वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ९/१ पृ. १४-१९
  • माणसे धरणारे अशी सेवा करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • माणसे धरणारे अशी सेवा करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सजीव ‘मनुष्यांना धरणारे’
  • माणसांची मासेमारी
  • मानवजातीच्या समुद्रात मासेमारी करणे
  • “प्रभूच्या दिवसात” माणसे धरणे
  • चार शिष्यांना पाचारण
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • चार शिष्यांना पाचारण करण्यात आले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • गोलार्धव्याप्त जलाशयात माणसांची मासेमारी करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • मासेमारीच्या जाळ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ९/१ पृ. १४-१९

माणसे धरणारे अशी सेवा करणे

“येशू शिमोनाला म्हणाला, भिऊ नको; एथून पुढे तू मनुष्यांना धरिशील.”—लूक ५:१०.

१, २. (अ) मासेमारीने मानवजातीच्या इतिहासात कोणता कार्यभाग पार पाडलेला आहे? (ब) साधारण २,००० वर्षांआधी कोणत्या नव्या मासेमारीची प्रस्तुति करण्यात आली?

आज हजारो वर्षे मानवजात आपले खाद्य म्हणून पृथ्वीवरील समुद्र, तळी, नद्यातून मासेमारी करीत आहे. प्राचीन मिसरातील नाईल नदीतील मासे एक विशिष्ट खाद्य मानले जाईल. मोशेच्या दिवसात नाईलच्या पाण्याचे रक्‍त करण्यात आले, त्यात मिसरी लोकांना जो त्रास झाला तो केवळ पाण्याच्या टंचाईचाच नव्हे तर त्यातील मत्स्यांचा नाश झाल्यामुळे खाद्यपुरवठ्यावरही परिणाम झाला. नंतर सिनाय डोंगरापाशी यहोवाने इस्राएलांस नियमशास्त्र दिले, त्यात त्याने काही विशिष्ठ प्रकारातील मासे खाण्यास मुभा दिली. पण काही प्रकारचे मासे अशुद्ध म्हणून खाण्यावर बंदी घातली होती. यावरुन हे सूचित होते की, इस्राएल लोक, वचनयुक्‍त देशात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या आहारात मासेही असतील व त्यामुळे त्यांच्यापैकी काहीजण मच्छेमार कोळी असतील.—निर्गम ७:२०, २१; लेवीय ११:९-१२.

२ तथापि, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी मानवजातीस कोणा दुसऱ्‍याच प्रकारच्या मच्छेमारीची ओळख करून देण्यात आली. ही अशी प्रतिकात्मक मासेमारी होती, जिचा लाभ केवळ कोळ्यांस नव्हे तर वस्तुतः माशालाही होणार होता! या प्रकारातील मासेमारी अद्याप अनुसरली जात आहे. तिचे अमर्याद फायदे जगभरातील लाखोंना मिळत आहेत.

सजीव ‘मनुष्यांना धरणारे’

३, ४. कोणत्या दोन कोळ्यांनी येशू ख्रिस्तामध्ये रस दाखवला?

३ इ. स. २९ मध्ये ज्याने या नव्या प्रतिकात्मक पद्धतीच्या मासेमारीची ओळख करून दिली, त्याचा योहान बाप्तिस्मा करणाऱ्‍याद्वारे यार्देन नदीत बाप्तिस्मा झाला. तो येशू होता. काही आठवड्यानंतर योहान आपल्या शिष्यांपैकी दोघांना येशूकडे अंगूली दाखवून म्हणालाः “हा पहा, देवाचा कोकरा!” दोघांपैकी, जो आंद्रिया नावाचा शिष्य, त्याने लगेच ते आपला भाऊ शिमोन पेत्र याला कळविले. तो म्हणालाः “मशीही [म्हणजे ख्रिस्त] आम्हाला सापडला आहे!” आंद्रिया व शिमोन हे खरे पाहता, व्यवसायाने कोळी होते ही बाब लक्षणीय आहे.—योहान १:३५, ३६, ४०, ४१; मत्तय ४:१८.

४ काही काळानंतर येशू गालील समुद्रकिनारी मोठ्या लोकसमुदायास उपदेश करीत होता. हे स्थळ पेत्र व आंद्रिया राहात होते तेथून फार दूरवर नव्हते. येशू लोकांना सांगत होताः “पश्‍चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” (मत्तय ४:१३, १७) आम्ही आपल्या मनात हे चित्र उभे करू शकतो की, पेत्र व आंद्रिया ही दोन गरीब माणसे येशू काय म्हणतो ते ऐकण्याच्य उत्सुकतेने त्याच्यापुढे उभी आहेत. कदाचित, त्यांना कल्पनाही वाटली नसावी की, त्या दिवशी येशूने उद्‌गारिलेले शब्द त्यांच्या जीवनात कायमचा मोठा बदल घडवून आणतील. वस्तुतः येशूने त्यावेळी जे म्हटले व केले ते आज आम्हा सर्वांसाठी महत्त्वाचा अर्थ राखून आहे.

५. पेत्र या कोळ्याला येशूची कशी सेवा करता आली?

५ आपण असे वाचतोः “नंतर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्याजवळ गर्दी करून देववचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या काठी लागलेले दोन मचवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते.” (लूक ५:१, २) त्या काळी व्यावसायिक कोळी सहसा रात्रभर काम करीत, आणि ही माणसे रात्रभर केलेल्या मासेमारीनंतर आपली जाळी धुवून स्वच्छ करीत होती. लोकसमुदायासा अधिक प्रभावीपणे उपदेश करता यावा म्हणून त्यांच्या मचव्यापैकी एकाचा उपयोग करण्याचे येशूने ठरविले. “त्या मचव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो काठापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग, त्याने बसून मचव्यातून समुदायास शिक्षण दिले.”—लूक ५:३.

६, ७. मासेमारीसंबंधीचा कोणता चमत्कार येशूने घडवून आणला, आणि यामुळे येशूने मासेमारी करण्याबद्दल कोणते उद्‌गार काढले?

६ आता याकडे लक्ष द्या की, लोकसमुदायास शिक्षण देण्यापेक्षा काही अधिक गोष्टींचा विचार येशूच्या मनात होताः “आपले बोलणे संपविल्यावर त्याने शिमोनाला म्हटलेः ‘खोल पाण्यात जाऊ द्या व मासे धरण्यासाठी आपली जाळी खाली सोडा.’” हे आठवा की, हे कोळी सबंध रात्रभर काम करीत होते. त्यामुळे पेत्राने दाखवलेला प्रतिसाद आपल्याला आश्‍चर्याचा वाटणार नाही. पेत्र त्याला म्हणालाः “गुरुजी, आम्ही सारी रात्रभर कष्ट करून काही धरले नाही; तरी आपल्या सांगण्यावरुन मी जाळी सोडतो.” तेव्हा काय घडले? “त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा जे भागीदार दुसऱ्‍या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला साहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांस खुणविले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की, ते बुडू लागले.”—लूक ५:४-७.

७ येशूने येथे एक चमत्कार घडवून आणला होता. त्या सरोवरात रात्रभर मासे नव्हते; पण आता तर ते माशांनी बुजबुजले होते. या चमत्काराने पेत्राने मोठा प्रभावा घडला. “शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणालाः ‘प्रभूजी, मजपासून जा. मी पापी मनुष्य आहे.’ कारण त्यांनी धरलेल्या माशांचा समुदाय पाहून तो व त्याजबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब व योहान हेही विस्मित झाले होते.” येशूने पेत्राला शांत केले व मग असे उग्दार काढले, ज्याने पेत्राचे जीवनच बदलले गेले. तो म्हणालाः “भिऊ नको. एथून पुढे तू मनुष्यांना [“सजीव,” न्यू.व.] धरिशील.”—लूक ५:८-१०.

माणसांची मासेमारी

८. ‘माणसे धरणारे’ या निमंत्रणाला चार व्यावसायिक कोळ्यांनी कसा प्रतिसाद दाखवला?

८ याप्रकारे, येशूने माणसांची तुलना माशांसोबत केली. त्याने या गरीब कोळ्यांना एका महान मासेमारीसाठी—लोकांना जिवंतपणे धरण्यासाठी—हा प्रापंचिक व्यवसाय सोडून देण्याची हाक दिली. पेत्र व त्याचा भाऊ आंद्रिया यांनी हे निमंत्रण स्वीकारले. “मग ते लागलेच जाळी सोडून देऊन त्याच्यामागे चालले.” (मत्तय ४:१८-२०) यानंतर येशूने, फाटलेली जाळी परत जोडत बसलेल्या याकोब व योहानास हाक दिली. त्याने त्यांना देखील माणसे धरणारे बनण्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले. त्यांचा काय प्रतिसाद होता? “मग, ते तारु व आपला बाप यांस लागलेच सोडून त्याच्यामागे चालले.” (मत्तय ४:२१, २२) येशूने जिवंत जिवांना धरण्यात आपले कौशह्‍य येथे दाखवून दिले. या प्रसंगी त्याने चौघांना जिवंत धरले.

९, १०. पेत्र व त्याच्या सहकाऱ्‍यांनी कोणता विश्‍वास दाखवला, आणि त्यांना आध्यात्मिक मासेमारीसाठी कशी तालीम मिळाली?

९ व्यावसायिक कोळी आपण केलेल्या मासेमारीवर स्वतःचा उदरनिर्वाह करतो; पण आध्यात्मिक कोळ्याला तसे करता येत नाही. या कारणामुळे या शिष्यांनी येशूला अनुसरण्यासाठी आपले सर्व काही सोडले तेव्हा मोठा विश्‍वास दाखवला. तथापि, आपली आध्यात्मिक मासेमारी यशस्वी होईल याबद्दल त्यांना यर्त्किचितही शंका नव्हती. येशूने तर निष्फळ पाण्यात महामूर मासे आणण्याचा चमत्कार घडवून आणला होता. याप्रमाणे ते, जेव्हा इस्राएल राष्ट्राच्या पाण्यात आपली जाळी सोडतील तेव्हा त्यांना खात्री होती की, देवाच्या मदतीने त्यांना त्यातून माणसांची जिवंतपणे मासेमारी करता येईल. तेव्हापासून सुरवात झालेले आध्यात्मिक मासेमारीचे काम आता चालूच आहे आणि यहोवा अद्यापही चांगलीच कापणी देत आहे.

१० येशूने आपल्या शिष्यांना साधारण दोनपेक्षा अधिक वर्षे माणसे धरण्याच्या कामाची तालीम दिली. काही प्रसंगी त्याने त्यांना काळजीपूर्वक सूचना दिल्या व स्वतः कोठेही जाण्याआधी त्यांना प्रचाराला पाठविले. (मत्तय १०:१-७; लूक १०:१-११) येशूचा विश्‍वासघात करून त्याला ठार मारले गेले तेव्हा शिष्य स्तंभित झाले. पण येशूचा मृत्यु म्हणजे त्यानंतर माणसे धरणे हे काम बंद असा अर्थ झाला का? तद्‌नंतर घडलेल्या घटनांनी याचे उत्तर दिले.

मानवजातीच्या समुद्रात मासेमारी करणे

११, १२. येशूने आपल्या पुनरुत्थानानंतर मासेमारीशी संबंधित असणारा कोणता चमत्कार केला?

११ येशूचा यरुशलेमाबाहेर मृत्यु, व त्याच्या पुनरुत्थानानंतर शिष्य गालीलास परतले. एके प्रसंगी त्यांच्यापैकी सातजण गालील समुद्रापाशी उभे होते. पेत्राने म्हटले की, तो मासे धरावयाला जातो, तेव्हा दुसरेही त्याच्याबरोबर गेले. नेहमीप्रमाणे त्यांनी रात्रभर मासेमारी केली. प्रत्यक्षात ते रात्रभर आपली जाळी समुद्रात टाकून होते, तरी त्याच्या हाती काहीच लागले नाही. मग, पहाटे एक आकृती त्यांना किनाऱ्‍यावर दिसली. तिने पाण्यापलिकडे असलेल्या लोकांना मोठ्याने हाक मारुन म्हटलेः “मुलांनो, तुम्हाजवळ काही खावयाला आहे का?” शिष्यांनी उत्तर केलेः “नाही!” किनाऱ्‍यावर उभा होता त्याने त्यांना म्हटलेः “‘मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हास सापडेल.’ म्हणून त्यांनी ते टाकले; तेव्हा माशांच्या घोळक्यामुळे ते त्यांना ओढवेना.”—योहान २१:५, ६.

१२ केवढा आश्‍चर्यचकित करणारा अनुभव! शिष्यांना लगेच आधीचा माशांचा घडलेला चमत्कार आठवला असावा, किंवा त्यापैकीच्या निदान एकाने तरी ती आकृति कोण आहे हे लगेच ओळखले असावे. “ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणालाः ‘प्रभु आहे, प्रभु आहे!’ हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेला गुंडाळला, कारण तो उघडा होता, आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत ओढीत होडीतून आले, कारण ते काठापासून दूर नव्हते; ते सुमारे दोनशे हातांवर [३०० फूट] होते.”—योहान २१:७, ८.

१३. येशूचे स्वर्गारोहण झाल्यावर आंतरराष्ट्रीय मासेमारीच्या कोणत्या कार्यक्रमास सुरवात झाली?

१३ या चमत्काराने काय सूचित केले? हेच की, माणसे धरण्याच्या कामात खंड पडला नाही. येशूने जेव्हा पेत्राला तीन वेळा—व त्याच्याद्वारे इतर सर्व शिष्यांना—येशूच्या मेंढरांना पाळण्यास बजावले तेव्हा अधिक जोर दिलेला आढळतो. (योहान २१:१५-१७) होय, आध्यात्मिक भरवणूकीचा कार्यक्रम पुढे उभा होता. आपल्या मृत्युआधी त्याने हे भाकित केले होतेः “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवितील.” (मत्तय २४:१४) आता त्या भविष्यवादाची प्राथामिक पूर्णता पहिल्या शतकात होण्याची वेळ आली होती. त्याचे शिष्य मानवजातीच्या समुद्रात आपली जाळी टाकण्याच्या तयारीत होते; त्यांची जाळी तशीच रिकामी परत वर येणार नव्हती.—मत्तय २८:१९, २०.

१४. यरुशलेमाचा नाश होण्याच्या आधीच्या वर्षात येशूच्या अनुयायांचे मासेमारीचे कार्य कोणत्या प्रकाराने आशीर्वादित झाले?

१४ स्वर्गातील आपल्या पित्याच्या राजासनाकडे जाण्याआधी येशूने आपल्या अनुयायांना म्हटले होतेः “पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमात, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रे. कृत्ये १:८) इ. स. ३३च्या पेंटेकॉस्टच्या वेळी शिष्यांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव करण्यात आला तेव्हापासून आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक मासेमारीच्या कामास सुरवात झाली. पेंटेकॉस्टच्या दिवशीच तीन हजार जिवंत जीव धरण्यात आले व त्यानंतर “पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार झाली.” (प्रे. कृत्ये २:४१; ४:४) वाढ होतच राहिली. अहवाल आम्हाला सांगतोः “विश्‍वास धरणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांचा समुदाय उत्तरोत्तर प्रभूकडचा झाला.” (प्रे. कृत्ये ५:१४) लवकरच शोमरोन्यांनी सुवार्तेकडे लक्ष दिले व त्यानंतर थोड्याच अवकाशात बेसुंती मूर्तिपूजक विदेशी लक्ष देऊ लागले. (प्रे. कृत्ये ८:४-८; १०:२४, ४४-४८) पेंटेकॉस्टच्या साधारण २७ वर्षांनी प्रेषित पौलाने कलस्सै येथील ख्रिश्‍चनांना असे कळविले की, “सुवार्तेची सर्व सृष्टित घोषणा झाली” होती. (कलस्सैकर १:२३) खरेच, येशूच्या शिष्यांनी गालीलच्या पाण्यापासून दूरवरही मासेमारी केली होती. त्यांनी रोमी साम्राज्यात सर्वत्र पांगलेल्या यहूद्यांमध्ये याचप्रमाणे यहूद्देत्तर लोकांच्या असंभवनीय समुद्रातही आपली जाळी टाकली होती. आणि त्यांची जाळी भरून बाहेर आली. पहिल्या शतकातील गरजांच्या अनुषंगाने येशूने मत्तय २४:१४ मध्ये दिलेल्या भविष्यवादाची यरुशलेमाचा इ. स. ७० मध्ये नाश होण्याआधी पूर्णता झाली.

“प्रभूच्या दिवसात” माणसे धरणे

१५. प्रकटीकरणाच्या पुस्तकात कोणत्या पुढील मासेमारीच्या कामाचे भाकित करण्यात आले व ते केव्हा पूर्ण होणार होते?

१५ तथापि, अधिक गोष्टी घडायच्या होत्या. पहिल्या शतकाच्या अंतास यहोवाने, तोपर्यंत हयात असलेल्या प्रेषित योहानास “प्रभूच्या दिवसात” घडणाऱ्‍या गोष्टींचे प्रकटीकरण पुरविले. (प्रकटीकरण १:१, १०) त्यातील एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्वरुपाचे महान सुवार्ता प्रचारकार्य. आम्ही वाचतोः “मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला, त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणारे जन म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोक यांना सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती.” (प्रकटीकरण १४:६) दिव्यदूतांच्या मार्गदर्शनाखाली देवाचे सेवक, केवळ रोमी प्रांतातच नव्हे तर सबंध निवासी पृथ्वीवर सुवार्तेच्या प्रचाराचे काम अक्षरशः करणारे होते. जिवांना जिवंत पकडण्याचे गोलार्धव्याप्त काम हाती घ्यायचे होते, आणि त्या दृष्टांताची आज, आमच्या काळी पूर्णता होत असल्याचे दिसत आहे.

१६, १७. नंतरच्या काळातील आध्यात्मिक मासेमारीचे काम कधी सुरु झाले, आणि यहोवाने त्याच्यावर आपला कसा आशीर्वाद दिला?

१६ या विसाव्या शतकात हे मासेमारीचे काम कोठवर आले? सुरवातीला खूपच कमी कोळी होते. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या शेवटानंतर सुवार्तेचा प्रचार करणारे इर्षावान पुरुष व स्त्रिया मिळून केवळ चार हजार क्रियाशील प्रचारक होते. हे जवळजवळ सर्व अभिषिक्‍त होते. जेथे कोठे यहोवाने त्यांच्यासाठी मार्ग उघडा केला, तेथे त्यांनी आपली जाळी टाकली व अनेक जिवंत जिवांना पकडले. दुसऱ्‍या जागतिक महायुद्धानंतर यहोवाने मासेमारीसाठी नव्या पाण्याची सोय केली. वॉचटावर बायबल स्कूल ऑफ गिलियड मधून प्रशिक्षित झालेल्या मिशनऱ्‍यांनी पुष्कळ देशात आघाडीने कार्य केले. जपान, इटली आणि स्पेनसारखी क्षेत्रे सुरवातीला उजाड अशी दिसली, पण यात नंतर ओघाओघाने जिवांची समृद्ध कापणी मिळाली. आम्हाला नुकतेच कळाले आहे की, पूर्व युरोपात देखील मासेमारीचे कार्य केवढ्या यशस्वी रितीने होत आहे.

१७ आज, अनेक देशात जाळी जणू फाटत आहेत. जिवांची एवढी मोठी कापणी मिळाल्यामुळे नव्या मंडळ्या व विभाग संघटित करण्याची गरज पडली. या सर्वांची गरज भागवण्यासाठी सर्व भागात सतत नवीन राज्य सभागृहे व संमेलन सभागृहांची बांधणी करण्यात येत आहेत. या वाढीची काळजी करण्यासाठी अधिक वडील व उपाध्य सेवक यांची गरज आहे. मागे १९१९ मध्ये त्या विश्‍वासू जनांमार्फत एक बलाढ्य कार्य सुरु झाले. यशया ६०:२२ची अक्षरशः पूर्णता झालेली आहे. ‘जो सर्वात लहान त्याचे सहस्र झाले आहेत.’ कारण त्या चार हजार कोळ्यांचे आता चाळीस लक्षांपेक्षा अधिक कोळी बनले आहेत. पण अद्याप शेवट आलेला नाही.

१८. पहिल्या शतकातील आध्यात्मिक कोळ्यांचे सुंदर उदाहरण आपल्याला कसे अनुसरता येईल?

१८ या सर्व गोष्टींचा आम्हासाठी वैयक्‍तीकपणे काय अर्थ होतो? पेत्र, आंद्रिया, याकोब व योहान यांना माणसे धरणारे बनण्यास आमंत्रित करण्यात आले तेव्हा शास्त्रवचने म्हणतात की, “त्यांनी सर्व सोडून देऊ ते [येशूचे] अनुयायी झाले.” (लूक ५:११) विश्‍वास व समर्पणाचे हे केवढे उत्तम उदाहरण! आम्हीही, यहोवाची सेवा करण्याची आतुरता, मग ती कोणाही किंमतीस असो, प्रदर्शित करण्यासाठी अशाच प्रकारचा आत्मनिग्रही आत्मा दाखवू शकतो का? करू शकतो, असे लक्षावधींनी प्रत्यत्तर केले. पहिल्या शतकातील शिष्यांनी, यहोवाने त्यांना जेथे जेथे अनुज्ञा दिली तेथे माणसे धरण्याचे काम केले. ते यहूद्यात असो की, विदेश्‍यात; त्यांनी काहीही अट न ठेवता आपली लाक्षणिक मासेमारी केली. या, आपण देखील कोणताही निर्बंध किंवा अहंमन्यता न राखता प्रत्येकाला प्रचार करू.

१९. आपण जेथे मासेमारी करीत आहोत तेथील पाणी फलदायी दिसत नसल्यास काय करावे?

१९ पण, जर तुमचे सध्याचे क्षेत्र निष्फळ असल्याचे वाटत असेल तर काय? निराश होऊ नका. हे आठवा की, शिष्यांनी रात्रभर कष्ट करून देखील काही मिळवले नव्हते तेव्हा येशूने त्यांची जाळी भरून टाकली. हेच आध्यात्मिक मार्गाने होऊ शकते. उदाहरणार्थ, आयर्लंडबद्दल पाहू जाता, तेथे विश्‍वासू साक्षीदारांनी अनेक वर्षे कष्ट उपसले, तरी मोजकेच प्रतिफळ होते. पण यात अलिकडे बदल झाला. यहोवाच्या साक्षीदारांचे १९९१चे वार्षिक अहवाल पुस्तक म्हणते की, १९९० च्या सेवा वर्षाचा शेवट होईपर्यंत आयर्लंडने सलग २९ उच्चांक गाठले! कदाचित, आज ना उद्या, तुमचेही क्षेत्र असेच फलदायी बनण्याचा संभव आहे. तेव्हा, यहोवा या कार्यास अनुज्ञा देत आहे तोवर आपली ही मासेमारी करीत राहा!

२०. माणसांची मासेमारी करण्यासाठी आम्ही केव्हा जावे?

२० इस्राएलातील कोळी, इतर सर्व लोक उबदार बिछान्यात आराम करीत होते त्या रात्रीच्या वेळी मासेमारी करीत. ते आपल्या सोईस्कर वेळी नव्हे, तर ज्यावेळी अधिक मासे मिळू शकतील अशावेळी बाहेर पडत. याचप्रमाणे आम्हीही आमच्या क्षेत्राचा वेध घ्यावा व अशावेळी तेथे जावे की, आम्हाला अधिक लोक भेटतील व आमचे स्वागत होईल. हे कदाचित सायंकाळच्या वेळी, किंवा आठवड्याच्या शेवटाला किंवा इतर कोणाही वेळी करू शकतो. ते कोणाही वेळी असो, आम्ही चांगल्या अंतःकरणाच्या लोकांना मिळवून घेण्यास सर्वकाही पणाला लावून करू.

२१. आमचे क्षेत्र अनेक वेळा कार्य झालेले असल्यास आम्ही काय लक्षात ठेवले पाहिजे?

२१ पण तेच, आमचे क्षेत्र अनेकदा उरकण्यात आले असेल तर काय? जगातील व्यावसायिक कोळी ही तक्रार करीत असतात की, मासेमाराचा त्यांचा परिसर माशांविना ओसाड झाला आहे. पण, आमचा आध्यात्मिक मासेमारीचा परिसर देखील असाच ओसाड असू शकतो का? कधीच नाही. अनेक क्षेत्रभागांचा वेळोवेळी उरक होऊन देखील तेथे वाढ हाती आली आहे. काही क्षेत्रांवर तर चांगले काम केल्यामुळे चांगले फळ दिले. यास्तव, घरोघरी अनेक वेळा भेटी दिल्या जातात तेव्हा ज्या घरात पूर्वी कोणी नसल्यामुळे भेट देता आली नाही अशांची भेट घेण्याची खात्री असू द्या. संभाषणाचे विविध विषय शिकून घ्या. हे लक्षात असू द्या की, आपल्या मागून लवकरच कोणी तरी तेथे भेट देणार असेल, म्हणून ज्या घरी बसण्यास बोलावले आहे तेथे वेळ काढत बसू नका किंवा घरमालकाचा रोष अजाणपणे आपणावर ओढवून घेऊ नका. तसेच रस्त्यावरील साक्षीकार्य व अनौपचारिक साक्ष सफाईने देण्याची कुशलता मिळवा. तुमची आध्यात्मिक जाळी हरप्रसंगी व शक्यतो हर मार्गाने टाकत राहा.

२२. या काळी आम्ही कोणत्या भव्य हक्काचा अनुभव घेत आहोत?

२२ ही अशी मासेमारी आहे, ज्यामध्ये कोळ्यांचा तसेच माशांचाही फायदा होत असतो, हे लक्षात ठेवा. आम्ही धरतो ते जीव टिकून राहिले तर तेही सर्वकाळ जिवंत राहू शकतील. पौलाने तीमथ्याला हे उत्तेजन दिले होतेः “त्यातच टिकून राहा; कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्‍याचेही तारण करशील.” (१ तीमथ्य ४:१६) येशूने आपल्या शिष्यांना आध्यात्मिक मासेमारी करण्याची तालीम देण्यास सुरवात केली होती. आजही ही आध्यात्मिक मासेमारी येशूच्या मार्गदर्शनाखाली चालविली जात आहे. (पडताळा प्रकटीकरण १४:१४-१६.) हे काम त्याच्या वर्चस्वाखाली उरकण्याचा केवढा मोठा हक्क आम्हाला मिळाला आहे! या कारणास्वत, यहोवा परवानगी देत आहे तोवर आपण आपली जाळी खाली सोडू या. कारण जिवंत जिवांना धरणे यापेक्षा अधिक महत्त्वाचे असे दुसरे कोणते काम असू शकेल बरे?

तुम्हाला आठवते का?

▫ येशूने आपल्या शिष्यांना कोणते काम करण्याची तालीम दिली होती?

▫ आपल्या मृत्युसोबत आध्यात्मिक मासेमारीचे काम संपुष्टात येऊ शकणार नाही हे येशूने कसे दाखवले?

▫ पहिल्या शतकात यहोवाने आध्यात्मिक मासेमारीच्या कामावर कसा आशीर्वाद पाठवला?

▫ “प्रभूच्या दिवसात” माशांचा कोणता समृद्ध हंगाम जाळ्यात आला?

▫ आपण व्यक्‍तिगतरित्या मनुष्यांस धरणाऱ्‍यांमध्ये अधिक यशस्वी कसे होऊ शकतो?

[१७ पानांवरील चित्रं]

येशूच्या पुनरुत्थानानंतर त्याच्या प्रेषितांनी माणसे धरणाऱ्‍यांच्या ईश्‍वरी कामास पुढे नेले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा