वाचकांचे प्रश्न
नीतीसूत्रे ३०:१९च्या लेखकाला, एका पुरूषाने तरूणीला लबाडीने फुसलाविले हे त्याच्या “समजापलिकडले” आहे असे खरोखरी वाटले का?
नीतीसूत्रे ३०:१९चा शक्यतो तोच अर्थ असेल, जो सहजरित्या समजण्याजोगा नाही.
ह्या वचनाचा अर्थ समजून घेताना, त्याचा संदर्भ टाळू नये. ह्या उताऱ्या आधीच, त्या ईश्वर प्रेरित लेखकाने चार अशा गोष्टी सांगितल्या ज्या काही बाबतीत अधाशी आहेत. (नीतीसूत्रे ३०:१५,१६) मग त्याने ही यादी दिली : “तीन गोष्टी माझ्या समजापलीकडे आहेत, चार मला कळत नाहीत: गरूडाचे आकाशात उडणे, सर्पाचे खडकावर सरपटणे, जहाजाचे समुद्रावर चालणे, व पुरूषाचा तरूणीशी संबंध.”—नीतीसूत्रे ३०:१८,१९.
पण ह्या चार गोष्टींमध्ये असे काय “समजापलिकडले” होते?
“समज” या शब्दाचा अर्थ विधायक किंवा चांगले, असे गृहित धरून काही विद्वानांनी असे वर्णन केले की सांगितलेल्या प्रत्येक चार गोष्टींमध्ये देवाच्या सृष्टिचे सूज्ञान दिसते: नवलाचे म्हणजे एक मोठा पक्षी कसा उडू शकतो, कसा एक साप पायाविना खडकावर सरपटू शकतो, कसे एक जड जहाज खवळलेल्या समुद्रात पाण्यावरच तरंगते, आणि कसा एक धट्टाकट्टा युवक एका गोड तरूणीच्या अत्यंत प्रेमात पडून लग्न करतो, व मग ते आश्चर्यकारक मानवी बाळाला जन्म देतात. एका प्राध्यापकाला त्या चारही गोष्टींमध्ये दुसरी साम्यता आढळली, की प्रत्येक मार्गावर नेहमीच काहीतरी नवीन आहे.—गरूडाचे उडणे, सर्पाचे सरपटणे, मार्ग नाही तरी जहाजाचे समुद्रावर चालणे, व एका जोडप्याच्या वाढत्या प्रेमाचे नाविण्य.
तथापि, जरी त्या चार गोष्टींमध्ये जणू काही सर्वसाधारण आहे जे विधायक असले तरी चांगल्या अर्थी ते ‘समजापलिकडे’ असण्याची गरज नाही. नीतीसूत्रे ६:१६-१९ मध्ये “परमेश्वर [यहोवा, न्यू.व] ज्यांचा द्वेष करितो” त्यांची यादी दिली आहे. आणि असे पाहिल्यास, प्रश्नातील वचनाच्या जरा आधी, नीतीसूत्रे ३०:१५,१६ अशा गोष्टीबद्दल (शिओल, निसंतान गर्भाशय, पूर्ण सुकून गेलेली भूमी, व संतप्त अग्नी) सांगते ज्या कधीच म्हणत नाहीत, “आता पूरे!” म्हणूनच त्या समजापलिकडील चांगल्या नाहीत.
नीतीसूत्रे ३०:१८ तील “समज” ह्या उल्लेखिलेल्या इब्री शब्दाचा अर्थ होतो, “वेगळे करणे, तारतम्य करणे, फरक करणे, विशिष्ट, आश्चर्यकारक.” एक गोष्ट जरी चांगली नसली तरी वेगळी, विशिष्ट, किंवा आश्चर्यकारक सुध्दा होऊ शकते. दानिएल ८:२३, २४ मध्ये भाकित केले की एक उग्रस्वरूपी, कूटप्रश्न समजणारा राजा उभा राहील जो “विलक्षण नाश” करील आणि “समर्थ व पवित्र लोकांचा नाश करील.”—पडताळा अनुवाद १७:८; २८:५९; जखऱ्या ८:६.
नीतीसूत्रे ३०:१८, १९च्या नंतरचे वचन आम्हास त्या लेखकाला जे समजण्यास अवघड वाटले ते समजण्यास मदत करील. २०वे वचन एका व्यभिचारी स्त्री बद्दल म्हणते की “ती खाऊन पिऊन तोंड पुसते आणि म्हणते, ‘मी काही दुष्कर्म केले नाही’!” कदाचित तिने युक्तिने व गुप्तपणे पाप केले असेल, पण तिच्या पापाचा सुगावा लागला नसेल, म्हणून ती निर्दोष असल्याचा दावा करते.
मागील गोष्टीं मध्ये अशीच साम्यता आहे. एक गरूड आकाशात उंच भरारी मारतो, एक सर्प खडकावर सरपटत जातो, समुद्राच्या लहरींमधून जहाज तरंगत जाते—या सर्व गोष्टी त्यांच्या मागे कसलाही मागमूस सोडत नाहीत, आणि ह्या तिन्हीं मधून एकाचा सुद्धा पत्ता लावण्यास आम्हाला कठीण जाईल. जर ही सर्वसाधारणता तिन्ही गोष्टीं मध्ये आहे, तर मग चौथी गोष्ट, “पुरूषाचा तरूणीसोबत संबंध” याबद्दल काय?
वास्तविक पाहता याचा सुद्धा मागमूस लावता येणार नाही. एक तरूण पुरूष चातुर्याने, सहजरितीने, व कावेबाजपणाचा उपयोग करून एका भोळ्या कुमारीकेला प्रेमात हळुवारपणे पाडू शकतो. ती कमअनुभवी असल्यामुळे त्याच्या युक्त्यांना कदाचित ओळखू शकणार नाही. फुस लाविल्यानंतरही, ती सांगू शकणार नाही की त्याने तिला कसे जिंकले; कदाचित पाहाणाऱ्यांना सुद्धा ते सांगण्यास कठीण जाईल. तरी, पुष्कळ तरूणींनी त्यांची नीती अशा कपटी फुसलाविणाऱ्यांमुळे गमावली आहे. अशा चंचल पुरूषांचा मार्ग शोधून काढणे फार कठीण आहे, तरी त्यांचे ध्येय, जसे गरूडाला उडताना असते, सरपटत जाणाऱ्या सर्पाला, व समुद्रातील जहाजाला असते तसेच असते. ह्या फसवणाऱ्यांचा, हेतू असतो अनैतिक स्वार्थ.
ह्या प्रकाशात नीतीसूत्रे ३०:१८, १९चा मुद्दा, सृष्टीतील वैज्ञानिक किंवा यांत्रिकी गोष्टींना अनुलक्षून नाही. तर, हा भाग आम्हास नैतिक ताकीद देतो, जसे नीतीसूत्रे ७:१-२७ मध्ये मन वळवून घेणाऱ्या वेश्येच्या धोक्या पासून सावध राहिले पाहिजे. ख्रिस्ती भगिनींनी नीतीसूत्रे ३०:१८, १९वे वचन गांभिर्याने घेतले पाहिजे की जेव्हा काही पुरूष पवित्र शास्त्र अभ्यास करण्यासाठी आस्था असल्याचा दावा करतात. जर असा ओळखीचा पुरूष, किंवा सोबत काम करणारा, आस्था दाखवत असला तर त्या भगिनीने मंडळीतील कोणा एका बांधवाला त्या पुरूषाकडे न्यावे. तो बांधव त्या व्यक्तिच्या खऱ्या आस्थेला समाधानकारक मदत देऊ शकेल, की ज्या मध्ये “पुरूषाचा तरूणीशी संबंध” याचा कुठलाही धोका राहणार नाही.