वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ९/१ पृ. २४-२९
  • गोलार्धव्याप्त जलाशयात माणसांची मासेमारी करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गोलार्धव्याप्त जलाशयात माणसांची मासेमारी करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • माणसांची मासेमारी—गोलार्धव्याप्त आव्हान
  • गोलार्धव्याप्त मासेमारीच्या कामातील प्रगति
  • सर्वांना सहभाग आहे
  • वाढीस कारणीभूत ठरणाऱ्‍या गोष्टी
  • आम्हाला सुधारणा करता येईल का?
  • माणसे धरणारे अशी सेवा करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • जाळे व मासे यांचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • ‘जा आणि शिष्य करा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ९/१ पृ. २४-२९

गोलार्धव्याप्त जलाशयात माणसांची मासेमारी करणे

“जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरविण्याचे कारण नाही, ती मला सांगणे प्राप्त आहे. मी सुवार्ता सांगत नाही तर मला धिक्कार असो.”—१ करिंथकर ९:१६.

१, २. (अ) करिंथकरांस पहिले पत्र ९:१६ मधील आव्हान कोणी खरोखरी पूर्ण केले आहे, आणि तुम्ही तसे का उत्तर देता? (ब) यहोवाच्या साक्षीदारांनी कोणती जबाबदारी पत्करली आहे?

वर नमूद असणाऱ्‍या पौलाच्या शब्दातील आव्हानास या २० व्या शतकात कोणी पूर्ण केले आहे? ‘आध्यात्मिक गरजांची जाणीव असणाऱ्‍या’ लाखो स्त्री-पुरुषांची मासेमारी करण्यासाठी कोण जगात पुढे गेले आहे? (मत्तय ५:३) कोणी तुरुंगवास व मृत्यु यांची जोखीम पत्करली आहे, आणि ख्रिस्ताने मत्तय २४:१४ मध्ये दिलेल्या आज्ञेच्या पूर्तिस्तव कोणी कित्येक देशात असा त्रास सहन केला आहे?

२ अहवाल उत्तर देतोः यहोवाचे साक्षीदार. एकट्या गेल्याच वर्षी चाळीस लक्षापेक्षा अधिक साक्षीदार २११ देश व प्रदेशात घरोघरी जाऊन त्यांनी २०० पेक्षा अधिक भाषेत ‘सुवार्ता गाजविली.’ हा काही प्रशिक्षित असणारा मिशनऱ्‍यांचा निवडक गट नव्हता. नाही, यहोवाच्या सर्व साक्षीदारांना घरोघरी तसेच प्रत्येक प्रसंगी सुवार्तेचा प्रचार व शिक्षण देण्याची जबाबदारी असल्याचे वाटते. आपल्या विश्‍वासाची सहभागिता इतरांसोबत करण्याची गरज त्यांना का वाटते बरे? कारण ज्ञान जबाबदारी आणते हे त्यांना माहीत आहे.—यहेज्केल ३३:८, ९; रोमकर १०:१४, १५; १ करिंथकर ९:१६, १७.

माणसांची मासेमारी—गोलार्धव्याप्त आव्हान

३. मासेमारीचे काम केवढ्या व्याप्त स्वरुपात झाले पाहिजे?

३ हे मासेमारीचे भव्य कार्य कोणा एका नदी, तळे किंवा समुद्र यावर मर्यादित नाही. नाही, येशूने म्हटले तसे हे कार्य “सर्व राष्ट्रात” करायचे आहे. (मार्क १३:१०) आपल्या पित्याकडे जाण्याआधी येशून शिष्यांना म्हटलेः “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हास आज्ञापिले ते पाळावयास त्यांस शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे.”—मत्तय २८:१९, २०.

४. (अ) येशूच्या आरंभीच्या यहूदी शिष्यांना कशाचे आश्‍चर्य वाटले असावे? (ब) आपल्या प्रचार कार्याची व्याप्ती केवढी आहे असे यहोवाच्या साक्षीदारांना वाटते?

४ येशूच्या त्या यहूदी अनुयायांना ती आज्ञा खरोखरीच थरारक वाटली असावी. तो यात त्याच्या यहूदी शिष्यांना सांगत होता की, त्यांनी आता सर्व राष्ट्रातील “अशुद्ध” विदेशांपाशी जाऊन त्यांना शिकवले पाहिजे. या नेमणूकीनुसार जुळवून घेण्यास व त्याप्रमाणे हालचाल करण्यासाठी त्यांना स्वतःमध्ये थोडीफार सुधारणा करावी लागली. (प्रे. कृत्ये १०:९-३५) पण याशिवाय पर्याय नव्हता; “शेत हे जग आहे,” असे येशूने त्यांना दाखल्यात सांगितले होते. या कारणास्तव, यहोवाचे साक्षीदार सबंध जगाला त्यांची मासेमारी करण्याची जागा या दृष्टीने बघतात. तो काही समुद्रालगतचा किंवा समुद्रधुनीतला प्रदेश नाही व येथपर्यंत त्यांच्या नेमणूकीची मर्यादा नाही. जेथे धार्मिक स्वातंत्र्य उपलब्ध नाही अशा देशात दक्षता जरुरीची भासते. तरीपण, निकडीचा काळ लक्षात घेऊन ते मासेमारी करतात. ते का? कारण जागतिक घटना व त्याद्वारे होणारी पवित्र शास्त्रीय भविष्यवादांची पूर्तता, आम्ही गोलार्धव्याप्त मासेमारीच्या कामाच्या शेवटास आलो आहोत याची सूचकता देते.—मत्तय १३:३८; लूक २१:२८-३३.

गोलार्धव्याप्त मासेमारीच्या कामातील प्रगति

५. गोलार्धव्याप्त मासेमारीच्या कार्यात कोणते लोक प्रतिसाद देत आहेत?

५ १९३५च्या आधीच्या काळातच बहुतेक अभिषिक्‍त राज्य वारीसदारांची मासेमारी करण्यात आली व तेव्हा त्यांची पूर्ण संख्या बहुतेक संपुष्टात आली. या कारणामुळे १९३५ पासून यहोवाचे साक्षीदार ज्यांना “लीन जन” म्हणतात व जे “पृथ्वीचे वतन पावतील” अशांचा शोध घेत आहेत. (स्तोत्रसंहिता ३७:११, २९) हे तेच लोक आहेत, जे “सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत.” सैतानाच्या अवनत व भ्रष्ट व्यवस्थीकरणावर “मोठे संकट” प्रहार करून त्याच्या उपासकांना कायमच्या नाशाच्या “अग्नीच्या भट्टीत” लोटील त्याआधी, हे लोक देवाच्या राज्य अधिपत्याकडे कृपापसंती मिळविण्याच्या उद्देशाने येत आहेत.—यहेज्केल ९:४; मत्तय १३:४७-५०; २४:२१.

६, ७. (अ) प्रचार कार्याच्या बाबतीत १९४३ मध्ये कोणती पावले उचलण्यात आली? (ब) कोणते परिणाम मिळू शकले?

६ हे गोलार्धव्याप्त मासेमारीचे काम आतापर्यंत यशस्वी ठरले आहे का? वस्तुस्थितीलाच ते बोलू द्या. मागे १९४३ मध्ये दुसरे जागतिक युद्ध धुमसत असताना ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात विश्‍वासू अभिषिक्‍त बांधवांनी केल्या जाणाऱ्‍या एका मोठ्या गोलार्धव्याप्त मासेमारीच्या कामाचा पूर्वदृष्टांत पाहिला. त्यासाठी कोणीत पावले उचलण्यात आली?a—प्रकटीकरण १२:१६, १७.

७ १९४३ मध्ये वॉचटावर सोसायटीने गिलियड (इब्री, “साक्षीची रास”; उत्पत्ती ३१:४७, ४८) या मिशनरी शाळेची प्रस्थापना केली. येथे दर सहा महिन्याला शंभर मिशनऱ्‍यांना प्रशिक्षित केले जाऊन त्यांना जगभरात लाक्षणिक कोळी या नात्याने पाठवण्यात आले. त्या काळी ५४ राष्ट्रांत केवळ १,२६,३२९ साक्षीदार क्रियाशीलपणे मासेमारी करीत होते. मग, दहा वर्षातच हा आकडा १४३ देश व ५,१९,९८२ इतका उंचावला! खरेच गिलियड शाळेने धीट अशा कोळी व कोळिणींना तयार केले, जे विदेशी संस्कृतीमध्ये जाऊन तेथील नव्या पाण्यात जुळवून मासेमारी करू शकले. यामुळे, हजारो प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांनी प्रतिसाद दिला. त्या मिशनऱ्‍यांनी व यांनी ज्यांच्यासोबत मिळून कार्य केले त्या स्थानिक लोकांनी असा पाया घातला, ज्यावर आता अद्‌भूत वाढ होत आहे.

८, ९. (अ) मिशनरींच्या उल्लेखनीय कार्यासंबंधाने कोणती उदाहरणे देता येतील? (ब) मिशनरींनी आपल्या क्षेत्रात कोणती उल्लेखनीय वाढ अनुभवली? (यहोवाच्या साक्षीदारांचे १९९२चे वार्षिक अहवाल पुस्तक पहा.)

८ त्या आरंभीच्या गिलियड शाळेतील कित्येक विश्‍वासू जाणकार आता ७० ते ८० वर्षे वयाचे झाले असले तरी ते विश्‍वासूपणे आपल्या विदेशी नेमणूकीत मग्न आहेत. याची स्पष्टता देणारे एक उदाहरण ८२ वर्षे वयाच्या एरीक ब्रिटन व त्यांची बायको ख्रिस्तिना यांचे आहे. हे १९५० मधील गिलियडच्या १५ व्या वर्गाचे विद्यार्थी असून ते अद्याप ब्राझिलमध्ये सेवा करीत आहेत. ते तेथे गेले तेव्हा त्या देशात ३,००० पेक्षा कमीच साक्षीदार होते. आता तर तेथे ३,००,००० पेक्षा अधिक आहेत! खरेच, ब्राझिलमध्ये “जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र” बनले आहे, कारण मासेमारीचे काम फलदायी होत गेले.—यशया ६०:२२.

९ आपण आफ्रिकेतील मिशनऱ्‍यांबद्दल काय म्हणू शकतो? बहुतेकांनी येथील वेगळ्‌या संस्कृतीला जुळवून घेतले आहे व यांना येथील आफ्रिकन लोकांबद्दल प्रेम वाटू लागले आहे. यात जॉन व एरीक कूक आणि त्यांच्या बायका कॅथलिन आणि मार्टल यांचे उदाहरण उल्लेखनीय आहे. ते दक्षिण आफ्रिकेत सेवा करीत आहेत. जॉन व एरीक हे १९४७च्या गिलियडच्या आठव्या वर्गातून पदवीधर बनले. या दोघांनी एकत्रपणे मिळून अंगोला, झिंम्बाब्वे, मोझांबिक व दक्षिण आफ्रिका येथे सेवा केली. काही मिशनऱ्‍यांचा आफ्रिकेत आजारामुळे तर काहींचा युद्ध, छळ यामुळे मृत्यु घडला. ॲलन बॅटे व आर्थर लॉसन हे दोघे लायबेरियातील अलिकडील मुलकी युद्धात ठार झाले. तरीही, आफ्रिकी पाणी अधिक फलदायी असल्याचे शाबीत झाले. या प्रचंड खंडात आता ४,००,००० पेक्षाही अधिक साक्षीदार सर्वत्र पसरले आहेत.

सर्वांना सहभाग आहे

१०. पायनियर्स हे का व कोणत्या मार्गाने प्रशंसनीय काम करीत आहेत?

१० तथापि, हेही लक्षात घेतले पाहिजे की, विदेशी मिशनऱ्‍यांची संख्याही काही हजारात मोडत असली तरी स्थानिक प्रचारक व पायनियरांचीb संख्या ही लाखोंत गेली आहे. ते जगभरात प्रचाराचे मोठे काम उरकत आहेत. १९९१ मध्ये पायनियर्स व फिरत्या सेवकांची संख्या ५,५०,००० च्या पुढे गेली होती. याचप्रमाणे जेव्हा आपण हे विचारात घेतो की, दर महिन्याला जगभरात कोठेही ६० ते १४० तासांच्या महिन्याचे प्रचारकार्य करण्यासाठी यापैकीचे विश्‍वासू साक्षीदार सहभाग घेतात तेव्हा केवढी छाप पडण्याजोगी संख्या आपल्याला मिळते. पुष्कळ जण हे व्यक्‍तिगत त्याग व खर्च सोसून करतात. पण का? कारण यांची यहोवा आपला देव याच्यावर पूर्ण अंतःकरण, मन, जीव व शक्‍तिची प्रीती आहे तसेच ते स्वतःसारखी आपल्या शेजाऱ्‍यावरही प्रीती करतात.—मत्तय २२:३७-३९.

११. यहोवाचा आत्मा त्याच्या लोकांच्या कार्यावर आहे याचा कोणता पुरावा दिसत आहे?

११ आता त्या पस्तीस लाखांपेक्षा अधिक इतर प्रचारकांबद्दल काय जे, पूर्ण वेळेच्या कार्यात नाहीत, परंतु यहोवाच्या कार्यात, आपल्या परिस्थितीनुरुप १०० टक्के सहकार्य देत आहेत? यापैकी काही पत्नी आहेत व यांना मुलेही आहेत. तरी या गोलार्धव्याप्त मासेमारीच्या कामात आपला महत्त्वपूर्ण वेळ देत आहेत. पुष्कळ जण पती आणि पूर्ण वेळेचे प्रापंचिक काम असणारे पिताही आहेत. तरी ते आठवड्याच्या शेवटाला तसेच सायंकाळी इतर लोकांना सत्य शिकवण्यासाठी वेळ काढत असतात. याशिवाय सड्या स्त्री, पुरुष व युवकांचाही एक मोठा समुदाय आहे जो प्रचारात सहभागी होत असतो व ते आपल्या वागणूकीद्वारे सत्याची इतरांना शिफारस करतात. देवाच्या राज्य-अधिपत्याची सुवार्ता दर महिन्याला कोणतेही वेतन न घेता स्वयंसेवक म्हणून प्रचार करणारे असे चाळीस लाखांपेक्षा सदस्य असणारा कोणता धार्मिक समाज आहे? खात्रीने ही गोष्ट या कामावर यहोवाचा आत्मा असल्याचे स्पष्ट करीत आहे!—स्तोत्रसंहिता ६८:११; प्रे. कृत्ये २:१६-१८; पडताळा जखर्या ४:६.

वाढीस कारणीभूत ठरणाऱ्‍या गोष्टी

१२. लोक सत्याला का व केवढ्या संख्येने प्रतिसाद देत आहेत?

१२ हे भव्य प्रचारकार्य दर वषी अप्रतिम परिणाम आणीत आहेत. १९९१ मध्ये ३,००,००० नव्या साक्षीदारांचा पाण्यात बुडवून बाप्तिस्मा झाला. हे दर शंभर प्रचारकांच्या ३,००० पेक्षा अधिक मंडळ्यांच्या बरोबरीचे आहे! हे सर्व कशामुळे साध्य झाले? येशूने काय म्हटले ते आपण लक्षात घेऊ याः “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्यावाचून कोणाच्याने मजकडे येववत नाही. . . . संदेष्ट्यांच्या ग्रंथात असे लिहिले आहे की, ‘ते सर्व देवाने [यहोवा, न्यू.व.] शिकविलेले असे होतील.’ जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो मजकडे येतो.” अशाप्रकारे हे स्पष्ट आहे की, कोणी या गोलार्धव्याप्त मासेमारीला मानवी प्रयत्नाने प्रतिसाद देत नसतो. यहोवा अंतःकरणाची स्थिती बघतो आणि त्या लायक लोकांना तो आपणाकडे आकर्षून घेतो.—योहान ६:४४, ४५; मत्तय १०:११-१३; प्रे. कृत्ये १३:४८.

१३, १४. कित्येक साक्षीदारांनी कोणती चांगली मनोवृत्ती दाखवली आहे?

१३ तथापि, लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी यहोवा मानवी कोळ्यांना त्याचे प्रतिनिधी म्हणून उपयोगात आणतो. यासाठी ते जेथे मासेमारी करतात तेथील लोकांबद्दल तसेच त्यांच्या क्षेत्राबद्दल त्यांना वाटणारी प्रवृत्ती महत्त्वाची आहे. पौलाने गलतीकरांना लिहिलेले शब्द बहुतेकांनी आपल्या अंतःकरणी लावून घेतले आहे हे पाहणे केवढे उत्तेजनात्मक आहेः “योग्य ते करावयाचा आपल्याला कधी कंटाळा येऊ नये, आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.”—गलतीकर ६:९.

१४ पुष्कळ विश्‍वासू साक्षीदार काही दशके प्रचार करीत राहिले आहेत व सोबत घडणाऱ्‍या गोष्टींचे त्यांनी बारकाईने निरिक्षण केले आहे. नाझी, फॅसिस्ट तसेच इतर हुकुमशाही सत्ता उदयास आलेल्या व पतन झालेल्या त्यांनी बघितल्या. काहींनी १९१४ नंतर जी काही युद्धे झाली ती सर्व बघितली. त्यांनी पाहिले की, जागतिक नेते आपल्या आशा लीग ऑफ नेशन्स व नंतर संयुक्‍त राष्ट्रसंघ यावर विसंबून आहेत. काही देशात यहोवाच्या कार्यावर बंदी आल्याची व नंतर ती उठविली गेल्याचीही त्यांनी पाहिले आहे. या सर्व काळात, यहोवाच्या साक्षीदारांनी माणसे धरणारे हे काम करण्यासोबत योग्य ते करावयाचा कधी कंटाळा येऊ दिला नाही. सचोटीचा हा केवढा ठळक अहवाल!—मत्तय २४:१३.

१५. (अ) आमच्या जागतिक क्षेत्रांतील गरजांना अनुलक्षून आम्हाला कोणती मदत मिळाली आहे? (ब) तुमच्या नेमणूकीत प्रकाशनांनी कोणती मदत दिली?

१५ जगभरातील वाढीस आणखी काही गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. यापैकीची एक म्हणजे, क्षेत्रांच्या गरजांच्या अनुषंगाने माणसे धरणाऱ्‍या कोळ्यांची लवचिक प्रवृत्ती. वेगवेगळ्या संस्कृति, भाषा व धर्म याचे लोक स्थलांतरित होत असता यहोवाच्या साक्षीदारांनी या विविध दृष्टिकोणाच्या पार्श्‍वभूमीच्या लोकांविषयी आपली समज अधिक विस्तीर्ण केली. पवित्र शास्त्र व पवित्र शास्त्रीय प्रकाशने २०० पेक्षा अधिक भाषांत तयार करून ते वितरीत केल्यामुळे जगभरातील मंडळ्यांना मोठी मदत मिळाली आहे. द न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन हे आता पूर्ण किंवा विभागात झेक व स्लोवॅकसहित १३ भाषांत उपलब्ध आहे. पृथ्वीवर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! हे माहितीपत्रक आता अल्बेनियन ते झुलू या १९८ भाषांत उपलब्ध आहे आणि त्याची एकंदर छपाई ७ कोटी २० लक्ष इतकी झाली आहे. द ग्रेटेस्ट मॅन हू एव्हर लिव्हड्‌ हे पुस्तक आता ६९ भाषांत उपलब्ध आहे. २९ भाषांत प्रकाशित झालेले मॅनकाइण्डस्‌ सर्च फॉर गॉड हे पुस्तक या जगाच्या प्रमुख धार्मिक व्यवस्थांचा उगम व त्यांचे विश्‍वास याबद्दल पडताळा करते, आणि हे गोलार्धव्याप्त मासेमारीत खूपच साहाय्यक ठरत आहे.

१६. दुसऱ्‍या देशातील गरजांबद्दल काहींनी कसा प्रतिसाद दाखवला?

१६ गालार्धव्याप्त मासेमारीच्या कामाला आणखी कशामुळे इतकी पुष्टी मिळाली? हजारोंनी ‘मासेदोनियाच्या हाकेस’ प्रतिसाद दाखवला. जसे पौल देवाने दिलेल्या हाकेमुळे आशिया मायनरपासून युरोपातील मासेदोनिया येथे स्थलांतरीत होण्याची इच्छा धरुन होता तसेच पुष्कळ साक्षीदारांनी राज्या-प्रचार, वडील व उपाध्य सेवकांची जेथे अधिक गरज होती तेथील देश व क्षेत्रात स्वतःला स्थलांतरीत केले. ते त्या खऱ्‍या कोळ्यासारखे ठरले ज्यांनी आपल्या स्थानिक क्षेत्रात भरपूर मासेमारी झाल्यामुळे दुसरीकडे जेथे कमी मचवे आहेत, पण मासे भरपूर आहेत त्या पाण्याकडे स्थलांतर केले.—प्रे. कृत्ये १६:९-१२; लूक ५:४-१०.

१७. ‘मासेदोनियाच्या हाकेला’ प्रतिसाद देणारी कोणती उदाहरणे आम्हापाशी आहेत?

१७ अलिकडील गिलियड मिशनरी शाळेत युरोपियन देशातून आलेल्या विद्यार्थ्यांचा भरणा होता, यांनी इंग्रजी भाषा शिकून घेतली आणि स्वतःला इतर देशातील सेवेकरता सादर केले. तसेच मिनिस्टीरीयल ट्रेनिंग स्कूलमध्ये कित्येक सड्या बांधवांना दोन महिन्याची कसून तालीम दिली जाते व मग त्यांना इतर देशात तेथील मंडळ्या व विभागांना दृढ करण्यासाठी पाठवण्यात येते. तसेच आता पूर्वीय युरोप व पूर्वीच्या सोवियत प्रजासत्ताक येथे नवनवीन क्षेत्रे उघडत आहेत, जी मासेमारीस अप्रतिम आहेत.—पडताळा रोमकर १५:२०, २१.

१८. (अ) पायनियर हे सहसा प्रभावी सेवक का असतात? (ब) ते मंडळीतील इतरांना कशी मदत करू शकतात?

१८ जगभरातील मासेमारीच्या कार्यास साहाय्यक ठरलेली आणखी एक मदत म्हणजे नियमित पायनियर्सकरता असलेली पायनियर सर्विस स्कूल होय. खासपणे पायनियरांसाठी तयार करण्यात आलेल्या शायनिंग ॲज इल्युमिनेटर्स इन द वर्ल्ड पुस्तकाच्या कसून अभ्यासाद्वारे ते आपली सेवकपणाची क्षमता वाढवतात; कारण यात “प्रीतीचा मार्ग जोपासणे,” “येशूचा कित्ता अनुसरा,” आणि “शिक्षणाची कला वाढविणे” यासारख्या विषयांवर विचार केला जातो. मंडळ्यांमध्ये घरोघरच्या कामाचे प्रशिक्षण लाभलेले हे गुणवत्तापात्र कोळी असण्यामुळे व ते इतरांनाही या मोठ्या मासेमारीच्या कामात तालीम देत असल्यामुळे मंडळ्यांना किती कृतज्ञ वाटते बरे!—मत्तय ५:१४-१६; फिलिप्पैकर २:१५; २ तीमथ्य २:१, २.

आम्हाला सुधारणा करता येईल का?

१९. प्रेषित पौलाप्रमाणे आपल्याला सेवकपणात कशी सुधारण करता येईल?

१९ पौलाप्रमाणे आम्हाठायी सरळ व पुढे बघण्याचा दृष्टिकोण असला पाहिजे. (फिलिप्पैकर ३:१३, १४) त्याने विविध प्रकारचे लोक व त्यांची परिस्थिती यांजबरोबर जुळवून घेतले. सर्वसाधारण पाया कसा घालावा आणि स्थानिक प्रवृत्त्या आणि संस्कृती यांच्या आधारावर कसा विवाद करावा हे त्याला ठाऊक होते. घरमालक राज्य संदेशास दाखवीत असलेल्या प्रतिक्रियेला दक्ष राहून व मग आपली सादरता त्या व्यक्‍तिच्या गरजांशी अनुरुप बनवून आपल्याला पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करता येईल. आम्हापाशी पवित्र शास्त्राच्या अभ्यासाची विविध प्रकाशने असल्यामुळे आपणाला त्या विशिष्ठ माणसाच्या गरजेनुरुप असणारे प्रकाशन सादर करता येते. फलदायी स्वरुपाच्या मासेमारीसाठी आमची लवचिकता व दक्षता महत्त्वाची आहे.—प्रे. कृत्ये १७:१-४, २२-२८, ३४; १ करिंथकर ९:१९-२३.

२०. (अ) आमचे मासेमारीचे कार्य आता इतके का महत्त्वाचे आहे? (ब) आमची व्यक्‍तिगत जबाबदारी आता काय आहे?

२० हे अप्रतिम असे गोलार्धव्याप्त मासेमारीचे काम आता इतके महत्त्वाचे का आहे? कारण पवित्र शास्त्राचे भविष्यवाद परावर्तित झालेल्या व घडत असलेल्या घटनांद्वारे हे सुव्यक्‍त आहे की, सैतानी व्यवस्थीकरण आता विनाशकारी कळसाला पोहंचत आहे. तर मग, आपण यहोवाचे साक्षीदार या नात्याने काय करावयास हवे? या मासिकातील तीन अभ्यासाच्या लेखांनी आम्ही, आमच्या वाट्याला असलेल्या गालार्धव्याप्त पाण्यात मासेमारीचे कार्य करण्यासाठी उद्योगी व उत्साही असले पाहिजे या जबाबदारीकडे ठळकपणे लक्ष वेधविले आहे. मासेमारी करण्याच्या आमच्या प्रयत्नशील कार्याला यहोवा कधीच विसरणार नाही ही हमी आपल्याला पवित्र शास्त्रातून आहे. पौलाने म्हटलेः “तुमचे कार्य आणि तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा, यावरुन जी प्रीती तुम्ही त्याच्या नामावर दाखविली, तीही देवाने विसराची असा तो अन्यायी नाही. आमची अशी उत्कंठा आहे की, तुम्हापैकी प्रत्येकाने आशेची पूर्ण खातरी करून घेण्यासाठी तशीच आस्था शेवटपर्यंत बाळगावी.”—इब्रीयांस ६:१०-१२.

[तळटीपा]

a तसेच रेवलेशन—इटस्‌ ग्रॅण्ड क्लायमॅक्स ॲट हँड! यातील पृष्ठे १८५ व १८६ पहा. हे प्रकाशन वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेले आहे.

b “पायनियर पब्लिशर . . . यहोवाच्या साक्षीदारांमधील पूर्ण वेळेचा कार्यकर्ता.”—वेबस्टर्स थर्ड्‌ न्यू इंटरनॅशनल डिक्शनरी.

तुम्हाला आठवते का?

▫ यहोवाचे साक्षीदार सबंध जग हे आपल्या मासेमारीच्या कार्याचे स्थळ आहे असे का समजतात?

▫ गिलीयड मिशनरी शाळेने मासेमारीच्या कामाला कोणता आशीर्वाद आणला?

▫ यहोवाच्या साक्षीदारांना कोणत्या गोष्टींनी यशप्राप्ती मिळवून दिली?

▫ आपल्याला आमचे ख्रिस्ती सेवकपण व्यक्‍तिगतपणे कसे सुधारता येईल?

[२६ पानांवरील चौकट]

आंतरराष्ट्रीय मासेमारीचे परिणाम

वर्ष देश साक्षीदार

१९३९ ६१ ७१,५०९

१९४३ ५४ २६,३२९

१९५३ १४३ १९,९८२

१९७३ २०८ १७,५८,४२९

१९८३ २०५ २६,५२,३२३

१९९१ २११ ४२,७८,८२०

[२७ पानांवरील चित्रं]

गालीली कोळ्यात अद्याप साक्षीकार्य केले जात आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा