ख्रिस्ताच्या उपस्थितीवर प्रकाशझोत टाकणे
“जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने येईल, . . . तो लोकांना एकमेकांपासून वेगळे करील.”—मत्तय २५:३१, ३२.
१. मत्तय २४:३ मधील शब्दांचा ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळक वर्गाने कोणता अर्थ व्यक्त केला?
येशूच्या मृत्यूच्या तीन दिवसांआधी, त्याचे चार शिष्य त्याच्याजवळ आले व आस्थेने त्यांनी त्याला विचारले: “ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे [ग्रीक प․रो․सिʹया] व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हास सांगा.” अनेक शतके ख्रिस्ती धर्मजगाच्या पाळकवर्गाने व लेखकांनी मत्तय २४:३ मध्ये येशूच्या शब्दांचा असा अर्थ लावला की सर्व मानवजातीने त्याला पाहावे म्हणून तो पुन्हा एकदा दृश्य शारीरिक रुपात येणार आहे. यास्तव, ख्रिस्ती धर्मजगाच्या पाळक वर्गाने व लेखकांनी ही शिकवण दिली की येशूचे पुनरागमन मोठ्या दिमाखाने व दृश्यपणे थाटामाटात होईल. ते याला येशूचे दुसरे येणे असे संबोधतात. परंतु त्यांच्या कल्पना बरोबर आहेत का?
२, ३. (अ) “येणे” आणि “उपस्थिती” या दोन शब्दांमधील कोणता फरक स्टडीज इन द स्क्रीपचर्स खंड २ ने केला? (ब) ख्रिस्ताच्या प․रो․सिʹयाच्या अर्थाबद्दल यहोवाच्या लोकांना काय समजून आले?
२ एकोणिसाव्या शतकातील ज्योती वाहक म्हणून, १८८९ पर्यंत यहोवाच्या अभिषिक्त जणांना येशूच्या पुनरागमनाच्या विषयाबद्दलची दुरूस्ती आधीच प्राप्त झाली होती. स्टडीज इन द स्क्रीपचर्स खंड २, पृ. १५८ ते १६१ मध्ये वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीचे पहिले अध्यक्ष चार्ल्स. टी. रसेल यांनी असे लिहिले: “प․रो․सिʹया . . . उपस्थितीला चित्रित करते, व सार्वजनिक इंग्रजी पवित्र शास्त्रात केल्यानुसार त्याचे ‘येणे’ असे कधीही भाषांतर करू नये. नव्या कराराचे अगदी मौल्यवान भाषांतर एमफॅटीक डायग्लॉट, प․रो․सिʹयाचे तो येत आहे किंवा मार्गावर आहे असे नव्हे तर आगमनानंतर उपस्थिती झालेला आहे असे योग्य भाषांतर करते. जसे तो [येशू] म्हणतो ‘नोहाच्या दिवसांत होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राची प․रो․सिʹया [उपस्थिती] होईल.’ तर ही तुलना नोहाच्या काळातील ‘जलप्रलया पूर्वी’चे दिवस व ख्रिस्ताचे जगात उपस्थित असणे, त्याचे दुसरे पुनरागमन, आणि हे युग ‘अग्नि’ने प्रभू [यहोवा]च्या दिवशी उद्भवणाऱ्या अत्यंत कठीण त्रासामध्ये नाहीसे होण्याआधीचे दिवस, यातील आहे.”—मत्तय २४:३७.
३ यास्तव, १९व्या शतकांतील यहोवाच्या लोकांनी येशूची प․रो․सिʹया अदृश्य असेल असे अचूकपणे समजून घेतले. एकोणिशे चवदाच्या शरद ऋतुत विदेश्यांच्या काळाची समाप्ती होईल हेही त्यांनी समजून घेतले होते. जसजशी आध्यात्मिक ज्ञानप्रसाराची प्रगती होत गेली, तसे यहोवाच्या लोकांना कळून आले की येशू ख्रिस्ताला १९१४ ह्याच वर्षी स्वर्गामध्ये राज्याचा राजा म्हणून अधिष्ठित केले.—नीतिसूत्रे ४:१८; दानिएल ७:१३, १४; लूक २१:२४; प्रकटीकरण ११:१५.
“आमच्या प्रभूचे आगमन”
४. “आमच्या प्रभूचे आगमन” कशाला चित्रित करते?
४ तर मग, आमच्या दिवसात, “प्रभू येशू ह्याच्या आगमनसमयी” ह्या पवित्र शास्त्रीय शब्दप्रयोगाचा काय अर्थ होतो? (१ थेस्सलनीकरास ५:२३) एका अधिकाऱ्याने असे विवेचन केले की “उपस्थिती,” प․रो․सिʹया “एखाद्या प्रांताला भेट देणारा उच्च पदाचा व्यक्ती विशेषेकरून राजे व सम्राट ह्यांच्यासाठी ही अधिकृत संज्ञा झाली.” यास्तव हा शब्दप्रयोग १९१४ पासून व नंतर स्वर्गामध्ये त्याच्या सिंहासनाधिष्ठ झाल्यावर राजा म्हणून येशू ख्रिस्ताच्या भव्य उपस्थितीचा निर्देश करतो. तो, ‘आपल्या शत्रूंवर प्रभूत्त्व कर’ ही भविष्यसूचक आज्ञा पूर्ण करण्यासाठी सक्रियतेने अदृश्यरित्या हजर आहे. (स्तोत्रसंहिता ११०:२) ख्रिस्ताच्या अदृश्य भव्य उपस्थितीच्या परिणामांचा अनुभव मानव सुमारे ७९ वर्षांपासून घेत आहे.
५. ह्या मासिकाच्या तीन अभ्यासाच्या लेखांमध्ये प․रो․सिʹयाच्या दरम्यान होणाऱ्या कोणत्या वाढीबद्दल चर्चा केली जाणार आहे?
५ तीन लेखांच्या ह्या मालिकेमध्ये आपण, ह्या काळातील ख्रिस्ताच्या राज्याने सिद्धिस नेलेल्या चित्तवेधक पुराव्यांचे पुनरावलोकन करणार आहोत. प्रथमत: पवित्र शास्त्रातील भाकीत केलेल्या व पूर्ण झालेल्या किंवा होता असलेल्या भविष्यवाण्यातील अनेक घटना आम्ही सादर करणार आहोत. दुसरे, येशू त्याच्या भव्य उपस्थितीच्या संपूर्ण काळात, विश्वासू आणि बुद्धिमान दास यांचा उपयोग करून जे प्रचंड काम पार पाडत आहेत त्याचे वर्णन आम्ही देणार आहोत. (मत्तय २४:४५-४७) तिसरा लेख, “मोठ्या संकटाचा” काळ, आमच्यासाठी भव्य समाप्तीचा असेल याचे वर्णन करील. हीच ती वेळ, येशू ख्रिस्त अधर्मी मानवांचा नाश करण्यासाठी व धार्मिक लोकांच्या सुटकेसाठी यहोवाचा दंडाधिकारी म्हणून येण्याची असेल. (मत्तय २४:२१, २९-३१) नाशाच्या त्या काळाबद्दल प्रेषित पौलाने वर्णन केले आहे की “तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्नि ज्वालेसहित प्रगट होईल, तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.”—१ थेस्सलनीकरास १:७, ८.
ते चिन्ह
६. मत्तय २४ आणि २५ अध्यायात कोणत्या संयुक्त चिन्हाचे वर्णन दिले आहे?
६ एकोणीशे वर्षांआधी, येशूच्या ज्योतीवाहक शिष्यांनी राज्यअधिकारात त्याच्या भविष्याच्या उपस्थितीचे चिन्ह किंवा पुरावा मागितला. मत्तयाच्या पुस्तकात २४ आणि २५ अध्यायात नमूद केलेले त्याचे उत्तर संयुक्त चिन्ह सादर करते ज्याचे सर्व घटक आंतरराष्ट्रीय प्रमाणात पूर्ण होत आहेत. त्या चिन्हाची पूर्णता दु:खाचा आणि अति परिक्षेचा काळ चिन्हांकित करते. येशूने असा इशारा दिला: “तुम्हांस कोणी फसवू नये म्हणून सावध असा कारण पुष्कळजण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळांना फसवितील. तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा कारण असे होणे आवश्यक आहे.”—मत्तय २४:४-६.
७. चिन्हांचे कोणते भाग १९१४ पासून पूर्ण झालेले आपण पाहिलेत?
७ येशूने पुढे भाकीत केले की अभूतपूर्व प्रमाणात लढाया होतील. ह्या पूर्णतेत, यातील दोन युद्धांना जागतिक युद्धे म्हणून त्यांचे वर्गीकरण करण्यात आले, एक होते १९१४ पासून १९१८ पर्यंत आणि दुसरे १९३९ ते १९४५ पर्यंत. आणखी पुढे, त्याने म्हटले की जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. खऱ्या ख्रिश्चनांचा कडक छळ केला जाईल. ह्या भविष्यवाणीच्या अगदी खरेपणात, यहोवाच्या साक्षीदारांना, आधुनिक ज्योती वाहकांना देवाच्या राज्याची सुवार्ता “सर्व राष्ट्रांत साक्षीसाठी सर्व जगात” गाजवताना गेल्या आठ दशकांसाठी छळ सहन केला. (मत्तय २४:७-१४) प्रत्येक यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक अहवाल पुस्तक चिन्हांचे स्वरूप पूर्ण होत आहे या पुराव्याबद्दल अधिक सांगते.
८, ९. (अ) येशूच्या भव्य उपस्थितीत काय सामील आहे? (ब) त्याच्या उपस्थितीची पद्धत आणि ठिकाण याविषयी खोट्या ख्रिस्ताबद्दल सांगण्यात आलेला येशूचा भविष्यवाद काय सुचवितो?
८ येशूच्या राज्यअधिकारात संपूर्ण पृथ्वीचा समावेश असल्याने, खरी भक्ती सर्व देशांत विस्तृत होत आहे. त्याच्या राजेशाही उपस्थितीचा (प․रो․सिʹया) काळ गोलार्धव्याप्त तपासणीचा आहे. (१ पेत्र २:१२) परंतु येशूचा सल्ला घेण्यासाठी कोणती राजधानी किंवा केंद्र आहे का? येशूने याचे उत्तर, त्याच्या उपस्थितीच्या अपेक्षेबद्दल भाकीत करताना याप्रकारे दिले, की तेव्हा खोटे ख्रिस्त उठतील. त्याने इशारा दिला: “यास्तव कोणी तुम्हांस म्हणतील, ‘पाहा तो ख्रिस्त अरण्यात आहे तर जाऊ नका; तुम्हास म्हणतील, पाहा तो आपल्या खोलीत आहे तर ते खरे मानू नका. कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चकाकत जाते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे प․रो․सिʹया होईल.”—मत्तय २४:२४, २६, २७.
९ पृथ्वीवर इतर कोणाही पेक्षा अधिक, “मनुष्याचा पुत्र” येशूला माहीत होते की त्याची उपस्थिती चालू झाल्यावर तो कोठे असेल. पृथ्वीवर इकडे किंवा तिकडे वा कोणत्याही विशिष्ट ठिकाणी तो आढळून येणार नव्हता. तो कोणत्याही निर्जन ठिकाणी जणू “अरण्यात” प्रकट होणार नव्हता. असा हा एकांत मशीहाचा शोध घेणाऱ्यांना, त्या ठिकाणाच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या नजरेत न येता, उपयुक्त ठरणार होता व येथेच ते आपल्या नेत्याकडून तालीम घेऊ शकले असते व सर्व तयारी झाल्यावर एक राजकीय गुद्दा लगावून मशीहाला जगाच्या अधिपत्यावर विराजमान करू शकले असते. पण नाही, मशीहा असा येणार नव्हता. याचप्रमाणे तो स्वत:ला “आपल्या खोलीत” दडवून ठेवणार नव्हता, जे ठिकाण त्याने निवडलेल्या थोडया लोकांनाच माहीत असते व येथे कोणाच्या लक्षात न येता, गुप्तपणे तो जगाच्या सरकारांना उलटवून टाकून स्वत:ला वचनदत्त मशीहा म्हणून अभिषेक घडवून आणण्याच्या योजना आखू शकत होता. पण असेही तो काही करणार नव्हता!
१०. गोलार्धव्याप्त रितीने पवित्र शास्त्राचा प्रकाश कसा चकाकत आहे?
१० उलटपक्षी, त्याच्या भव्य राजेशाही उपस्थितीच्या सुरवातीला येशू राजा झाला आहे याबद्दल लपवण्यासारखे काहीच नसणार. येशूने भाकीत केल्याप्रमाणे, जगव्याप्तरितीने पवित्र शास्त्राचा सत्याचा प्रकाश पूर्वेकडून पश्चिमेपर्यंतच्या सर्व भागांवर निरंतर चकाकत राहील. खरोखर, आधुनिक ज्योतीवाहक यहोवाचे साक्षीदार “[यहोवाकडून] येणारे तारण दिगंतापर्यंत न्यावे म्हणून राष्ट्रांचा प्रकाश असे” ठरले आहेत.—यशया ४९:६.
स्वर्गदूतांचे कार्य
११. (अ) राज्याचा प्रकाश पाडण्यासाठी स्वर्गदूतांचा कसा उपयोग केला जात आहे? (ब) गहू वर्गाच्या सदस्यांना कधी व कोणत्या गटात एकत्रित केले गेले?
११ येशूच्या उपस्थितीच्या संबंधाने असलेली इतर वचने दूतांबरोबर येणे, किंवा त्याच्यासोबत दूतांस पाठवणे असे वर्णन करतात. (मत्तय १६:२७; २४:३१) गहू आणि निदणाच्या दाखल्यात, येशूने स्पष्ट केले की “शेत हे जग आहे” आणि “कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे स्वर्गदूत आहेत.” याचा अर्थ, राज्य अधिकाराच्या आणि महिमेच्या त्याच्या उपस्थितीच्या वेळेस तो पृथ्वीवरल्या विशिष्ट कार्यासाठी फक्त स्वर्गदूतांचाच वापर करणार आहे असा होत नाही. एकोणिशे एकोणिसला आरंभ करून, पहिल्या महायुद्धाच्या घटनांमुळे पृथ्वीवर आत्म्याने अभिषिक्त झालेल्या गहू वर्गाचे लोक विखुरले होते त्यांना येशूच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गदूतांनी वेगळे केले व ते राजाच्या नामात पुढे कार्य करण्यासाठी तयार झाले. (मत्तय १३:३८-४३) एकोणिसे वीसच्या दशकामध्ये देवाच्या प्रस्थापित राज्यासाठी इतर हजारो मानवांनी भूमिका घेतली आणि मग ते देवाच्या आत्म्याने अभिषिक्त झाले. हे अभिषिक्त जण मूळच्या शेषांबरोबर काम करण्यासाठी तत्परतेने पुढे आले. तेच सामुदायिकरित्या आमच्या दिवसातले विश्वासू आणि बुद्धिमान दास बनले.
१२. कोणत्या शुद्धीकरणाच्या कामात स्वर्गदूतांनी सहभाग घेतला, आणि पृथ्वीवर त्याचा काय परिणाम झाला?
१२ येशू १९१४ मध्ये राज्यारुढ झाल्यावर त्याच्या उपस्थितीच्या दरम्यान स्वर्गदूतांच्या सहभागितेचे आणखी एक उदाहरण प्रकटीकरण १२:७-९ मध्ये लिखित आहे: “‘मीखाएल’ [येशू ख्रिस्त] व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्याच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले. तरी त्यांचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले.” अशाप्रकरे, वरील स्वर्गाला शुद्ध केले गेले परंतु यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण करण्यासाठी पृथ्वीच्या राज्यांना पूर्णपणे शुद्ध करण्याचे बाकी आहे. १९९३ ह्या वर्षी, ईश्वरी इशारा अजूनही लागू होत आहे: “भूमि ह्यांना हाय हाय . . . कारण सैतान उतरून तुमच्याकडे आला आहे, आणि आपणाला थोडकाच काळ आहे हे त्याला समजते म्हणून त्याला मोठा राग आला आहे.”—प्रकटीकरण १२:१२, पंडिता रमाबाई भाषांतर.
स्वर्गीय पुनरुत्थान
१३, १४. (अ) शास्त्रवचने, १९१८ पासून काय चालू झाले असे स्पष्ट करतात? (ब) आजच्या अभिषिक्त शेषांच्या संबंधात पौल आणि योहान काय प्रकट करतात?
१३ ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या दरम्यान आणखी एक आश्चर्यकारक घटना म्हणजे स्वर्गीय पुनरुत्थानाची सुरवात. प्रेषित पौलाने हे स्पष्ट केले की त्यांच्या कबरेत गाढ निद्रेत असलेल्या अभिषिक्त ख्रिश्चनांना उठविले जाईल आणि आत्मिक राज्यात ते येशू ख्रिस्ताबरोबर जीवंत राहतील. ही घटना १९१८ पासून घडण्यास चालू झाली हे दाखवण्यासाठी अनेक वर्षांपासून पुरावा सादर केला जात आहे. पौल लिहितो: “ख्रिस्तामध्ये सर्व जीवंत केले जातील. पण प्रत्येक आपआपल्या क्रमाप्रमाणे, प्रथम फळ ख्रिस्त मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी [प․रो․सिʹया].” (१ करिंथकर १५:२२, २३) ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या दरम्यान होणाऱ्या अभिषिक्तांचे पुनरुत्थान १ थेस्सलनीकर ४:१५-१७ मध्ये निश्चित केले आहे: “प्रभूच्या [यहोवा न्यू.व.] वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की, प्रभूचे येणे होईतोपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही . . . ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारुढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू.” ख्रिस्ताचे १,४४,००० अभिषिक्त जण आहेत ज्यांना शेवटी हे आश्चर्यकारक बक्षीस मिळेल.—प्रकटीकरण १४:१.
१४ पौलाने दाखवल्याप्रमाणे, आज जिवंत असलेले अभिषिक्त शेष, विश्वासू अभिषिक्त ख्रिश्चन हुतात्मे आणि शिष्य यांच्याआधी राज्यात प्रवेश करणार नाहीत. आज ज्या अभिषिक्तांचा मृत्यू होतो त्यांचे वर्णन प्रेषित योहान पुढील प्रमाणे देतो: “प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो: खरेच आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल; त्यांची कृत्ये तर त्यांच्याबरोबर [म्हणजेच, त्यांच्या पुनरुत्थित अस्तित्त्वात] जातात.” (प्रकटीकरण १४:१३) आणि पौल असे म्हणतो: “पाहा मी तुम्हांस एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही तरी आपण सर्व जण बदलून जाऊ; क्षणात निमिषात शेवटला कर्णा वाजेल. मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ.” (१ करिंथकर १५:५१, ५२) किती तो आश्चर्यकारक चमत्कार!
१५, १६. (अ) लूक १९:११-१५ मध्ये कोणता दाखला येशू ख्रिस्ताने दिला, आणि कोणत्या कारणास्तव? (ब) ह्या भविष्यवाणीची पूर्णता कशी होत आहे?
१५ एके प्रसंगी, येशू जेव्हा देवाच्या राज्याचा प्रचार त्याच्या शिष्यांना करत होता तेव्हा त्याने त्यांच्या चुकीच्या कल्पना सुधरवण्यासाठी एका दाखल्याचा उपयोग केला. तो अहवाल असा वाचतो: “ते ह्या गोष्टी ऐकत असता त्याने त्यास एक दाखलाही सांगितला, कारण तो यरूशलेमेजवळ होता, आणि देवाचे राज्य एव्हाच प्रगट होणार आहे असे त्यांना वाटत होते तो म्हणाला: ‘कोणी एक उमराव, आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने दूर देशी गेला, त्याने आपल्या दहा दासांना बोलाविले व त्यांना दहा मोहरा देऊन सांगितले मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा . . . मग असे झाले की तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या दासांना त्याने पैसा दिला होता त्यांनी व्यापारात काय काय मिळविले हे पाहावे म्हणून त्याने त्यांस आपणाकडे बोलावण्यास सांगितले.’”—लूक १९:११-१५.
१६ तो “उमराव” येशू होता जो “दूर देशी” स्वर्गात जेथे त्याला राज्य मिळणार होते तेथे गेला. त्याने १९१४ मध्ये ते राज्य प्राप्त केले. यानंतर लगेचच, ख्रिस्ताचे अनुयायी असण्याचा दावा करणाऱ्यांना त्याने सोपविलेल्या राज्याच्या कामाची त्यांनी किती काळजी घेतली हे पाहण्यासाठी राजा यानात्याने त्याने त्यांना जबाबदार ठरविले. काही विश्वासू लोकांनाच धन्याची प्रशंसा मिळाली: “शाबास, भल्या दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर तुला अधिकार दिला आहे.” (लूक १९:१७) ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या काळात निरंतर तीव्र राज्य प्रचाराचे कार्य गोवलेले आहे तसेच दुष्टांविरूद्ध देवाचे न्यायदंड घोषित करणे आणि “भल्या दास” याला दिलेल्या अधिकारात ह्या कार्याचे निरिक्षण करण्याचे गोवलेले आहे.
जागतिक प्रचार
१७. प․रो․सिʹयाच्या दरम्यान कोणता आनंद उल्लेखनीय असेल?
१७ प․रो․सिʹयाच्या दरम्यान आणखी काय घडणार होते? प्रचार कार्याचा व येणाऱ्या मोठ्या संकटातून बचावण्यासाठी नवोदितांना तयार होण्यास मदत देण्याचा तो काळ मोठ्या हर्षाचा होणार होता. “मोठा लोकसमुदाय” यातील शेषांना मदत करणारे “शिफारसपत्रे” असे होतील. (प्रकटीकरण ७:९; २ करिंथकर ३:१-३) कापणीच्या कामाचा आनंद सांगताना पौल म्हणतो: “कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुगूट काय आहे? आपला प्रभू येशू ह्याच्या आगमनसमयी [प․रो․सिʹया] त्याच्यासमोर तुम्हीच आहा ना?”—२ थेस्सलनीकाकर २:१९.
शुद्धता आणि निर्दोषता राखा
१८. (अ) प․रो․सिʹयाचा संबंध असलेली पौलाची कोणती प्रार्थना आहे? (ब) ह्या काळात कोणत्या प्रकारचा आत्मा आम्ही विकसीत केला पाहिजे, आणि कोणकोणत्या मार्गाने?
१८ ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या दरम्यान जिवंत असलेल्या सर्वांच्या पवित्रकरणासाठीसुद्धा पौलाने प्रार्थना केली: “शांतीचा देव स्वत: तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी [प․रो․सिʹया] तुमचा आत्मा, जीव आणि शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत.” (१ थेस्सलनीकाकरास ५:२३) होय, आपण अभिषिक्त शेषांतील असू वा इतर मेंढरांच्या प्रचंड, संख्येतील असू, ह्या विलक्षण काळात आपण नेहमी शुद्ध आणि निर्दोष राहू यासाठी सहकार्याचा आत्मा आपणाला एकत्र बांधतो. याचप्रकारे, आपणही धीर विकसीत केला पाहिजे. याकोबाने लिहिले: “प्रभूच्या आगमनाची [प․रो․सिʹया] धीर धरा, . . . आपली अतंकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनसमयी [प․रो․सिʹया] वेळ आली आहे.”—याकोब ५:७, ८.
१९. प․रो․सिʹयाच्या संबंधात पेत्र कोणता इशारा देतो, आणि आम्ही त्याला कसा प्रतिसाद द्यावा?
१९ सध्याच्या काळात जिवंत असलेल्यांबद्दल देखील प्रेषित पेत्राला काही सांगायचे होते. त्याने आम्हास संपूर्ण पृथ्वीच्या सर्व भागात असणाऱ्या थट्टा करणाऱ्यांविरूद्ध ताकीद दिली. पेत्र म्हणतो: “प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वत:च्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसांत थट्टा करीत येऊन म्हणतील, ‘त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.’” (२ पेत्र ३:३, ४) ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या दरम्यान थट्टेखोरांचे प्राबल्य असतानाही, अनेकांच्या तारणासाठी यहोवाचे लोक जगाचा प्रकाश म्हणून निरंतर प्रकाश चमकवत आहेत.
उजळणीसाठी प्रश्न
▫ प․रो․सिʹयाच्या बाबतीत यहोवाच्या लोकांना प्रगतीशीलतेने कसा ज्ञानप्रसार झाला?
▫ मत्तय २४:४-८ची कशी पूर्णता होत आहे?
▫ सिंहासनाधिष्ठ ख्रिस्ताला स्वर्गदूत कसे सहकार्य देत आहेत?
▫ प․रो․सिʹयाच्या सोबत कोणते आश्चर्यकारक चमत्कार प्रकट होत आहेत?
▫ ह्या काळात कोणता आनंद अनुभवला जात आहे, व यात कोणाचा सहभाग आहे?