खोटे बोलायला इतके सोपे का वाटते?
आपल्याला खोटे सांगितले जावे हे कोणालाही मुळीच आवडत नाही. तरीही, संपूर्ण जगभरातील लोक एक दुसऱ्यांबरोबर विविध कारणांसाठी खोटे बोलत असतात. जेम्स पॅटरसन व पिटर किम यांचे द डे अमेरिका टोल्ड द ट्रुथ या पुस्तकाज आलेल्या निरिक्षणावरून असे समजते की ९१ टक्के अमेरिकेतील लोक रोज खोटे बोलतात. लेखक असे स्पष्ट करतात: “खोटे बोलण्यावाचून आठवडा घालविणे हे आम्हा बहुतेकांना फारच मुष्कीलीचे वाटते. पाचातील एक त्याशिवाय—आमच्या बोलण्याचा अर्थ, सदसदविवेक बुद्धी, पूर्वसंकल्पित लबाड्याशिवाय—एकही दिवस जगू शकत नाही.”
आधुनिक दिवसातील जीवनाच्या जवळ जवळ सर्वच क्षेत्रात खोटे बोलणे एक साधारण बाब आहे. राजकारणातील नेते त्यांच्या लोकांना व एक दुसऱ्यांसोबत खोटे बोलतात. वेळोवेळी, ज्या लज्जास्पद कामात ते वास्तविकपणे समाविष्ट असतात त्याचा ते नकार करतात हे दृश्य दूरदर्शनवर आम्हाला पाहवयास मिळते. सिसएला बोक त्यांच्या लाईंग—मॉरल चॉइस इन पब्लिक ॲन्ड प्रायव्हेट लाईफ या पुस्तकात असे निरिक्षण करतात: “कायद्यात, व वृत्तपत्रव्यवसायात, सरकारात आणि सामाजिक शास्त्रात फसवेगिरी क्षुल्लक गोष्ट समजली जाते. जे खोटे बोलतात व नियम बनवितात त्यांना वाटते की हे माफ केले जाऊ शकते.”
अमेरिकेतील राजकारणातच्या फसवेगिरीचा उल्लेख करताना मे/जून १९८९ च्या कॉमन कॉज मॅगझिन ने निरिक्षले: “वॉटरगेट प्रकरण तसेच व्हियतनामचे युद्ध या गोष्टी सरकाराची फसवेगिरी आणि जाहीरपणे भरवसा न ठेवण्याविषयी इराण बरोबर प्रतिस्पर्धा करणाऱ्या आहेत. रोनाल्ड रेगन अमेरिकेचे अध्यक्ष असताना कोणती वेगळी घटना घडली? पुष्कळ जण खोटे बोलले परंतु फार कमी जणांना पश्चाताप झाला” या चांगल्या कारणामुळे सामान्य लोकात त्यांच्या राजनैतिक पुढाऱ्यांवर भरवसा ठेवत नाहीत.
आंतरराष्ट्रीय संबंधात अशा पुढाऱ्यांना एक दुसऱ्यावर भरवसा ठेवणे मुश्कीलीचे वाटते. ग्रीक तत्वज्ञानी प्लॅटो यांनी म्हटले: “राष्ट्रातील पुढाऱ्यांना—राष्ट्राच्या भल्यासाठी खोटे बोलायची परवानगी आहे.” आंतरराष्ट्रीय संबंधात पवित्र शास्त्रातील दानीएल ११:२७ मधील भविष्यवाणी जे म्हणते त्या प्रकारे आहे: “ते एका मेजावर बसून परस्परांबरोबर खोटे बोलतील.”
व्यापारी जगात, उत्पादन व सेवेबद्दल खोटे बोलणे सर्रासपणे सवय झाली आहे. खरेदी करणाऱ्यांना सावधानीपूर्वक कमी करण्याची बोली करावी लागते, तसेच त्या वस्तुवर अगदी लहान अक्षरात छापलेल्या गोष्टी लक्षपूर्वक वाचाव्या लागतात. काही देशात लोकांना खोट्या जाहीरातीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी व तसेच फायदेकारक, अपायकारक आणि लबाडीपासून मुक्त भासविणाऱ्या अन्यायी व्यापाऱ्यांपासून सुरक्षितता मिळण्यासाठी सरकारात नियमितस्वरुपाच्या एजन्सी असतात. एवढा सर्व प्रयत्न करूनही लोकांना लबाड व्यापाऱ्यांमुळे आर्थिकरितीने हाल सहन करावे लागतात.
काही लोकांना खोटे बोलणे इतके सोपे वाटते की, त्यांना ती सवय होऊन जाते. काही सर्वसाधारणपणे सत्य बोलणारे असतात, पण धोक्याच्या परिस्थितीत असतात तेव्हा ते खोटे बोलतात. काही जण परिस्थिती कोणतीही असली तरी खोटे बोलण्याचे नाकारतात.
खोटे याची परिभाषा “१. खासपणे फसविण्याच्या उद्देशाने केलेला खोटा शब्दप्रयोग किंवा कार्य. . . २. खोटी छाप पाडणारे काही किंवा त्या उद्देशास्तव.” लबाडी करणाऱ्याला ते सत्य नाही हे माहीत असते परंतु इतरांनी त्यावर विश्वास ठेवावा हा यामागील उद्देश असतो. खोटे बोलण्याद्वारे व अर्ध-सत्य बोलण्याद्वारे तो, ज्यांना सत्य माहीत असण्याचा अधिकार असतो त्यांना फसविण्याचा प्रयत्न करतो.
खोटे बोलण्याची कारणे
लोक अनेक कारणांसाठी खोटे बोलत असतात. काही विचार करतात की या स्पर्धात्मक जगातील यश मिळण्यासाठी त्यांच्या पात्रतेविषयी त्यांना खोटे बोलावेच लागते. इतर जण चुका व अपराध झाकण्यासाठी खोटे बोलतात. आणखी इतर न केलेल्या कामाची, ते केले म्हणून छाप पडण्यासाठी खोटा अहवाल देतात. यानंतर इतर काही असे आहेत जे दुसऱ्यांचे चांगले वर्तन वाईट करण्यासाठी, पेच निर्माण करणारी गोष्ट टाळण्यासाठी वा आधीचे खोटे बोलणे सिद्ध करण्यासाठी किंवा लोकांचे पैसे कपटाने हिरावून घेण्यासाठी खोटे बोलतात.
खोटे बोलण्याला एक सामान्य समर्थन आहे की ते दुसऱ्या व्यक्तीला सुरक्षित ठेवते. काही याचा निरुपद्रवी खोटे बोलणे म्हणतात कारण ते असा विचार करतात की यामुळे इतरांना इजा पोहचत नाही. परंतु, अशा निरुपद्रवी खोटे बोलण्यामुळे वाईट परिणाम होत नाही का?
परिणामांचा विचार करा
निरुपद्रवी खोटे बोलण्यामुळे अधिक गंभीर गोष्टीतही खोटे बोलण्याची सवय लागू शकते. सिस्सेला बोक यांनी म्हटले: “सर्वच खोटे बोलणे ‘निरुपद्रवी’ असले तरी ते सहजासहजी सोडून दिले जाऊ शकत नाही. प्रथमतः, इजा पोहचवणाऱ्या लबाड्या वादविवाद करण्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत. खोटे बोलणाऱ्याला वाटते की यामुळे इजा होणार नाही किंवा ते फायदेकारक आहे परंतु हे फसणाऱ्याच्या दृष्टिने ते तसे नसते.”
लबाड्या अधिक निरुपद्रवी दिसतात तरी त्या मनुष्याचे चांगले नातेसंबंधाचा नाश करणाऱ्या ठरतात. लबाडी करणाऱ्याच्या विश्वसनीयतेचे तुकडे झालेले असतील, व भरवशाची कायमचीच ताटातुट हाईल. प्रसिद्ध निबंधकार राल्फ वॉलडो एमरसन यांनी लिहिलेः “प्रत्येक सत्याचे उल्लंघन ही लबाडीची एक प्रकारे आत्महत्याच केवळ नाही तर मानवी समाजाच्या सुदृढतेचा खून करणे होय.”
दुसऱ्या व्यक्तीविषयी खोटे बोलणे हे लबाडाला फार सोपे वाटते. त्याच्याकडे काही पुरावा नसतो तरी, त्याच्या खोट्या बोलण्याने शंका निर्माण होतात आणि पुष्कळ त्याच्या दाव्याचा शोध न करता विश्वास ठेवतात. यामुळे त्या प्रामाणिक व्यक्तिच्या प्रतिष्ठेवर कलंक आणला जातो, आणि तो निर्दोष आहे हे सिद्ध करण्याचे त्याच्यावर ओझे येते. यास्तव, निर्दोष व्यक्तीऐवजी लोक लबाडावर भरवसा ठेवतात तेव्हा निराशा होत असते, यामुळे निर्दोष व्यक्तीचे संबंध लबाडाबरोबर नष्ट होतात.
खोटे बोलण्याची सवय लबाड फार सोप्यारितीने वाढवतो. एक लबाडी दुसरी लबाडी करण्यास प्रवृत्त करते. अमेरिकेतीत सुरूवातीच्या थॉमस जॅफरसन या मुत्सद्याने निरिक्षिले: “याच्या इतका अधिक तुच्छ, किळसवाणा, तिरस्कारणीय दुर्गुण नाही आणि जो स्वतःला एकदा खोटे बोलू देतो त्याला दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा, जसजशी त्याला सवय होत जाते तसे त्याला ते अधिक सोपे जाते.” हा नैतिकतेच्या नाशाचा ऱ्हास होय.
खोटे बोलणे सोपे वाटते त्याचे कारण
खोटे बोलण्यास सुरूवात एका बंडखोर दूताने पहिल्या स्त्रीला खोटे बोलण्यापासून झाली, त्याने तिला सांगितले की तिने सृष्टिकर्त्याची आज्ञा मोडली तर ती मरणार नाही. याचा सर्व मानवजातीवर मोठा घातक परिणाम झाला, यामुळे सर्वांना अपूर्णता, आजार आणि मरण आले.—उत्पत्ती ३:१-४, रोमकर ५:१२.
अवज्ञाकारी आदाम व हव्वेच्या काळापासून, लबाडाचा बाप, याच्या विश्वासघातकी प्रभावामुळे मानवजातीच्या जगात खोटे बोलायला प्रवृत्त करणारी परिस्थिती निर्माण केली आहे. (योहान ८:४४) या ऱ्हास होत चाललेल्या जगात सत्य केवळ सापेक्ष आहे. सप्टेंबर १९८६ च्या सॅटरडे इव्हनिंग पोस्ट ने खोटे बोलण्याच्या समस्येचे असे निरिक्षण केले की ती “ढोंगी व्यापार, सरकार, शिक्षण, मनोरंजन आणि दोन नागरिक व शेजाऱ्यामधील दैनंदिन संबंध याला स्पर्श करते . . . आम्ही सापेक्षतेचा सिद्धान्त स्वीकारला आहे त्यात, केवळ एक लबाडी असते व सत्य काहीच नसते.”
हा लबाड बोलण्याचा सराव असणाऱ्यांचा दृष्टिकोन आहे, ज्यांना ते फसवतात त्यांच्याविषयी त्यांना दयेची कमी असल्याचे दाखवतात. खोटे त्यांच्याकडून अगदी सहज निघते. हा त्यांच्या जीवनाचाच भाग आहे. काही जे नेहमीच खोटे बोलणारे नाहीत ते देखील भीतीमुळे—उघडकीस येण्याची भीती, शिक्षा मिळण्याची भीती आणि इत्यादि निश्चितच खोटे बोलतात. ही अपूर्ण शरीराची कमतरता आहे. या सवयीला सत्य बोलण्याचा निश्चय करून कसे बदलले जाईल?
सत्यवचनी का असावे?
आमच्या महान सृष्टिकत्याने सर्वांसाठी ठरविलेला सत्य हा एक दर्जा आहे. त्याच्या लिखित वचनात, पवित्र शास्त्रात, इब्रीयांस ६:१८ म्हणते “खोटे बोलणे देवाला अशक्य आहे.” हाच दर्जा त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त याने पृथ्वीवर त्याचा व्यक्तिगत प्रतिनिधी असताना उंचावला होता. ज्यांनी येशूला मारण्याचा प्रयत्न केला होता त्या यहूदी धार्मिक नेत्यांना येशूने म्हटले: “ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हास सांगितले त्या मनुष्याला म्हणजे, मला तुम्ही आता जिवे मारावयास पाहता. आणि मी त्याला ओळखीत नाही असे जर म्हणेन तर तुमच्यासारखा लबाड होईन.” (योहान ८:४०, ५५) त्याने आम्हाकरता नमूना ठेवला आहे तो असा की, “त्याने पाप केले नाही, आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही.”—१ पेत्र २:२१, २२.
आमचा सृष्टिकर्ता ज्याचे नाव यहोवा आहे तो खोटे बोलण्याचा द्वेष करतो, जसे नीतीसूत्रे ६:१६-१९ मध्ये लिहिले आहे की: “परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] ज्यांचा द्वेष करतो अशा सहा गोष्टी आहेत; नव्हे त्याला अशा सात गोष्टींचा वीट आहे: उन्मत दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतःकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी व भावाभावांत वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य ह्या त्या होत.”
त्याच्या दर्जानुरूप राहून त्याची सम्मती प्राप्त करण्यासाठी हा सत्यवचनी देव आमच्याकडून अपेक्षा करतो. त्याचे ईश्वरप्रेरित वचन आम्हाला आज्ञा देते: “ऐकमेकांबरोबर लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसुद्धा काढून टाकले आहे.” (कलस्सैकर ३:९) जे लोक लबाड बोलण्याच्या सवयीचा त्याग करण्याचे नाकारतील, त्याला ते स्वीकार्य वाटणार नाही; त्यांना त्याचे जीवनाचे दान मिळणार नाही. साहजिकच, स्तोत्रसंहिता ५:६ स्पष्टपणे म्हणते की देव “असत्य भाषण करणाऱ्यांचा नाश” करणार आहे. प्रकटीकरण २१:८ पुढे म्हणते की “सर्व लबाड” यांचा भाग “दुसरे मरण” असेल, म्हणजेच सार्वकालिक नाश होय. लबाडीविषयी देवाच्या दृष्टिकोनाचा स्वीकार केल्यामुळे सत्य बोलण्यासाठी आम्हाला चांगले कारण पुरविते.
परंतु सत्य बोलण्यामुळे जर पेच किंवा वाईट भावना निर्माण होत असतील तर अशा वेळी काय केले जावे? खोटे बोलणे हा कधीही उपाय नाही तर काही वेळा काहीच न बोलणे हा आहे. खोटे बोलण्यामुळे तुमच्या विश्वासनीयतेचा नाश होतो व तुम्ही ईश्वरी अस्वीकृतीला कारणीभूत होता तर खोटे का बोलावे?
भीती आणि मानवी अपूर्णतेमुळे, एखाद्यास लबाडीचा आश्रय घेण्याचे प्रलोभन होऊ शकते. हे सर्वात सोपे काम आहे किंवा चुकीची दया दाखवणे यात समाविष्ट आहे. येशू ख्रिस्त त्याला माहित होता तरी प्रेषित पेत्राने त्याला तीन वेळा नाकारल्यामुळे तो या प्रलोभनास बळी पडला. यानंतर, खोटे बोलल्यामुळे त्याच्या हृदयाला चरे पडले. (लूक २२:५४-६२) त्याच्या खऱ्या पश्चातापामुळे देवाने त्याला क्षमा केली, याला पुरावा म्हणून नंतर त्याला सेवेच्या विशेषाधिकाराचे अनेक आशीर्वाद मिळाले. लबाड बोलणे थांबविण्याचा निश्चय, निर्णय करून केलेल्या पश्चातापाच्या कृत्याने देव ज्याचा द्वेष करतो ते करण्याद्वारे ईश्वरी क्षमा मिळते.
परंतु खोटे बोलल्यानंतर क्षमा मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, तुमच्या सृष्टिकर्त्यासोबत चांगले नातेसंबंध टिकवा आणि इतरांसोबत सत्य बोलण्याद्वारे तुमची विश्वसनियता टिकवा. स्तोत्रसंहिता १५:१, २ काय म्हणते त्याची आठवण ठेवा: “हे परमेश्वरा [यहोवा, न्यू.व.] तुझ्या मंडपात कोण वस्ती करील, तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, आपल्या मनापासून सत्य बोलतो.”