राज्य घोषकांचा वृत्तांत
पूर्व युरोप कडून सुर्वाता
पूर्व युरोपच्या ईश्वरीय क्षेत्रात खूप आनंदी घटना घडत आहेत. झागरेब मध्ये ऑगस्ट १६-१८,१९९१ च्या आंतरराष्ट्रिय अधिवेशनात, ७,३०० साक्षीदारांनी, १५ राष्ट्रांतून आलेल्या त्यांच्या बांधवांचे हार्दीक स्वागत केले. सर्व मिळून १४,६८४ जण उपस्थित होते. अशांतीने हादरून गेलेल्या ह्या राष्ट्रात प्रेम व ऐैक्यतेचे हे एक उत्कृष्ट प्रदर्शन होते.
पूर्व युरोपातील साक्षीदार दुसऱ्यांना यहोवाच्या राज्याची सुर्वाता सांगण्यात फार व्यस्त आहेत, जी त्यांनी ओळखली की खऱ्या शांतिची एकमेव आशा आहे. काही भागांमध्ये त्यांची तटस्थता टिकवण्यास त्यांना आव्हानात्मक आहे. तरीसुध्दा, लोक ऐकतात, आणि साक्षिदारांनी खूप उत्तम उदाहरणांचा अहवाल दिला आहे.
एका शहरात, एका सोळा वर्षीय मुलीने ही सुवार्ता त्याच शहरात राहाणाऱ्या एका यहोवाच्या साक्षीदाराकडून ऐकली. एक नियमित पवित्र शास्त्र अभ्यास चालू झाला, व तिची सत्यासाठी आवड वाढत गेली. ह्या सुंदर गोष्टी शिकल्यावर त्या तिला दुसऱ्यांना सांगण्याची फार इच्छा झाली, म्हणून तिने तो सांगण्याचा प्रयत्न केला पण विरोध व थट्टेचा सामना करावा लागला. एका शालेय सोबतीने तर तिचा खूपच विरोध केला पण हिची सहनशीलता पाहून फार आश्चर्यचकित झाली, कारण ह्या युवक पवित्र शास्त्र विद्यार्थिनीचा अपमान झाला तरी तिला मुळीच राग नव्हता. काही वेळा नंतर ह्या मुलीला चांगली साक्ष दिली गेली, व तिने हे जाणले की तिची वागणूक चुकीची होती. तिच्या सोबत पवित्र शास्त्र अभ्यास चालू झाला, आणि मग ती पहिली पवित्र शास्त्र विद्यार्थीनी व तिची नविन सोबती, दोघींनी त्यांचा आनंद इतरांसोबत वाटण्याचा प्रयत्न केला, जरी त्यांना त्यांच्या पालकांकडून, शिक्षकांकडून व त्यांच्या शालेय सोबतींकडून विरोधाचा सामना करावा लागला.
ह्या दोघींच्या साक्षीकार्या मुळे, आणखी एका शालेय सोबतीनीने सत्याचा स्वीकार केला. आता त्या तिघी जणी एकाच वर्गात होत्या. व तिघीही दुसऱ्यांना प्रेम व मदत करण्यात चांगले उदाहरण होत्या. मग एक दुसरी मुलगी त्यांच्यात येऊन सामिल झाली.
आता ह्या चौघीजणी शाळेच्या पटांगणातील एका बाकावर एकत्र बसून पवित्र शास्त्राची चर्चा करीत असत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांची संख्या वाढू लागली. आणखीन एका त्यांच्या वर्गातील मुलीने, त्यांच्यां उत्तम वर्तणूकीने प्रोत्साहित होउन पवित्र शास्त्र अभ्यास करण्याची तयारी दाखवली. ह्या पाच जणींनी, दुसऱ्या विद्यार्थी व शिक्षकांनाही, असे करण्यासाठी उत्तेजन दिले तथापि, ह्या मुलींना त्यांच्या पालकांकडून खूप दबाव सहन करावा लागला. त्यांनी ह्या मुलींचा अभ्यास थांबवण्यासाठी, त्यांची प्रकाशने नष्ट केली व त्यांच्या सोबत दुर्व्यवहार केला.
ह्या युवक आस्थेवाईक व्यक्तिने साक्षीकार्य चालू केल्याने काय परिणाम झाला? त्यातील एका मुलीचा बाप्तिस्मा १९९०च्या प्रांतिय अधिवेशनात झाला, व दुसऱ्या चौघींचा १९९१च्या वसंत ऋतुतील विभागीय संम्मेलनात झाला. हे फार मोठ्या आनंदाचे कारण होते. आज ह्या पाचही मुली नियमित पायनियरींग करतात! ही गोष्ट ज्या शहरात घडली, तेथे आता ११ प्रचारक आहेत, व ८ जण पायनियर सेवेत आहेत.
यहोवा पूर्व युरोप मधील त्याच्या साक्षीदारांची काळजी घेतो व आशिर्वाद देतो. हे स्पष्ट आहे की जगाच्या ह्या भागात प्रामाणिक लोकांमध्ये वाढ होण्याची प्रचंड संभाव्यता आहे.