वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 १/१ पृ. २९-३०
  • मृत समुद्रातील गुंडाळ्या एक बहुमोल शोध

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मृत समुद्रातील गुंडाळ्या एक बहुमोल शोध
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मोठे बक्षिस
  • इतर मौल्यवान हस्तलिखिते
  • मृत समुद्रातील गुंडाळ्या अभूतपूर्व खजिना
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • ‘समुद्राजवळ गायिलेल्या गीताचे’ हस्तलिखित इतिहासातील दोन कालखंडांना जोडणारा दुवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • मृत समुद्रातल्या गुंडाळ्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या का असाव्यात?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • हे पुस्तक टिकले कसे?
    सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 १/१ पृ. २९-३०

मृत समुद्रातील गुंडाळ्या एक बहुमोल शोध

यरुशलेमाच्या आग्नेय दिशला साधारण २४ किलोमीटर अंतरावर वादी एन-नार हा ओस पडलेला, कोरडे पात्र असलेला ओढा पूर्वेकडून पुढे जात मृत समुद्राला मिळतो. समुद्र किनाऱ्‍याच्या मैदानी प्रदेशामागे तुटक्या सुळक्यांची एक रांगच पसरलेली आहे. या मैदानी प्रदेशात शरद ऋतुत जेव्हा दिवस उष्ण व रात्र एकदम थंड असतात अशा वेळी ता‘आमिरेळ बेदोयुईन लोक त्यांच्या शेरडामेंढरांच्या कळपाची राखण करीत असतात.

१९४७ मध्ये कळपाची राखण करीत असता, एका बेदोयुईन मेंढपाळाने सुळक्याच्या तुटक्या फुटक्या तोंडातून एक छोटा दगड आत फेकला. तेव्हा जणू काय एखादे मातीचे भांडे फुटल्यासारखा आवाज ऐकून तो एकदमच दचकला, घाबरुन पळाला पण लगेच दोन दिवसात तो परतला व जरा मोठे तोंड असलेल्या भेगेतून आत उतरण्यासाठी अजून १०० मीटर वर चढला. त्याच्या डोळ्यांना अंधाराचा सराव झाल्यानंतर त्याला गुहेच्या भिंतीलगत १० उंच रांजण व तुटलेल्या खडकांवर मध्ये फुटलेल्या भांड्यांचा पसारा दिसला.

बरेचसे रांजण रिकामे होते, परंतु एकात मात्र तीन गुंडाळ्या होत्या. यापैकीच्या दोघांवर कापडाचे आवरण होते. ती हस्तलिखिते घेऊन तो त्यांच्या बेदोईन तळावर आला व तंबूच्या खांबावरील पिशवीत जवळजवळ महिनाभर तसेच राहू दिले. शेवटी काही बेदोईन लोक त्यापासून काही मोल मिळते की काय हे पाहण्यासाठी त्या गुंडाळ्या घेऊन बेथलहेमला गेले. परंतु तेथील मठातून या गुंडाळ्यांना आता काहीच किंमत नाही असे सांगून त्यांना असभ्यपणे घालवून देण्यात आले. एका विक्रेत्याने सांगितले की, या गुंडाळ्यांना पुराणवस्तु संशोधनाचा कोणताच आधार नाही. त्याला असाही संशय आला की, यहूदी सभास्थानातून त्या चोरल्या असाव्यात. परंतु ही त्याची केवढी मोठी चूक होती! सरतेशवटी एक सिरियाचा चांभार, जो दलालाचेही काम करीत होता, त्याने योग्य ती किंमत ठरवली. लवकरच दुसऱ्‍याही हस्तलिखितांची किंमत ठरवण्यात आली.

या प्राचीन लिखाणांपैकी काहींच्यामुळे ख्रिस्ताच्या काळातील धार्मिक यहूदी गटाच्या कार्यहालचालींबद्दल पूर्ण ज्ञानाचे नवे दालनच उघडले गेले. परंतु यशयाच्या भविष्यवादाच्या पवित्र शास्त्रीय हस्तलिखिताने सर्व जग रोमांचित झाले. ते का बरे?

मोठे बक्षिस

ही नव्यानेच मिळालेली यशयाची मूळ गुंडाळी ७.५ मीटर लांबीची होती. ती, काळजीपूर्वक तयार केलेल्या प्राण्यांच्या कातडीच्या १७ तुकड्यांनी मिळून बनलेली होती. ते जवळजवळ सुधारीत चर्मपत्रच होते. प्रत्येक रकान्यात ३० ओळी याप्रमाणे ५४ रकाने व्यवस्थित आखलेले होते. या ओळींवर कुशल नक्कलकाराने ग्रंथातील अक्षरे व्यवस्थितपणे लिहिली होती व त्यामध्ये परिच्छेद पाडण्यात आले होते.—पहा फोटो.

ही गुंडाळी काठ्यांभोवती गुंडाळलेली नव्हती. ती मध्यभागी बरीच काळवंडलेली होती, हे बहुधा त्याची हाताळणी बऱ्‍याच हातातून झाली असावी हे स्पष्ट करते. ती व्यवस्थित वापरलेली, व कौशल्याने दुरुस्त केलेली दिसत होती. ती इतकी व्यवस्थित राहण्याचे कारण म्हणजे ती एका भांड्यात काळजीपूर्वक बंद केलेली होती. ती पवित्र शास्त्र प्रामाण्यांना तसेच आम्हा सर्वांना देखील किती मोलाची आहे?

यशया संदेष्ट्याचे हे हस्तलिखित अस्तित्वात असणाऱ्‍या इतर प्रतींपेक्षा एक हजार वर्षांचे जुने आहे, तरीही त्यातील लिखाणामध्ये अधिक असा फरक जाणवत नाही. १९५० मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथाचे संपादक प्राध्यापक मिलर बरोज्‌ यांनी म्हटलेः “या हस्तलिखितात यशयाच्या ग्रंथात व्याकरणदृष्ट्या जरी लक्षणीय फरक असला तसेच बरेचसे पाठभेद कमी जास्त महत्त्वाचे असले तरी एमटी (मॅसोरेटिक इब्री ग्रंथ) यात मुख्यतः प्रतिपादित केले आहेत.”a सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ईश्‍वरी नामाची मूळ आद्याक्षरे יהוה इब्री भाषेतील देवाचे पवित्र नाव यहोवा याचा सुसंगतपणे वापर केलेला आढळतो.

इतर मौल्यवान हस्तलिखिते

गुहा क्रमांक १ या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या गुहेतून मिळालेल्या दुसऱ्‍या हस्तलिखितातही हे ईश्‍वरी नाव आढळते. हबक्कूकच्या पुस्तकावर केलेल्या विवेचनात हे नाव चार वेळा पालेओ-इब्री भाषेत आढळते, ही लिपि परिचित अशा चौकोनी इब्री अक्षरांपेक्षा वेगळी आहे.—हबक्कूक १:९वरील तळटीप पहा, रेफरन्स बायबल.

या गुहेमध्ये यशयाच्या दुसऱ्‍या गुंडाळीचेही अवशेष मिळाले आहे व त्याबरोबर पवित्र शास्त्रातील दानीएलच्या पुस्तकाचाही चर्मतुकडा मिळाला आहे. दानीएल २:४ मध्ये इब्रीतून अरामिक भाषेत झालेला बदल देखील जपून ठेवलेला आहे व तो हजार वर्षापूर्वीच्या सापडलेल्या हस्तलिखाणातही आढळून येतो.

सुव्यवस्थितपणे जपून ठेवलेल्या गुंडाळीतील छोट्या भागांचे प्रदर्शन यरुशलेमातील “श्राईन ऑफ द बुक” या नावाच्या संग्रहालयात ठेवले आहे. हे संग्रहालय जमिनीखाली आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही तेथे भेट द्याल तेव्हा जणू गुहेतच प्रवेश करीत आहात असे वाटू लागेल. या संग्रहालयाचा वरचा भाग, ज्या मातीच्या भांड्यात यशयाची मृत समुद्राची गुंडाळी सापडली होती त्याच्या झाकणाच्या आकाराचा बनवलेला आहे. तरीही तुम्हाला येथे केवळ यशयाच्या हस्तलिखिताची हुबेहुब केलेली नक्कलच पहावयास मिळेल. मूळची मौल्यवान प्रत जवळच एका भक्कम खोलीत सुरक्षितपणे ठेवलेली आहे.

[तळटीपा]

a यापैकीचे अधिक महत्त्वपूर्ण वाचन न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स—वीथ रेफरन्सेस मध्ये यशया ११:१; १२:२; १४:४; १५:२; १८:२; ३०:१९; ३७:२०, २८; ४०:६; ४८:१९; ५१:१९; ५६:५; ६०:२१ येथे आढळेल. तळटीपेत त्या गुंडाळीचा संकेत 1QIs/a असा दर्शविलेला आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा