घोषणा नियमन मंडळाच्या कमिटीकरिता सहाय्यक
यहोवाच्या साक्षीदारांमधील नियमन मंडळाचे सदस्य, ज्यांची संख्या सध्याला १२ आहे, आजही त्याच्या नेमणूकीत निष्ठावंतपणे सेवा करीत आहेत. सतत वृद्धींगत होणाऱ्या “मोठा लोकसमुदाया”तील इमानी सदस्य उत्सुकतेने आपला पाठिंबा देत आहेत म्हणून ते नेहमी त्यांचे कृतज्ञ राहिले आहेत. (प्रकटीकरण ७:९, १५) जगभरात होत असलेली ही प्रचंड वाढ दृष्टीसमोर ठेवता, आता असे दिसते की, नियमन मंडळास मदतनीस पुरविलेले बरे. तदनुसार, अनेक मदतनीसास, खासकरुन मोठा लोकसमुदाय यांचेमधून, नियमन मंडळाच्या कमिटीच्या सभांमध्ये, म्हणजेच कार्यकारी मंडळ, प्रकाशन, सेवा, शिक्षण देणे, व लेखन कमिटी यांच्या सभांमध्ये सहभागी होण्यास आमंत्रण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे, प्रत्येक कमिटीच्या सभांना उपस्थित राहणाऱ्यांची संख्या वाढून सात ते आठपर्यंत असेल. नियमन मंडळाच्या कमिटी सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मदतनीस चर्चेत भाग घेतील व त्यांना कमिटी ज्या सर्व नेमणूका नेमून देतील त्या पुऱ्या करतील. ही नवी योजना मे १, १९९२ पासून अमलात आली आहे.
आज अनेक वर्षे, अभिषिक्त साक्षीदारांच्या शेषांची संख्या घटत आहे, तर मोठा लोकसमुदाय आमच्या सर्वथोर अपेक्षेपलिकडे वृद्धींगत होत आहे. (यशया ६०:२२) या आश्चर्यकारक वाढीबद्दल आम्ही यहोवाचे आभार मानतो. जेव्हा, यहोवाचे साक्षीदार हे नवे नाव १९३१ मध्ये कृतज्ञतापूर्वक स्वीकारण्यात आले, त्यावेळी सर्वाधिक राज्य प्रचारकांची संख्या ३९,३७२ होती, जे बहुतेक ख्रिस्ताचे अभिषिक्त बंधू होते. (यशया ४३:१०-१२; इब्रीयांस २:११) साठ वर्षे सरता १९९१ मध्ये जगभरातील प्रचारकांची संख्या ४२,७८,८२० या उच्चांकास भिडली, ज्यातील अभिषिक्त म्हणविणारे शेष केवळ ८,८५० होते. शास्त्रवचनांच्या प्रकाशात अपेक्षा करता, सध्याला “मोठा लोकसमुदाय” जे “लहान कळप” मधील शेष हयात आहेत त्यांच्यापेक्षा ४८० ला १ असे संख्येने अधिक आहेत. (लूक १२:३२; प्रकटीकरण ७:४-९) अती वेगाने विस्तारणाऱ्या राज्य हितसंबंधांची काळजी वाहण्यात, मोठा लोकसमुदाय जो सहकार व पाठिंबा शेषांना पुरवीत आहोत तो खरोखरी आवश्यक तसाच मौल्यवान आहे.
टेहळणी बुरुजच्या या अंकात खुलासा केल्यानुसार आज आध्यात्मिक इस्राएलांचे संगतीत असा एक गट सेवामग्न आहे जो नेथनीम व शलमोनाच्या चाकरांचे वंशज, जे बाबेलच्या गुलामगिरीतून सुटल्यावर शेष यहुद्यांच्या संगतीत आले होते; व जे यहूद्देतर होते तरी परतणाऱ्या लेव्यांपेक्षा संख्येने अधिक होते त्यांच्याशी तुलनीय आहे. (एज्रा २:४०-५८; ८:१५-२०) आजचा मोठा लोकसमुदायमधून जी ‘वाहिलेली मनुष्ये’, ज्यांना शाखा दप्तरावर, फिरतीचे कामावर तसेच जगभरात प्रस्थापित असलेल्या ६६,००० पेक्षा अधिक मंडळ्यांवर देखरेखे म्हणून काम केल्याने बराचसा अनुभव प्राप्त आहे ती प्रौढ ख्रिश्चन मनुष्ये आहेत.
अलिकडेच देखरेखे आणि त्यांचे सहाय्यक उपाध्य सेवक यांचेकरिता खास शिक्षण देणाऱ्या राज्य उपाध्यपण शाळा सबंध जगभरात भरविल्या होत्या. एकट्या अमेरिकेत ५९,४२० देखरेखे उपस्थित होते. हे “वडील” याद्वारे त्यांचेवरील जबाबदाऱ्या पार पाडण्यात अधिक प्रभावीत बनविण्यात आले.—१ पेत्र ५:१-३; इफिसकर ४:८, ११ पडताळा.
यहोवाच्या साक्षीदारांच्या ब्रुकलीनमधील मुख्यालयात काही अशी ‘वाहिलेली मनुष्ये’ आहेत जी आज कैक वर्षे सेवा करीत आहेत. यांच्यामध्ये मोठ्या लोकसमुदायामधील काही प्रौढ देखरेखेही आहेत, ज्यांनी चातुर्य आणि अनुभव यात समृद्धी प्राप्त केली आहे. अशांचेमधून नियमन मंडळाने काही देखरेख्यांची नियमन मंडळाच्या कमिटी सभांमध्ये मदतनीस म्हणून निवड केली आहे. हे सर्वच सेवेत दीर्घकाळ अनुभवी असावेत ही गरज नाही. तर त्यांना ज्या विशिष्ठ क्षेत्रात मदत देणे आहे त्यात प्रौढ व अनुभवी असण्याची गरज आहे. कमिटीसोबत त्यांना जी नेमणूक असेल ती त्यांना कोणताही विशिष्ट दर्जा देत नाही. तर जसे येशूने म्हटले होते तसे ते “सर्व भाऊभाऊ” आहेत. (मत्तय २३:८) तरी या मनुष्यांकडे पुष्कळसे सोपविले जाईल, व त्याचे परिणामात “त्यांजजवळून फार मागण्यात येईल.”—लूक १२:४८.
आज यहोवाच्या संघटनेतेत जी सतत आगेकूच चालू आहे ती पाहून आम्हास आनंद वाटतो. गेल्या दहा वर्षात क्षेत्रावर सेवकपण करणाऱ्यात सुमारे १०० टक्के वाढ झालेली आहे जी थोर दाविद, येशू ख्रिस्त याजबद्दलच्या भविष्यवादास अनुसरुन आहेः “त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार.” (यशया ९:७) अशाच प्रकारे नेथनीम जसे यरुशलेमाच्या वेशीची डागडूजी करण्यात याजकांच्या संगतीत कामे करीत तसे आज यहोवाच्या संघटनेबद्दलचा भविष्यवाद पुरा होत आहेः “परदेशचे लोक तुझे कोट बांधीत आहेत.” (यशया ६०:११; नेहम्या ३:२२, २६) अर्वाचीन काळातील नेथनीमांचे, त्यांनी खरी भक्तिची उभारणी करण्यात जे “यहोवाचे याजक” त्यांचे अनेक मार्गी व सेवेत सहाय्य केले, त्याबद्दल त्यांची प्रशंसा करावीशी वाटते.—यशया ६१:५, ६.