आपल्या ख्रिस्ती स्वातंत्र्याचा सूज्ञपणे उपयोग करा
“तुम्ही स्वतंत्र असा, आणि आपली स्वतंत्रता देवाचे दास असण्याच्या कामी उपयोगात आणा.”—१ पेत्र २:१६, न्यू.व.
१. आदामाने कोणते स्वातंत्र्य गमावले, आणि कोणत्या स्वातंत्र्यामध्ये यहोवा मानवजातीची पुनर्स्थापना करील?
आमच्या पहिल्या पालकांनी एदेन बागेत पाप केले तेव्हा त्यांनी आपल्या मुलांसाठी वडिलोपार्जित हक्क गमावला—पाप व भ्रष्टता यापासून मुक्तता. यामुळे आमचा जन्म भ्रष्टता व मृत्यु यामध्ये झाला. तथापि, विश्वासू मानवांची अद्भूत मुक्तता करावी असे यहोवाने उद्देशिले आहे ते आनंदाचे आहे. आज, सरळ हृदयाचे लोक मोठ्या उत्कंठेने “देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची” वाट पाहात आहे. यामुळे ते “स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन [त्यांना] देवाच्या लेकरांची गौरवयुक्त मुक्तता मिळेल.”—रोमकर ८:१९-२१.
‘प्रचार करण्यास अभिषेक झालेले’
२, ३. (अ) ‘देवाचे पुत्र’ कोण आहेत? (ब) ते आता कोणते अद्भूत स्थान अनुभवीत आहेत, आणि यामुळे त्यांच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या आहेत?
२ हे ‘देवाचे पुत्र’ कोण आहेत? ते आत्म्याने अभिषिक्त असणारे येशूचे बांधव आहेत, जे त्याच्या स्वर्गीय राज्यात त्याच्यासोबत अधिपती असतील. यापैकीच्या पहिल्या सदस्यांचे आगमन पहिल्या शतकात झाले. येशूने शिकविलेले स्वतंत्र करणारे सत्य त्यांनी स्वीकारले, आणि इ. स. ३३च्या पेंटेकॉस्टपासून पुढे त्यांनी अशा वैभवी हक्काचा सहभाग घेतला ज्याबद्दल पेत्राने काही म्हटले होते. त्याने असे लिहिलेः “तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक’ असे आहा.”—१ पेत्र २:९अ; योहान ८:३२.
३ देवाचा खास निधि असणे हा केवढा अद्भूत आशीर्वाद आहे! देवाच्या या अभिषिक्त पुत्रांपैकीचे आजचे अवशिष्ट देवासोबतचे तेच आशीर्वादित स्थान आज अनुभवीत आहेत. पण या उच्च हक्कासोबत जबाबदाऱ्याही येतात. यापैकीच्या एका जबाबदारीकडे पेत्राने लक्ष आकर्षित केले व म्हटलेः “ज्याने तुम्हास अंधःकारातून काढून अद्भूत प्रकाशात पाचारण केले त्याचे ‘गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.’”—१ पेत्र २:९ब.
४. ख्रिस्ती स्वातंत्र्यासोबत येणारी जबाबदारी अभिषिक्त ख्रिश्चनांनी कशी पूर्ण केली आहे?
४ या अभिषिक्त ख्रिश्चनांनी देवाचे गुण प्रसिद्ध करण्याची जबाबदारी पूर्ण केली का? होय. १९१९ पासूनच्या अभिषिक्तांबद्दल भाष्य करताना यशयाने भविष्यवादितपणे असे म्हटलेः “प्रभु परमेश्वराचा [यहोवा, न्यू.व.] आत्मा मजवर आला आहे, कारण दीनांस शुभवृत्त सांगण्यास, भग्नहृदयी जनांस पट्टी बांधावी, धरुन नेलेल्यांस मुक्तता व बंदिवानांस बंधमोचन विदित करावे; परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा म्हणून परमेश्वराने [यहोवा, न्यू.व.] मला अभिषेक केला आहे.” (यशया ६१:१, २) आज अभिषिक्त शेष येशूचे उदाहरण अनुसरत आहेत; यांनाच मुक्ततेची सुवार्ता इतरांना आवेशाने घोषित करण्याबद्दलची शास्त्रवचने प्रामुख्याने लागू होतात.—मत्तय ४:२३-२५; लूक ४:१४-२१.
५, ६. (अ) अभिषिक्त ख्रिश्चनांच्या उत्साहपूर्ण प्रचारामुळे काय घडले? (ब) मोठ्या लोकसमुदायाचे लोक कोणता हक्क व जबाबदाऱ्या अनुभवीत आहेत?
५ त्यांच्या आवेशी प्रचार कार्यामुळे अलिकडील दिवसात दुसरी मेंढरे यांचा एक मोठा लोकसमुदाय सामोरा येऊ शकला. यहोवाची सेवा अभिषिक्तांसोबत करण्यासाठी ते सर्व राष्ट्रांमधून पुढे आले आहेत; आणि यांनाही सत्याने स्वतंत्र केलेले आहे. (जखर्या ८:२३; योहान १०:१६) अब्राहामाप्रमाणे हेही विश्वासाद्वारे नीतीमान ठरवले जातात आणि यहोवा देवासोबत अधिक जवळच्या नातेसंबंधात येतात. शिवाय राहाबाप्रमाणे हे नीतीमान ठरल्यामुळे आता ते बचावासाठी तयार झालेले आहेत. हा त्यांचा बचाव हर्मगिदोनातून होईल. (याकोब २:२३-२५; प्रकटीकरण १६:१४, १६) अशा स्वरुपाचा उच्च प्रकारातील हक्क देखील देवाच्या गौरवाबद्दल इतरांना सांगण्याची जबाबदारी पुढे ठेवतो. आणि याच कारणास्तव योहानाने यांना यहोवाची जाहीरपणे स्तुति करीत असलेले बघितले. तो म्हणतो की, ते “उच्च वाणीने म्हणत होतेः ‘राजासनावर बसलेल्या आमच्या देवाचा व कोकऱ्याचा तारणाबद्दल महिमा होवो.’”—प्रकटीकरण ७:९, १०, १४.
६ आता चाळीस लाखांपेक्षा पुढे असलेला मोठा लोकसमुदायाने अभिषिक्त ख्रिश्चनांच्या उरलेल्या छोट्या गटासोबत मिळून गेल्या वर्षी जवळपास दहा कोटी तास यहोवाचे गुण इतरांना प्रसिद्ध करण्यात खर्च केले. त्यांना मिळालेल्या आध्यात्मिक स्वातंत्र्याचा हा सर्वतोपरि चांगला वापर होता.
“राजाला मान द्या”
७, ८. ख्रिस्ती स्वातंत्र्य प्रापंचिक अधिकाऱ्यांबद्दलची कोणती जबाबदारी सामोरी आणते, आणि आम्ही याबाबतीत कोणती चुकीची मनोवृत्ती टाळली पाहिजे?
७ आमचे ख्रिस्ती स्वातंत्र्य आम्हावर इतरही जबाबदाऱ्या लादते. यापैकीच्या काहींचा निर्देश पेत्राने लिहिताना असा केलाः “सर्वांस मान द्या, बंधुवर्गावर प्रीती करा, देवाचे भय धरा, राजाला मान द्या.” (१ पेत्र २:१७) तेव्हा, “राजाला मान द्या” या उद्गारांचा काय अर्थ होतो?
८ येथे “राजा” प्रापंचिक अधिपतींचे प्रतिनिधत्व करतो. आज जगात अधिकारपदास अनादर व्यक्त करण्याचा आत्मा वाढलेला आहे आणि याचा परिणाम ख्रिश्चनांवर देखील अगदी सहजपणे होऊ शकतो. वास्तविक पाहता, “सगळे जग त्या दुष्टाच्या अधीन” असल्यामुळे आपण “राजा”ला का मान द्यावा याचे त्याला आश्चर्य वाटू लागले. (१ योहान ५:१९) यामुळेच त्याला स्वतःला सोयीस्कर न वाटणारे कायदे न मानण्याचा आणि लक्षात येत नसेल तर कर चुकविण्याचाही मोह होऊ शकेल. पण हे तर येशूने दिलेल्या आज्ञेच्या की, “कैसराचे कैसराला . . . द्या” याच्या विरुद्ध आहे. तसे केल्यामुळे ‘आपली स्वतंत्रता ही दुष्टपणाचे झाकण करीत आहे’ असा याचा अर्थ होईल.—मत्तय २२:२१; १ पेत्र २:१६.
९. प्रापंचिक अधिकारास आज्ञाधारक असण्याची दोन चांगली कारणे कोणती आहेत?
९ ख्रिश्चनांनी सापेक्षरित्या का होईना, पण अधिकारास मान दिला पाहिजे व त्याच्या अधीन असले पाहिजे. (प्रे. कृत्ये ५:२९) ते का? प्रेषित पेत्र याबद्दलची तीन कारणे देतो. तो म्हणतो की, सरकार हे “वाईट करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी व चांगले करणाऱ्यांची स्तुति करण्यासाठी [देवाने] पाठविलेले” असे आहेत. शिक्षेचे भय हेच अधिकाराची आज्ञा मानण्यास पुरेसे आहे. हल्ला, चोरी, किंवा इतर काही गुन्ह्यामुळे कोणा यहोवाच्या साक्षीदाराला दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होणे ही किती लज्जास्पद गोष्ट आहे! काहींना अशी बातमी प्रसिद्ध करण्यात केवढा आनंद होईल याचा जरा विचार करा. उलटपक्षी, मुलकी कायद्यांना आज्ञाधारक आहोत ही ख्याति वाढवल्यामुळे सोज्वळ मनाच्या प्रशासकांकडून आपल्याला स्तुति मिळू शकते. यामुळे आमचे सुवार्ता प्रचाराचे काम करण्याची अधिक मुक्तता आम्हास मिळू शकते. याशिवाय, ‘चांगले करण्याने निर्बुद्ध मनुष्यांच्या अज्ञानाला आम्ही कुंठित करतो.’ (१ पेत्र २:१५ब) अधिकाऱ्यांची आज्ञा मानण्याचे हे दुसरे कारण आहे.—रोमकर १३:३.
१०. प्रापंचिक अधिकाराची आज्ञा मानण्याचे कोणते जोरदार कारण आहे?
१० पण आणखी एक जोरदार कारण आहे. हे अधिकारी यहोवाच्या परवानगीमुळेच अस्तित्वात आहेत. पेत्र म्हणतो त्याप्रमाणे राजकीय अधिपती यहोवाने “पाठविलेले” आहेत आणि ख्रिश्चनांनी त्यांना आज्ञांकित असावे अशी “देवाची इच्छा” आहे. (१ पेत्र २:१५अ) तसेच प्रेषित पौल देखील म्हणतोः “जे अधिकारी आहेत ते त्यांच्या सापेक्ष पदी देवाने नेमिलेले आहेत.” या कारणास्तव आमचा पवित्र शास्त्रीय प्रशिक्षित विवेक अधिकाऱ्यांना आज्ञांकित राहण्याची चालना देतो. आम्ही त्यांना अधीन राहण्याचे नाकारल्यास आपण “देवाच्या व्यवस्थेला आड” होतो असे ते होते. (रोमकर १३:१, २, ५) आमच्यापैकी कोणाला देवाच्या व्यवस्थेच्या विरुद्ध उभे राहण्याची इच्छा आहे? ते ख्रिस्ती स्वातंत्र्याचा केवढा गैरवापर करण्यासारखे असेल!
“बंधुवर्गावर प्रीती करा”
११, १२. (अ) ख्रिस्ती स्वातंत्र्यासोबत समविश्वासूंबद्दल कोणती जबाबदारी येते? (ब) कोण आमच्या प्रेमळ सहानुभूतिला खासपणे पात्र आहेत व का?
११ ख्रिश्चनांनी “बंधुवर्गावर प्रीती करा”वी असेही पेत्राने म्हटले आहे. (१ पेत्र २:१७) ही ख्रिस्ती स्वातंत्र्यासोबत येणारी आणखी एक जबाबदारी आहे. आम्ही सर्वजण कोणा ना कोणा मंडळीशी संबंधित आहोत. खरे म्हणजे आपण सर्व आंतरराष्ट्रीय सहवास किंवा बांधवांच्या संघटनेचे सदस्य आहोत. यांच्याबद्दल प्रीती दाखवावी हा आमच्या स्वातंत्र्याचा चांगला उपयोग आहे.—योहान १५:१२, १३.
१२ प्रेषित पौलाने ख्रिश्चनांच्या एका गटास खासपणे वेगळे करून म्हटले की तो आमच्या खास प्रेमाचा हक्कदार आहे. त्याने म्हटलेः “तुम्हामध्ये नेतृत्व करणाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे असे समजून ते तुमच्या जिवांकरिता जागृत राहतात; हे त्यांनी आनंदाने करावे, शोकाने करू नये; हे शोकाने करणे तुम्हास हितकारक नाही.” (इब्रीयांस १३:१७) मंडळीत नेतृत्व करणारे वडील आहेत. हे खरे की ही माणसे परिपूर्ण नाहीत. असे असले तरीही, यांची नियमन मंडळाच्या देखरेखीखाली नियुक्ति करण्यात आली आहे. ते उदाहरण तसेच विचारशीलता याद्वारे नेतृत्व करतात आणि यांना आमच्या जिवांची राखण करण्याची नेमणूक आहे. केवढी ही महत्त्वाची जबाबदारी! (इब्रीयांस १३:७) मंडळ्यात एकंदरीत चांगला सहकार्याचा आत्मा दिसत आहे हे आनंदाचे आहे, त्यामुळेच वडिलांना त्यांच्यासोबत काम करण्यात आनंद वाटतो. पण जेव्हा कोणी विशिष्ट सहकार्य देण्याची इच्छा दाखवीत नाही तेव्हा ते खूप कठीण होते. यावेळीही वडील आपले काम करतो, पण पौल म्हणतो की ते तो “दुःखाने” करतो. वडीलांनी दुःखी व्हावे अशी आम्हाला कोणालाही निश्चितपणे वाटणार नाही. त्यांनी आपल्या कामात आनंद मिळवावा व याद्वारे त्यांनी आमची उभारणी करावी हीच आमची इच्छा आहे.
१३. आम्हाला वडिलांना सहकार्य देता येईल असे कोणते मार्ग आहेत?
१३ आम्हाला वडिलांना सहकार्य देता येईल असे कोणते मार्ग आहेत? एक मार्ग म्हणजे आमच्या राज्य सभागृहाची स्वच्छता व नीटनेटकेपणाला मदत करणे. दुसरा मार्ग हा की, आजारी आणि अपंग असणाऱ्यांना भेटी देण्याच्या कामात सहकार्य देणे. याखेरीज, आम्ही स्वतः आध्यात्मिक रितीने बळकट असण्यास हवे की, ज्यामुळे आम्ही भार बनणार नाहीत. मंडळीची नैतिक तसेच आध्यात्मिक शुद्धता राखण्यामध्ये सहकार्य देणे हे देखील महत्त्वाचे क्षेत्र आहे. हे आपली वागणूक व्यवस्थित ठेवून व आमच्या लक्षात आलेल्या गंभीर प्रकरणांची माहिती कळवून साध्य करता येईल.
१४. वडिलांनी घेतलेल्या शिस्तबद्ध कृतिसंबंधाने आपल्याला कसे सहकार्य देता येईल?
१४ मंडळीची शुद्धता राखण्यासाठी वडीलांना कधीकधी पश्चातापी नसणाऱ्या अपराध्याला मंडळीतून बहिष्कृत करावे लागते. (१ करिंथकर ५:१-५) हे मंडळीचे संरक्षण करते. त्यामुळे अपराध्यालाही मदत मिळू शकते. अशा या शिस्तीमुळे अपराध्याला सुबुद्धि मिळते. पण समजा, बहिष्कृत झालेला कोणी जवळचा मित्र किंवा नातेवाईक असल्यास काय? तसेच ही व्यक्ति आमचा बाप, आई, मुलगा किंवा मुलगी असेल तर काय? अशा वेळीही आम्ही वडिलांनी आचरलेली कृति स्वीकारू का? ते कठीण असेल हे खरे आहे. पण तेच वडिलांच्या कृतीला आव्हान करणे आणि जो मंडळीसाठी भ्रष्टावणारा प्रभाव असल्याचे सिद्ध झाले आहे अशा व्यक्तिसोबत सहवास ठेवून असणे हे आमच्या स्वातंत्र्याचा केवढा गैरवापर असेल! (२ योहान १०, ११) याबाबतीत जे सहकार्य मिळत आहे त्याबद्दल एकंदरीत यहोवाच्या लोकांची प्रशंसा केली पाहिजे. अशामुळेच या अशुद्ध जगात यहोवाची संस्था निष्कलंक राहते.—याकोब १:२७.
१५. कोणी गंभीर पातक केले असल्यास लगेच काय करण्यास हवे?
१५ पण आम्हीच स्वतः गंभीर पातक केले तर काय? यहोवाची कृपापसंती ज्याच्यावर राहते त्याबद्दल दाविदाने सांगितले आहे. त्याने म्हटलेः “परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] गिरीवर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आणि मन [“अंतःकरण,” न्यू.व.] शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावीत नाही व कपटाने शपथ वाहत नाही तो.” (स्तोत्रसंहिता २४:३, ४) काही कारणामुळे ‘आमचे हात स्वच्छ आणि आमचे अंतःकरण शुद्ध’ राहिले नसेल तर आम्ही तातडीने हालचाल केली पाहिजे. आमचे सार्वकालिक जीवन पणाला लागले आहे.
१६, १७. गंभीर पापाचे दोषी असणाऱ्यांनी ते प्रकरण स्वतःच का हाताळण्याचा प्रयत्न करू नये?
१६ काहींना आपले गंभीर पाप लपवण्याचा मोह झाला असेल. अशांनी स्वतःला म्हटले असेलः ‘मी तर यहोवाला आपले पाप कबूल केले आहे व पश्चाताप दाखवला आहे. तर मग, यात वडिलांना का समाविष्ट करावे?’ वडील जे काही करतील त्याबद्दल त्या अपराध्याला भीती किंवा अचंबीत झाल्याचे वाटायला लागले असेल. तथापि, त्याने हे लक्षात ठेवण्यास हवे की, जरी केवळ यहोवा आमची पापे पुसून टाकू शकत असला तरी त्यानेच मंडळीच्या शुद्धतेसाठी वडिलांना प्रामुख्यत्वे जबाबदार धरले आहे. (स्तोत्रसंहिता ५१:२) ते तेथे बरे तेच करण्यास, “पवित्र जनांची पूर्णता” [“पुनर्व्यवस्था,” न्यू.व.] करण्यास आहे. (इफिसकर ४:१२) आम्हाला आध्यात्मिक मदतीची गरज असताना त्यांच्याकडे न जाणे हे आजारी असताना डॉक्टरांकडे न जाण्यासारखे आहे.
१७ जे कोणी स्वतःच प्रकरणे हाताळण्याचा प्रयत्न करतात अशांना आपला विवेक काही महिने किंवा वर्षे निघून गेली तरी भयंकरपणे सतावीत असल्याचे दिसते. यापेक्षा वाईट ते हे की, ते दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा त्याच पापात पडतात. शेवटी जेव्हा वडिलांच्या निदर्शनास हे प्रकरण येते तेव्हा ते पुन्हापुन्हा आचरलेले दुष्कर्म बनलेले असते. यासाठीच, याकोबाचा सल्ला अनुसरणे किती चांगले आहे! त्याने लिहिलेः “तुम्हापैकी कोणी दुखणाईत आहे का? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे; आणि त्यांनी प्रभूच्या [यहोवा, न्यू.व.] नामाने त्याला तेल लावावे व त्याजवर ओणवून प्रार्थना करावी.” (याकोब ५:१४) बरे होण्याची अद्याप वेळ असतानाच वडिलांकडे जा. आपण बरेच थांबून राहिलो तर कदाचित पापाचरण करण्यात कठीण बनू.—उपदेशक ३:३; यशया ३२:१, २.
स्वरुप व करमणूक
१८, १९. एका पाळकांनी यहोवाच्या साक्षीदारांबद्दल प्रशंसोद्गार का काढले होते?
१८ पाच वर्षांआधी एका चर्च मासिकात इटलीतील एका कॅथोलिक पाळकाने यहोवाच्या साक्षीदारांविषयी उबदार बोलणी केली.a त्यांनी म्हटलेः “यहोवाचे साक्षीदार व्यक्तिशः मला आवडतात. मी हे स्पष्टच सांगतो. . . . माझ्या परिचयाचे असणारे शिष्टाचारी, सौम्य भाषण करणारे . . . [आणि] अधिक मन वळविणारे आहेत. सत्याला अशी स्वीकारणीय सादरता हवी असते हे आम्हाला केव्हा कळणार? सत्याची घोषणा करणाऱ्यांनी अर्धवट, घाण वास येणारे, पिंजारलेल्या केसांचे असू नये.”
१९ या शब्दांवरुन दिसते की, इतर गोष्टींसमवेत पाळकांना यहोवाच्या साक्षीदारांबद्दल, ते जी वेशभूषा करतात व स्वतःला सादर करतात त्याबद्दल आत्मीयता वाटली होती. त्यांना ज्यांनी ज्यांनी भेटी दिल्या अशांनी “विश्वासू व बुद्धिमान दास” याने कित्येक वर्षांपासून ज्या सूचना दिल्या त्या श्रवण केल्या होत्या. (मत्तय २४:४५) पवित्र शास्त्र म्हणते की, स्त्रियांचा पेहराव “भिडस्तपणाने व मर्यादेने” साजेसा असावा. (१ तीमथ्य २:९) सध्याच्या अवनत काळी ही सूचना पुरुषांसाठीही लागू आहे. देवाच्या राज्याच्या प्रतिनिधींनी स्वतःला बाहेरील लोकांपुढे सभ्यतेने सादर करावे हे व्यवहार्य नाही का?
२०. एखाद्या ख्रिश्चनाने आपल्या पेहरावाच्या बाबतीत सर्वदा का दक्ष असावे?
२० काही म्हणतील की, सभा व क्षेत्रकार्यात त्यांनी आपला पेहराव कसा असतो याची काळजी घेतलीच पाहिजे, पण ही पवित्र शास्त्रीय तत्त्वे इतर वेळी लागू होत नाही असे त्यांना वाटत असेल. मग, याचा अर्थ आम्ही देवाच्या राज्याचे प्रतिनिधी राहण्याचे अशावेळी थांबवत असतो का? परिस्थिती भिन्न असू शकते हे मान्य आहे. आपण राज्य सभागृह उभारणीच्या कामात मदत करीत असताना आमचा पेहराव, आम्ही त्याच राज्य सभागृहात सभांना उपस्थित राहतेवेळी घातलेल्या पेहरावापेक्षा भिन्न असू शकेल. आपण आराम करतो तेव्हा अधिक आरामशीर पद्धतीने कपडे घालून असतो. पण जेव्हा जेव्हा लोक आम्हाला बघतात तेव्हा तेव्हा आमचा पेहराव सुव्यस्थित व सभ्य असावा.
२१, २२. घातक करमणूकीपासून आमचे रक्षण कसे करण्यात आले आहे, आणि अशा प्रकरणांबद्दल जेव्हा आम्हाला सूचना मिळते तेव्हा आमचा दृष्टिकोण कसा असावा?
२१ आणखी एक असे क्षेत्र आहे, ज्याकडे अधिक लक्ष दिले जाते व ते म्हणजे, करमणूक. लोकांना व खासपणे तरुणांना करमणूक आवडते. कुटुंबासाठी आरामाची आयोजना करणे हे काही पाप नाही किंवा वेळेचा अपव्ययही नाही. येशूने देखील आपल्या शिष्यांना “थोडा विसावा घ्या,” असे म्हटले होते. (मार्क ६:३१) पण ही करमणूक आध्यात्मिक किडेला उत्पन्न करीत नाही याची दक्षता घ्या. आपण आज अशा जगात जगत आहोत, जेथे करमणूक म्हणजे लैंगिक अनैतिकता, प्रचंड हिंसाचार, दहशत आणि भूतविद्या या गोष्टी भरपूर दिसतात. (२ तीमथ्य ३:३; प्रकटीकरण २२:१५) विश्वासू व बुद्धिमान दास अशा या धोक्यांच्या बाबतीत जागृत आहे व तो आम्हाला याबद्दल सतत ताकीद देत असतो. त्यांनी दिलेले स्मरण तुमच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण केल्यासारखे आहे असे तुम्हाला वाटते का? किंवा हे धोके सतत तुमच्या लक्षात आणून देण्याची काळजी यहोवाची संस्था करत आहे म्हणून तुम्ही याबद्दल कृतज्ञ आहात?—स्तोत्रसंहिता १९:७; ११९:९५.
२२ आम्हाला यहोवाकडून स्वातंत्र्य मिळत असले तरी त्याचा कसा वापर करतो त्याबद्दल आम्ही जबाबदार असतो हे लक्षात ठेवले पाहिजे. आपण चांगल्या सूचनेस धुडकावून लावून चुकीचे निर्णय घेतले तर त्याबद्दल इतरांना दोष देता येणार नाही. प्रेषित पौल म्हणतोः “आपणातील प्रत्येक जण स्वतःचा हिशेब देवाला देईल.”—रोमकर १४:१२; इब्रीयांस ४:१३.
देवाच्या मुलांची मुक्तता होण्याकडे उत्सुकतेने वाट बघा
२३. आम्ही खरेच आशीर्वादित लोक आहोत. आम्ही खोटा धर्म व अंधश्रद्धा यापासून मुक्त आहोत. खंडणी यज्ञापर्णाबद्दल आम्ही किती ऋणी आहोत, कारण यामुळे शुद्ध विवेकाने आम्हाला यहोवापाशी जाता येते आणि आध्यात्मिक रितीने पाप व मरण यांच्या दास्यातून मुक्त आहोत. लवकरच “देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची” वेळ येईल. हर्मगिदोनात येशूचे भाऊ त्यांच्या स्वर्गीय गौरवात, यहोवाच्या शत्रूंचे संहारक या नात्याने मानवांना प्रकट होतील. (रोमकर ८:१९; २ थेस्सलीनकाकर १:६-८; प्रकटीकरण २:२६, २७) यानंतर, हे देवपुत्र देवाच्या राजासनातून मानवजातीप्रत वाहणाऱ्या आशीर्वादांच्या माध्यमाच्या रुपात प्रकट होतील. (प्रकटीकरण २२:१-५) मग, देवाच्या पुत्रांचे हे प्रकट होणे विश्वासू मानवजातीच्या आशीर्वादामध्ये व देवाच्या लेकरांची गौरवयुक्त मुक्तता होण्यासाठी कारणीभूत ठरेल. अशा काळासाठी तुम्ही उत्कट आहात का? तर, तुम्ही आपल्या ख्रिस्ती स्वातंत्र्याचा सूज्ञपणे उपयोग करा. आत्ताच देवाचे दास व्हा आणि त्या अद्भूत स्वातंत्र्याचा सदासर्वदा आनंद घ्या!
[तळटीपा]
a पाळकांनी आपली ही प्रशंसा नंतर मागे घेतली, बहुधा दबाव पडल्यामुळे.
उजळणी चौकट
▫ अभिषिक्त आणि दुसरी मेंढरे यांनी यहोवाचे गौरव कसे केले आहे?
▫ ख्रिश्चनांनी प्रापंचिक अधिकाराचा का सन्मान केला पाहिजे?
▫ ख्रिश्चन कोणकोणत्या पद्धतीने वडिलांना सहकार्य देऊ शकतील?
▫ पेहरावाच्या बाबतीत यहोवाचे साक्षीदार जगातील पुष्कळांपेक्षा वेगळेच कसे व का दिसतात?
▫ करमणूकीच्या बाबतीत आम्ही कोणकोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?
२३. (अ) स्वातंत्र्याच्या अनुषंगाने आज आपण कोणते आशीर्वाद अनुभवीत आहोत? (ब) कोणत्या आशीर्वादांची आपण उत्कटतेने वाट बघून आहोत?
[१० पानांवरील चित्रं]
वडील हे खासपणे आमचे प्रेम व सहकार्य मिळण्याच्या पात्रतेचे आहेत
[११ पानांवरील चित्रं]
ख्रिश्चनाचा पेहराव सुव्यवस्थित, सभ्य आणि प्रसंगास अनुलक्षून असावा