ख्रिस्ती सुवार्तिक कार्याचा प्रेरित नमुना
“जसा मी ख्रिस्ताचा अनुकारी आहे, तसे तुम्ही माझे अनुकारी व्हा.”—१ करिंथकर ११:१.
१. येशूने आपल्या शिष्यांपुढे कोणकोणत्या बाबतीत आपले अप्रतिम उदाहरण राखले? (फिलिप्पैकर २:५-९)
येशूने आपल्या शिष्यांसाठी केवढे अप्रतिम उदाहरण मांडले! पृथ्वीवर येऊन पापी मानवांसोबत वस्ती करावी याकरता त्याने आपले स्वर्गीय वैभव सोडले. मानवजातीच्या तारणासाठी व अधिक महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्वर्गीय पित्याच्या नामाच्या पवित्रीकरणासाठी त्याची पराकाष्ठेचा त्रास सहन करण्याची तयारी होती. (योहान ३:१६; १७:४) त्याच्या जीवनाची चौकशी चालू असता त्याने निर्भिडपणे हे घोषित केलेः “मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी.”—योहान १८:३७.
२. येशूने जे काम आरंभिले होते ते चालू ठेवण्याची आज्ञा तो त्याच्या पुनरुत्थानानंतर शिष्यांना का देऊ शकला?
२ येशूने आपल्या मृत्युआधी शिष्यांना उत्तम तालीम दिली, व यामुळे त्यांना राज्य सत्याबद्दल साक्ष देण्याचे काम पुढे नेता येऊ शकत होते. (मत्तय १०:५-२३; लूक १०:१-१६) आणि यामुळेच, पुनरुत्थानानंतर येशू त्यांना ही आज्ञा देऊ शकलाः “जा . . . व सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या. जे सर्व काही मी तुम्हांस आज्ञापिले ते पाळावयास त्यांस शिकवा.”—मत्तय २८:१९, २०.
३. शिष्य बनविण्याचे काम कसे विस्तारीत झाले, पण ते खासपणे कोणत्या क्षेत्रापुरते मर्यादित होते?
३ येशूच्या शिष्यांनी त्याच्या आज्ञेचे पालन पुढील साडेतीन वर्षे केले पण ते शिष्य बनविण्याचे आपले काम यहूदी, यहूदी मतानुसारी आणि सुंती शोमरोनी यांच्यापर्यंत मर्यादित ठेवून होते. मग, इ. स. ३६ मध्ये सुवार्तेचा प्रचार कर्नेल्य हा बेसुंती माणूस व त्याच्या घरच्या लोकांना व्हावा असे देवाने मार्गदर्शन दिले. पुढील दहा वर्षात इतर विदेश्यांना मंडळीत पाचारण करण्यात आले. तरीपण, बहुतेक सर्व काम भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील विभागातच होत राहिले.—प्रे. कृत्ये १०:२४, ४४-४८; ११:१९-२१.
४. इ. स. ४७-४८च्या दरम्यान कोणती अभूतपूर्व घडामोड झाली?
४ अधिक दूरच्या प्रदेशात यहूदी व विदेशी लोकांतून शिष्य बनवण्याचे काम ख्रिश्चनांच्या हातून घडण्यासाठी आणखी कशाची तरी गरज होती. यासाठीच, इ. स. ४७-४८ च्या सुमाराला सूरियाच्या अंत्युखिया येथील मंडळीच्या वडीलांना हा ईश्वरी संदेश मिळालाः “बर्णबा व शौल यांस ज्या कार्यासाठी मी बोलाविले आहे त्यासाठी त्यांस मजकरिता निराळे करून ठेवा.” (प्रे. कृत्ये १३:२) पौलाला त्यावेळी त्याच्या मूळ नावाने ओळखले जात होते हे लक्षात आणा; तसेच हेही लक्षात घ्या की, देवाने पौलाच्या आधी बर्णबाचे नाव घेतले; हे कदाचित तेव्हा बर्णबा हा त्या दोघांमध्ये श्रेष्ठ होता असे मानले जात असावे.
५. पौल तसेच बर्णबा यांच्या सुवार्तिक कार्याचा अहवाल ख्रिश्चनांसाठी आज इतका महत्त्वाचा का आहे?
५ पौल व बर्णबा यांच्या सुवार्तिक कार्याचा सविस्तर अहवाल यहोवाच्या साक्षीदारांना व खासपणे त्यांच्यातील सुवार्तिक व पायनियरांना मोठे प्रोत्साहन देणारा आहे. त्या सुवार्तिक व पायनियरांनी आपले घर सोडून विदेशी वसाहतीत जाऊन देवाची सेवा करण्यासाठी स्वतःला स्थलांतरित केले आहे. प्रेषितांची कृत्ये याच्या १३ व १४ अध्यांयाची उजळणी ही पौल व बर्णबा यांचे अधिकपणे अनुकरण करण्याची व शिष्य बनविण्याच्या सर्वमहत्त्वाच्या कामात आपला सहभाग अधिक वाढवण्याची चालना निश्चितपणे देईल.
कुप्रचा प्रदेश
६. सुवार्तिकांनी कुप्रमध्ये आपले कोणते उदाहरण मांडले?
६ हे सुवार्तिक विलंब न लावता सलुकीयातील बंदरातून तारवाने कुप्रास रवाना झाले. ते सलमीनात जाऊन पोहोंचल्यावर त्यांनी तेथे आराम केला नाही. “त्यांनी देवाचे वचन यहूद्यांच्या सभास्थानामध्ये गाजविले.” येशूने घालून दिलेल्या नमून्यानुसार त्यांनी त्या शहरात राहून तेथील लोक आपणापाशी येतील का याची वाट पाहात बसायचे नव्हते. उलट, ते “सर्व बेटात चालून” गेले आणि आपले कार्य केले. यामुळे त्यांना पायी खूप चालावे लागले असेल व बऱ्याच ठिकाणी वस्तीस उतरावे लागले असेल; कारण कूप्र हे मोठे बेट आहे व यांच्या यात्रेने त्याचा खूप मोठा प्रदेश पायी घातला असेल.—प्रे. कृत्ये १३:५, ६.
७. (अ) पफेस येथे कोणती उल्लेखनीय घटना घडली? (ब) हा अहवाल आम्ही कोणती प्रवृत्ती राखण्याचे उत्तेजन देतो?
७ या दोन पुरुषांना तेथील वास्तव्याच्या शेवटाला पफेस शहरात मोठा आनंदाचा अनुभव मिळाला. त्या बेटाचा अधिकारी सिर्ग्य पौल याने त्यांचा संदेश ऐकला व “विश्वास धरिला.” (प्रे. कृत्ये १३:७, १२) पौलाने नंतर असे लिहिलेः “बंधुजनहो, तुम्हास झालेले पाचारण पाहा; तुम्हामध्ये संसारदृष्ट्या ज्ञानी, समर्थ, कुलीन असे फार नाहीत.” (१ करिंथकर १:२६) तरीही, ज्या ‘समर्थ’ लोकांनी प्रतिसाद दिला, त्यापैकी सिर्ग्य पौल हा एक होता. या अनुभवाने सर्वांना पण खासपणे मिशनऱ्यांना, १ तीमथ्य २:१-४ मध्ये आपल्याला उत्तेजन देण्यात आले आहे त्याप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांना साक्ष देण्याबद्दल विधायक दृष्टिकोण धरावा असे उत्तेजन दिले पाहिजे. अधिकारावर असलेल्या लोकांनी देवाच्या सेवकांना कधी कधी मोठी मदत केली आहे.—नेहम्या २:४-८.
८. (अ) येथून पुढे बर्णबा व पौल यांच्या नातेसंबंधात कोणता बदल घडल्याचे दिसते? (ब) बर्णबा कोणत्या अर्थी चांगले उदाहरण ठरला?
८ यहोवाच्या आत्म्याच्या प्रभावाने पौलाने सिर्ग्य पौल याचे मतांतर करण्यात प्रमुख भूमिका घेतली. (प्रे. कृत्ये १३:८-१२) तसेच, येथून पुढे पौलानेच पुढाकार घेतल्याचे दिसून येते. (प्रे. कृत्ये १३:१५, १६, ४३ सोबत प्रे. कृत्ये १३:७ पडताळा.) हे, पौलाचे धर्मांतर झाले तेव्हा त्याला जी ईश्वरी नेमणूक देण्यात आली त्याच्या सहमतात होते. (प्रे. कृत्ये ९:१५) अशा हालचालीमुळे कदाचित बर्णबाच्या नम्रतेची परिक्षा झाली असावी. तथापि, या झालेल्या बदलाद्वारे स्वतःचा स्वाभिमान दुखवून घेण्यापेक्षा बर्णबाने, “सांत्वनेचा पुत्र” या त्याच्या नावाच्या अर्थानुरुप स्वतःचे सांत्वन केले असावे आणि त्याने पौलाला त्याच्या सर्व सुवार्तिक यात्रेत तसेच जेव्हा कालांतराने काही यहूदी ख्रिश्चनांनी बेसुंती विदेश्यांमधील त्यांच्या सेवकपणाला आव्हान केले तेव्हा निष्ठावंतपणे पाठबळ दिले. (प्रे. कृत्ये १५:१, २) हे आम्हा सर्वांसाठीच, पण खासपणे मिशनरी आणि बेथेल कुटुंबियांसाठी केवढे सुंदर उदाहरण आहे! आपण सर्वांनीच ईश्वरशासित बदलास स्वीकारण्याची तयारी दाखवून आम्हामध्ये नेतृत्व करण्यासाठी ज्यांची नेमणूक करण्यात आली आहे अशा सर्वांना पूर्ण पाठिंबा द्यावा.—इब्रीयांस १३:१७.
आशिया मायनरचे पठार
९. पौल व बर्णबा यांनी अंत्युखियातील पिसिदियापर्यंत प्रवास करण्याची जी तयारी दाखवली त्याकडून आपण काय शिकू शकतो?
९ कुप्रमधून पौल व बर्णबा यांनी उत्तरेकडे आशिया खंडाकडे प्रयाण केले. उघड नाही अशा काही कारणास्तव या सुवार्तिकांनी बंदराच्या प्रदेशात राहणे पसंद केले नाही, तर आशिया मायनरच्या पठाराच्या केंद्रभागी असलेल्या पिसिदियातील अंत्युखियाकडे साधारण १८० किलोमीटर्स इतका लांब व खडतर प्रवास केला. यात कड्यावर जाऊन पार होणे व समुद्रसपाटीहून १,१०० मीटर्स वर असलेल्या तळवटीकडे खाली येणे समाविष्ट होते. जे. एस. हावसन् हे पवित्र शास्त्र प्रामाण्य म्हणतातः “दक्षिण किनाऱ्याच्या तळवटीला . . . पठारापासून वेगळे करणाऱ्या डोंगरभागातील लोकांची अधर्मवृत्ती व लुटमार या गोष्टी प्राचीन इतिहासात अगदीच कुविख्यात आहेत.” याखेरीज, या सुवार्तिकांना स्वाभाविक वातावरणाकडूनही धोके संभावले. “पिसिदिया येथील डोंगराच्या रांगातून वाहणारा पाण्याचा प्रचंड पूर,” हावसन् पुढे म्हणतात, “आशिया मायनरच्या इतर प्रांतातील पुरासारखा नाही. येथे तर नद्या डोंगरांच्या सुळक्यापासूनच दुथडी भरून वाहत येतात व खोल अरुंद दरीत अति विक्राळपणे झेप घेतात.” ही माहिती त्या सुवार्तिक कार्यकर्त्यांना सुवार्तेचा प्रसार व्हावा यासाठी केवढ्या जोखीमा झेलण्याची तयारी होती ते आपल्या डोळ्यांपुढे आणते. (२ करिंथकर ११:२६) आजही, लोकांच्या भेटी घडाव्या आणि त्यांच्यासोबत सुवार्तेची सहभागी करता यावी म्हणून यहोवाचे बरेच सेवक सर्व प्रकारच्या अडथळ्यांना तोंड देण्याचे धैर्य दाखवतात.
१०, ११. (अ) पौलाने आपल्या सभागृहासोबत सर्वसाधारण स्तर कसा ठेवला? (ब) मशीहाच्या दुःखाबद्दल ऐकून पुष्कळ यहूद्यांना नवल का वाटले असावे? (क) पौलाने आपल्या श्रोतेजनांपुढे कोणत्या तारणाची आशा धरली?
१० पिसिदियातील अंत्युखियामध्ये यहूद्यांचे सभास्थान होते, त्यामुळे या सुवार्तिकांनी तेथे देवाच्या वचनाशी अधिक परिचित असणाऱ्यांना प्रथम सुवार्तेचा स्वीकार करण्याची पहिली संधी दिली. बोलण्याचे निमंत्रण मिळाल्यावर पौलाने उभे राहून अत्यंत प्रावीण्यदर्शक जाहीर भाषण सादर केले. सभागृहातील यहूदी व यहूदी मताधिकारी यांच्याशी बोलताना पौलाने सबंध भाषणभर एक सर्वसाधारण स्तर ठेवला. (प्रे. कृत्ये १३:१३-१६, २६) प्रस्तावनेनंतर, पौलाने यहूद्यांच्या नामांकित इतिहासाची उजळणी केली आणि त्यांना याचे स्मरण दिले की, प्राचीन काळी यहोवाने त्यांच्या पूर्वजांना निवडले होते आणि त्यांना मिसरातून मुक्त केले तसेच पुढे वचनयुक्त देशातील रहिवाश्यांवर ताबा मिळवण्यासाठी मदत दिली. नंतर यहोवाने दावीदासोबत केलेल्या दळणवळणाबद्दल पौलाने ठळक माहिती दिली. ही माहिती पहिल्या शतकातील यहूद्यांच्या अंतःकरणात अगदी चांगल्या प्रकाराने जतन केलेली होती, कारण हे यहूदी, देव, दावीदाच्या वंशातून एकाचा उद्भव करून त्याला मुक्तिदाता व चिरकालिक शासक बनवील अशी अपेक्षा धरून होते. यामुळे आता, पौलाने अगदी निर्भिडपणे ही घोषणा केलीः “ह्या मनुष्याच्या [दावीद] वंशजात, देवाने वचनानुरुप इस्राएलांसाठी तारणारा येशू ह्यास आणिले.”—प्रे. कृत्ये १३:१७-२३.
११ तथापि, यहूदी तर एका लष्करी नेत्याची, जो उद्धारक बनून त्यांना रोमी अधिपत्याखालून काढील आणि यहूद्यांचे राष्ट्र उच्च करील अशाची प्रतिक्षा करीत होते. या कारणामुळे, जेव्हा त्यांनी पौलाकडून हे ऐकले की, मशीहाला ठार मारण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या धार्मिक पुढाऱ्यांकडे सोपवले गेले तेव्हा त्यांना त्याचे निश्चये आश्चर्य वाटले असावे. “देवाने त्याला मेलेल्यांमधून उठविले,” असे पौलाने निर्भिडपणे जाहीर केले. आपल्या भाषणाच्या समाप्तीला पौलाने, एका अद्भूत प्रकारातील तारण मिळवणे कसे शक्य आहे ते सभागृहाला दाखवले. “तुम्हांस हे ठाऊक असो,” तो म्हणाला, “ज्याच्याद्वारे पापांची क्षमा तुम्हांस गाजवून सांगितली आहे; आणि ज्यांविषयी मोशाच्या नियमशास्त्राने तुम्ही न्यायी ठरत नाही, त्या सर्वांविषयी याजकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा न्यायी ठरतो.” पौलाने भाषणाची समाप्ती, सभागृहाला, देव जे लोक तारणाच्या त्याच्या अद्भूत तरतूदीकडे दुर्लक्ष करतील असे भाकित केले त्यांच्यासारखे न होण्याचे उत्तेजन देऊन केली.—प्रे. कृत्ये १३:३०-४१.
१२. पौलाच्या भाषणाचा कसा परिणाम दिसला, आणि यामुळे आम्हाला कोणते उत्तेजन मिळावे?
१२ शास्त्रवचनांवर आधारलेले हे केवढे चांगले भाषण! यावर श्रोतेगणाचा कसा प्रतिसाद दिसला? “यहूद्यातील व भक्तिमान यहूदी मतानुसारी यांच्यातील पुष्कळ जण पौल व बर्णबा यांच्यामागे गेले.” (प्रे. कृत्ये १३:४३) हे आज आम्हासाठी किती उत्तेजक आहे! आपणही आपल्या जाहीर सेवकपणात किंवा मंडळीत आपले अभिप्राय देताना वा भाषण देताना सत्याची सादरता अधिक प्रभावी करण्याचा सर्वतोपरि प्रयत्न करू या.—१ तीमथ्य ४:१३-१६.
१३. सुवार्तिकांना पिसिदियातील अंत्युखिया का सोडावे लागले, आणि नव्या शिष्यांबद्दल कोणता प्रश्न उभा राहतो?
१३ पिसिदियातील अंत्युखियातील नवीन आस्थेवाईक लोक ही सुवार्ता जाहीर करण्याचे नाकारू शकले नाहीत. याचा परिणाम हा घडला की, “पुढल्या शब्बाथवारी बहुतेक सर्व नगर देवाचे [यहोवा, न्यू.व.] वचन ऐकावयाला जमले.” आणि लवकरच शहराच्या पलिकडे वर्तमान पसरले. खरे म्हणजे, “प्रभूचे [यहोवा, न्यू.व.] वचन त्या सर्व प्रांतात पसरत गेले.” (प्रे. कृत्ये १३:४४, ४९) या वस्तुस्थितीचे स्वागत करण्याऐवजी, मत्सरी यहूद्यांनी त्या सुवार्तिक कार्यकर्त्यांना शहराबाहेर घालवून देण्यात यश मिळवले. (प्रे. कृत्ये १३:४५, ५०) यामुळे नव्या शिष्यांवर कोणता परिणाम घडला? ते निराश झाले का? आणि त्यांनी प्रचार करायचे सोडून दिले का?
१४. सुवार्तिकांनी आरंभिलेल्या कार्याला विरोधक का नष्ट करू शकले नाहीत, आणि यापासून आपल्याला कोणता धडा मिळतो?
१४ नाही, कारण हे देवाचे कार्य होते. याखेरीज सुवार्तिकांनी पुनरुत्थान झालेल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाचा खंबीर पाया घातला होता. या कारणामुळे, नव्या शिष्यांनी या सुवार्तिकांना नव्हे तर ख्रिस्ताला आपला नेता मानले हे उघड आहे. यास्तव, आम्ही असे वाचतो की, ते “पवित्र आत्म्याने पूर्ण होत गेले.” (प्रे. कृत्ये १३:५२) हे आजच्या मिशनऱ्यांसाठी तसेच इतर शिष्य बनविणाऱ्या लोकांसाठी किती उत्तेजक आहे! आपण नम्रपणे व उत्साहाने आपला कार्यभाग पार पाडीत राहिल्यास यहोवा देव व येशू ख्रिस्त आमच्या सेवकपणावर आशीर्वाद पाठवतील.—१ करिंथकर ३:९.
इकुन्या, लिस्त्रा व दर्बे
१५. सुवार्तिकांनी इकुन्या येथेही कोणती पद्धत अनुसरली, आणि काय परिणाम दिसला?
१५ आता पौल व बर्णबा यांनी आग्नेय दिशेकडे १४० किलोमीटर्स दूरवर असलेल्या पुढील इकुन्या शहराकडे प्रयाण केले. छळाची भीती यांना अंत्युखियामध्ये ज्या पद्धतीने कार्य केले तसेच करण्यामध्ये मात करू शकली नाही. याचा परिणाम म्हणून पवित्र शास्त्र म्हणतेः “यहूदी व हेल्लेणी यांच्या मोठ्या जमावाने विश्वास धरिला.” (प्रे. कृत्ये १४:१) परंतु, सुवार्तेचा स्वीकार न करणाऱ्या यहूद्यांनी विरोध उभा केला. तथापि, सुवार्तिकांनी धीर धरला आणि इकुन्यातील नव्या शिष्यांसोबत बराच वेळ खर्च केला. मग, जेव्हा, यहूदी विरोधक धोंडमार करण्याच्या बेतात आहेत असे कळले तेव्हा पौल व बर्णबा सूज्ञपणे तेथून निघून “लुस्त्र व दर्बे या नगरात व त्या सभोवतालच्या प्रदेशात” गेले.—प्रे. कृत्ये १४:२-६.
१६, १७. (अ) पौलाला लुस्त्रामध्ये काय झाले? (ब) देवाने प्रेषितासोबत जे दळणवळण राखले होते त्याचा लुस्त्रातील एका तरुणावर कसा परिणाम घडला गेला?
१६ या नव्या तसेच पहिल्यांदाच कार्य होत असलेल्या प्रदेशात ते धैर्याने “सुवार्ता सांगत राहिले.” (प्रे. कृत्ये १४:७) पिसिदियाच्या अंत्युखिया व इकुन्या येथील यहूद्यांनी ही बातमी ऐकली तेव्हा ते लिस्त्रामधून आले व त्यांनी पौलाला धोंडमार करावा अशी गळ घातली. आता निसटून जाण्यास वेळ मिळाला नाही, त्यामुळे पौलावर दगडमार झाला आणि तो पडला तेव्हा विरोधकांची तो मेला अशी खात्री झाली. त्यांनी त्याला ओढून नगराबाहेर काढले.—प्रे. कृत्ये १४:१९.
१७ यामुळे नव्या शिष्यांना केवढे भयंकर दु:ख झाले असावे याची तुम्ही कल्पना करू शकता का? पण केवढे आश्चर्य! ते पौलाभोवती गोळा झाले आणि तो त्यांच्यामध्ये उठून उभा राहिला! यावेळी तीमथ्य हा मनुष्य त्या नव्या शिष्यांपैकी होता की नव्हता हे पवित्र शास्त्र येथे सांगत नाही. पण देवाने पौलासोबत जे दळणवळण राखले होते ते याला कळालेच असेल व या माहितीने या तरुण मनावर खोल परिणाम केला. पौलाने तीमथ्याला नंतर दुसऱ्या पत्रात असे लिहिलेः “अंत्युखियात, इकुन्यात व लुस्त्रात जी संकटे मजवर आली ती सोसण्यात व माझा जो छळ झाला तो सहन करण्यास मला अनुसरलास; त्या सर्वांतून प्रभूने मला सोडविले.” (२ तीमथ्य ३:१०, ११) पौलाला हा दगडमार घडल्याच्या एक किंवा दोन वर्षांनी तो लुस्त्रात परतला व त्याला, तरुण तीमथ्य “लुस्त्रातल्या व इकुन्यातल्या बंधुवर्गाकडून नावाजलेला,” उदाहरणशील ख्रिस्ती असल्याचे आढळले. (प्रे. कृत्ये १६:१, २) यामुळेच त्याने तीमथ्याला आपल्या यात्रेवर सोबती असे निवडले. यामुळे तीमथ्य आध्यात्मिक पातळीत प्रगति करू शकला आणि काही काळातच त्याला पौलाने वेगवेगळ्या मंडळ्यांना भेटी देण्यास पाठविण्याच्या पात्रतेचा तो बनला. (फिलिप्पैकर २:१९, २०; १ तीमथ्य १:३) याचप्रमाणे आज, देवाचे आवेशी सेवक युवकांवर अद्भूत प्रभाव राखून आहेत; आणि या युवकांपैकी पुष्कळ जण तीमथ्याप्रमाणे देवाचे सेवक बनण्यात आपली मोलाची वाढ करीत आहेत.
१८. (अ) दर्बे येथे सुवार्तिकांचे काय झाले? (ब) आता त्यांच्यापुढे कोणती संधि होती, पण त्यांनी कोणता निर्णय घेतला?
१८ लुस्त्रामध्ये मृत्युच्या तडाख्यातून वाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पौल बर्णबासोबत दर्बे येथे निघाला. यावेळी कोणी विरोधकाने त्यांचा पाठपुरावा केला नाही आणि पवित्र शास्त्र म्हणते की, त्यांनी ‘पुष्कळ शिष्य केले.’ (प्रे. कृत्ये १४:२०, २१) दर्बे येथे मंडळीची स्थापना केल्यावर पौल व बर्णबा यांना निर्णय घ्यावा लागला. दर्बेहून तार्ससकडे रोम्यांनी बांधलेला एक रस्ता जात होता. तेथून सूरियातील अंत्युखियाकडे जाण्यासाठी लहान वाट होती. हा परतीसाठी अगदीच सोयीस्कर असा मार्ग होता; यामुळे त्या सुवार्तिकांना, आपण थोडीशी विश्रांती घ्यावी असे वाटले असणार. तथापि, आपल्या धन्याच्या अनुकरणार्थ, पौल व बर्णबा यांना एक मोठी निकड जाणवली.—मार्क ६:३१-३४.
देवाचे कार्य पूर्णपणे पार पाडणे
१९, २०. (अ) सुवार्तिक लुस्त्र, इकुन्या व अंत्युखिया येथे परतल्यामुळे यहोवाने त्यांना कसे आशीर्वादित केले? (ब) हे आज यहोवाच्या लोकांना कोणता धडा देते?
१९ घरी परतण्याची लहान वाट धरण्याऐवजी, या सुवार्तिकांनी आपला रोख पुन्हा, त्यांच्या जिवाला धोका संभवलेल्या व आधी भेट दिलेल्या शहराकडे पुनर्भेटीसाठी वळविला. नव्या मेंढरांसाठी त्यांनी ही जी निस्वार्थ प्रीती दाखवली त्याबद्दल यहोवाने त्यांना आशीर्वादित केले का? होय, खरेच, कारण अहवाल सांगतो की, “शिष्यांची चित्ते स्थिरावून त्यांस . . . विश्वासात स्थिर राहावे” असा बोध करण्यात त्यांना यश मिळू शकले. त्यांनी नव्या शिष्यांना अगदी योग्यपणे म्हटले की, “आपणाला पुष्कळ संकटातून देवाच्या राज्यात जावे लागते.” (प्रे. कृत्ये १४:२१, २२) पौल व बर्णबा यांनी त्यांना येणाऱ्या देवाच्या राज्यात त्यांचे सहवारीस बनण्यासाठी जे पाचारण झाले आहे त्याबद्दल देखील सांगितले. आज आपण नव्या शिष्यांना याचप्रमाणे उत्तेजन देण्यास हवे. पौल व बर्णबा यांनी ज्या देवाच्या राज्याचा प्रचार केला त्याच्याच सत्तेखाली पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाच्या भवितव्याची आशा अशांच्या पुढे धरून त्यांना येणाऱ्या छळास तोंड देत राहण्याचे उत्तेजन द्यावे.
२० भेट दिलेल्या प्रत्येक शहरामधून निघून जाण्याआधी पौल व बर्णबा यांनी स्थानिक मंडळीला चांगले संघटित होण्याची मदत केली. त्यांनी लायक माणसांना तालीम देऊन त्यांना नेतृत्व करण्याची नेमणूक दिली हे उघड आहे. (प्रे. कृत्ये १४:२३) यामुळे पुढील वाढीस निसंशये चालना मिळाली. याचप्रमाणे आज, कमी अनुभव असणाऱ्यांना मदत देऊन त्यांच्या खांद्यावर जबाबदारी घेण्याचे सोपवल्यावर मिशनरी व इतर जेथे गरज आहे त्या दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतात.
२१, २२. (अ) पौल व बर्णबा यांनी आपले सुवार्तिक कार्य संपवल्यावर काय घडले? (ब) यामुळे कोणते प्रश्न सामोरे येतात?
२१ ते सुवार्तिक परत सुरियाच्या अंत्युखिया येथे आल्यावर त्यांना अत्यंत समाधान वाटले. खरेच, पवित्र शास्त्र अहवाल सांगतो की, देवाने जे कार्य त्यांच्यावर सोपवले होते ते “कार्य त्यांनी साधिले.” (प्रे. कृत्ये १४:२६) मग हे उघडच आहे की, परतल्यावर त्यांनी आपल्या अनुभवांची कथा तेथे सांगितली तेव्हा तिने “सर्व बंधुजनांना फार आनंदित केले.” (प्रे. कृत्ये १५:३) पण पुढे काय? आता ते आपल्या यशावर तृप्त राहून आराम करीत राहणार का, आणि पुढे प्रयत्न करणार नाहीत का? मुळीच नाही. यरुशलेमातील नियमन मंडळाला भेट देऊन सुंतेच्या वादाबद्दलचा निर्णय मिळवल्यावर ते दोघे जण पुन्हा आपल्या सुवार्तिक कार्याला लागले. यावेळी ते वेगवेगळ्या दिशेने गेले. बर्णबा योहान मार्कला सोबत घेऊन कुप्र येथे गेला तर पौलाला नवा सोबती, सीला भेटला व त्यासोबत तो सूरिया व किलिकिया मधून गेला. (प्रे. कृत्ये १५:३९-४१) या फेरीदरम्यान त्याने तरुण तीमथ्याला निवडले आणि आपणासोबत घेतले.
२२ बर्णबाच्या दुसऱ्या यात्रेचा कोणता परिणाम झाला त्याबद्दल पवित्र शास्त्र कळवत नाही. पौलाच्या बाबतीत बघता तो युरोपातील नव्या क्षेत्रात गेला आणि तेथे त्याने फिलिप्पी, बिरुया, थेस्सलनीका, करिंथ आणि इफिस या पाच शहरात मंडळ्या स्थापल्या. पौलाने हे जे उल्लेखनीय यश मिळवले त्यामागील किल्ली कोणती होती? आज हेच तत्त्व ख्रिस्ती शिष्य बनविणाऱ्यांच्या बाबतीत लागू होणारे आहे का?
तुम्हास आठवते का?
▫ येशू हा अनुसरण्याजोगा उल्लेखनीय उदाहरण कसा आहे?
▫ बर्णबा कोणत्या अर्थी एक उदाहरण होता?
▫ पौलाने पिसिदियाच्या अंत्युखिया येथे जे भाषण दिले त्यावरुन आपल्याला काय शिकता येते?
▫ पौल व बर्णबा यांनी आपली नेमणूक कशी पूर्णपणे पार पाडली?
[८ पानांवरील चित्रं]
प्रेषित पौलाने छळामध्ये जी सहनशीलता दाखवली तिने तीमथ्य या तरुण पुरुषावर कायमची छाप पाडली