वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ९/१ पृ. १९-२४
  • जाळे व मासे यांचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जाळे व मासे यांचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सखोल अर्थाचा दाखला
  • मासेमारी—केव्हा?
  • आमचा काळ खास आहे
  • मासेमारीच्या कामातील तुमचा सहभाग
  • अधिक शिक्षणाने धन्यवादित
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • माणसे धरणारे अशी सेवा करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • कोणते फळास येईल हे तुम्हाला ठाऊक नाही
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • तुम्हाला खरोखरच अर्थ समजला आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ९/१ पृ. १९-२४

जाळे व मासे यांचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो?

“स्वर्गाच्या राज्याची [पवित्र] रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांस दिलेले आहे.”—मत्तय १३:११.

१, २. आपण येशूच्या दाखल्यात का आस्थेवाईक असावे?

तुम्हास एखादे रहस्य उलगडण्यात किंवा कोडे उकलण्यात आनंद वाटतो का? असे करण्यामुळे देवाच्या स्वसंकल्पातील तुमचे स्थान कोणते ते ओळखण्यात जर तुमची मदत झाली तर काय? असला अंतर्दृष्टिकोणाचा विशेष हक्क, येशूने दिलेल्या एका संक्षिप्त दृष्टांताद्वारे तुम्हाला मिळू शकतो हे आनंदाचे आहे. तो ज्यांनी ऐकला अशा पुष्कळांना त्याने घोटाळ्यात टाकले व त्यानंतर देखील अगणित लोकांना तो दृष्टांत घोटाळ्याचा वाटला. पण तुम्हाला तो समजू शकेल.

२ मत्तयाच्या १३ व्या अध्यायात येशूने दाखल्यांच्या वापराबद्दल काय म्हटले त्याकडे लक्ष द्या. त्याच्या शिष्यांनी त्याला विचारलेः “आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता?” (मत्तय १३:१०) खरेच, बहुतेक लोक समजू शकणार नाही असे दाखले येशूने का वापरले? त्याने याचे उत्तर ११ ते १३ वचनात दिले आहे. तो म्हणालाः “स्वर्गाच्या राज्याची [पवित्र] रहस्ये जाणण्याचे दान तुम्हास दिलेले आहे, परंतु त्यांस दिलेले नाही. . . . यास्तव मी त्यांबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहत असता पाहत नाहीत; आणि ऐकत असता ऐकत नाहीत व समजतही नाहीत.”

३. येशूच्या दाखल्यांची समज झाल्यामुळे आम्हाला कसा लाभ मिळू शकतो?

३ मग, येशूने यशया ६:९, १० चे अवतरण घेतले. जे आध्यात्मिक दृष्टीने बहिरे व अंधळे असणाऱ्‍या लोकांबद्दल सांगते. आम्ही यांच्यासारखे असण्याची गरज नाही. आपण येशूचा दाखला समजून त्याप्रमाणे कृति केली तर खरोखरीच आता व भविष्यात चिरकालिकपणे धन्य होऊ. येशू आम्हाला हे उबदार आश्‍वासन देतोः “धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहतात; आणि धन्य तुमचे कान, कारण ते ऐकतात.” (मत्तय १३:१६) हे आश्‍वासन येशूच्या सर्व दाखल्यांच्या बाबतीत अंतर्भूत आहे. पण सध्याला आपण, मत्तय १३:४७-५० मध्ये दिलेल्या मासे धरण्याच्या जाळ्याबद्दल येशूचा जो लहान दाखला आहे, त्याकडे आपले लक्ष केंद्रित करू.

सखोल अर्थाचा दाखला

४. मत्तय १३:४७-५० मध्ये नमूदित असणाऱ्‍या दाखल्यात येशूने कशाबद्दलचे वर्णन दिले?

४ “आणखी स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या ज्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव [मासे] एकत्र सापडतात त्यासारखे आहे. ते भरल्यावर माणसांनी काठाकडे ओढले व त्यांनी बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले व वाईट ते फेकून दिले. तसे युगाच समाप्तीस होईल. देवदूत येऊन धार्मिकांतून दुष्टांस वेगळे करतील, आणि त्यांस अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दातखाणे चालेल.”

५. जाळ्याच्या दाखल्यासंबंधी कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

५ तुम्ही कोळ्यांना जाळे टाकून मासे धरताना प्रत्यक्षात नसेल तरी चित्रपटात किंवा दूरदर्शनवरील चित्रात बघितले असेल. यामुळे येशूच्या दाखल्याचे दृश्‍य आपल्या मनात उभे करणे हे तितके अवघड नाही. पण त्याचा तपशील व अर्थाबाबत काय? उदाहरणार्थ, येशूने म्हटले की, जाळ्याचा हा दाखला “स्वर्गाच्या राज्या”बाबत आहे. तरीपण या राज्यामध्ये “सर्व प्रकारचे” म्हणजे चांगले व वाईट किंवा दुष्ट असे त्यात असतील असा त्याचा निश्‍चितच अर्थ नव्हता. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे ही मासेमारी कोण करीत आहे? हे मासे धरणे व वेगवेगळे करणे कधी घडते—येशूच्या दिवसात की, आमच्या काळी, “युगाच्या समाप्ती”मध्ये? या दाखल्यात तुम्ही स्वतःला बघता आहात का? जे “रडणे व दातखाणे” करतील अशांपैकी होऊ नये म्हणून तुम्हाला काय करता येईल?

६. (अ) जाळ्याचा दाखला समजून घेण्यामध्ये आम्ही इतका रस का घ्यावा? (ब) याची समज मिळण्याची किल्ली काय आहे?

६ हे प्रश्‍न दाखवितात की, हा दाखला वाटतो तेवढा सोपा नाही. तरीपण याचा विसर पडू देऊ नका की, “धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहतात; आणि धन्य तुमचे कान, कारण ते ऐकतात.” या कारणास्तव, आपण याचा अर्थ शोधून काढू शकतो का व त्यामागील रहस्य उलगडू शकतो का ते पाहू या. यामुळे आमचे कान बहिरे व आमचे डोळे अंधळे नाहीत हे दिसेल. खरे म्हणजे या अर्थाची समज प्राप्त होण्याची किल्ली आपल्याकडे आधीपासूनच आहे. मागील लेखात आपल्याला कळाले आहे की, येशूने गालीलकर कोळ्यांना आपला व्यवसाय सोडून देऊन “माणसे धरण्याचे” आध्यात्मिक काम करण्यास पुढे येण्याची हाक दिली होती. (मार्क १:१७) त्याने त्यांना म्हटलेः “एथून पुढे तुम्ही माणसे धरणारे व्हाल.”—लूक ५:१०.

७. येशूने माशांबद्दल बोलणी केली तेव्हा तो कशाचे चित्र देत होता?

७ याच्या एकमतात या दाखल्यातील “मासे” हे मानवांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यास्तव ४९ वे वचन जेव्हा ‘नीतीमानांस दुष्टांपासून वेगळे’ करण्याचे म्हणते तेव्हा त्याचा अर्थ, नीतीमान किंवा अनीतीमान जलजीव नव्हे, तर धार्मिक व दुष्ट लोकांस वेगवेगळे करणे असा होतो. याचप्रमाणे ५० व्या वचनाचा अर्थ समुद्रातील जलजीव रडणे व दातखाणे करतात असा आम्ही घेऊ नये. नाही. हा दाखला मानवी जिवांना एकत्र करण्याचा व नंतर त्यांचे पृथ्थकरण करण्याचा असून, त्याच्या परिणामाच्या बाबतीत पाहता तो तेवढाच गंभीर आहे.

८. (अ) वाईट माशांना मिळणाऱ्‍या परिणामाबद्दल आपण काय शिकू शकतो? (ब) वाईट माशांबद्दल जे काही म्हणण्यात आले ते बघता आपण राज्याबद्दल कोणत्या निर्णयाला पोहंचू शकतो?

८ वाईट माशांना म्हणजे दुष्टांना रडणे व दातखाणे चालेले अशा अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल हे लक्षात घ्या. इतर ठिकाणी, येशूने या रडणे व दातखाणे या स्थितीचा संबंध देवाच्या राज्याबाहेरील अवस्थेशी जोडला. (मत्तय ८:१२; १३:४२) तसेच मत्तय ५:२२ व १८:९ मध्ये तर त्याने “अग्नी गेहेन्‍ना” हा शब्दप्रयोग कायमच्या नाशाच्या संदर्भात उपयोगात आणला. यास्तव, या दाखल्याचा अर्थ समजावून घेऊन त्यानुसार आपली वागणूक ठेवणे हे किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट होत नाही का? देवाच्या राज्यात दुष्ट नाहीत व कधीच असणार नाहीत हे आम्ही सर्व चांगले जाणतो. या कारणास्तव, “स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या जाळ्यासमान” आहे असे जेव्हा येशूने म्हटले तेव्हा देवराज्याच्या संदर्भात विविध प्रकारातील मासे एकत्रितपणे धरण्यासाठी जाळ्यासारखे काही तरी उपकरण जलात सोडले जाईल असा त्याचा अर्थ असावा.

९. जाळ्‌याच्या दाखल्यात देवदूतांचा कसा संबंध येतो?

९ हे जाळे पाण्यात सोडल्यावर व मासे गोळा झाल्यावर त्यांना वेगवेगळे करण्याचे काम सुरु होणारे होते. ते काम कोण करतील असे येशू म्हणाला होता? मत्तय १३:४९ नुसार हे वेगवेगळे करण्याचे काम करणारे कोळी-देवदूत आहेत. यास्तव, येशू आम्हास देवदूतांच्या देखरेखीखाली असणाऱ्‍या पृथ्वीवरील एका उपकरणाची माहिती देत होता, जे स्वर्गाच्या राज्यासाठी चांगले व पात्र असणाऱ्‍या आणि त्याकरता अपात्र ठरणाऱ्‍या लोकांची ओळख दाखविण्यासाठी वापरण्यात येईल.

मासेमारी—केव्हा?

१०. मासेमारीचे काम बऱ्‍याच लांब मुदतीपर्यंत चालणार आहे हा निष्कर्ष आम्ही कोणत्या कारणाद्वारे काढू शकतो?

१० संदर्भ आम्हाला या गोष्टी केव्हा घडणार त्याबद्दल कळविण्यात मदत देतो. या दाखल्याच्या थोड्याच आधी, येशूने चांगले बी पेरणाऱ्‍याचा दाखला सांगितला, पण त्या शेतावर कोणीतरी येऊन निदण पेरून गेले. शेत हे जगाची प्रतिमा आहे. येशूने मत्तय १३:३८ मध्ये हे स्पष्ट केले की, “चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत.” हे दोन्ही, युगाच्या समाप्तीस होणाऱ्‍या कापणी हंगामापर्यंत वाढत राहिले. मग, निदण वेगळे केले गेले आणि त्यानंतर ते जाळून टाकले गेले. या गोष्टीसोबत जाळ्याच्या दाखल्याची तुलना केल्यास आम्हास दिसते की, जाळ्यात मासे धरण्याचे काम बऱ्‍याच लाब मुनदतीपर्यंत चालणार.—मत्तय १३:३६-४३.

११. पहिल्या शतकात मासेमारीचा जलाशय आंतरराष्ट्रीय स्वरुपाचा कसा बनला?

११ येशूच्या दाखल्यानुसार मासे सरसकटपणे गोळा केले जाणार होते, याचा अर्थ जाळ्यात चांगले व वाईट मासे येणार होते. प्रेषित हयात होते तोपर्यंत मासेमारीच्या कामाचे मार्गदर्शन करणाऱ्‍या देवदूतांनी देवाच्या ख्रिस्ती संघटनेचा “चांगले” मासे धरण्यासाठी उपयोग केला. ते मासे अभिषिक्‍त ख्रिस्ती बनले. तुम्हाला असे म्हणता येईल की, इ. स. ३३च्या पेंटेकॉस्टच्या आधीच्या काळात येशूने केलेल्या मासेमारीत १२० शिष्यांना धरले. (प्रे. कृत्ये १:१५) पण एकदा या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीची प्रस्थापना झाल्यावर या जाळ्यासमान असणाऱ्‍या उपकरणाद्वारे मासेमारीच्या कामाला चालना आली व हजारो चांगले मासे धरले गेले. इ. स. ३६ पासून विदेश्‍यांना ख्रिस्ती धर्मात पाचारण करण्याने, व ते ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त मंडळीचे सभासद बनल्यामुळे या मासेमारीचा परिसर वाढून तो आंतरराष्ट्रीय जलाशयात पसरला.—प्रे. कृत्ये १०:१, २, २३-४८.

१२. प्रेषितांच्या मृत्युनंतर काय घडले?

१२ जगाच्या दृश्‍यातून प्रेषितांचे प्रयाण झाल्यानंतर काही शतके काही विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी ईश्‍वरी सत्याचा शोध घेतला व ते त्याला बिलगून राहिले. यांच्यापैकी काहींना देवाची संमति होती व त्याने त्यांचा आपल्या पवित्र आत्म्याने अभिषेक केला. तरीही प्रेषितांच्या मृत्युमुळे असणारा निर्बंध दूर झाला आणि धर्मत्याग चोहीकडे पसरण्यास वाव मिळाला. (२ थेस्सलनीकाकर २:७, ८) यामधून अशी संघटना उदयास आली व वाढत गेली, जिने स्वतःबद्दल देवाची मंडळी असल्याचा दावा केला. तिने देवाच्या आत्म्याद्वारे ज्यांचा येशूसोबत सत्ता चालविण्यास अभिषेक होतो, ते पवित्र राष्ट्र स्वतः असल्याचा दावा खोटपणाने केला.

१३. जाळे प्रकरणात ख्रिस्ती धर्मराज्याचाही समावेश होता असे का म्हणता येते?

१३ ख्रिस्ती धर्माचा दावा करणाऱ्‍या अशा अविश्‍वासूंचा जाळ्याच्या दाखल्यामध्ये काही सहभाग असू शकेल असे तुम्हास वाटते का? तसे पाहता होय, असे म्हणता येईल व त्याला कारणेही आहेत. लाक्षणिक जाळ्यात ख्रिस्ती धर्मराज्याचाही समावेश आहे. कॅथोलिक चर्चने बऱ्‍याच काळासाठी साधारण लोकांपासून पवित्र शास्त्राला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होताहे खरे. तरी देखील, याच ख्रिस्ती धर्मराज्यातील काही सदस्यांनी देववचनांचा इतर भाषेत अनुवाद, नक्कल व वितरण करण्यास फार मोठी भूमिका पार पाडली. कालांतराने चर्चेसनी बायबल सोसायटींची स्थाना केली व त्यांना साहाय्य दिले. यांनी दूरच्या देशातील भाषेत पवित्र शास्त्र अनुवादित केले. चर्चेसने वैद्यकीय मिशनरी व शिक्षकही गावोगावी पाठवून शिधेवर जगणारे ख्रिस्ती बनविले. यामुळे प्रचंड प्रमाणातील वाईट मासे एकत्रित केले. यांना देवाची संमती नव्हती. तरीपण त्यामुळे ख्रिस्ती नसलेल्या लाखोंना बायबलची ओळख करून दिली आणि भ्रष्ट स्वरुपात का होईना, ख्रिस्ती धर्माच्या एका बाजूची ओळख करून दिली.

१४. ख्रिस्ती धर्मराज्याच्या चर्चेसनी मासे गोळा करण्याच्या कामात काही अंशी कशी मदत केली?

१४ या सर्व काळात, देवाच्या वचनास बिलगून राहिलेल्या व इतस्ततः विखुरलेल्या विश्‍वासू जनांना जेवढे करता येणे शक्य होते तेवढे परिश्रम केले. कोणत्याही वेळी त्यांची देवाच्या खऱ्‍या अभिषिक्‍तांची मंडळी अशी पृथ्वीवर राहिली. ही सुद्धा मासे किंवा माणसे धरीत होती याची आम्हाला खात्री आहे. यापैकीच्या अनेकांचा देव चांगले मासे या अर्थाने आपल्या आत्म्याने अभिषेक करीत होता. (रोमकर ८:१४-१७) ख्रिस्ती धर्माच्या या निपूण प्रवर्तकांनी, शिधेवर जगणाऱ्‍या किंवा ज्यांना ख्रिस्ती धर्मराज्याच्या बायबल सोसायटींनी त्यांच्या भाषेत उपलब्ध केलेल्या पवित्र शास्त्राच्या भाषांतराच्या वाचनामुळे जे मर्यादित ज्ञान मिळविले होते अशांना पवित्र शास्त्रीय सत्ये व त्यांची समज मिळवून दिली. खरेच, मासे गोळा करण्याचे काम जारी होते. ख्रिस्ती धर्मराज्यांनी जरी देवाच्या दृष्टिकोणातून अयोग्य असणारे मासे गोळा केले तरी ते काम चालू चालूच होते.

१५. दाखल्यातील जाळे हे कोणाला अनुलक्षून आहे असे सूक्ष्मरित्या सांगता येईल?

१५ अशाप्रकारे जाळे हे, स्वतःला देवाची मंडळी म्हणविणाऱ्‍या व मासे गोळा करणाऱ्‍या पृथ्वीवरील उपकरणास सूचित आहे. यात ख्रिस्ती धर्मराज्य तसेच अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची खरी मंडळी या दोघांचा समावेश होतो. यापैकीच दुसरी, म्हणजे खऱ्‍या ख्रिश्‍चनांची अभिषिक्‍त मंडळी मत्तय १३:४९ नुसार, दिव्यदूतांच्या अदृश्‍य मार्गदर्शनाखाली चांगले मासे गोळा करीत राहिली.

आमचा काळ खास आहे

१६, १७. येशूने जाळ्याबद्दल दिलेल्या दाखल्याची पूर्णता होणाऱ्‍या या सध्याच्या काळात आम्ही जिवंत असणे हे इतके का महत्त्वाचे आहे?

१६ आता आपण यातील वेळेचा घटक विचारात घेऊ. जाळ्यासमान उपकरणाने अनेक शतके चांगले तसेच वाईट मासे किंवा दुष्ट यांना गोळा केले. मग, वेळ झाली आणि देवदूत निर्णायकपणे वेगळे करण्याच्या कामास लागले. ते केव्हा? ४९वे वचन अगदी स्पष्ट शब्दात सांगते की, ते “युगाच्या समाप्ती”स होईल. हे, येशूने शेरडे व मेंढरे यांच्या दाखल्यात म्हटलेल्या गोष्टींशी जुळणारे आहे. तो म्हणालाः “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने येईल व त्याजबरोबर सर्व देवदूत येतील तेव्हा तो आपल्या वैभवी राजासनावर बसेल. त्याजपुढे सर्व राष्टे जमविली जातील, आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांस एकमेकांपासून वेगळे करील.”—मत्तय २५:३१, ३२.

१७ या कारणास्तव, मत्तय १३:४७-५० च्या अनुषंगाने दिव्यदूतांच्या मार्गदर्शनाखाली होणारे हे खडतर स्वरुपाचे वेगळे करण्याचे काम “युगाची समाप्ती” १९१४ मध्ये सुरु झाली तेव्हापासून चालू आहे. हे खासपणे, ज्या वर्षी अभिषिक्‍तांपैकीच्या काही शेषांची तात्पुरत्या आध्यात्मिक बंदिवासातून किंवा अक्रियाक स्थितीतून सुटका झाली आणि मासेमारीच्या कामात पुढे धडाडीने सरसावले त्या १९१९ पासून अधिक स्पष्ट होत गेले.

१८. चांगले मासे कसे भांड्यात गोळा करण्यात येत आहेत?

१८ वेगळ्‌या केलेल्या चांगल्या माशांचे काय होणार होते? ४८ वे वचन सांगते की, मासे निवडणाऱ्‍या देवदूतांनी “जे चांगले [मासे] ते भांड्यात जमा कले, वाईट ते फेकून दिले.” चांगल्या माशांना ठेवण्यात आलेली ही भांडी त्यांच्यासाठी संरक्षक अशी आहेत. हे आमच्या काळात घडले आहे का? निश्‍चितपणे. लाक्षणिक चांगले मासे जिवंत धरले जातात तेव्हा त्यांना खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या मंडळ्यात ठेवले जाते. ह्‍या भांड्यासमान मंडळ्या त्यांना ईश्‍वरी सेवेत टिकून राहण्यात सुरक्षितता व साहाय्य देतात, याबद्दल तुमचे सहमत नाही का? तरीही, कोणी म्हणतेः ‘हे सर्व ठीक. पण याचा माझ्या सध्याच्या जीवनाशी व भविष्याशी काय संबंध?’

१९, २०. (अ) या दाखल्याचा अर्थ समजावून घेणे हे आज का महत्त्वाचे आहे? (ब) १९१९ पासून पुढे मासेमारीचे कोणते महत्त्वपूर्ण काम करण्यात आले?

१९ येथे जी वर्णनात्मक कार्यसिद्धी स्पष्ट करण्यात आली ती, प्रेषित व १९१४चा काळ यांच्यापुरतीच मर्यादित नाही. या काळादरम्यान जाळे या उपकरणाने ख्रिश्‍चनत्वाचा दावा करणारे खोटे तसेच खरे समर्थक गोळा केले होते. होय, ते उपकरण चांगले व वाईट मासे गोळा करीत होते. याचप्रमाणे दिव्यदूतांनी मासे वेगळे करण्याचे जे काम सुरु केले होते ते १९१९ मध्ये संपले नाही. निश्‍चितच नाही. तर काही विशिष्ट गोष्टींसह जाळ्याच्या दाखल्याची पूर्णता आमच्या काळापर्यंत पोहोंचते. आम्ही तसेच आमचे नजीकचे भवितव्यही त्यामध्ये गोवलेले आहे. ते का व कसे याची आम्ही समज करून घेणे अगत्याचे आहे, कारण यामुळेच आम्हाबद्दल “धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहतात आणि धन्य तुमचे कान, कारण ते [समजदारीने] ऐकतात,” ही गोष्ट खरी असल्याचे दिसेल.—मत्तय १३:१६.

२० तुम्हाला माहीतच असेल की, १९१९ नंतर अभिषिक्‍त शेष त्या देवदूतांच्या संगतीत, त्यांनी प्रतिकात्मक जाळे सतत माशांनी भरून काठावर आणून चांगले व वाईट मासे वेगळे करावे या उद्देशास्तव उपदेश कार्यात मग्न झाले. त्या काळापासून आकडेवारी दाखवते की, देवाच्या आत्म्याचा अभिषेक होण्यासाठी चांगल्या माशांचे एकत्रीकरण होत राहून ते लाक्षणिक जाळ्यात १,४४,००० मधील शेवटले सदस्य येईपर्यंत चालू राहिले. (प्रकटीकरण ७:१-४) पण १९३०शीच्या मध्याला, पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त होणाऱ्‍या चांगल्या माशांना गोळा करण्याचे काम सर्वसाधारणपणे संपुष्टात आले. तर आता, अभिषिक्‍त शेषांच्या मंडळीने आपले जाळे काढून टाकून, आपल्या स्वर्गीय वतनाची वाट बघत, आरामात बसून वेळ घालवायचा होता का? मुळीच नाही!

मासेमारीच्या कामातील तुमचा सहभाग

२१. आमच्या काळात आणखी कोणती मासेमारी चालू आहे? (लूक २३:४३)

२१ येशूने दिलेल्या जाळ्याचा दाखला स्वर्गीय राज्यातील स्थानप्राप्तीचे दान देण्यात आलेल्या त्याचांगल्या माशांवर प्रकाशझोत टाकतो. तरीपण या दाखल्याशिवाय दुसरीही लाक्षणिक मासेमारी चालू आहे व त्याबद्दलची माहिती आपण मागील लेखात पाहिली आहे. ही मासेमारी येशूच्या दाखल्यातील चांगल्या अभिषिक्‍त माशांसाठी नाही; तर ती अशा लाक्षणिक जिवंत माशंना पकडण्यासाठी चालू आहे, ज्यांना पृथ्वीवरील नंदनवनातील जीवनाची विस्मयकारक आशा असणार.—प्रकटीकरण ७:९, १०; पडताळा मत्तय २५:३१-४६.

२२. कोणता आनंदी परिणाम आपल्याला अनुभवता येईल, आणि याला पर्याय काय आहे?

२२ तुम्ही हीच आशा बाळगून आहात तर, यहोवाने आमच्या काळात देखील हे जीवन वाचविणारे मासेमारीचे काम पुढे चालविण्यास परवानगी दिली आहे याबद्दल तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. यामुळे तुम्हाला विस्मयकारक भवितव्य मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे. भवितव्य? होय, तोच शब्द उपयोगात आणण्यास साजेसा आहे. कारण जी निष्पत्ती होणार ती, चालू असणाऱ्‍या मासेमारीचे मार्गदर्शन करणाऱ्‍या मार्गदर्शकाला आम्ही सतत दाखविलेल्या निष्ठावंतपणावर आधारीत आहे. (सफन्या २:३) दाखल्यातील ते वैशिष्ट्य आठवा की, जाळ्यात जेवढे मासे आले त्या सर्वांना कृपेचा लाभ झाला नाही. येशूने म्हटलेच होते की, अपात्र किंवा दुष्टांना नीतीमानांपासून वेगळे केले जाईल. कशासाठी? मत्तय १३:५० मध्ये येशूने, अपात्र किंवा दुष्टांना गंभीर परिणाम मिळणार असे म्हटले. यांना अग्नीच्या भट्टीत कायमच्या नाशसाठी टाकण्यात येईल.—प्रकटीकरण २१:८.

२३. मासेमारीचे काम आज इतके महत्त्वाचे कशामुळे झाले आहे?

२३ चांगल्या अभिषिक्‍त माशांसाठी तसेच पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाचा लाभ होणाऱ्‍या लाक्षणिक माशांसाठी गौरवी भवितव्य समोर आहे. तद्वत, आज सबंध गोलार्धावर मासेमारीचे महान काम यशस्वीपणे पार पाडले जात आहे याचे देवदूत निरिक्षण करीत आहे हे उचित कारणासाठीच आहे. आणि लाक्षणिक माशांचा केवढा मोठा घोळका हाती लागलेला आहे! तुम्हाला अगदी योग्यपणे असे म्हणता यईल की, ही पकड, प्रेषितांनी येशूच्या मार्गदर्शनाखाली आपली खरी जाळी टाकून जो अद्‌भतू माशांचा घोळका मिळविला अगदी त्यासारखीच आहे.

२४. आध्यात्मिक मासेमारीसंबंधाने आपल्याला काय केले पाहिजे?

२४ तर आता, तुम्ही स्वतः जीवन वाचविणाऱ्‍या या लाक्षणिक मासेमारीत क्रियाशीलपणे होईल तितक्या क्षमतेत सहभागी होत आहात का? आतापर्यंत आपला या कार्यातील सहभाग केवढाही व्यापक राहिलेला असो, आम्ही सर्वांनीच, जीवन वाचविणाऱ्‍या ह्‍या मासेमारीच्या भव्य कामात जगभरात जे काही साध्य होऊ शकले ते पाहून लाभ मिळवता येऊ शकेल. तसे केल्यामुळेच आम्हाठायी, येणाऱ्‍या सर्व दिवसात जाळे टाकून मासे धरीत राहण्याचा तीव्र आवेश सतत जागृत राहील.—पडताळा मत्तय १३:२३; १ थेस्सलनीकाकर ४:१.

तुम्हाला हे मुद्दे आठवतात का?

▫ येशूने जाळ्याचा जो दाखला दिला त्यातील दोन प्रकारच्या माशांद्वारे कोणाचे प्रतिनिधित्व मिळते?

▫ जाळे प्रकरणात ख्रिस्ती धर्मराज्यातील चर्चेस कोणत्या अर्थाने सहभागी होती?

▫ आमच्या काळात मासेमारीचे जे कार्य होत आहे ते इतके निर्णायक का आहे?

▫ जाळ्याच्या दाखल्याने आम्हा प्रत्येकाला कोणत्या प्रकारचे स्व-परिक्षण करण्यासाठी प्रवृत्त करण्यास हवे?

[२० पानांवरील चित्रं]

गालील समुद्रात मासेमारीचा व्यवसाय कित्येक शतकांपासून चालू आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा