वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ११/१ पृ. ३-४
  • जीवन देवाकडील एक देणगी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन देवाकडील एक देणगी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • मिळती जुळती माहिती
  • मुले—जबाबदारी व एक बहुमान
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • एका थंड, निष्ठुर जगात प्रवेश!
    सावध राहा!—२००४
  • गर्भपाताविषयी बायबल काय म्हणतं?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ११/१ पृ. ३-४

जीवन देवाकडील एक देणगी

आपले ह्दय, एका दिवसाला आपल्या संपूर्ण शरीरात चोवीस तास मौल्यवान रक्‍त खेळवते. आपण निजतो, तेव्हा आपली फुफ्फुसे प्रसरण व आकुंचन पावतात. आपण जेवल्यानंतर, आपले जेवण आपोआप पचविले जाते. हे रोज, आपल्याला कळत वा न कळत घडत असते. ह्‍या सहजरित्या गृहित धरल्या जाणाऱ्‍या अगम्य व चमत्कारीक क्रिया, त्या देणगीचा एक भाग आहेत ज्याला आपण जीवन म्हणतो. एका अर्थाने ही अलौकिक म्हणता येईल अशी देणगी आहे.

मानवी गर्भधारणा व जन्म ह्‍या क्रियेकडे जरा लक्ष द्या. सामान्यपणे शरीर नवख्या पेशींच्या घटकास नाकारते, पण गर्भाशय एका फलित अंड्याला अपवाद म्हणून परवानगी देते. ह्‍या वाढत्या पिंडाला नवख्या पेशींचा घटक म्हणून नाकारण्याऐवजी, ते त्याची काळजी बाहेर येण्याजोगे बाळ तयार होईपर्यंत घेते व संरक्षण देते. ह्‍या बाबतीत, गर्भाने निर्णायक अपवाद न घेतल्यास, मानवी जन्म अशक्य कोटीतला ठरेल.

तरीपण, जेव्हा हे बाळ चार महिन्यांचे असते, तेव्हा जर उदरात आवश्‍यक हालचाल झाली नाही तर त्याचे जीवन अल्प होऊ शकते. त्या वेळेला ते अंगठा चोखण्यास सुरू करते, स्नायुंच्या हालचाली करते ज्यामुळे त्याला नंतर मातेचे स्तनपान करण्यास मदत होईल. आणि हे जीवन-व-मरणाच्या प्रकरणातील एक प्रकरण असून त्याचे निरसण बाळ जन्माला येण्याआधीच केले जाते.

गर्भ उदरात असतो, तेव्हा त्याच्या ह्दयाच्या पडद्याला छिद्र असते. हे छिद्र, कालांतराने, जन्माच्या वेळी आपोआप बंद होते. त्यासोबतच, गर्भ उदरात असतो तेव्हा एक मोठी रक्‍त-वाहिनी फुफ्फुसाद्वारे जाते ती त्याच्या जन्माच्या वेळी आपोआप लहान होते; आता रक्‍त फुफ्फुसाला जाते, व जेव्हा बाळ त्याचा पहिला श्‍वास घेतो तेव्हा हे रक्‍त प्राणवायुशी संयुक्‍त होते.

ही फक्‍त एक सुरवात आहे. संपूर्ण जीवनभरात, सुरेख नमुनेदार व्यवस्थांची मालिका जसे की, श्‍वासोच्व्छवास, अभिसरण, मज्जातंतू व ग्रंथीसंस्था त्यांचे काम करील आणि सहकार्याने त्यांच्या अशा क्रिया कार्यक्षमतेने पार पाडत राहतील जे मानवी आकलनास धक्का देते—पण, हे सर्व जीवनाला चिरस्थायी करण्यासाठी होत असते. एका प्राचीन लेखकाने देवास संबोधून असे म्हटले होते: “भयजनक व आश्‍चर्यकारक रीतीने माझी घटना झाली आहे, म्हणून मी तूझे उपकारस्मरण करितो; तुझी कृत्यें अद्‌भूत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.”—स्तोत्रसंहिता १३९:१४.

स्पष्टत:, ह्‍या सुंदर शब्दांच्या लेखकाने जीवन अंध, उत्क्रांतीने आले आहे असा विश्‍वास धरला नाही. जर असे असते तर, आम्ही आपले जीवन कसे घालवावे यांबद्दल कोणतीही जबाबदारी किंवा बंधन आम्हावर आले नसते. तरीपण जीवनाच्या रचनेवरून आम्हाला कोणती तरी योजना दिसते, व योजनेला कोणीतरी योजणारा पाहिजेच. पवित्र शास्त्र हे तत्त्व मांडते: “प्रत्येक घर कोणी तरी बांधिलेले असते; आणि सर्व वस्तु करणारा देव आहे.” (इब्री ३:४) या कारणास्तव “यहोवा हाच देव आहे असे जाणणे व त्यानेच आम्हास उत्पन्‍न केले” हे समजणे महत्वाचे आहे. (स्तोत्रसंहिता १००:३) होय, जीवन हे हितकर अशा आकस्मिक गोष्टी पेक्षाही अधिक आहे; स्वत: देवाकडून ती एक देणगी आहे.—स्तोत्रसंहिता ३६:९.

अशी वस्तुस्थिती असल्यामुळे आमच्या जीवनदात्याबद्दल आमचे कोणते कर्तव्य आहे? आपले जीवन व्यतित करण्याबद्दल काय अपेक्षा आहे? हे व ह्‍या संबंधीत असणाऱ्‍या प्रश्‍नांची चर्चा पुढील अंकात केली जाईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा