मुक्त पण जबाबदार लोक
“तुम्हास सत्य समजेल व सत्य तुम्हास स्वतंत्र करील.”—योहान ८:३२.
१, २. (अ) मानवी इतिहासात स्वातंत्र्यासाठी काय काय झाले? (ब) कोण केवळ खऱ्या अर्थाने मुक्त आहे? विवेचीत करा.
स्वातंत्र्य. केवढा हा शक्तिशाली शब्द! मानवांनी स्वतंत्र असावे यासाठी मानवजातीने किती अगणित युद्धे, क्रांत्या तसेच मोजता येणार नाही इतक्या सामाजिक उलाढाली सहन केल्या. द एन्सायक्लोपिडिआ अमेरिकाना म्हणतोः ‘नागरी उत्थान होत असता स्वातंत्र्याइतका दुसरा कोणताही विचार इतकी महत्त्वपूर्ण भूमिका राखून नव्हता.’
२ तरीही, आज किती लोक खरेपणाने मुक्त आहेत? स्वातंत्र्य काय असते हे किती जणांना माहीत आहे? द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ म्हणतोः “लोकांना पूर्ण रुपाचे स्वातंत्र्य हवे असल्यास त्यांचे विचार, बोलणे व कृति यावर कसलाही निर्बंध असता कामा नये. आपल्या आवडीनिवडी काय याची जाणीव त्यांना असली पाहिजे आणि त्या निवडीतून निर्णय घेण्याचे सामर्थ्य त्यांना दिले गेले पाहिजे.” हे लक्षात घेतल्यास तुम्हाला असा कोणी परिचित आहे का की, जो खरेपणाने मुक्त आहे? मजवर “विचार, बोलणे व कृति यावर कसलाही निर्बंध” नाही असे कोण म्हणू शकतात? खरेपणाने केवळ सबंध विश्वात अशी एकच व्यक्ति आहे जी या वर्णनात बसू शकते व ती आहेः यहोवा देव. त्यालाच पूर्ण रुपाचे स्वातंत्र्य आहे. केवळ तोच आपल्या इच्छेप्रमाणे निवड करू शकतो आणि सर्व विरोधातही ती तो पूर्ण करू शकतो. तो “सर्वसमर्थ” आहे.—प्रकटीकरण १:८; यशया ५५:११.
३. कोणत्या अटींवर मानवाला बहुधा स्वातंत्र्य अनुभवण्यास मिळत असते?
३ तथापि क्षुद्र मानवासाठी स्वातंत्र्य हे केवळ सापेक्ष ठरू शकते. ते कोणा अधिकाऱ्याद्वारे दिले जाऊ शकते किंवा त्याचे आश्वासन मिळू शकते आणि ते स्वातंत्र्य आम्ही त्या अधिकाराला अधीन होण्याशी संबंधित असते. खरे म्हणजे, जवळजवळ प्रत्येक प्रकरणात, एखाद्या व्यक्तिला त्याच्या स्वातंत्र्याच्या खात्रीदात्याच्या अधिकाराला ओळखण्यावर त्याला स्वातंत्र्य राखू शकते. उदाहरणार्थ, “मुक्त जग” यात वास्तव्य करणाऱ्या विशिष्ठांना हालचालीचे स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्य हे लाभ मिळतात. पण या स्वातंत्र्याची खात्री कशावर अवलंबून आहे? देशाच्या कायद्यावर. या कायद्यांचे पालन करण्यावर त्याला यांचा अनुभव घेता येऊ शकतो. या स्वातंत्र्याची पायमल्ली करून त्याने कायदे मोडले तर त्याला अधिकाऱ्यांना जाब द्यावा लागेल आणि त्याला कारावासाची शिक्षा मिळून त्याच्या स्वातंत्र्यावर पडदा पडू शकेल.—रोमकर १३:१-४.
ईश्वरी स्वातंत्र्य—जबाबदारीसह
४, ५. यहोवाच्या उपासकांना कोणत्या स्वातंत्र्याचा आनंद मिळत आहे, आणि तो त्यांना कशाबद्दल जबाबदार धरील?
४ पहिल्या शतकात येशूने स्वातंत्र्याबद्दल भाष्य केले. त्याने यहूद्यांना म्हटलेः “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा. तुम्हास सत्य समजेल, व सत्य तुम्हास स्वतंत्र करील.” (योहान ८:३१, ३२) तो येथे भाषण किंवा धर्मस्वातंत्र्याबद्दल बोलत नव्हता. तसेच, जसे कित्येक यहूद्यांनी अपेक्षिली होती त्या रोमी जुवाखालून स्वतंत्रता मिळण्याबद्दल देखील तो येथे बोलत नव्हता. तर हे असे स्वातंत्र्य होते, जे अधिक मोलवान होते व ते कोणा मानवी कायद्यांमुळे किंवा कोणा मानवी अधिपतीच्या लहरीवर अवलंबून नाही; तर विश्वाचा सार्वभौम सेनाधीश प्रभू यहोवा यांजकडून मिळणारे स्वातंत्र्य आहे. ते अंधश्रद्धा, धार्मिक अजाणपणा आणि अधिक गोष्टींपासून स्वातंत्र्य देणारे आहे. यहोवा देत असलेले स्वातंत्र्य खरे आहे व ते चिरकाल टिकून राहणारे आहे.
५ प्रेषित पौलाने म्हटलेः “प्रभु [यहोवा, न्यू.व.] आत्मा आहे; आणि जेथे प्रभूचा [यहोवा, न्यू.व.] आत्मा आहे तेथे मोकळीक [“स्वातंत्र्य,” न्यू.व.] आहे.” (२ करिंथकर ३:१७) यहोवा मानवजातीसोबत कित्येक शतके दळणवळण ठेवून होता ते यासाठी की विश्वासू लोकांना सरतेशवेटी अत्यंत सुंदर व सर्वथोर मानवी स्वातंत्र्याचा, “देवाच्या लेकरांची गौरवयुक्त मुक्तता” याचा लाभ मिळावा. (रोमकर ८:२१) मध्यंतरीच्या काळात यहोवा पवित्र शास्त्रीय सत्याच्या माध्यमाद्वारे लोकांना काही अंशी मुक्तता देत आहे, आणि आम्ही या स्वातंत्र्याची पायमल्ली केल्यास तो आम्हाला जबाबदार धरतो. प्रेषित पौलाने लिहिलेः “त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही सृष्ट वस्तु नाही; तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे [“ज्याला आम्हाला जाब द्यावयाचा आहे,” न्यू.व.] त्याच्या दृष्टीला सर्व उघडेवाघडे आहे.”—इब्रीयांस ४:१३.
६-८. (अ) आदाम व हव्वेला कोणती स्वतंत्रता अनुभवण्यास मिळाली, पण कोणत्या अटींवरत्यांचे हे स्वातंत्र्य टिकून राहणार होते? (ब) आदाम व हव्वा यांनी स्वतःसाठी तसेच आपल्या संतानासाठी कोणकोणत्या गोष्टी गमावल्या?
६ आमचे पहिले मानवी पालक आदाम व हव्वा हे जिवंत होते तेव्हाच यहोवाला जाब देण्याची गरज ठळकपणे दिसली. देवाने त्यांची निर्मिती त्यांना स्वेच्छा ही अद्भूत देणगी देऊन केली होती. ते ही स्वेच्छा जबाबदार पद्धतीने वापरतील तोपर्यंत त्यांना भय, आजार, मृत्यु यापासूनचे स्वातंत्र्य तसेच आपल्या स्वर्गीय पित्याकडे शुद्ध विवेकाने जाण्याची मोकळीक अनुभवण्यास मिळणार होती. पण त्यांनी या स्वेच्छेची निंदा केली तेव्हा सर्वच काही पालटले.
७ यहोवा देवाने आदाम व हव्वेला एदेन बागेत ठेवले आणि त्यांच्या आनंदासाठी त्याने त्यांना एकाशिवाय बागेतील सर्व झाडांची फळे खाण्याची मुभा दिली होती. ते विशिष्ट झाड त्याने स्वतःसाठी ठेवले होते; ते “बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड” होते. (उत्पत्ती २:१६, १७) या झाडावरील फळ खाण्यापासून स्वतःला आवरल्यामुळे आदाम व हव्वा याबद्दल आपली मान्यता दाखवीत होते की, बरे काय व वाईट काय त्याबद्दलचा हक्क ठरविण्याचा अधिकार केवळ यहोवाचा आहे. त्यांनी जबाबदारपणे वागणूक केल्यास व मना केलेले फळ खाण्यापासून स्वतःला आवरल्यास यहोवा त्यांना अधिक स्वातंत्र्य अनुभवण्याची संधि देणार होता.
८ तरीपण हे दुःखाने म्हणावे लागेल की, हव्वेने सर्पाच्या फसव्या प्रस्तावाला ऐकून ‘बरेवाईट जाणणारे’ होण्याचे ठरविले. (उत्पत्ती ३:१-५) पहिल्यांदा तिने व मग आदामाने ते मना केलेले फळ खाल्ले. यामुळे, यहोवा देव त्यांच्यासोबत बोलण्यासाठी एदेन बागेत आला तेव्हा त्यांना लाज वाटली व ते लपले. (उत्पत्ती ३:८, ९) ते आता पापी झाले होते आणि त्यांनी देवाकडे शुद्ध विवेकाने जाण्याच्या स्वतंत्रतेची संवेदना गमावली होती. या कारणामुळे आजार व मरण यापासूनची स्वतःसाठी व आपल्या संतानासाठी असलेली मुक्तता देखील त्यांनी गमावली. पौलाने म्हटलेः “एका मनुष्याच्या द्वारे [आदाम] पाप जगात आले आणि पापाच्या द्वारे मरण आले; आणि सर्वांनी पाप केल्यावरून सर्व मनुष्यात मरण पसरले.”—रोमकर ५:१२; उत्पत्ती ३:१६, १९.
९. स्वतः उपभोगीत असलेल्या स्वातंत्र्याचा चांगल्या कारणास्तव वापर केलेल्या कोणाची उदाहरणे अहवालात आहेत?
९ असे असले तरी, मानवजातीठायी अद्याप स्वेच्छा होती आणि काही काळातच काही अपूर्ण मानवांनी याचा यहोवाची सेवा करण्यासाठी जबाबदार पद्धतीने उपयोग केला. यापैकीची काही नावे आमच्या माहितीसाठी प्राचीन काळापासून जतन केलेली आहेत. हाबेल, हनोख, नोहा, अब्राहाम, इसहाक आणि याकोब (ज्याला इस्राएल असेही म्हणत) ही मनुष्ये अशी उदाहरणे आहेत, ज्यांनी आपल्या स्वातंत्र्याचा देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी वापर केला. यामुळे त्यांचे बरे झाले.—इब्रीयांस ११:४-२१.
देवाच्या निवडलेल्या लोकांचे स्वातंत्र्य
१०. यहोवाने आपल्या खास लोकांसोबत केलेल्या कराराच्या कोणत्या अटी होत्या?
१० मोशेच्या काळी यहोवाने, संख्येने लाखो असणाऱ्या इस्राएलपुत्रांची मिसरी दास्यत्वातून सुटका केली आणि त्यांच्यासोबत करार करून त्यांना आपले खास लोक बनविले. या कराराखाली इस्राएलांना याजकत्व तसेच प्राण्यांचे यज्ञयाग वाहण्याची व्यवस्था होती, जिचा परिणाम त्यांची पापे प्रतिकरुपात क्षमा होण्यात होत होता. यामुळे त्यांना भक्तिमध्ये देवाकडे येण्याची स्वतंत्रता मिळाली. त्यांना अंधश्रद्धा आणि खोटी भक्ती यापासून दूर राखण्यासाठी कायदे व नियमांची व्यवस्था होती. नंतर त्यांना वचनयुक्त देश वतनादाखल मिळणार होता आणि त्यांच्या शत्रूंविरुद्ध ईश्वरी मदत मिळण्याची हमी होती. करारातील त्यांची बाजू, त्यांनी यहोवाचे नियम पाळावे ही होती. ही शर्त इस्राएलांनी अगदी स्वेच्छेने मान्य केली. ते म्हणालेः “परमेश्वराने [यहोवा, न्यू.व.] सांगितले आहे ते सर्व आम्ही करू.”—निर्गम १९:३-८; अनुवाद ११:२२-२५.
११. यहोवासोबत केलेल्या करारातील आपली बाजू सांभाळण्यात अपयश दाखवल्यामुळे इस्राएलांना कोणता परिणाम मिळाला?
११ यहोवासोबतच्या त्या खास नातेसंबंधात इस्राएल लोक १,५०० वर्षांपेक्षा अधिक काळ होते. पण वेळोवेळी ते तो करार पाळण्यात अपयशी ठरले. त्यांना वारंवार खोट्या उपासनेत भुलविण्यात आले, त्यामुळे ते मूर्तिपूजा व अंधश्रद्धा यांच्या बंधनात आले व यामुळेच देवाने त्यांना त्यांच्या शत्रूचे दास होण्यासाठी सोडले. (शास्ते २:११-१९) कराराचे पालन केल्यामुळे मिळणारा मुक्ततेचा आशीर्वाद उपभोगण्या ऐवजी त्याचा अवमान केल्यामुळे त्यांना शिक्षा मिळाली. (अनुवाद २८:१, २, १५) मग, इ. स. पू. ६०७ मध्ये यहोवाने त्या राष्ट्राला बाबेलच्या दास्यात अडकविले.—२ इतिहास ३६:१५-२१.
१२. मोशेच्या नियमशास्त्र कराराबद्दल ओघाओघाने काय स्पष्ट झाले?
१२ हा मोठा कठीण धडा होता. यामुळे नियमशास्त्राच्या पालनाचे महत्त्व त्यांनी समजून घ्यायचे होते. तथापि, ७० वर्षानंतर इस्राएल आपल्या स्वगृही परतल्यावर देखील ते नियमशास्त्र कराराचे योग्यपणे पालन करण्यात मागे पडले. त्यांच्या परतण्याच्या शंभर वर्षानंतर यहोवाने इस्राएल याजकांना उद्देशून म्हटलेः “तुम्ही मार्ग सोडून गेला आहे; धर्मशास्त्राच्या मार्गात पुष्कळांस ठोकर खाण्यास तुम्ही लाविले आहे; तुम्ही लेव्यांच्या करार बिघडविला आहे.” (मलाखी २:८) इस्राएलातील अत्यंत प्रामाणिक लोकांनाही परिपूर्ण नियमाच्या दर्जाला पूर्ण करता आले नाही. यामुळेच तो आशीर्वाद ठरण्याऐवजी प्रेषित पौलाच्या मते “शाप” ठरला. (गलतीकर ३:१३) यास्तव, अपरिपूर्ण, विश्वासू मानवांना देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता लाभण्यासाठी मोशेच्या नियमशास्त्रापेक्षा अधिक काही जरुरीचे होते.
ख्रिस्ती स्वातंत्र्याचा प्रकार
१३. स्वातंत्र्यासाठी कोणता अधिक चांगला आधार पुरविण्यात आला?
१३ ती अधिक गोष्ट येशू ख्रिस्ताचे खंडणीचे यज्ञार्पण ही होती. इ. स. ५० च्या सुमाराला पौलाने गलतीया येथील अभिषिक्त ख्रिश्चनांना लिहिले. त्यांची नियमशास्त्र करारापासून यहोवाने कशी मुक्तता केली त्याचे वर्णन केले व म्हटलेः “आपणाला स्वातंत्र्य असावे म्हणून ख्रिस्ताने आपणास स्वतंत्र केले. यास्तव स्थिर राहा, दास्याच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.” (गलतीकर ५:१) पण येशूने कोणत्या अर्थी लोकांची मुक्तता केली?
१४, १५. विश्वासू यहूदी तसेच यहूद्देतरांना येशूने कोणत्या अद्भूत मार्गी मुक्तता मिळवून दिली?
१४ येशूच्या मृत्युनंतर ज्या यहूद्यांनी त्याचा मशीहा म्हणून स्वीकार केला व त्याचे शिष्य झाले ते एका नव्या कराराखाली आले. हा करार जुन्या नियमशास्त्र कराराऐवजी स्थापित करण्यात आला. (यिर्मया ३१:३१-३४; इब्रीयांस ८:७-१३) या नव्या कराराखाली हे व नंतर त्यांना येऊन मिळालेले यहूद्देत्तर विश्वासू जन आले व ते एका नव्या आध्यात्मिक राष्ट्राचा भाग बनले जे देवाचे खास लोक दैहिक इस्राएल यांचेऐवजी बदली करण्यात आले. (रोमकर ९:२५, २६; गलतीकर ६:१६) यामुळे, येशूने वचन दिलेल्या स्वातंत्र्याचा त्यांना अनुभव मिळाला. त्याने म्हटले होतेः “सत्य तुम्हास स्वतंत्र करील.” या सत्याने त्यांना मोशेच्या नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त करण्याखेरीज त्याने या यहूदी ख्रिश्चनांना धार्मिक नेत्यांनी त्यांच्यावर लादलेल्या सर्व कठीण सांप्रदायापासून मुक्ती दिली. शिवाय त्याने या यहूद्देतर ख्रिश्चनांना मूर्तिपूजा आणि त्यांच्या पूर्वीच्या उपासनेच्या अंधश्रद्धा यापासून मोकळीक दिली. (मत्तय १५:३, ६; २३:४; प्रे. कृत्ये १४:११-१३; १७:१६) पण यापेक्षा अधिक होते.
१५ स्वतंत्र करणाऱ्या सत्याबद्दल बोलताना येशूने म्हटलेः “जो कोणी पाप करितो तो पापाचा दास आहे.” (योहान ८:३४) वस्तुतः आदाम व हव्वेने पाप केल्यामुळे त्यानंतर जो जो जन्माला आला व जगला तो पापी व पापाच्या दास्यत्वात होता. यात केवळ स्वतः येशूचा अपवाद होता, आणि येशूच्या यज्ञार्पणामुळे विश्वासधारकांची त्या दास्यत्वापासून मोकळीक होण्याची तरतूद झाली. हे खरे की, ते स्वभावतः अद्याप अपूर्ण व पापी होते. तरीपण, आता ते येशूच्या यज्ञापर्णाचा आधार घेऊन आपल्या पापांबद्दल पश्चाताप करू शकत होते आणि आपली विनंती ऐकली जाईल याचा त्यांना आत्मविश्वास राखता येत होता. (१ योहान २:१, २) येशूच्या खंडणी यज्ञार्पणावर आधारीत देवाने यांना नीतीमान असे गृहीत धरले आणि आता ते शुद्ध विवेकाने त्याच्याकडे जाऊ शकत होते. (रोमकर ८:३३) याशिवाय, खंडणीने पुनरुत्थानाद्वारे अनंतकालिक जीवनाचा मार्ग उघडा केला असल्यामुळे सत्य त्यांना मृत्युच्या भयापासून देखील सुटका देऊ शकले.—मत्तय १०:२८; इब्रीयांस २:१५.
१६. जग देऊ करीत असलेल्या स्वातंत्र्यापेक्षा ख्रिस्ती स्वातंत्र्यामध्ये आणखी कशाचा समावेश आहे?
१६ ख्रिस्ती स्वातंत्र्याने मानवी दृष्टीकोणातून असणाऱ्या सर्व थरातील स्त्री-पुरुषांना एक अद्भूत मार्ग उघडला. गरीब, कैदी आणि दासांना देखील स्वतंत्र होता आले. उलटपक्षी, राष्ट्रातील उच्च लोकांनी ख्रिस्ताबद्दलच्या संदेशाच्या अवमान केला असल्यामुळे ते अंधश्रद्धा, पाप व मरणाचे भय याच्या दास्यत्वामध्ये राहिले. आपल्याला सध्या ज्या स्वातंत्र्याचा उपभोग मिळत आहे त्याबद्दल आम्ही यहोवाचे उपकार मानण्याचे कधीही थांबवू नये. याची तुलना जगाच्या कोणत्याही गोष्टीसोबत होऊ शकणार नाही.
मुक्त पण जबाबदार लोक
१७. (अ) पहिल्या शतकात काहींनी कसे आपले ख्रिस्ती स्वातंत्र्य घालवून दिले? (ब) सैतानी जगाच्या दिखाऊ मुक्ततेद्वारे आपण स्वतःची का फसवणूक करून घेऊ नये?
१७ पहिल्या शतकात बहुतेक अभिषिक्त ख्रिश्चनांनी त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल आनंद मानला व आपली सचोटी कोणत्याही किंमतीवर राखून ठेवली. तरीपण हे दुःखाचे आहे की, काही जणांनी ख्रिस्ती स्वातंत्र्य व त्याच्या आशीर्वादांचा काही काळ उपभोग घेतल्यावर ते त्यांनी त्यागले व जगाचे दास्य करण्याकडे पुन्हा परतले. हे असे का घडले? पुष्कळांचा विश्वास निश्चये दुर्बळ बनला आणि ते ‘बहकून गेले.’ (इब्रीयांस २:१) तसेच, “विश्वास व चांगला विवेकभाव . . . कित्येकांनी . . . झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरुपी तारु फुटले आहे.” (१ तीमथ्य १:१९) कदाचित ते भौतिकवाद किंवा एखाद्या अनैतिक जीवनाक्रमणाला नमले. यास्तव, आम्ही आपला विश्वास राखावा व त्याची उभारणी करीत राहावे, व्यक्तीगत अभ्यास, सहवास, प्रार्थना व ख्रिस्ती कार्ये यात मग्न असावे, हे किती महत्त्वपूर्ण आहे! (२ पेत्र १:५-८) ख्रिस्ती स्वातंत्र्याबाबत आम्हाला वाटणारी कदर आम्ही कधीच घालवू नये! मंडळीबाहेरील होणाऱ्या ढिल्या गोष्टींकडे बघून काहींना वाटेल की, ते आपणापेक्षा अधिक मुक्त आहेत असे वाटून त्याचा मोह जडेल हे खरे आहे. तथापि, जगात जी गोष्ट मुक्ततेची वाटते ती, खरे पाहता, बहुधा बेजबाबदारपणा असतो. आपण देवाचे दास न राहिल्यास पापाचे दास होत असतो आणि हे दास्यत्व मोठे कडू वेतन देते.—रोमकर ६:२३; गलतीकर ६:७, ८.
१८-२०. (अ) काही लोक ‘वधस्तंभाचे वैरी’ कसे बनले? (ब) काही जणांनी ‘आपली स्वतंत्रता दुष्टपणाचे झाकण’ बनविण्यासाठी कशी वापरली?
१८ पौलाने फिलिप्पैकरांना लिहिलेल्या पत्रात पुढे असे म्हटलेः “मी तुम्हास बहुत वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की, पुष्कळ जण ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैऱ्याप्रमाणे चालणारे आहेत.” (फिलिप्पैकर ३:१८) होय, एकेकाळचे ख्रिस्ती, कदाचित धर्मत्यागी बनल्यामुळे सत्याचे शत्रू बनले असावेत. असे हे मार्गाक्रमण आपण आचरू नये हे केवढ्या महत्त्वाचे आहे! याशिवाय पेत्राने देखील असे लिहिलेः “आपली स्वतंत्रता ही दुष्टपणाचे झाकण न करता तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास असे असा.” (१ पेत्र २:१६) तर मग, एखाद्याचे स्वातंत्र्य दुष्टपणाचे झाकण कसे होऊ शकेल? मंडळीसोबत अद्याप सहवास राखून असता गंभीर पाप—कदाचित गुप्तणे—आचरण्याद्वारे.
१९ दियत्रफेसची आठवण करा. योहानाने त्याच्याबद्दल म्हटलेः “[मंडळीमध्ये] अग्रगण्य होण्याची आवड धरणारा दियत्रफेस हा आमचा स्वीकार करीत नाही . . . तो बंधुजनांचा स्वीकार करीत नाही आणि जे त्यांचा स्वीकार करावयास पाहतात त्यांस तो मना करितो व मंडळीबाहेर घालवितो.” (३ योहान ९, १०) दियत्रफेसने आपले स्वातंत्र्य दुष्टपणाचे झाकण करून स्वतःच्या स्वार्थी इच्छा पुऱ्या करू पाहिल्या.
२० शिष्य यहूदाने लिहिलेः “या दंडासाठी पूर्वीच नेमिलेली कित्येक मनुष्ये नकळत आत शिरली आहेत; ती अभक्तीने वागणारी मनुष्ये आपल्या देवाची कृपा पालटून तिला कामातुरपणाचे स्वरुप आणितात; आणि आपला एकच स्वामी व प्रभु येशू ख्रिस्त याला ते नाकारितात.” (यहूदा ४) मंडळीसोबत सहवास राखीत असताना ही माणसे एक भ्रष्ट प्रभाव होती. (यहूदा ८-१०, १६) प्रकटीकरणाच्या पुस्तकात पर्गम व थुवतीरा मंडळीमध्ये गटबाजी, मूर्तिपूजा आणि अनैतिकता होती असे आम्ही वाचतो. (प्रकटीकरण २:१४, १५, २०-२३) ख्रिस्ती स्वातंत्र्याचा केवढा हा गैरवापर!
२१. जे ख्रिस्ती स्वातंत्र्याचा अवमान करतात अशांना काय मिळणार?
२१ या प्रकारे जे आपल्या ख्रिस्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करतात अशांना काय मिळणार आहे? इस्राएलांचे काय झाले ते लक्षात आणा. इस्राएल देवाचे निवडलेले राष्ट्र होते, पण यहोवाने शेवटी त्याला नाकारले. ते का? कारण इस्राएलांनी देवासोबत असणारे आपले संबंध दुष्टपणाचे झाकण असे होऊ दिले. आपण अब्राहामाचे वंशज आहोत हे ते दाव्याने म्हणत होते, पण अब्राहामाचे संतान आणि यहोवाने निवडलेला मशीहा येशू याचा धिक्कार केला. (मत्तय २३:३७-३९; योहान ८:३९-४७; प्रे. कृत्ये २:३६; गलतीकर ३:१६) “देवाचा इस्राएल” एकंदरीत अशाप्रकारे अविश्वासू होणार नाही. (गलतीकर ६:१६) पण आध्यात्मिक किंवा नैतिक प्रदुषण निर्माण करणाऱ्या कोणाही ख्रिश्चनाला शिक्षेस सामोरे जावे लागेल, आणि प्रतिकूल न्याय मिळू शकेल. आम्ही सर्व आपले ख्रिस्ती स्वातंत्र्य कसे वापरतो याबद्दल जबाबदार आहोत.
२२. देवाचे दास्य करण्यासाठी जे आपले ख्रिस्ती स्वातंत्र्य वापरतात अशांना कोणता आनंद मिळेल?
२२ यास्तव, देवाचे दास बनून खरेपणाने मुक्त असणे हे किती चांगले आहे बरे. ज्याचे खरेपणाने महत्त्व आहे असे स्वातंत्र्य केवळ यहोवा देतो. नीतीसूत्र म्हणतेः “माझ्या मुला, सूज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन.” (नीतीसूत्रे २७:११) यासाठीच, आपण आपले स्वातंत्र्य यहोवाच्या गौरवासाठी वापरू या. तसे केल्यास आमच्या जीवनाला अर्थ राहील; आम्ही आमच्या स्वर्गीय पित्याला संतुष्ट करू शकू आणि मग, ज्यांना देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळेल त्यामध्ये आपणही असल्याचे स्वतःला पाहू शकू.
तुम्ही कसे स्पष्टीकरण द्याल?
▫ केवळ कोण खरेपणाने मुक्त आहे?
▫ आदाम व हव्वेने कोणत्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतला, पण त्यांनी ते का गमावले?
▫ यहोवासोबत असणाऱ्या कराराचे पालन केले तेव्हा इस्राएलांना कोणत्या स्वातंत्र्याचा अनुभव मिळाला?
▫ येशूचा स्वीकार करणाऱ्यांना कोणती मुक्तता मिळाली?
▫ पहिल्या शतकातील काहींनी आपली ख्रिस्ती स्वतंत्रता कशी धिक्कारली किंवा त्यागली?
[६ पानांवरील चित्रं]
मानव देऊ शकतो त्यापेक्षा अधिक चांगले स्वातंत्र्य येशूने दिले