तुम्ही रहिवाशी किंवा परदेशी असा, देव तुमचे स्वागत करतो!
“एकापासून मनुष्यांची सर्व राष्ट्रे उत्पन्न करून त्यांनी सगळ्या भूपृष्ठावर राहावे असे त्याने केले.”—प्रे. कृत्ये १७:२६.
१. विदेशी संस्कृतीच्या लोकांचा स्वीकार करण्याबद्दल पुष्कळ जागी कोणती चमत्कारिक स्थिती अस्तित्वात आहे?
पुष्कळ देशातील विदेशी, परदेशस्थ आणि आश्रित लोकांबद्दलची काळजी वाढत चालली आहे याबद्दलची सूचकता वार्ताहरांच्या वृत्तांतातून कळते. आशिया, आफ्रिका, युरोप, आणि अमेरिका यामधून निघून लाखो लोक हताश झाले आहेत. कदाचित त्यांना दारिद्य्र, मुलकी युद्धे किंवा छळ यापासून सुटका मिळण्याची ते पराकाष्ठा करीत आहेत. पण यांचे इतरत्र स्वागत होऊ शकेल का? टाईम मासिक म्हणतेः “युरोपाचे मानवीवंशासंबंधीचे नियम बदलत असता काही राष्ट्रांना आढळले की, त्यांना पूर्वी वाटत होते तसे ते विदेशी संस्कृतीला इतके सहिष्णुता दाखवीत नाहीत.” अशा १,८०,००,००० “नकोश्या” आश्रितांबद्दल टाईम कळवतेः “हे स्थिर राष्ट्रांसाठी प्रस्तुत करणारे आव्हान टळणारे नाही.”
२, ३. (अ) स्वीकार करण्याच्या बाबतीत पवित्र शास्त्र कोणती प्रोत्साहनदायक हमी देते? (ब) देव लोकांशी कसा दळणवळण ठेवून आहे याबद्दल शास्त्रवचने जे सांगतात त्याचे परिक्षण करणे आम्हास लाभाचे का ठरेल?
२ याबाबतीत काहीही घडत गेले तरी, पवित्र शास्त्र दाखवते की, देव प्रत्येक राष्ट्रांच्या लोकांचे स्वागत करतो, मग ते एखादा जन्मतः त्या देशाचा नागरिक असो किंवा परदेशस्थ किंवा आश्रित असो. (प्रे. कृत्ये १०:३४, ३५) ‘तरी,’ कोणी विचारील, ‘तुम्ही असे कसे म्हणू शकता? देवानेच प्राचीन इस्राएलांना आपले लोक म्हणून निवडले नव्हते का व इतरांना वगळले नव्हते का?’
३ आपण बघू या की, देवाने प्राचीन लोकांसोबत कसे दळणवळण ठेवले. यासोबत आपण हेही पाहू या की, आज खऱ्या उपासकांना कोणते हक्क उपलब्ध आहेत त्याबद्दल विशिष्ठ भविष्यवाद काय सांगतात. या भविष्यवादित साहित्याची उजळणी केल्यामुळे आपल्याला अधिक पूर्ण समज मिळू शकेल जी तुम्हाला अधिक प्रोत्साहनदायक वाटेल. यामुळे, देव मोठे संकट सरल्यावर “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा” यातील लोकांशी कसे दळणवळण राखणार.—प्रकटीकरण ७:९, १४-१७.
‘सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील’
४. राष्ट्रीयत्वाची समस्या कशी सुरु झाली, पण देवाने कोणते पाऊल उचलले?
४ जलप्रलयानंतर नोहाच्या कौटुंबिक सदस्यांनी मिळून तेव्हाचे मानवजातीचे जग बनले होते. हे सर्व खरे उपासक होते. पण हे ऐक्य लवकरच बदलले. काही काळातच देवाच्या इच्छेसंबंधाने दुर्लक्ष करणाऱ्या काही लोकांनी एक बुरुज बांधण्यास सुरवात केली. यामुळे मानवजातीची विभागणी होऊन तिचे भाषांच्या गटात विभाजन झाले व त्यामुळे लोक व राष्ट्रांची पांगापांग झाली. (उत्पत्ती ११:१-९) तरी देखील, खरी भक्ति अब्राहामाप्रत नेणाऱ्या मालिकेने टिकून राहिली. देवाने विश्वासू अब्राहामाला आशीर्वादित केले आणि याचे अभिवचन दिले की त्याची संतान मोठे राष्ट्र बनेल. (उत्पत्ती १२:१-३) ते इस्राएल राष्ट्र होते.
५. देवाने अब्राहामाशी जो व्यवहार राखला त्यावरुन आपल्याला का धैर्य मिळते?
५ तथापि, इस्राएलांखेरीज इतर लोकांना देव वगळीत नव्हता, कारण त्याच्या उद्देशांची सीमा सबंध मानवजातीपर्यंत जात होती. देवाने अब्राहामास जे अभिवचन दिले त्यावरुन आपल्याला स्पष्टरित्या पहावयास मिळते. तो म्हणालाः “तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे अभीष्ट पावतील.” (उत्पत्ती २२:१८) परंतु, देवाने काही शतके खास मार्गी इस्राएलासोबत व्यवहार राखला, त्यांना राष्ट्रीय कायदे दिले, त्याच्या मंदिरात यज्ञार्पणे करण्यासाठी याजकांची व्यवस्था केली, आणि राहण्यासाठी वचनयुक्त देश दिला.
६. देवाने इस्राएलांसोबत केलेली व्यवस्था सर्वांना कशी फायदेकारक ठरणार होती?
६ देवाने इस्राएलांना दिलेले कायदे सर्व राष्ट्रातील लोकांसाठी चांगले होते ते या अर्थी की, त्यामुळे मानवी पापीष्ठ वृत्ती स्पष्ट दिसू शकली व मानवी पापे एकदाच व कायमची दूर करावीत या उद्देशाने एका परिपूर्ण यज्ञार्पणाचीही गरज स्पष्ट दाखवली गेली. (उत्पत्ती ३:१९; इब्रीयांस ७:२६-२८; ९:९; १०:१-१२) तरीपण, ज्याकरवी सर्व राष्ट्रे आशीर्वादित होणार होती ते अब्राहामाचे संतान येईल व त्याच्यासंबंधाने असणाऱ्या सर्व गरजा पूर्ण करील याची काय हमी होती? येथेच इस्राएलच्या नियमशास्त्राने मदत दिली. त्याने कनान्यांसोबत आंतरजातीय विवाह करण्याची मनाई केली; कारण हे लोक आपल्या अनैतिक चालीरिती व मुलांना जिवंतपणीच होमार्पण म्हणून वाहणे यासारख्या प्रथांबद्दल कुविख्यात होते. (लेवीय १८:६-२४; २०:२, ३; अनुवाद १२:२९-३१; १८:९-१२) यामुळेच देवाने हे जाहीर केले की ते लोक व त्यांच्या प्रथा यांचा पूर्णपणे विनाश व्हावा. याद्वारे, परदेशीयांसोबत सर्वांनाच दीर्घकालीन लाभ मिळणार होते व संतानाची वंशमालिका भ्रष्ट होण्यापासून वाचविली जाणार होती.—लेवीय १८:२४-२८; अनुवाद ७:१-५; ९:५; २०:१५-१८.
७. देवाने अनोळख्यांचे स्वागत केले याबद्दल आरंभाला कोणता संकेत मिळतो?
७ नियमशास्त्र अस्तित्वात होते आणि देवाने इस्राएलांना खास असे मानले होते तरी त्याने इस्राएल नसलेल्या लोकांवर देखील आपली कृपादृष्टि दाखवली. हे त्याने इस्राएली लोक मिसरी दास्यत्वातून सुटून आपल्या वतनाकडे चालले असता दाखवले. “त्यांच्याबरोबर लोकांचा मोठा मिश्र समुदाय गेला.” (निर्गम १२:१३) प्राध्यापक सी. एफ. कील यांनी यांचे वर्णन “विदेश्यांचे थवे . . . मिश्र लोक, वेगवेगळ्या राष्ट्राच्या लोकांचा समुदाय” असे केले. (लेवीय २४:१०; गणना ११:४) यात, खऱ्या देवाचा स्वीकार केलेले पुष्कळसे मिसरी लोकही असावेत.
विदेश्यांचे स्वागत
८. गिबोन्यांना देवाच्या लोकांमध्ये कसे स्थान मिळू शकले?
८ देवाच्या आज्ञेनुरुप इस्राएलांनी वचनयुक्त देशातून त्या हिणकस राष्ट्रांना घालवून दिले तेव्हा देवाने यरुशलेमाच्या उत्तरेला राहणाऱ्या गिबोनी या विदेश्यांना संरक्षण दिले. यांनी वेशांतर करून आपल्या प्रतिनिधींना यहोशवाकडे पाठवले, शांतीची याचना केली व ती मिळवली. त्यांची ही युक्ति कळल्यावर, यहोशवाने म्हटले की हे गिबोनी लोक “मंडळीसाठी आणि परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] निवडणार होता त्या स्थानाच्या वेदीसाठी त्यांस लाकूडतोड्ये व पाणक्ये नेमून ठेविले.” (यहोशवा ९:३-२७) आजही नवीन लोकांचा भाग बनण्यासाठी स्थलांतरीत होणारे लोक अगदी हलकी सेवा पत्करण्याची तयारी दाखवतात.
९. इस्राएलांमधील परदेशस्थ या अर्थाने राहाब व तिच्या कुटुंबाचे उदाहरण कसे प्रोत्साहनदायक आहे?
९ त्या काळी केवळ विदेश्यांच्या गटालाच देव पाचारण करीत होता असे नाही; तर तो एकाकी राहणाऱ्या वैयक्तिंचेही स्वागत करीत होता हे जाणून तुम्हाला आनंद वाटेल. आज काही रा ज्यांच्यापाशी सामाजिक दर्जा, गुंतवण्यासाठी संपत्ती, किंवा उच्च शिक्षण आहे अशानांच स्थलांतरीत झाल्यावर स्वागत करतात. पण यहोवा तसे करीत नाही व हे गिबोन्यांच्या प्रकरणाच्या आधी घडले. यात अशा एका कनानी रहिवाशीणिचा समावेश होता, जी निश्चितच उच्च सामाजिक दर्जाची नव्हती. पवित्र शास्त्र तिला “राहाब वेश्या” म्हणते. तिने खऱ्या देवावर आपला विश्वास प्रदर्शित केल्यामुळे ती व तिच्या घराण्याचा यरीहोचे पतन होताना बचाव झाला. राहाब परदेशी होती, तरी इस्राएलांनी तिचा स्वीकार केला. ती आम्ही अनुसरण्याजोगा असा योग्य नमूना ठरली. (इब्रीयांस ११:३०, ३१, ३९, ४०; यहोशवा २:१-२१; ६:१-२५) ती मशीहाची पूर्वज देखील बनली.—मत्तय १:५, १६.
१०. विदेश्यांचे इस्राएलामधील स्वागत कशावर अवलंबून होते?
१० खऱ्या देवाला संतुष्ट करण्याच्या प्रयत्नांमुळे इस्राएलेत्तर लोकांना वचनयुक्त देशात वस्तीस मुभा देण्यात आली. जे यहोवाची सेवा करीत नव्हते अशांसोबत धार्मिकरित्या संबंध न ठेवण्याचे इस्राएलांना सांगण्यात आले. (यहोशवा २३:६, ७, १२, १३; १ राजे ११:१-८; नीतीसूत्रे ६:२३-२८) तरीही पुष्कळ यहुद्देत्तर रहिवाश्यांनी मूलभूत कायदे मान्य केले. इतर काहींनी तर सुंता करुन घेऊन ते धर्मांतरीत बनले; आणि यहोवाने अशांना त्याच्या मंडळीतील सदस्य म्हणून स्वीकृती दर्शविली.—लेवीय २०:२; २४:२२; गणना १५:१४-१६; प्रे. कृत्ये ८:२७.a
११, १२. (अ) खरी उपासना पत्करणाऱ्या विदेश्यांना इस्राएलांनी कसे वागवायचे होते? (ब) यहोवाचे उदाहरण अनुकरण करण्यात आपण का सुधारण करण्यास हवी?
११ खरी उपासना करणाऱ्या विदेश्यांच्या बाबतीत देवाने इस्राएलांना त्याचे अनुकरण करण्याचे सांगितले. तो म्हणालाः “कोणी विदेशी तुमच्या देशात तुमच्याबरोबर राहात असला तर त्यांस उपद्रव देऊ नका. तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीय मनुष्यास तुम्ही स्वदेशीय मनुष्यांसारखेच लेखा; आणि त्याजवर आपल्यासारखीच प्रीती करा; कारण तुम्हीही मिसर देशात परदेशीय होता.” (लेवीय १९:३३, ३४; अनुवाद १:१६; १०:१२-१९) आम्ही जरी सध्या नियमशास्त्राखाली नसलो तरी यावरुन आम्हाला शिकण्यासाठी एक धडा मिळतो. दुसरे वंश, राष्ट्र, किंवा संस्कृतीच्या लोकांबद्दल अहंभाव किंवा वैर बाळगणे हे सहजगत्या घडते. यासाठीच आम्ही हे विचारावेः ‘मी यहोवाचे उदाहरण अनुसरुन अशा अहंभावापासून स्वतःला दूर करीत आहे का?’
१२ देव अशांचे स्वागत करतो याबद्दल इस्राएलांपुढे दृश्य पुरावा होता. शलमोन राजाने प्रार्थिलेः “तुझ्या इस्राएल लोकांतला नव्हे असा कोणी परदेशीय तुझ्या नामास्तव परदेशाहून आला . . . आणि त्याने येऊन ह्या मंदिराकडे तोंड करुन प्रार्थना केली, तर तू आपल्या स्वर्गातील निवास स्थानातून ती ऐक म्हणजे या भूतलावरील सर्व देशाचे लोक तुझे नाम ओळखून . . . तुझे भय बाळगतील.”—१ राजे ८:४१-४३; २ इतिहास ६:३२, ३३.
१३. देवाने इस्राएलांसोबत राखलेल्या दळणवळणात बदल करण्याची का तरतुद केली?
१३ यहोवा इस्राएल राष्ट्राचा त्याचे लोक या नात्याने अद्याप वापर करीत असता व त्याद्वारे मशीहा येण्याची मालिका सुरक्षित ठेवीत असता त्याने एक अभूतपूर्व बदल भाकित केला. आधी इस्राएलाने नियमशास्त्र करारानुरुप वागण्याचे मान्य केले तेव्हा देवाने हे ठरविले की, ते “याजक राज्य व पवित्र राष्ट्र” यांचा उगम ठरतील. (निर्गम १९:५, ६) पण इस्राएलाने शतकानुशतके आपला अविश्वासूपणा दाखविला. त्यामुळे यहोवाने भाकित केले की, तो एक नवा करार करील, ज्यात, ज्यांचे मिळून “इस्राएल घराणे” होईल त्यांचे अपराध व पाप यांची तो क्षमा करील. (यिर्मया ३१:३३, ३४) तो नवा करार मशीहा येईपर्यंत थांबून राहिला, कारण त्याच्या यज्ञार्पणामुळे पुष्कळांच्या पापांची क्षमा होणार होती.—यशया ५३:५-७, १०-१२.
स्वर्गातील इस्राएल
१४. देवाने कोणत्या “इस्राएल”चा स्वीकार केला व कसा?
१४ या सर्व गोष्टींची कशी पूर्णता करण्यात आली त्याबद्दल ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने आपल्याला मदत देतात. येशू हा तो मशीहा होता व त्याच्या मृत्युने नियमशास्त्राची पूर्तता केली आणि पापांची पूर्णपणे क्षमा मिळण्याचा आधार दिला. याकडून लाभ मिळवण्यासाठी आता कोणी शारीरिक सुंता झालेला यहूदी असण्याची गरज नव्हती. तर प्रेषित पौलाने लिहिले की, नवीन करारात, “अंतरी जो यहूदी तो यहूदी होय, आणि आध्यात्मिक दृष्ट्या जी अंतःकरणाची व्हावयाची ती सुंता होय, शास्त्रलेखाप्रमाणे व्हावयाची ती नव्हे.” (रोमकर २:२८, २९; ७:६) येशूच्या यज्ञार्पणावर ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनाच पापांची क्षमा मिळाली आणि देवाने अशांना ‘आध्यात्मिक दृष्ट्या यहूदी’ असे स्वीकारले. अशांचे मिळून जे आध्यात्मिक राष्ट्र बनते त्याला “देवाचे इस्राएल” म्हणतात.—गलतीकर ६:१६.
१५. आध्यात्मिक इस्राएलाचे भाग होण्यासाठी शारीरिक राष्ट्रीयत्व का जमेस धरले जात नाही?
१५ होय, आध्यात्मिक इस्राएल या नात्याने स्वीकृत होणे हे आता विशिष्ट राष्ट्रीय किंवा संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर आधारलेले नव्हते. यापैकीचे काही येशूचे प्रेषित स्वाभाविक यहूदी होते; पण रोमी लष्करी अधिकारी कर्नेल्य यासारखे इतर बेसुंती विदेशी होते. (प्रे. कृत्ये १०:३४, ३५, ४४-४८) पौलाने अशा आध्यात्मिक इस्राएलाबद्दल अगदी उचितपणे म्हटले की, “यात हेल्लेणी व यहूदी, सुंता व बेसुंता, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हे नाही.” (कलस्सैकर ३:११) देवाच्या आत्म्याने अभिषेक झालेल्यांचे “निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक” तयार झाले.—१ पेत्र २:९; पडताळा निर्गम १९:५, ६.
१६, १७. (अ) आध्यात्मिक इस्राएलांना देवाच्या उद्देशानुरुप कोणती भूमिका आहे? (ब) पण जे देवाचे इस्राएल नाहीत अशांचाही विचार होणे का योग्य आहे?
१६ तर मग, देवाच्या उद्देशात आध्यात्मिक इस्राएलांचे भवितव्य काय आहे? येशूने म्हटलेः “हे लहान कळपा, भिऊ नको; कारण तुम्हास राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटते.” (लूक १२:३२) ज्यांचे “नागरिकत्व स्वर्गीय” आहे असे अभिषिक्त जन कोकऱ्यासोबत त्याच्या राजवटीत त्याचे सहवारीस बनतील. (फिलिप्पैकर ३:२०; योहान १४:२, ३; प्रकटीकरण ५:९, १०) हे लोक ‘इस्राएल लोकांचे शिक्का मारिलेले’ आणि “देवासाठी व कोकऱ्यासाठी प्रथम फळ असे मनुष्यातून विकत घेतलेले” आहेत असे पवित्र शास्त्र सूचित करते. त्यांची एकंदर संख्या १,४४,००० आहे. तथापि, या संख्येचा अहवाल दिल्यावर योहान नंतर आणखी एका गटाविषयी, “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यापैकी कोणाच्याने मोजवला नाही असा . . . मोठा लोकसमुदाय” याची माहिती देतो.—प्रकटीकरण ७:४, ९; १४:१-४.
१७ काहींना असे वाटेलः ‘जे आध्यात्मिक इस्राएलाचे भाग नाहीत अशा लाखोंबद्दल, जे एक मोठा लोकसमुदाय या नात्याने मोठ्या संकटातून पार पडतील अशांबद्दल काय? आध्यात्मिक इस्राएलांचे जे अवशिष्ट लोक आज आहेत त्यांच्या संबंधात यांची कोणती भूमिका आहे?’b
भविष्यवादातील विदेशी
१८. बाबेलोनी बंदिवासातून इस्राएलाचे परतणे कसे घडले?
१८ इस्राएल नियमशास्त्र कराराखाली होते, पण ते अविश्वासू होते त्या काळाकडे आपण परतल्यावर असे दिसते की, देवाने त्यांचा बाबेलोन्यांकरवी नाश करण्याचा निश्चय केला. इ. स. पू. ६०७ मध्ये इस्राएल ७० वर्षांसाठी गुलामगिरीत गेले. देवाने नंतर परत त्या राष्ट्राला विकत घेतले. जरुब्बाबेल या प्रांताधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली स्वाभाविक इस्राएलांचा अवशिष्ट आपल्या स्वगृही परतला. बाबेलोनास जिंकणाऱ्या मेद व पारसाच्या सत्ताधिशांनी बंदिवासातून परतणाऱ्यांना सामुग्री दिली. या सर्व घडामोडींबद्दल यशयाने भाकित केले आहे. (यशया १:१-९; ३:१-२६; १४:१-५; ४४:२१-२८; ४७:१-४.) आणि एज्रा परतण्याबद्दलचा सविस्तर ऐतिहासिक वृत्तांत देतो.—एज्रा १:१-११; २:१, २.
१९. इस्राएलच्या परतीच्या संबंधाने, विदेश्यांचा समावेश असेल हे दर्शवणाऱ्या कोणत्या भाकिताबद्दल संकेत देण्यात आला?
१९ देवाच्या लोकांचे परतणे व त्यांना परत विकत घेणे याबद्दल यशयाने आणखी एक थरारक भविष्यवाद केला. तो म्हणालाः “रा तुझ्या प्रकाशाकडे येतील; राजे तुझ्या उदयप्रकाशाकडे येतील.” (यशया ५९:२०; ६०:३) याचा अर्थ असा की, शलमोनाने जी प्रार्थना केली तिच्या सहमतात केवळ काही विशिष्ठच नव्हे तर अधिक जणांचे स्वागत होणार. यशयाने या स्थितीत अभूतपूर्व बदल दाखविला आहे. तो म्हणाला की, “राष्ट्रे” इस्राएलांची सेवा करणारः “परदेशचे लोक तुझे कोट बांधतील, त्यांचे राजे तुझी सेवा करतील. कारण मी क्रोधाविष्ट होऊन तुला ताडिले तरी आता मी प्रसन्न होऊन तुजवर दया केली आहे.”—यशया ६०:१०.
२०, २१. (अ) इस्राएलाचे बंदिवासातून परतणे याला कोणती आधुनिक काळची समांतरता मिळते? (ब) यानंतर आध्यात्मिक इस्राएलास ‘पुत्र व कन्या’ कशा येऊन मिळाल्या?
२० इस्राएलांचे बंदिवासात जाणे व परतणे हे कित्येक बाबतीत आधुनिक काळातील आध्यात्मिक इस्राएलांशी समांतरीत असल्याचे दिसते. पहिल्या जागतिक महायुद्धाआधी अभिषिक्त ख्रिश्चनांचे अवशिष्ट लोक देवाच्या इच्छेच्या पूर्ण सहमतात नव्हते; ते अद्याप ख्रिस्ती धर्मराज्यातील चर्चेसमधून घेतलेल्या काही दृष्टीकोणांना व आचारांना बद्ध होते. मग, युद्धकाळातील उद्रेक तसेच तत्वतः धार्मिक पुढाऱ्यांच्या चिथावणीने आध्यात्मिक इस्राएलांमधील नेतृत्व करणाऱ्यांना अन्यायाने तुरुंगात डांबण्यात आले. मग, १९१९ मध्ये खऱ्या तुरुंगात असणारे ते अभिषिक्त दोषमुक्त ठरवण्यात येऊन त्यांची सुटका झाली. यामुळे खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य, मोठी बाबेल हिच्या दास्यातून देवाच्या लोकांची सुटका झाली हा पुरावा स्पष्ट झाला. यानंतर त्याचे लोक पुढे होऊन त्यांनी आध्यात्मिक नंदनवनाची उभारणी व प्राप्ती केली.—यशया ३५:१-७; ६५:१३, १४.
२१ हेच यशयाच्या वर्णनात सूचित करण्यात आलेः “ते सर्व एकत्र होत आहेत, तुजकडे येत आहेत, तुझे पुत्र दुरून येत आहे, तुझ्या कन्यांला कडेवर बसवून आणीत आहेत. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावले; कारण समुद्राकडून विपुल धन तुजकडे लोटेल; राष्ट्रांची संपत्ती तुजकडे येईल.” (यशया ६०:४, ५) नंतरच्या दशकात ‘पुत्र व कन्या’ येत राहिल्या व त्यांचा आत्म्याने अभिषेक होऊन आध्यात्मिक इस्राएलाच्या राहिलेल्या जागा भरल्या गेल्या.
२२. आध्यात्मिक इस्राएलासोबत ‘परदेशी’ येऊन कसे काम करू लागले?
२२ पण, ‘परदेशचे लोक तुझे कोट बांधतील’ याबद्दल काय? हे देखील आमच्या काळी घडले आहे. १,४४,००० जणांसंबंधाचे पाचारण संपुष्टात येत होते तसे सर्व राष्ट्रातील एक मोठा लोकसमुदाय सामोरा येऊन आध्यात्मिक इस्राएलांसोबत भक्ति करू लागला. या नव्या लोकांपाशी नंदनवनमय पृथ्वीवर सार्वकालिक जीवन जगण्याची पवित्र शास्त्रआधारीत आशा आहे. त्यांच्या विश्वासू सेवाकार्यामुळे त्यांना मिळणारी अखेरची जागा ही वेगळी असली तरी राज्याच्या सुवार्तेचा अभिषिक्त शेषांसोबत प्रचार करुन त्यांना मदत देण्यास यांना आनंद वाटत होता.—मत्तय २४:१४.
२३. “परदेशी” लोकांनी किती प्रमाणात अभिषिक्तांचे साहाय्य केले आहे?
२३ आज ज्यांना ‘स्वर्गातील नागरिकत्व’ आहे अशा अवशिष्ट लोकांसोबत “परदेशी” मिळून ४०,००,००० पेक्षा अधिक जण यहोवाला आपली निष्ठा सिद्ध करीत आहेत. यापैकीचे पुष्कळ स्त्री व पुरुष, तरुण व वृद्ध, पायनियर या नात्याने पूर्ण वेळचे सेवकपण करीत आहेत. ६६,००० पेक्षा अधिक मंडळ्यातून असे हे परदेशी वडील व उपाध्य सेवक या जबाबदाऱ्या सांभाळीत आहेत. शेषांना यशयाच्या या शब्दांची पूर्णता बघून मोठा आनंद होत आहे की, “परके उभे राहून तुमचे कळप चारितील. परदेशी तुमचे नांगऱ्ये व द्राक्षांचे मळे लावणारे होतील.”—यशया ६१:५.
२४. देवाने इस्राएल व इतरांशी गतकाळात जे दळणवळण राखले त्याद्वारे आपण का प्रोत्साहीत होऊ शकतो?
२४ यास्तव, तुम्ही कोणत्याही राष्ट्रातील रहिवाशी, परदेशस्थ, किंवा आश्रित असा, तुम्हाला आध्यात्मिक परदेशी बनण्याची व सर्वसमर्थ देवाकडून हार्दिक स्वागत होण्याची भव्य संधि आहे. त्याने केलेल्या या स्वागतामुळे तुम्हाला आता व सार्वकालिक भविष्यात त्याची सेवा करण्याचा हक्क अनुभवता येईल.
[तळटीपा]
a “परके,” “वसाहत करणारे,” “अनोळखी,” व “विदेशी” यामधील फरक जाणून घेण्यासाठी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेला ग्रंथ इन्साईट ऑन द स्क्रिपचर्स खंड १, पृ. ७२-५, ८४९-५१ पहा.
b यहोवाच्या साक्षीदारांनी १९९१ मध्ये जो प्रभूच्या सांजभोजनाचा वार्षिक विधी पार पाडला त्याला जगभर १,०६,००,००० पेक्षा अधिक लोक उपस्थित होते, पण यात केवळ ८,८५० इतकेच लोक आध्यात्मिक इस्राएलांचे अवशिष्ट म्हणून होते.
तुम्हाला हे लक्षात आले का?
▫ सर्व राष्ट्रातील लोक देवाला स्वीकृत असतील ही आशा त्याने कशी दिली?
▫ देवाचे खास लोक इस्राएल याशिवाय इतर लोक देखील देवाकडे येऊ शकतात हे कशावरुन दिसते?
▫ परदेशी लोक इस्राएलांना येऊन मिळतील हे देवाने भविष्यवादात कसे दाखवले?
▫ बाबेलोनी दास्यत्वातून इस्राएलांचे परतणे याला कोणती समांतरता आहे, आणि यात “परदेशी” लोकांचा कसा समावेश आहे?
[२३ पानांवरील चित्रं]
यहोवाची भक्ति करण्यासाठी येणाऱ्या विदेश्यांसाठी शलमोन राजाने प्रार्थना केली