वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 ५/१ पृ. २९
  • तुम्हास आठवते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हास आठवते का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • ख्रिस्ती आत्म्याने व सत्याने उपासना करतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • एकाग्र अंतःकरणाने चालत राहणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • देवाची सेवा सदासर्वकाळ करणे हे तुमचे ध्येय बनवा
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • ईश्‍वरी अधीनता—का आणि कोणाकरवी?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 ५/१ पृ. २९

तुम्हास आठवते का?

तुम्ही टेहळणी बुरुजच्या अलिकडील अंकांचे काळजीपूर्वक वाचन केले आहे काय? असल्यास पुढील मुद्दे तुमच्या लक्षात येऊ शकतील:

▫ यहोवाच्या साक्षीदारांनी अनुभवलेल्या अभूतपूर्व वाढीला काय कारणीभूत आहे?

खासपणे, ती देवाच्या आशीर्वादानेच मिळाली आहे. ते देवाचे कार्य आहे. सुवार्तिक कार्यात यहोवाचे साक्षीदार शिक्षण देत असलेल्या सर्व गोष्टी पवित्र शास्त्राच्या आधारावरच आहेत. त्यांच्या यशस्वीतेची आणखी एक किल्ली म्हणजे देवाने ज्याला ख्रिस्ती मंडळीचा मस्तक असे नेमले आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल ते दाखवीत असलेली पूर्ण मान्यता ही आहे.—१२/१ पृष्ठ १२.

▫ बथशेबा बरोबर दाविदाने केलेल्या महापापाबद्दल यहोवाने त्याला दया का दाखवली?

प्रामुख्यत्वे देवाने दाविदाबरोबर राज्याच्या करार केला होता त्यामुळे आणि दाविदाची स्वत:ची दयाळू वृत्ती व त्याने केलेला खरा पश्‍चाताप. (१ शमुवेल २४:४-७; २ शमुवेल ७:१२; १२:१३; स्तोत्रसंहिता ५१:१, २, १७)—३/१, पृष्ठे २०, २१.

▫ येशूच्या मशीहापदास ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने कोणते तीन प्रकारचे पुरावे पाठिंबा देतात?

येशूची वंशावळ हा पहिला पुरावा आहे. (मत्तय १:१-१६; लूक ३:२३-३८) दुसरा पुरावा पूर्ण झालेल्या भविष्यवाणीचा आहे. दानीएल ९:२५ मधील भविष्यावाणीप्रमाणेच, अक्षरशः अनेक भविष्यवाण्या येशूची मशीहा अशी ओळख देतात. तिसरा पुरावा देवाची स्वतःची कबुली होय; तीन प्रसंगी त्याने त्याच्या स्वतःच्या शब्दांनी ती स्पष्टपणे दिली. (मत्तय १७:५; लूक ३:२१, २२; योहान १२:२८)—४/१, पृष्ठे १०, १२.

▫ मत्तय २४:३७ मध्ये उद्धृत केल्यानुसार, “नोहाच्या दिवसातल्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल” या येशूच्या बोलण्याचा काय अर्थ होत होता?

जलप्रलय येऊन दुष्ट व्यवस्थेला काढून टाकण्याच्या अनेक दशके अगोदर नोहा तारु बांधत व दुष्टांना इशारा देत होता. याचप्रमाणे, ख्रिस्ताची अदृश्‍य उपस्थिती काही दशके टिकून राहते, ज्यात महासंकट त्याच्या कळसाला पोहचण्यापूर्वी गोलार्धव्याप साक्ष दिली जात आहे.—४/१, पृष्ठ १६.

▫ चांगल्या कौटुंबिक पवित्र शास्त्र अभ्यासाच्या काही आवश्‍यकता कोणत्या आहेत?

अभ्यासासाठी संधि साधून घेतली पाहिजे व ती दूरदर्शनवरील कार्यक्रम व इतर आकर्षणे यांनी विचलीत होऊ देऊ नये. कुटुंबाच्या विशिष्ट गरजेकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांना जे शिकवले जाते ते त्यांना खरेच समजते हे पाहण्यासाठी दृष्टिकोनात्मक प्रश्‍न विचारा. (मत्तय १७:२५) अभ्यासाचे वातावरण आनंदविणारे ठेवा. उत्साही असा, व अभ्यासात सर्वांना समाविष्ट करा.—१/१, पृष्ठ २८.

▫ अन्‍नपदार्थात रक्‍ताच्या सुकलेल्या घटकांचे मिश्रण मिसळलेले असू शकते याबद्दल ख्रिश्‍चनांनी किती काळजी केली पाहिजे?

नुसता संशय किंवा अफवेपासून ख्रिश्‍चनांनी सावध राहिले पाहिजे. तसेच यादी तपासून पाहणे, खाटिकांकडे जाऊन विचारपूस करणे यामध्ये व्यवहारीपणा वा समंजसपणा असला पाहिजे. तथापि, स्थानिक परिसरात रक्‍ताचा सर्रास वापर होत असल्याचे निश्‍चितपणे दिसत आहे, तर मग ते अन्‍न असो की, वैद्यकीय इलाज—रक्‍तापासून दूर राहावे ही देवाची आज्ञा ख्रिश्‍चनांनी पाळून चालण्यास हवे. (प्रे. कृत्ये १५:२८, २९) १/१, पृष्ठे ३०-३१.

▫ इस्राएलात शिकवल्या जाणाऱ्‍या शिक्षणपद्धती मधील आध्यात्मिक खोली नीतीसूत्राचे पुस्तक कशी दाखवून देते?

नीतीसूत्राचे पुस्तक दाखविते की सूज्ञान, शिस्त, समज, दृष्टि, न्याय, चतुरपणा, ज्ञान आणि विचारशैली यासारख्या उच्च गोष्टींचे शिक्षण “भोळ्यांना” देऊन त्यांच्यामध्ये “यहोवाचे भय” वाढवावे हा त्यामागील उद्देश होता. (नीतीसूत्रे १:१-७; २:१-१४)—२/१, पृष्ठ ५.

▫ शिक्षणाचा कोणता समतोल दृष्टिकोन आज युवकांनी घेतला पाहिजे?

शिक्षण हे इच्छित परिणाम प्राप्त करण्यासाठी वापरण्याजोगे माध्यम आहे असा ख्रिश्‍चनांनी दृष्टिकोन धरावा. या शेवटल्या काळी, यहोवाची सेवा शक्य आहे तितकी व प्रभावी रितीने करावी हे त्यांचे उद्दिष्ट असावे.—२/१, पृष्ठ ११.

▫ इस्राएल राष्ट्राने दशमांश द्यावा अशी यहोवाने का आज्ञा दिली होती?

एक गोष्ट ही, की, याद्वारे ते, यहोवाच्या चांगुलतेबद्दल आपल्याला कदर आहे हे दृश्‍यरुपाने दाखवू शकत होते. आणि दुसरी ही की, याद्वारे लेव्यांसाठी त्याची मदत होत होती. यामुळे त्यांना आपली कर्तव्ये आणि लोकांना नियमशास्त्र शिकवण्याची जबाबदारी पूर्ण करता येऊ शकत होती. (पहा २ इतिहास १७:७-९.)—३/१, पृष्ठ १५.

▫ कोणता दशमांश आणण्याचे ख्रिश्‍चनांना निमंत्रण दिले आहे? (मलाखी ३:१०)

दशमांश या गोष्टीला सूचित करतो की जो काही भाग आपला आहे तो यहोवाला देणे किंवा त्याच्या सेवेसाठी वापरणे होय. हे आमचे त्याच्यावरील प्रेम व आम्ही त्याचेच आहोत याचे द्योतक आहे.—३/१, पृष्ठ १५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा