वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 ५/१ पृ. ७-१२
  • ईश्‍वरी अधीनता—का आणि कोणाकरवी?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरी अधीनता—का आणि कोणाकरवी?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आम्ही कशाबद्दल यहोवा देवाच्या अधीन असले पाहिजे
  • येशू ख्रिस्त ईश्‍वरी अधीनतेचे परिपूर्ण उदाहरण
  • ईश्‍वरी अधीनतेची प्राचीन उदाहरणे
  • अधीनतेच्या बाबतीत पौलाचे उदाहरण
  • ईश्‍वरी अधीनता आमच्याकडून काय अपेक्षिते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • पत्नीची अधीनता—म्हणजे नेमके काय?
    सावध राहा!—१९९७
  • पत्नींनो—आपल्या पतींचा मनापासून आदर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • तुम्ही कोणाच्या अधिकाराला ओळखले पाहिजे?
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 ५/१ पृ. ७-१२

ईश्‍वरी अधीनता—का आणि कोणाकरवी?

“हे परमेश्‍वरा [यहोवा न्यू.व.] मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.”—यिर्मया १०:२३.

१. स्वातंत्र्याचे कोणते प्रकार मोठ्या प्रमाणात मोलाचे वाटतात?

उत्तर अमेरिकेतील १३ ब्रिटिश वसाहतींनी १८व्या शतकात मायदेश ब्रिटन पासून त्यांच्या स्वातंत्र्याची केलेली घोषणा मानवी साहित्यात नावाजलेली आहे. विदेशी ताब्यापासून त्यांना स्वातंत्र्य व मुक्‍तता हवी होती, यामुळे स्वातंत्र्याचा चोहीकडे फैलाव झाला. राजनैतिक आणि आर्थिक मुक्‍तता मोठा लाभ देऊ शकते. अलिकडील काळात पूर्व युरोपातील काही देश राजनैतिक मुक्‍ततेकडे वळले. तरीपण ह्‍या स्वातंत्र्यामुळे पुष्कळ गंभीर समस्या त्यांच्यावर गुदरल्या आहेत हे मान्य करावे लागेल.

२, ३. (अ) स्वातंत्र्याचा कोणता प्रकार आनंददायी वाटणारा नाही? (ब) ही वास्तविकता मूलतः कशी जोरदारपणे स्पष्ट केली गेली?

२ जरी विविध प्रकारचे स्वातंत्र्य इष्ट वाटत असले तरी एक अशा प्रकारचे स्वातंत्र्य आहे जे इष्ट वाटत नाही. ते कोणते आहे? मानवजातीचा निर्माता, यहोवा देवापासूनचे स्वातंत्र्य. तो आशीर्वाद नव्हे तर शाप ठरतो. का बरे? कारण यिर्मया संदेष्ट्याचे वर लिखित असलेले शब्द अगदी स्पष्टपणे दाखवितात त्याप्रमाणे मनुष्याला त्याच्या निर्मात्यापासून स्वतंत्र राहण्यासाठी बनविले गेले नाही. दुसऱ्‍या शब्दात, मनुष्याला त्याच्या निर्माणकर्त्याच्या अधीन राहण्याच्या उद्देशाने बनविले होते. आमच्या निर्माणकर्त्याच्या अधीन राहण्याचा अर्थ त्याच्या आज्ञांकित राहणे होय.

३ उत्पत्ती २:१६, १७ मध्ये उद्धृत केलेल्या आज्ञेद्वारे, निर्माणकर्त्याच्या अधीन राहणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय, ही वास्तविकता पहिल्या मानवी जोडीला यहोवा देवाने जोरदारपणे स्पष्ट केली गेली. त्याने म्हटलेः “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्‍यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ खाऊ नको कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” निर्माणकर्त्याच्या अधीन राहण्याचे नाकारल्यामूळे आदामाने त्याच्या सर्व संततीवर पाप, दुःख आणि मरण आणले.—उत्पत्ती ३:१९; रोमकर ५:१२.

४, ५. (अ) देवाच्या अधीन होण्याचे नाकारल्यामुळे मानवांवर काय गुदरले? (ब) कोणता नैतिक नियम अटळ आहे?

४ देवाच्या अधीन होण्याचे नाकारणारे निबुर्द्ध व नैतिकतेचा अभाव दर्शवणारे आहे. जगात यामुळे, मोठ्या प्रमाणात अधार्मिकपणा, गुन्हेगारी, हिंसाचार आणि लैंगिकतेमुळे संक्रमित आजाराची अनैतिकतेची फळे यांचा परिणाम झाला आहे. या व्यतिरिक्‍त, आज तरुणांनी यहोवाच्या, तसेच त्यांच्या पालकांच्या व देशातील नियमाच्या अधीन होण्याचे नाकारल्याने बाल अपराधामुळे अतिदुःखदायक पीडा होण्याचे ते मोठे कारण बनले नाहीत का? हा स्वातंत्र्याचा आत्मा आज पुष्कळ लोकांच्या विचित्र व गबाळ्या पेहरावावरून, व बोलत असलेल्या घाणेरड्या भाषेवरून दिसून येतो.

५ परंतु निर्माणकर्त्याच्या या अचल नैतिक नियमापासून सुटका शक्य नाहीः “फसू नका: देवाचा उपहास व्हावयाचा नाही. कारण मनुष्य जे काही पेरितो, त्याचेच त्याला पीक मिळेल; जो आपल्या देहासाठी पेरितो त्याला देहापासून नाशाचे पीक मिळेल.”—गलतीकर ६:७, ८.

६, ७. पाहिलेल्या कोणत्या उदाहरणावरून, अधीन होण्याचे नाकारण्याचे कोणते मूळ कारण आहे?

६ अधीन राहण्याचे नाकारणे याचे मूळ कारण कोणते आहे? स्पष्ट सांगावयाचे म्हणजे, ते स्वार्थीपणा व गर्व होय. यामुळेच पहिली स्त्री, हव्वा हिने सर्पाला तिला फसवू दिले व मना केलेले फळ खाल्ले. ती नम्र व विनयशील असती तर देवासारखे होण्याचा मोह—बरे आणि वाईटाचा स्वतः निर्णय करणे—त्याचे तिला आकर्षण वाटले नसते. ती निःस्वार्थी असती तर तिचा निर्माणकर्ता, यहोवा देव याने खासपणे मना केलेल्या गोष्टीची तिने मुळीच हाव धरली नसती.—उत्पत्ती २:१६, १७.

७ आदाम आणि हव्वेचे पतन घडल्यानंतर काही काळातच, गर्व व स्वार्थीपणामुळे काईनाने त्याचा भाऊ हाबेल याचा वध केला. इतकेच नव्हे तर स्वार्थीपणामुळे स्वतंत्रपणे कार्य करून विषयासक्‍त सुख उपभोगण्यासाठी काही देवदूतांनी देह धारण करून त्यांचे स्थान सोडले. गर्व आणि स्वार्थीपणाने निम्रोदाला प्रलोभित केले व त्या वेळेपासून तशीच गुणलक्षणे अधिक जगीक नेत्यांमध्ये दिसून येतात.—उत्पत्ती ३:६, ७; ४:६-८; १ योहान ३:१२; यहुदा ६.

आम्ही कशाबद्दल यहोवा देवाच्या अधीन असले पाहिजे

८-११. ईश्‍वरी अधीनतेचे अनुकरण करण्याची कोणती चार जोरदार कारणे आहेत?

८ आम्ही आमचा निर्माता, यहोवा देवाच्या अधीन असण्याच्या बंधनाखाली का आहोत? सर्वात प्रथम म्हणजे तो विश्‍वव्यापी सार्वभौम आहे. सर्व अधिकार खरेपणाने त्याच्याठायी आहेत. तो आमचा न्यायाधीश, नियंता आणि राजा आहे. (यशया ३३:२२) त्याच्याविषयी असे योग्यपणे लिहिले आहेः “ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टिला सर्व उघडेवाघडे आहे.”—इब्रीयांस ४:१३.

९ आणखी, आमचा निर्माणकर्ता सर्वशक्‍तीमान असल्यामुळे, कोणीही त्याला विरोध करुन यशस्वी होऊ शकणार नाही: त्याला अधीनता दाखवण्याच्या बंधनाकडे कोणीही दुर्लक्ष करु शकत नाही. जे त्याला विरोध करतात त्यांचा प्राचीन समयातील फारोचा जसा नाश झाला त्याप्रमाणे, आता किंवा नंतर देवाच्या नियुक्‍त वेळी नाश होईल ज्यात दियाबल सैतानाचाही नाश केला जाईल.—स्तोत्रसंहिता १३६:१, ११-१५; प्रकटीकरण ११:१७; २०:१०, १४.

१० निर्माणकर्त्या देवाची सेवा करण्याच्या उद्देशानेच अस्तित्वात असल्यामुळे सर्व बुद्धिमान प्राणी अधीनतेच्या बंधनाधीन आहेत. प्रकटीकरण ४:११ स्पष्ट करतेः “हे प्रभो [यहोवा न्यू.व.] आमच्या देवा गौरव, सन्मान व सामर्थ्य ही तुझी आहेत, असे म्हणवून घ्यावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही उत्पन्‍न केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” तो महान कुंभार आहे, व तो मानवी पात्रास त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी बनवितो.—यशया २९:१६; ६४:८.

११ आमचा निर्माणकर्ता अत्यंत-बुद्धिमान असल्यामुळे आपल्या बऱ्‍याकरता चांगले काय हे त्याला माहीत आहे या वास्तविकतेकडे आम्ही दुर्लक्ष करू नये. (रोमकर ११:३३) त्याचे नियम ‘आपल्या बऱ्‍याकरिता’ आहेत. (अनुवाद १०:१२, १३) याहीपेक्षा अधिक म्हणजे, “देव प्रीती आहे,” यामुळे आमच्यासाठी जे हितकारक तेच त्याला हवे आहे. अशाप्रकारे, आमचा निर्माणकर्ता, यहोवा देव याच्या अधीन राहण्याचे अगत्य दाखवणारी किती कारणे आहेत!—१ योहान ४:८.

येशू ख्रिस्त ईश्‍वरी अधीनतेचे परिपूर्ण उदाहरण

१२, १३. (अ) येशू ख्रिस्ताने ईश्‍वरी अधीनता कशी प्रकट केली? (ब) येशूच्या कोणत्या शब्दाद्वारे त्याची अधीनतेची मनोवृत्ती दिसून येते?

१२ देवाचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमच्यासाठी ईश्‍वरी अधीनतेचे एक चांगले उदाहरण निश्‍चितपणे ठेवतो. प्रेषित पौल फिलिप्पैकर २:६-८ मध्ये हे स्पष्ट करतोः “[येशू], देवाच्या स्वरुपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ असा त्याने मानला नाही. तर त्याने स्वतःला रिक्‍त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरुप धारण केले. आणि मनुष्य प्रकृतीचे असे होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोशिले एथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.” पृथ्वीवर असताना, त्याने वारंवार असे म्हटले की त्याने स्वतः होऊन काही केले नाही; त्याने स्वतंत्रपणे कार्य केले नाही तर तो सर्वदा त्याच्या स्वर्गीय पित्याच्या अधीन होता.

१३ आम्ही योहान ५:१९, ३० मध्ये असे वाचतोः “यावरून येशूने त्यास उत्तर दिले, ‘मी तुम्हास खचित सांगतो, पुत्र जे काही पित्याला करतांना पाहतो त्यावाचून त्याला स्वतः होऊन काही करता येत नाही; कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसेच करतो. माझ्याने स्वतः होऊन काही करवत नाही जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो. आणि माझा न्यायनिवाडा यथार्थ आहे कारण मी आपली इच्छा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो.’” अशाचप्रकारे त्याचा विश्‍वासघात होण्याच्या रात्रीदेखील त्याने वारंवार प्रार्थना केलीः “माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”—मत्तय २६:३९, ४२, ४४; योहान ७:२८; ८:२८, ४२ हेही पहा.

ईश्‍वरी अधीनतेची प्राचीन उदाहरणे

१४. नोहाने कोणत्या मार्गांद्वारे ईश्‍वरी अधीनता दाखवली?

१४ मानवजातीत आरंभाला नोहा ईश्‍वरी अधीनतेचे उदाहरण होता. त्याने तीन मार्गांनी त्याची अधीनता दाखविली. प्रथम, धार्मिक असल्यामुळे तो समवयस्कांमध्ये निर्दोष होता, तो देवासमागमे चालला. (उत्पत्ती ६:९) दुसरा मार्ग, तारु बनविण्याद्वारे. त्याने “तसे केले; देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.” (उत्पत्ती ६:२२) तिसरा, “धार्मिकतेचा प्रचारक” असल्यामुळे येणाऱ्‍या प्रलयाचा इशारा त्याने दिला.—२ पेत्र २:५.

१५, १६. (अ) ईश्‍वरी अधीनतेचे कोणते सुंदर उदाहरण अब्राहामने प्रस्तुत केले? (ब) साराने अधीनता कशी दाखवली?

१५ ईश्‍वरी अधीनतेचे अब्राहाम आणखी उत्कृष्ट उदाहरण होता. “तू आपला देश सोडून जा,” ही देवाची आज्ञा मानण्याद्वारे त्याने अधीनता प्रदर्शित केली. (उत्पत्ती १२:१) याचा अर्थ, उरमधील सुखावह परिस्थिती सोडून (खगोलशास्त्रज्ञांच्या शोधावरून असे दिसून येते की उर हे क्षुद्र शहर नव्हते) शंभर वर्षांसाठी परदेशी भूमीत भटके जीवन असणाऱ्‍यासारखे भटकत फिरणे होय. विशेषतः अब्राहामने त्याचा पुत्र इसहाकचे स्वेच्छेने अर्पण करण्याच्या मोठ्या परिक्षेतही ईश्‍वरी अधीनता दाखवली.—उत्पत्ती २२:१-१२.

१६ अब्राहामची बायको सारा ईश्‍वरी अधीनतेचे आणखी एक चांगले उदाहरण पुरविते. परदेशी ठिकाणी भटकत फिरत असल्यामुळे तिला निश्‍चितच, अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला असेल, परंतु तिने याविषयी कुरकुर केल्याचे आम्हाला पवित्र शास्त्रात कोठेही वाचण्यास मिळत नाही. अब्राहामाने मूर्तीपूजक शासकांना तिची ओळख त्याची बहीण अशी करून दिली तेव्हा तिने दोन प्रसंगी ईश्‍वरी अधीनता दाखवण्याचे चांगले उदाहरण मांडले. दोन्ही वेळी तिला त्यांच्या [मूर्तीपूजक शासकाचा] जनानखान्याचा सदस्य बनण्याची पाळी आली तरी तेथपर्यंत तिने सहकार्य दिले. तिने तिचा पती अब्राहामला “धनी” संबोधून तिच्या ईश्‍वरी अधीनतेचा पुरावा ती अधीनता हृदयापासून खरी होती हे दाखवण्याद्वारे दिला.—उत्पत्ती १२:११-२०; १८:१२; २०:२-१८; १ पेत्र ३:६.

१७. इसहाकाने ईश्‍वरी अधीनता दाखवली असे का म्हटले जाऊ शकते?

१७ अब्राहामाचा पुत्र इसहाकने पुरविलेल्या ईश्‍वरी अधीनतेकडे आम्ही दुर्लक्ष करु नये. यहोवाने जेव्हा त्याचा पिता अब्राहामला, त्याचा पुत्र इसहाकाचे बलिदान करण्याची आज्ञा दिली तेव्हा तो २५ वर्षाचा होता असे यहूदी सांप्रदाय म्हणतो. इसहाकला हवे असते तर तो त्याच्यापेक्षा शंभर वर्षांनी मोठ्या असलेल्या पित्याचा अगदी सहज प्रतिकार विरोध करु शकला असता. परंतु त्याने तसे केले नाही. होमबलीसाठी प्राणी नाही याचा इसहाक विचार करीत होता, तरी तो पित्याच्या अधीन झाला; वधण्यासाठी असलेला सुरा वापरल्यावर नाखुशीने प्रतिक्रिया न दाखविण्यासाठी त्याने पित्याला त्याचे हात व पाय बांधुन स्वतःस वेदीवर ठेवू दिले.—उत्पत्ती २२:७-९.

१८. मोशाने अनुकरण करण्याजोगी ईश्‍वरी अधीनता कशी दाखवली?

१८ अनेक वर्षांनंतर, ईश्‍वरी अधीनतेचे मोशेने आम्हासाठी चांगले उदाहरण ठेवले. तो “भूतलावर सर्व मनुष्याहून नम्र होता” ह्‍या त्याच्या वर्णनावरून ते अगदी स्पष्टपणे दिसते. (गणना १२:३) वीस ते तीस लाख बंडखोर लोकांवर नेतृत्व करावे लागले असतानाही जंगलात ४० वर्षे, यहोवाने दिलेल्या आज्ञेचे पालन केले ही त्याच्या ईश्‍वरी अधीनतेची पुढील साक्ष आहे. अहवाल असा सांगतो की: “मोशाने असे केले; परमेश्‍वराने [यहोवा न्यू.व] आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने सर्व काही केले.”—निर्गम ४०:१६.

१९. कोणत्या आविर्भावाद्वारे ईयोबाने ईश्‍वरी अधीनता दाखवली?

१९ ईश्‍वरी अधीनता दाखविण्याचे उत्कृष्ट उदाहारण ईयोब हा आणखी एक व्यक्‍ती होता. यहोवाने सैतानाला त्याच्या मालमत्तेचा पूर्ण नाश करण्याची तसेच त्याच्या मुलांना मारण्याची व त्याला “मोठमोठ्या गळवांनी नखशिखांत” पीडीत करण्याची परवानगी दिली, आणि ईयोबाच्या बायकोने देखील त्याला म्हटलेः “तुम्ही अजून सत्व धरुन राहिला आहा का? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा!” तथापि ईयोबाने त्याची ईश्‍वरी अधीनता असे म्हणण्याद्वारे दाखवलीः “तू धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलतेस; देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय?” (ईयोब २:७-१०) अशीच मनोवृत्ती असणारे ईयोब १३:१५ मध्ये त्याने उद्धृत केलेले शब्द दाखवतातः “तो मला ठार मारणार तरी मी त्याची आस धरणार नाही का?” [न्यू.व.] ईयोबाला त्याचे समर्थन करण्याची जास्त काळजी वाटत असली तरी, यहोवाने त्याचे भिकार सांत्वन करणाऱ्‍या एकाला असे म्हटलेः “तुजवर आणि तुझ्या दोन्ही मित्रांवर मी संतप्त झालो आहे, कारण मजविषयी माझा सेवक ईयोब जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही.” निःसंशये, ईयोबाने अधीनतेचे उत्कृष्ट उदाहरण आमच्यासाठी पुरविले.—ईयोब ४२:७.

२०. कोणत्या मार्गाद्वारे दाविदाने ईश्‍वरी अधीनता दाखवली?

२० इब्री शास्त्रवचनातील आणखी एक उदाहरण सांगायचे म्हणजे, ते आहे दाविदाचे. राजा शौल प्राण्यांप्रमाणे दाविदाच्या मागे लागला असताना, शौलाचा वध करुन त्याच्या त्रासापासून मुक्‍ती मिळवण्याचे दाविदाला दोन प्रसंग मिळाले. तथापि, दाविदाच्या ईश्‍वरी अधीनतेने त्याला असे करण्यापासून दूर ठेवले. त्याचे शब्द १ शमुवेल २४:६ मध्ये उद्धृत केलेले आहेतः “मी आपल्या स्वामीवर, परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यू.व.] अभिषिक्‍तावर आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] मजकडून न घडवो, कारण तो परमेश्‍वराचा [यहोवा, न्यू.व.] अभिषिक्‍त आहे.” (तसेच १ शमुवेल २६:९-११ पहा.) अशाचप्रकारे, त्याने चूका किंवा पाप घडले तेव्हा त्याबद्दल वाग्दंड स्वीकारून ईश्‍वरी अधीनता दाखवली.—२ शमुवेल १२:१३; २४:१७; १ इतिहास १५:१३.

अधीनतेच्या बाबतीत पौलाचे उदाहरण

२१-२३. प्रेषित पौलाने कोणत्या विविध प्रकारात ईश्‍वरी अधीनता दाखवली?

२१ ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात, अधीनतेच्या बाबतीत आमच्यासाठी विशेष उदाहरण पौलाचे आहे. त्याच्या प्रेषितीय सेवकपणातील इतर सर्व बाबतीत त्याने त्याचा स्वामी येशू ख्रिस्ताचे अनुकरण केले. (१ करिंथकर ११:१) यहोवाने इतर प्रेषितांपेक्षा त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला असला तरी, पौलाने स्वतंत्रपणे कार्य केले नाही. परिवर्तन झालेल्या विदेश्‍यांची सुंता होणे आवश्‍यक आहे का असा प्रश्‍न उद्‌भवला तेव्हा असल्याचे लूक आम्हाला सांगतोः “[अंत्युखियातील बंधुवर्गाकडून] असे ठरविण्यात आले की पौल व बर्णबा यांनी व त्यांच्यातून इतर कित्येकांनी या वादासंबंधाने यरुशलेमांतले प्रेषित व वडील वर्ग याकडे जावे.”—प्रे. कृत्ये १५:२.

२२ पौलाच्या मिशनरी कार्याबद्दल गलतीकर २:९ मध्ये आम्हाला सांगतले आहेः “मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानिले आहेत, त्यांनी मला व बर्णबाला आपण देवाच्या कार्यात सहभागी आहो हे दर्शविण्यासाठी उजव्या हातांनी हस्तांदोलन केले; यासाठी की आम्ही विदेश्‍यांकडे व त्यांनी सुंती लोकांकडे जावे.” आपल्याच मताने काम करण्याऐवजी पौलाने मार्गदर्शनाचा शोध केला.

२३ याचप्रकारे पौल यरुशलेममध्ये असताना मंदिरात जाऊन नियम शास्त्राच्या रितीचे पालन करण्याविषयी तेथील वडिलांनी दिलेल्या सल्ल्याचा त्याने स्वीकार केला व यामुळे मोशेच्या नियमशास्त्राच्या बाबतीत तो धर्मत्यागी नव्हता हे सर्वांना समजले. त्याच्या अशा कृत्यामुळे, त्याच्याविरुद्ध जमाव उठण्याचा मोठा अनर्थ टळला असे दिसले तर त्याने चूक केली होती का? कदापि नाही, प्रे. कृत्ये २३:११ मधील पुराव्यासंबंधी आपण असे वाचतोः “त्याच रात्री प्रभू त्याजपुढे उभा राहून म्हणालाः ‘धीर धर! जशी तू यरूशलेमात मजविषयी साक्ष दिली, तशी रोम तेथेही तुला द्यावी लागेल’.”

२४. पुढील लेखात अधीनतेच्या कोणत्या मुद्यांची चर्चा केली जाईल?

२४ खरोखर, आम्ही अधीनतेत राहण्यासाठी प्रबळ कारणे तसेच ज्यांनी अधीनता दाखवली अशांची उल्लेखनीय उदाहरणे शास्त्रवचने पुरवितात. पुढील लेखात, विविध क्षेत्रात यहोवा देवास अधीनता राखण्याबद्दल तसेच याला साहाय्यक ठरणाऱ्‍या गोष्टींची व त्यामुळे मिळणाऱ्‍या आशीर्वादांची आपण चर्चा करणार आहोत.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

▫ स्वतंत्रतेचा कोणता प्रकार आनंददायी नाही?

▫ अधीनता नाकारण्याचे कोणते मूळ कारण आहे?

▫ कोणत्या कारणामुळे यहोवाच्या अधीन राहणे आमचे कर्तव्य आहे?

▫ ईश्‍वरी अधीनतेच्या बाबतीत शास्त्रवचने कोणती उत्कृष्ट उदाहरणे पुरवितात?

[८ पानांवरील चित्रं]

ईश्‍वरी अधीनतेच्या विरुद्ध बंडाळी करणारा जलप्रलयाआधीचा निम्रोद शासक

[११ पानांवरील चित्रं]

नोहा, ईश्‍वरी अधीनतेचे निर्दोष उदाहरण.—उत्पत्ती ६:१४, २२

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा