ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या दरम्यान विस्तारित कार्य
“तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांस म्हणेल, ‘अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हांकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या.”—मत्तय २५:३४.
१. कोणत्या मार्गाने ख्रिस्ताची प․रो․सिʹया “नोहाच्या दिवसां”प्रमाणेच आहे?
ख्रिस्ताची उपस्थिती—दीर्घकाळापासून वाट पाहात असलेली घटना! “ह्या युगाच्या समाप्ती”च्या संबंधात येशूने जे म्हटले त्या “नोहाच्या दिवसां”सारख्याच काळाचे १९१४ ह्या वर्षी आगमन झाले. (मत्तय २४:३, ३७) परंतु ख्रिस्ताच्या उपस्थितीचा, वा प․रो․सिʹयाचा “विश्वासू व बुध्दिमान दास” यांच्या अभिषिक्त शेषांसाठी काय अर्थ होतो? (मत्तय २४:४५) ज्योती वाहक या नात्याने त्यांना अधिकाधिक सक्रिय व्हावयाचे आहे असा याचा अर्थ होतो! अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडणार होत्या! एकत्रित करण्याचे अभूतपूर्व काम नुकतेच चालू होणार होते.
२. मलाखी ३:१-५च्या पूर्णतेत कोणते शुध्दीकरण घडले आहे?
२ परंतु प्रथमत: ह्या अभिषिक्त ख्रिश्चनांना शुध्दीकरणाची आवश्यकता होती. मलाखी ३:१-५ मध्ये भाकीत केल्यानुसार, यहोवा देव आणि त्याचा “करार घेऊन येणारा निरोप्या” येशू ख्रिस्त १९१८ च्या वसंत ऋतूत आध्यात्मिक मंदिराची तपासणी करण्यासाठी आले. “देवाच्या घरापासून” न्यायनिवाडा चालू होणार होता. (१ पेत्र ४:१७) मलाखी ३:३ने भाकीत केले: “रुपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो [यहोवा] बसेल, व लेवीच्या वंशजांस शुद्ध करील. त्यांस सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील.” शुद्धीकरणाचा व पवित्र करण्याचा तो काळ होता.
३. आध्यात्मिक शुध्दीकरण होणे का जरूरीचे होते?
३ दासवर्गाच्या शेषांना १९१८ मध्ये कळसास पोंहचलेल्या ह्या न्यायनिवाड्यातून पार झाल्यानंतर, जगीक आणि धार्मिक अशुद्धतेपासून शुद्ध करण्यात आले. यहोवाने त्यांना शुद्ध करण्याचे कारण काय? कारण त्यामध्ये त्याचे आध्यात्मिक मंदिर गोवलेले होते. येशू ख्रिस्ताच्या शांत्यर्पणाच्या आधारावर यहोवाची भक्ती करण्यासाठी ही मंदिरासारखी योजना आहे. यहोवाची इच्छा होती की त्याचे मंदिर शुद्ध स्थितीत असले पाहिजे ज्यामुळे जेव्हा पार्थिव आशा असलेल्या असंख्य उपासकांना तेथे आणले जाईल, तेव्हा त्यांना त्याच्या विश्वव्यापी सार्वभौमत्वाला आदर देण्याचे ठिकाण मिळेल, त्याच्या ईश्वरी नामाला पवित्र केले जाईल, व त्याच्या धार्मिक नियमांचे पालन केले जाईल. अशाप्रकारे, ते यहोवाला कृतज्ञता व्यक्त करतील आणि त्याचे महान उद्देश जाहीर करण्यासाठी त्याला साथ देतील.
अधिकाधिक विशेषाधिकार
४, ५. (अ) येशू ख्रिस्ताने विचारलेला प्रश्न दासवर्गाच्या प्रत्येकाला आव्हानात्मक कसा आहे? (ब) “विश्वासू आणि बुद्धिमान दास” आणि “त्याचा परिवार” ह्या संज्ञेचा अर्थ कसा समजून घ्यावा? (क) येशूने दासाला कोणती आज्ञा दिली?
४ शुद्ध झालेला दासवर्ग १९१९ मध्ये विस्तारीत होणाऱ्या कार्याकडे पुढे पाहू शकत होता. त्यांचा धनी, येशू ख्रिस्ताने १९१४ मध्ये, स्वर्गीय राज्य मिळविले होते. तो जेव्हा त्याच्या “परिवारा”ची तपासणी करण्यासाठी त्याच्या घरातील नोकर मंडळीकडे पुन्हा आला, तेव्हा तो त्याच्या भव्य उच्चपदाने सुशोभित होता जे त्याने पृथ्वीवर असताना बाळगले नव्हते. त्याला काय दिसून आले? धन्याच्या जबाबदारीच्या गोष्टींचा सांभाळ करण्यात दासवर्ग गुंग होता का? मत्तय २४:४५-४७ मध्ये नमूद केल्यानुसार, येशूने असा एक प्रश्न विचारला जो त्याच्या प्रत्येक अभिषिक्त शिष्याला यहोवाच्या मशीहाला त्यांच्या व्यक्तीगत एकनिष्ठ प्रेमाचे परिक्षण करण्याचे आव्हान करत होता: “ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्यांच्यावर नेमले आहे असा कोण? धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. मी तुम्हास खचित सांगतो की, त्याला तो आपल्या वर्चस्वावर नेमील.”
५ स्पष्टत:, त्याच्या विश्वासू दासाबद्दल येशूने केलेले वर्णन कोणत्याही एका मानवाला लागू होत नाही. परंतु एक गट या नात्याने ते जरूर ख्रिस्ताच्या संपूर्ण विश्वासू अभिषिक्त मंडळीचे वर्णन करते. हा परिवार वैयक्तिक जणांप्रमाणे ख्रिस्ताच्या अभिषिक्त अनुयायांचा आहे. येशूला हे माहीत होते की तो ह्या अभिषिक्त जणांना त्याच्या स्वत:च्या रक्ताने विकत घेणार होता यास्तव, अगदी योग्यपणे त्याने त्यांना सामुदायकरित्या त्याचा दास असे संबोधले. पहिले करिंथकर ७:२३ त्यांच्याबद्दल असे म्हणते: “तुम्ही [सामुदायकरित्या] मोलाने विकत घेतलेले आहा; माणसांचे गुलाम होऊ नका.” येशूने त्याच्या दासवर्गाला त्यांचा प्रकाश पाडण्याची आज्ञा दिली जेणेकडून इतर आकर्षित होऊन शिष्य होतील आणि यथाकाळी आध्यात्मिक अन्न देऊन त्याच्या परिवाराला प्रगतीशीलतेने भरवतील.
६. येशूच्या तपासणीच्या परिणामाने दास वर्गाला बक्षीस कसे मिळाले?
६ ख्रिस्ताची उपस्थिती चालू झाल्यापासून १९१८ पर्यंत, हा दास वर्ग लोकप्रिय नसताना, छळ व काही गोंधळ असतानाही परिवाराला यथाकाळी अन्न देण्यासाठी संधी पाहत होता. त्याची तपासणी चालू झाली तेव्हा हेच काय ते धन्याला आढळून आले. प्रभू येशू अगदी संतुष्ट झाला, आणि १९१९ मध्ये त्याने घोषित केले की विश्वासू व मान्यता मिळालेला हा दासवर्ग धन्य आहे. त्याच्या धन्याने त्यांना ज्या कामासाठी नियुक्त केले होते ते त्यांनी पूर्ण केले यासाठी दासवर्गाला कोणते सुखकारक बक्षीस मिळाले? बढती! होय, धन्याच्या जबाबदारीत वाढ करण्यासाठी आणखी मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपविल्या गेल्या. हा धनी आता स्वर्गीय राजा असल्याकारणाने, त्याची पृथ्वीवरील मालमत्ता आता अधिक मौलवान झाली.
७, ८. (अ) धन्याची “सर्व मालमत्ता” काय आहे? (ब) दासाने ह्या मालमत्तेची देखरेख करणे हे कशाची मागणी करते?
७ तर मग, त्याची “मालमत्ता” काय आहे? हा पृथ्वीवरील आध्यात्मिक ठेवा आहे जो स्वर्गीय राजा या नात्याने त्याच्या अधिकाराच्या संबंधात ख्रिस्ताच्या मालकीचा आहे. जगाच्या सर्व राष्ट्रांकरिता देवाच्या स्थापिलेल्या राज्याचे प्रतिनिधी म्हणून काम करण्याचा भव्य सुहक्क यासोबतच ख्रिस्ताचे शिष्य बनवण्याची आज्ञा निश्चितच यामध्ये गोवलेली आहे.
८ धन्याच्या मालमत्तेवर देखरेख करण्याची बढती, दास वर्गाने राज्याचे काम पूर्ण करण्याकडे अधिकाधिक लक्ष देण्याची आणि होय, ह्या कामासाठी मोठ्या सोयी करण्याची मागणी करते. त्यांना आत्ता कामासाठी आणखी मोठे क्षेत्र होते—पृथ्वीवरील संपूर्ण वसाहत.
मेंढरास एकत्र करणे
९. दासाने केलेल्या विस्तारीत कार्याचा काय परिणाम झाला आहे?
९ मग, ख्रिस्ताच्या विश्वासू आणि बुद्धिमान दासवर्गाने ह्या कार्याचा विस्तार आज्ञाधारपणे केला. ह्याचा परिणाम काय झाला? १,४४,००० अभिषिक्तांमधील शेवटल्या जणांना एकत्रित केले गेले. आणि मग प्रकटीकरण ७:९-१७ मध्ये नमूद केलेला योहानाचा दृष्टांत रोमांचकारी, समाधानी वस्तुस्थिती झाली. विशेषकरुन १९३५ पासून ह्या दृष्टांताच्या पूर्णत्त्वाच्या स्थिर उलगडा पाहण्याचा आनंद दासवर्ग घेत आहेत. संपूर्ण पृथ्वीवरील, लाखोंचा “मोठा लोकसमुदाय” त्याचे उपासक म्हणून यहोवाच्या मंदिरात झुंडीने येत आहेत. यहोवाच्या स्वर्गदूताने योहानाला सांगितले की कोणालाही ह्या मोठ्या लोकसमुदायाला मोजता आले नाही. याचा अर्थ असा होतो की, दास वर्गाने किती लोकांना यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात आणावयाचे आहे त्यावर मर्यादा नाही. मार्ग जोपर्यंत खुला आहे तोपर्यंत, एकत्रीकरणाचे काम चालूच राहील.
१०. कोणत्या प्रेमळ कार्यात दासवर्ग गुंतलेला आहे?
१० निरंतर वाढणाऱ्या “दुसरी मेंढरे”च्या संख्येची काळजी घेण्याची विश्वासू दास वर्गाची गंभीर जबाबदारी आहे, व त्यांना हे माहीत आहे की सर्व राष्ट्रांमधील मेंढरासमान लोक त्यांचा धनी येशू याला फार प्रिय आहेत. ते खरोखरी त्याचा कळप असे आहेत. (योहान १०:१६; प्रे. कृत्ये २०:२८; १ पेत्र ५:२-४) यास्तव धन्याबद्दल आणि मेंढरांकरीता असलेल्या प्रेमाने, हा दास वर्ग मोठ्या लोकसमुदायाच्या आध्यात्मिक गरजेची आनंदाने काळजी घेतो.
११-१३. दासाच्या कार्यासंबंधी वॉचटावर सोसायटीच्या भूतपूर्व अध्यक्षांनी कोणते उचित विवेचन केले?
११ होय, दासांच्या ज्योती वाहक आज्ञेमधल्या मोठ्या भागामध्ये देवाच्या राज्याच्या पृथ्वीवरील प्रजेला एकत्रीत करण्याचे काम गोवलेले आहे. विश्वासू दासाच्या वाढत्या कार्याची चर्चा करताना, वॉचटावर सोसायटीचे भूतपूर्व अध्यक्ष, एफ. डब्लू. फ्रान्झ, डिसेंबर २२ला त्यांच्या मरणापूर्वी असे म्हणाले:
१२ “माझ्या ९९ वर्षांच्या जीवनाच्या अनुभवानुसार, येशू ख्रिस्ताने सर्वदा संघटनेचा फार चांगल्यारितीने उपयोग केला आहे. ह्या संघटनेला मार्गदर्शन देणारा कोणी केवळ मनुष्य नाही, तर तो प्रभू येशू ख्रिस्तच असला पाहिजे. कारण आम्ही जसा विचार केला होता त्याच्या पलिकडे फार भव्य व विस्मयकारकतेने ती चालली आहे. आज आमची अशी संघटना आहे जी संपूर्ण जगभरात विस्तारीत आहे. ही संघटना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, पूर्व आणि पश्चिमेकडे कार्यशील आहे. ह्या स्मरणीय विस्ताराला फक्त एक व्यक्ती जबाबदार ठरु शकते—देवाचा पुत्र, ज्याचा विश्वासू आणि बुद्धिमान दास वर्गावर ताबा आहे. तो त्याची जबाबदारी पूर्ण करत आहे, आणि आपण ज्याला पाहू शकतो त्या भव्य विस्ताराला हीच गोष्ट कारणीभूत आहे.
१३ “ही गोष्ट एकच मनुष्य साध्य करु शकत नाही. आमची अशी संघटना आहे जी ईश्वरशासित आहे, आणि ती ईश्वरशासित देवाच्या पद्धतीने, चालविली जाते. संपूर्ण पृथ्वीचा समावेश असलेले जे कार्य साध्य झाले याला कोणी मनुष्य वा वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीचा संस्थापक देखील दावा करू शकत नाही किंवा जबाबदार ठरत नाही. हे केवळ आश्चर्यकारक आहे.” मोठ्या लोकसमुदायातील सर्वजण भूतपूर्व ब्रदर फ्रॉन्झच्या विचाराबरोबर एकमतात नाहीत का? होय, निश्चितच, विश्वासू दासाच्या विस्तारित कार्याबद्दल ते खरोखरी कृतज्ञ आहेत.
राज्याची प्रजा
१४, १५. (अ) रुपयांच्या दृष्टांतात येशूने काय चित्रित केले (मत्तय २५:१४-३०)? (ब) यथायोग्यपणे, मत्तय २५ अध्यायात पुढे काय आहे?
१४ मत्तयाच्या २५व्या अध्यायात, शेरडे आणि मेंढरांचा दाखला देवाच्या राज्याच्या पार्थिव प्रजेच्या एकत्रिकरणाच्या मोठ्या कामाचे वर्णन करत आहे. त्यांच्यानंतरचा दृष्टांत, रुपयांचा आहे, त्यामध्ये येशूने असा दृष्टांत दिला की ज्या अभिषिक्त शिष्यांची त्याच्या स्वर्गीय राज्यात त्याच्याबरोबर राज्य करण्याची आशा आहे त्यांनी त्यांची पृथ्वीवरील मालमत्ता वाढविण्यासाठी काम केले पाहिजे. अगदी उचितपणे, मग, पुढील दृष्टांतात, ज्यांना त्याच्या स्वर्गीय राज्याची प्रजा व्हावयाचे आहे त्यांना काय करण्याची आवश्यकता आहे याचे येशूने काळजीपूर्वक वर्णन केले आहे.
१५ मत्तय २५:३१-३३ मध्ये येशूने केलेली नोंद याकडे लक्ष द्या: “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने ‘सर्व देवदूतांसह येईल’ तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल; त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील. आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे करील. आणि मेंढरास तो आपल्या उजवीकडे व शेरडांस डावीकडे ठेवील.”
१६. राष्ट्रे कशा रितीने एकत्रीत केली जातात व लोकांना कसे वेगळे केले जाते?
१६ येशू त्याच्या वैभवात १९१४ मध्ये आला. कृतीच्या आरंभाला, त्याने आणि त्याच्या सर्व स्वर्गदूतांनी स्वर्गातील त्याच्या दुरात्मिक शत्रुंवर हल्ला करून खाली हाकलून दिले. त्याच्या दृष्टांतात पुढे काय होते ते आम्हाला त्याच्या उपस्थितीच्या काळात येशूच्या महान सिंहासनावर न्यायनिवाड्यासाठी विराजमान होणे, याला चित्रित करते व त्याची गुणग्राहकता दाखवण्यासाठी मदत करते. त्याच्यासमोर सर्व राष्ट्रांना गोळा करणे याचा अर्थ होतो की, लाक्षणिकरित्या बोलायचे झाले तर येशू सर्व राष्ट्रांकडे त्याचा भावी कळप या नात्याने कार्य करीत आहे. हा कळप शेरडे आणि मेंढरे यांनी बनलेला आहे. खऱ्या कळपात शेरडांपासून मेंढरे वेगळे करण्यासाठी जर अर्धा दिवस लागू शकतो तर गोलार्धव्याप्त लोकांना जे चूक आणि बरोबर यामध्ये निवड करण्यास स्वतंत्र आहेत अशांना वेगळे करण्याला पुष्कळ वेळ लागतो. वेगळे करण्याचे काम प्रत्येक व्यक्तीच्या कार्यावर अवलंबून आहे हे त्याचे कारण आहे.
१७. सर्व लोकांसाठी आज परिस्थिती एवढी गंभीर का आहे?
१७ त्या दृष्टांतात, मेंढपाळ राजा मेंढरासमान लोकांना त्याच्या उजवीकडे आणि शेंरडासमान लोक त्याच्या डावीकडे ठेवतो. उजव्या हाताकडच्यांना न्यायाचे अनुकूल परिणाम मिळतात—सार्वकालिक जीवन. डाव्या हाताकडचे प्रतिकूल न्यायाला चित्रित करते—सार्वकालिक विनाश. राजाच्या ह्या गोष्टीबद्दलच्या निर्धाराला गंभीर परिणाम आहेत.
१८. राजाचा अदृश्यपणा कोणासही मुक्त का करत नाही?
१८ त्याची उपस्थिती किंवा प․रो․सिʹया दरम्यान मनुष्याच्या पुत्राचे अदृश्य राज्य कोणासही मुक्त करत नाही. अधिकाधिक मेंढरासमान जण आज जगव्याप्त देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी त्यांचा प्रकाश चमकवत दासवर्गाला येऊन सामील होत आहेत. खरोखर, पृथ्वीच्या सर्व भागांच्या कानाकोपऱ्यात त्यांचे प्रचारकार्य पोंहचले आहे.—मत्तय २४:१४.
१९. शेरडे आणि मेंढरांच्या दाखल्यात कोणत्या गुणांचे उदाहरण दिले आहे?
१९ मेंढपाळ राजा मेंढराच्या वर्गाच्या लोकांना आशीर्वादित भवितव्याचे बक्षीस का देत आहे? कारण ते राज्य प्रचारकार्याला त्यांच्या हृदयापासून पाठिंबा देतात आणि त्याच्या अभिषिक्त बांधवांना ते दया दाखवतात व ती दया येशू, स्वत:ला दाखवल्याप्रमाणे तो मानतो. याकारणास्तव, हा बादशाही मनुष्याचा पुत्र त्यांना असे म्हणतो: “अहो माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हांकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या.”—मत्तय २५:३४; २८:१९, २०.
राजाला सहकार्य देणे
२०, २१. मेंढरे राज्याच्या बाजूने उभे आहेत याचा कोणता पुरावा ते देतात?
२० देवाच्या राज्याचे पार्थिव वतन घेण्यासाठी राजा जेव्हा मेंढरांना आमंत्रण देतो तेव्हा ते आश्चर्य व्यक्त करतात याकडे लक्ष द्या. ते त्यांस विचारतात: ‘प्रभूजी, आम्ही तुम्हाला केव्हा यासर्व गोष्टी केल्या?’ तो त्यांना उत्तर देतो: “मी तुम्हांस खचित सांगतो की, ज्याअर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधुपैकी एकाला केले त्याअर्थी ते मला केले आहे.” (मत्तय २५:४०) त्याच्या पुनरुत्थानाच्या दिवशी येशू मरीया मग्दालीया समोर प्रगट झाला तेव्हा तो तिच्या बरोबर बोलत असताना त्याने त्याच्या आध्यात्मिक बांधवांबद्दल म्हटले: “माझ्या बांधवांकडे जा.” (योहान २०:१७) त्याच्या अदृश्य उपस्थितीच्या काळात, येशूच्या १,४४,००० आध्यात्मिक बांधवांपैकी फक्त लहान शेष पृथ्वीवर जीवंत आहे.
२१ येशू स्वर्गामध्ये अदृश्य असल्यामुळे, मेंढरासमान लोक ज्या काही प्रेमळ गोष्टी त्याच्यासाठी करत आहेत त्यासर्व अप्रत्यक्ष आहेत. त्यांच्या विश्वासाच्या डोळ्यांनीच ते त्याला त्याच्या सिंहासनावर पाहतात. त्याचे स्वर्गीय सहराजे असणाऱ्या त्याच्या आध्यात्मिक बांधवांना मदत करण्यासाठी जो प्रयत्न ते करत आहेत त्याला येशू गुणग्राहकता दाखवतो. त्याच्या बांधवांना जे काही केले जाते ते सर्व त्याला स्वत:ला केल्याप्रमाणे तो लेखतो. मेंढरासमान लोक जाणूनबुजून ख्रिस्ताच्या बांधवांना चांगल्या गोष्टी करतात कारण ते या योग्यतेचे आहे हे ते जाणतात. येशूचे आध्यात्मिक बांधव यहोवाच्या राज्याचे दूत आहेत याची गुणग्राहकता त्यांना आहे, आणि ते ठाम पुरावा देऊ इच्छितात की ते यांच्याबरोबर राज्याच्या बाजूने उभे राहात आहेत.
२२. मेंढरांच्या वर्गातील लोकांना बक्षीस कसे मिळते? (पडताळा प्रकटीकरण ७:१४-१७.)
२२ यहोवाने पूर्वीच पाहिले की हा मेंढरासमान वर्ग त्याच्या पुत्राच्या उपस्थितीच्या दरम्यान प्रकट होईल आणि त्याने त्यांच्यासाठी आश्चर्यकारक बक्षीस ठेवलेले आहे! यहोवाचा राजा, येशू ख्रिस्त ह्याच्या आनंदी हजार वर्षीय राजवटीत मोठा लोकसमुदाय पृथ्वीवरील शांतीचा आशीर्वाद मिळवून घेईल.
२३. कोणत्या अर्थपूर्ण पद्धतीने मेंढरे राजाच्या बांधवांना मदत करतात?
२३ शेरडे आणि मेंढरे या येशूच्या दृष्टांतासोबत पवित्र शास्त्राच्या भविष्यवाण्या, ज्या ख्रिस्ताच्या उपस्थितीला लागू होतात यांना, आम्ही विचारात घेतो तेव्हा आपल्याला काय दिसते? हेच की: अजाणतेत आणि सहजगत्या राजाच्या एखाद्या आध्यात्मिक बांधवासाठी चांगले करण्यामुळे देव आणि त्याच्या राजासमोर एखादी व्यक्ती मेंढरासमान धार्मिक स्थितीमध्ये आहे अशी ही गोष्ट नाही. त्यांच्या खऱ्या डोळ्यांनी जरी ते राज्य करणाऱ्या राजाला पाहू शकत नाही तरीही ते काय करत आहेत हे मेंढरासमान वर्गाला माहीत आहे. राजाच्या बांधवांना भौतिक मार्गाने नव्हे तर आध्यात्मिक मार्गाने मदत करण्याचा ते प्रयत्न करतात. ते कसे? देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात त्यांना सहकार्य देत व ख्रिस्तासाठी शिष्य बनविण्याकरता पवित्र शास्त्राभ्यास चालविण्याद्वारे. अशाप्रकारे, देवाच्या राज्याचे आज ४० लाखापेक्षा अधिक ज्योती वाहक प्रचारक आहेत.
विस्तारित कार्य
२४. कोणत्या प्रेमळ कामामुळे दासवर्ग पृथ्वीवरील सर्वात आनंदी लोक असे केले आहे?
२४ विश्वासू दासवर्गाने केलेल्या काही उत्तम कामाची आपण यादी करू या. प्रथम, दासवर्गाला धन्याच्या सर्व परिवारावर—पृथ्वीवरील त्याच्या राज्याची मालमत्ता—नियुक्त केले आहे आणि ही मालमत्ता वाढत चालली आहे. दुसरे, हा वर्ग फक्त आध्यात्मिक परिवारालाच नव्हे तर दुसऱ्या मेंढरांच्या वाढत चाललेल्या मोठ्या लोकसमुदायाला देखील आध्यात्मिक अन्न भरवीत आहे. तिसरे, राज्याचा प्रकाश पसरविण्याच्या कामात हा दासवर्ग पुढाकार घेत आहे. चौथे, प्रचंड विस्तारीत कार्यात मोठ्या लोकसमुदायाच्या दुसऱ्या मेंढरांना एकत्रित करणे आणि त्यांना यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात आणणे. पाचवे, मेंढरासमान जणांच्या हृदयपूर्वक पाठिंब्याने हा दास वर्ग संपूर्ण पृथ्वीवर शाखा संघटनांसाठी तसेच अमेरिकेतील मुख्य कचेरीत विस्तारीत सोई पुरवित आहेत. अशा प्रेमळ कामाने आज दासवर्गाला पृथ्वीवर सर्वात आनंदी लोक बनविले आहे, आणि त्यांनी इतर लाखो लोकांना आनंदी केले आहे. हे सर्व यहोवा देवाचे तसेच येशू ख्रिस्ताचे आभार मानीत आहेत, ज्यांनी बुद्धिमान दासाच्या विस्तारित कार्याला मार्गदर्शन केले आहे!
२५. दासवर्गाला मेंढरे निरंतर पाठिंबा कसा देऊ शकतात व कोणते भवितव्य दृष्टीपथात ठेवून?
२५ आज हा दास वर्ग देवाने नेमून दिलेले काम कष्टाने पार पाडत आहे. “मोठे संकट” आरंभ होण्याआधीचा काळ जवळजवळ गेलेला आहे! (मत्तय २४:२१) देवाची मेंढरे असलेल्यांनी मेंढपाळ राज्याच्या कृपेच्या उजवीकडील बाजूस राहणे किती महत्त्वाचे आहे! तर मग, विश्वासू आणि बुद्धिमान दासाला आपण निरंतर आवेशाने पाठिंबा देत राहू या. असे केल्यानेच सर्व मेंढरासमान लोक अशाप्रकारचे आनंदी उद्गार ऐकू शकतील: “माझ्या पित्याचे आशीर्वादितहो या. जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हांकरीता सिद्ध केले आहे ते वतन घ्या.”
तुम्ही उत्तर देऊ शकाल?
▫ राजाने सिंहासनाधिष्ठ झाल्यानंतर कोणता प्रथम न्याय झाला?
▫ मत्तय २४:४५-४७ची आधुनिक पूर्णता कशी झाली?
▫ विस्तारित कार्यासंबंधाने, कोणत्या कामासाठी दासवर्ग आणि मोठा लोकसमुदाय कृतज्ञ आहे?
▫ मत्तय २५:३४-४०ची पूर्णता प․रो․सिʹयाच्या दरम्यान कशी होते?
[चित्र]
धनी त्याच्या विश्वासू दासाला त्याची सर्व मालमत्ता बहाल करतो
[चित्र]
मानवजातीचा न्याय करण्याकरता येशूने त्याचे वैभवी सिंहासन ग्रहण केले आहे