर्लक्ष करू नये?
२० प्रार्थना अत्यंत जरूरीची आहे आणि ती कधीही दुर्लक्षू नये. पण अनेक आध्यात्मिक आजारी असलेल्यांना प्रार्थना करणे कठीण होते. आध्यात्मिकतेत आजारी असलेल्यांसाठी वडिलांनी विश्वासाने प्रार्थना करण्यामागे, हेतू काय आहे बरे? “प्रभू [यहोवा न्यू.व.] त्याला [निराशेतून] उठवील,” आणि सत्य व नीतिमत्त्व याचा पाठलाग करण्यास त्यास बळकटी देईल. आध्यात्मिकतेत आजारी असलेला ख्रिश्चन चुकीचा दृष्टिकोन बाळगून असेल परंतु कदाचित त्याने गंभीर पाप केलेले नसेल. त्यासाठी याकोब म्हणतो: “आणि, त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल.” वडिलांचा शास्त्रवचनीय सल्ला व सोबत प्रार्थना यामुळे आध्यात्मिक अशक्त झालेल्या व्यक्तीस त्याने केलेल्या गंभीर पापाला कबूल करावयास आणि पश्चात्तापी आत्मा प्रदर्शित करावयास प्रेरणा मिळते. यामुळे देवाच्या बाजूने क्षमा करण्यास आवाहन केले जाते.—याकोब ५:१५, १६.
२१. (अ) वडिलांना बोलावण्यास काही ख्रिश्चन नाखूष का असतात? (ब) पुढच्या लेखात काय विचारात घेण्यात येणार आहे?
२१ ख्रिस्ती मंडळीत येणाऱ्या नवीन जनांच्या समुदायाची काळजी घेण्याच्या आव्हानाला पुरेशा प्रकारे देखरेख करण्यासाठी प्रामाणिक वडिलांना पुष्कळ काही करावे लागते. खरेच, मानवांतील या देणग्या, कठीण काळात टिकून राहावयास यहोवाने पुरविलेली सुंदर तरतुद आहे. तरीही, हे बांधव तर खूपच मग्न आहेत किंवा समस्यांचा खूपच भार त्यांच्यावर आहे असा विचार करून काही ख्रिश्चन त्यांना मदतीसाठी बोलावण्यास माघार घेतात. पुढचा लेख आपल्याला ह्याची गुणग्राहकता बाळगण्यास मदत करील की ही माणसे मदत करावयास आनंदी आहेत कारण ते ख्रिश्चन मंडळीमध्ये स्वेच्छेने सहमेंढपाळ म्हणून काम करीत आहेत.
[तळटीपा]
a अ लिंग्वीस्टीक की टू द ग्रीक न्यू टेस्टमेंन्ट, यामध्ये फ्रिटस् रिनेकर, फोर्टिऑन याची व्याख्या अशी करतात, ‘जो एखादा वाहू शकतो असा भार’ आणि त्यात भर घालून: “सैनिकीपेशात माणसाच्या पाठीवर असलेले सामानाचे गाठोडे किंवा सैनिकाचे शस्त्राशिवाय इतर सामान असलेले ओझे असा शब्दप्रयोग वापरण्यात आला होता.”
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ आम्हाला मदतीची गरज भासते, तेव्हा यहोवाने कोणते तीनपदरी मार्गदर्शन पुरविले आहे?
▫ आधुनिक दिवसातील मानवामधील देणग्या कोण आहेत?
▫ वडिलांना आम्ही कधी बोलवू शकतो?
▫ ख्रिस्ती वडिलांकडून आम्ही कोणत्या मदतीची अपेक्षा करू शकतो?
[चित्र]
प्रार्थना, पवित्र शास्त्र अभ्यास आणि ख्रिस्ती वडीलांची मदत या आध्यात्मिक फायद्यांचा तुम्ही आनंद उपभोगत आहात का?