यहोवाचा वैभवी रथ पुढे प्रगमन करीत आहे
“‘चाकास गरगर फिरणारी चाके’ असे म्हटलेले मी ऐकले.” —यहेज्केल १०:१३.
१. यहोवाजवळ कोणते प्रवासाचे साधन आहे?
सध्याच्या वेगवान जेट लायनरच्या काळात जागतिक नेत्यांना असे वाटत असेल की, त्यांनी प्रवासाच्या कार्यक्षमतेत अंतिम केंद्रबिंदू गाठला आहे. तरीपण साधारण २,६०० वर्षांआधी यहोवा देवाने हे प्रकटविले की त्याच्यापाशीही प्रवासाचे एक अत्त्युतम साधन आहे, आणि ते कोणा तंत्रज्ञाने कधीच पाहिले नाही. तो एक प्रचंड, भयावह रथ आहे! विश्वाचा निर्माता एखाद्या रथासमान वाहनात बसून प्रवास करतो हे विचित्र वाटते का? तसे वाटावयास नको, कारण यहोवाचा वैभवी रथ कोणा मानवाच्या वैचारिक कल्पनेपेक्षा अति भिन्न आहे.
२. यहेज्केलचा पहिला अध्याय यहोवाच्या वैभवी रथाचे कसे वर्णन देतो, आणि संदेष्टा आपले लक्ष प्रथमतः कोणाकडे वेधवितो?
२ यहेज्केलच्या भविष्यवादाचा अध्याय १ला यात यहोवाला एक वैभवी रथ चालवताना दाखविण्यात आले आहे. हा चार चाके असणारा आश्चर्यकारक रथ स्वयंचलित असून तो मोठी आश्चर्याची कामे करतो. यहेज्केलने हा स्वर्गीय रथ इ. स. पू. ६१३ व्या वर्षी दृष्टांतात बघितला, त्यावेळी तो पुरातन बाबेलच्या एका कालव्याजवळ होता. हा संदेष्टा प्रथमतः आपले लक्ष यहोवाच्या या वैभवी रथासभोवती जे तैनातीला होते त्यांच्याकडे वळवतो. आपण त्याचे वाचन करीत असताना यहेज्केलने जे बघितले ते डोळ्यांपुढे उभे करण्याचा प्रयत्न करू या.
चार प्राणी
३. चार करुबांना असलेल्या चार मुखांपैकी प्रत्येक कशाला सूचित आहे?
३ यहेज्केल कळवतोः “मी पाहिले तो उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तेव्हा एक विशाळ मेघ येत असून त्यामध्ये लपेटलेला एक अग्निगोल होता; त्याभोवती प्रभा फाकली (होती); . . . त्याच्या मध्यभागी चार प्राण्यांच्या आकृतीसारखे काही नजरेस पडले.” (यहेज्केल १:४, ५) या चार प्राण्यांना किंवा करुबांना प्रत्येकी चार पंख व चार मुखे होती. त्यांचे एक मुख सिंहासारखे होते, जे यहोवाच्या न्यायाचे प्रतिक आहे. दुसरे मुख बैलाचे होते, जे देवाच्या सामर्थ्याचे प्रतिक आहे. तिसरे मुख गरुडाचे होते, जे देवाच्या ज्ञानाचे सूचक आहे. आणि त्यांना चवथे मुख मनुष्याचे होते, जे यहोवाठायी असणाऱ्या प्रेमाच्या गुणाचे प्रतिक आहे.—अनुवाद ३२:४; ईयोब १२:१३; यशया ४०:२६; यहेज्केल १:१०; १ योहान ४:८.
४. या करुबांना चार मुखे का होती, आणि या करुबांचा वेग केवढा होता?
४ प्रत्येक करुबाला एकेक मुख एकेका दिशेला होते. यामुळे करुबाला आपले मार्गाक्रमण लगेच बदलता येत होते व इच्छित मार्गाकडे असलेल्या तोंडाच्या दिशेने प्रवास सुरु करता येत होता. पण या करुबांचा वेग केवढा होता? ते तर विजेच्या गतीने इकडून तिकडे जात! (यहेज्केल १:१४) आतापर्यंत मानवाच्या कोणत्याही वाहनाने इतका वेग संपादलेला नाही.
५. यहेज्केलने रथाची चाके व त्यांच्या धावांचे कसे वर्णन केले?
५ एकाएकी रथाची चाके दृष्टीपथात येतात. ती केवढी वेगळी आहेत! त्यांच्याबद्दल १६ व १८ वे वचन म्हणतेः “त्यांचा आकार व घाट जणू काय चाकात चाक असा होता. त्या चाकांच्या धावा पाहिल्या तर त्या फार उंच व भयानक होत्या; त्या चोहोंच्या धावासभोवती सर्वत्र डोळे होते.” प्रत्येक करुबाशेजारी एक चाक याप्रमाणे एकंदर चार चाके होती. ही चाके वैडूर्यमण्यांसारखी म्हणजे पिवळ्या किंवा हिरव्या रत्नांच्या चकाकीने दिपविणारी होती. यामुळे एकंदर वैभवी दृष्टांताला दैदिप्यमानपणा व सुंदरता येत होती. या चाकाच्या धावांना “सर्वत्र डोळे” होते, त्यामुळे ते अंधळेपणाने कोठेही जात नव्हते. ही चाके खूपच उंच होती त्यामुळे एका परिक्रमेत ती खूपच अंतर कापीत होती. ही चाके, करुबांप्रमाणेच विजेच्या गतीने जाऊ शकत होती.
चाकात चाक
६. (अ) रथाला चाकात चाके कशी होती? (ब) चाकांनी आपली हालचाल कोणाच्या आधाराने चालविली होती?
६ आणखी काहीतरी अपूर्व होते. प्रत्येक चाकात आणखी एक चाक त्याच्या आसाभोवती काटकोनात बसवलेले होते. केवळ यामुळेच चाकांबद्दल असे म्हणता येत होते की, ती “चालत तेव्हा . . . चार दिशांपैकी पाहिजे त्या दिशेस नीट समोर चालत.” (वचन १७) चाकाची प्रत्येक बाजू एकेका दिशेकडे होती, त्यामुळे ही चाके लगेच आपली दिशा बदलू शकत होती. ती एखाद्या दिशेकडील आपली हालचाल चार करुबांना अनुलक्षून करत. चार चाकांवर देवाच्या रथाची बैठक एका अदृश्य आधाराने चालविली जात होती. ते जणू पाण्यावर हवेच्या दाबाने तरंगणाऱ्या एका प्रचंड बोटीसारखे होते.
७. या चाकातील शक्तीचा उगम कोठून होता?
७ पण या चाकांना आपली गति करुबांच्या अनुषंगाने राखण्यासाठी शक्ती कोठून मिळत होती? सर्वसमर्थ देवाच्या पवित्र आत्म्याकडून. २० वे वचन म्हणतेः “जिकडे आत्मा नेई तिकडे त्याच्या गतीच्या रोखाने ते जात . . . त्या प्राण्याचा आत्मा चाकात होता.” देवाची जी अदृश्य क्रियाशील शक्ती करुबांमध्ये होती, तीच या चाकांत होती.
८. या चाकांना कोणती संज्ञा देण्यात आली व का?
८ या चाकांना “गरगर फिरणारी चाके” असे संबोधण्यात आले. (यहेज्केल १०:१३) हे, प्रत्येक चाक जे काही करीत होते त्याला अनुलक्षून होते. ते गरगर फिरत होते. वैभवी रथाचा हा भाग अशा तऱ्हेने संबोधण्यात आल्यामुळे ते, रथ ज्या गतीने पुढे जात होता ते आपल्या लक्षात आणते. ती चाके इतक्या वेगाने गरगर फिरत होती तरी ती आपला मार्ग पाहू शकत होती, कारण त्यांना सर्वत्र डोळे होते.
९. रथाच्या वेगवान चाकांच्या वर जे होते त्याचे वर्णन यहेज्केलने कसे केले?
९ पण आता आपण त्या भयानक व वेगवान चाकाच्या वर काय होते ते बघू या. यहेज्केलचा १ला अध्याय व २२ वे वचन सांगतेः “त्या प्राण्यांच्या माथ्यावर चांदव्यासारखे काही होते. ते दिपविणाऱ्या व भयानक स्फटिकासारखे दिसले. ते त्यांच्या डोक्यावरुन ताणलेले होते.” वरील जागा जरी भरीव होती तरी ती “भयानक स्फटिकासारखी” पारदर्शक होती. हजारो रत्नांवर सूर्यकिरणे पडल्यावर जो चकाकीपणा येतो तसा चकाकीपणा येथे होता. ते खरेच भयप्रेरित दृश्य होते!
रथाचा वैभवी चालक
१०. (अ) सिंहासन व त्यावर बसलेल्याचे कसे वर्णन देण्यात आले आहे? (ब) रथाचा स्वार वैभवाने वेष्ठित आहे याद्वारे काय सूचित करण्यात आले आहे?
१० रथ थांबू शकतो हे उघड आहे, कारण त्यामुळेच त्यावरील स्वाराला यहेज्केलबरोबर बोलता येते. वरील भागी सिंहासनासारखे काहीसे नीलमणीच्या रुपात दिसत आहे. त्या सिंहासनावर असा कोणीतरी आहे, जो मनुष्य असल्यासारखा दिसतो. हे मानवी रुप यहेज्केलला ईश्वरी दर्शनाचे आकलन होण्यासाठी योग्यच आहे. पण ते मानवी रुप वैभवात आच्छादिलेले आहे, त्यामुळे ते सभोवार तृणमण्यासारखे, चांदी व सोन्याच्या चकाकीच्या मिश्रणाप्रमाणे चकाकत आहे. केवढे हे वैभवी दर्शन! या मानवी रुपाच्या कमरेच्या वर व खाली हे दैदिप्यमान वैभव चकाकत आहे. त्यामुळे एकंदर स्वरुपच वैभवाने वेष्ठित आहे. याद्वारे, यहोवा हा दैदिप्यमान तेजोमयपणा राखून आहे. तसेच, या रथाच्या स्वाराभोवती मेघधनुष्य पसरलेले आहे. वादळानंतर दिसणारे धनुष्य केवढी शांती व स्तब्धता सूचित करते! ही शांत वृत्ती असल्यामुळेच यहोवाला आपले गुण ज्ञान, न्याय, सामर्थ्य व प्रीती परिपूर्ण रुपात समतोल ठेवता येतात.
११. यहोवाचा रथ व त्याचे सिंहासन पाहून यहेज्केलवर कोणता परिणाम घडला?
११ यहोवाचा रथ व त्याचे सिंहासन प्रकाश व विविध रंगांनी उजळलेले आहेत. हे अंधाराचा तसेच भूतविद्येचा अधिकारी सैतान याच्या किती विपरीत आहे! ते सर्व वैभव बघून यहेज्केलवर कसा परिणाम झाला? “मी ते पाहून,” तो म्हणतो, “उपडा पडलो, व कोणा बोलणाऱ्याची वाणी माझ्या कानी आली.”—यहेज्केल १:२८.
रथ कशाची प्रतिमा आहे
१२. यहोवाच्या वैभवी रथाद्वारे काय चित्रित करण्यात आले आहे?
१२ हा अद्भूत रथ कशाची प्रतिमा आहे? यहोवा देवाच्या अच्युत्तम किंवा स्वर्गीय संस्थेची प्रतिमा. यात अदृश्य वातावरणातील सर्व पवित्र आत्मिक प्राण्यांचा समावेश आहे—सेराफ, करुब, व दिव्यदूत. वस्तुतः यहोवा हा सर्वसमर्थ देव असल्यामुळे त्याचे सर्व आत्मिक प्राणी त्याच्या अधीन आहेत, व तो त्यांच्यावर स्वार आहे हे या अर्थी की, तो त्यांच्यावर परोपकारी वृत्तीने वर्चस्व करतो व त्यांचा आपल्या उद्देशानुरुप वापर करतो.—स्तोत्रसंहिता १०३:२०.
१३. (अ) यहोवा आपल्या संस्थेला चालवीत आहे याबद्दल काय म्हणता येऊ शकते? (ब) चार चाके असलेला यहोवाच्या रथाचा दृष्टांत तुम्हावर कसला परिणाम करतो?
१३ यहोवा त्याची संस्था जणू रथाप्रमाणे चालवीत आहे व तो तिला त्याचा आत्मा जेथे नेऊ इच्छितो तेथे नेतो. ही संस्था वेड्यासारखी, अनियंत्रितपणे वा कोणा बुद्धिमान देखरेखीविना धावत नाही. या संस्थेला आपल्याच इच्छेनुरुप कोणत्याही दिशेने जाण्यासाठी यहोवा सोडीत नाही. उलटपक्षी, ती त्याचे मार्गदर्शन अनुसरते. ते सर्व एकत्र मिळून देवाच्या हेतूंची पूर्ण रुपाने पूर्णता साधण्यासाठी पुढे प्रगमन करीत आहे. चार चाके असणारा व पुढे प्रगमन करणाऱ्या यहोवाच्या रथाच्या दृष्टांताद्वारे स्वर्गीय संस्थेचे केवढे अद्भूत दर्शन घडविण्यात आले आहे! याच्याच अनुषंगाने यहोवाची संस्था प्रातिनिधकपणे चौरस किंवा पूर्ण एकमताची आहे असे म्हटले पाहिजे.
पहारेकरी या नात्याची नियुक्ती
१४. संदेष्टा यहेज्केल कोणाचे प्रतिक आहे?
१४ पण यहेज्केल संदेष्टा कोणाचे प्रतिक ठरतो? ऐतिहासिक वस्तुस्थितीनुसार हे स्पष्ट आहे की, यहोवाच्या साक्षीदारांचा आत्म्याने अभिषिक्त असणारा वर्ग या वैभवी रथासोबत आपला सहवास राखून आहे. त्यामुळे यहेज्केल यहोवाच्या साक्षीदारांतील अभिषिक्त शेषांचे १९१९ पासून प्रतिक ठरतो. देवाच्या स्वर्गीय संस्थेने आध्यात्मिक रितीने त्या वर्षापासून या अभिषिक्त शेषांसोबत आपला संपर्क, यांनी सबंध जगाला यहोवाचे साक्षीदार या नात्याने दिसावे म्हणून त्यांचे उत्थान करण्यासाठी केला. (पडताळा प्रकटीकरण ११:१-१२.) त्यावेळी ती रथरुपी संस्था प्रगमनशील होती व आजही ती आहे. खरे म्हणजे तिची प्रगतीची चाके तर पूर्वीपेक्षा अधिक जदल गतीने धावत आहेत. यहोवा अत्यंत वेगवान पद्धतीने पुढे जात आहे!
१५. वैभवी रथावरील स्वाराची वाणी काय म्हणते, आणि यहेज्केलला कोणती नियुक्ती मिळते?
१५ तो वैभवी रथ येऊन आपल्याकडे का थांबला ते यहेज्केलला जाणून घ्यायचे होते. त्याला रथामध्ये बसलेल्या व्यक्तीकडून एक वाणी बोलत असल्याची ऐकायला आली. ते भयप्रेरित दृश्य बघून यहेज्केल गांगरुन गेला व तो उपडा पडला. आता वैभवी रथाच्या स्वाराची कोणती वाणी ऐकायला येत आहे त्याकडे लक्ष द्या. ती म्हणालीः “मानवपुत्रा, तू आपल्या पायांवर उभा राहा, म्हणजे मी तुजबरोबर बोलेन.” (यहेज्केल २:१) तेव्हा यहोवा यहेज्केलला पहारेकऱ्याची नेमणूक देतो व त्याला बंडखोर इस्राएल घराण्याला इशारा देण्यास सांगतो. त्याला ईश्वरी नामाच्या आधारानेही बोलण्याची नियुक्ती मिळते. यहेज्केल या नावाचा अर्थ, “देव बळकटी देतो,” असा आहे. या कारणामुळे यहेज्केल वर्गाची देवाने बळकटी केली असून त्याची त्याने ख्रिस्ती धर्मजगावर पहारेकरी म्हणून नियुक्ती केली असल्याचे दिसत आहे.
१६, १७. (अ) वैभवी रथाच्या दृष्टांताने यहेज्केलला कोणता लाभ मिळवून दिला? (ब) आमच्या काळी वैभवी रथाच्या दृष्टांताची समज यहेज्केल वर्ग व मोठा लोकसमुदाय यांजवर कशी परिणामकारक ठरली?
१६ वैभवी रथाचा दृष्टांत यहेज्केलला शांतचित्त व जबरदस्त धक्का देणारा ठरला, पण त्याने त्याला यरुशलेमास येणाऱ्या नाशाची ताकीद देण्यासाठी पहारेकरी अशी नियुक्ती दिली. हेच आजच्या पहारेकरी वर्गाबद्दलही खरे ठरले आहे. यहोवाचा वैभवी रथ पुढे प्रगमन करीत आहे या दृष्टांताबद्दल मिळालेल्या समजबुद्धीने अभिषिक्त शेषांवर देखील मोठा प्रभाव पडला. १९३१ मध्ये त्यांना यहेज्केलच्या या दृष्टांताबद्दल अधिक शिकायला मिळाले याचा प्रत्यय विंडिकेशन पुस्तकात प्रकाशित झालेल्या माहितीवरुन दिसला. त्यांच्याठायी शांतचित्त रसिकता उभारली गेली आहे हे द वॉचटावर मासिकाच्या ऑक्टोबर १५, १९३१ ते ऑगस्ट १, १९५० पर्यंतच्या मुखपृष्ठावर, वैभवी रथाविषयीच्या यहेज्केलच्या दृष्टांताचे चित्रकाराच्या कल्पनेचे एक चित्र वर उजव्या रकान्यात छापण्यात येत होते याद्वारे दिसू शकले. अशाप्रकारे, यहेज्केल वर्ग त्याला मिळालेल्या नियुक्तीनुरुप वागला; त्याने पहारेकरी या अर्थाने सेवा केली आणि ईश्वरी घोषणा विदित केली. वैभवी रथावर विराजमान असलेल्या यहोवाकडून ख्रिस्ती धर्मजगाचा अग्नीमय नाश होण्याची वेळ इतकी जवळ आली आहे असे पूर्वी कधी वाटले नव्हते!
१७ आज अभिषिक्त शेषांसोबत मेंढरासमान लोकांचा “मोठा लोकसमुदाय” सहवास राखून आहे. (प्रकटीकरण ७:९) ते एकत्र मिळून ख्रिस्ती धर्मजगत आणि त्याच्या सबंध सैतानी व्यवस्थेवर येत असलेल्या नाशाची घोषणा करीत आहेत. हे घोषणेचे कार्य वेगाने होत आहे आणि प्रकटीकरण १४:६, ७ दाखविते तसे देवदूत या कामाला आधार देत आहेत.
वैभवी रथासोबत प्रगमन करीत राहणे
१८. देवदूतांचा आधार सतत मिळत राहण्यासाठी काय केले पाहिजे, व कशाबद्दल आम्ही संवेदनात्मक राहण्यास हवे?
१८ ईश्वरी न्यायदंडाची घोषणा करण्याची नियुक्ती लाभलेल्या यहोवाच्या पृथ्वीवरील सेवकांना साहाय्य देण्यासोबत हे नम्र देवदूत देवाच्या स्वर्गीय संस्थेचा एक भाग या नात्याने ते एकीने पुढे जात आहेत. आपल्याला या देवाच्या प्रबळ स्वर्गदूतीय सेवकांकडून संरक्षण व मार्गदर्शन मिळवावयाचे आहे तर आपणही आपली गती गरगर फिरणाऱ्या चाकांच्या गतीबरोबर राखली पाहिजे. याखेरीज, यहोवाच्या दृश्य संस्थेचे एक भाग या नात्याने वैभवी रथाच्या सोबत आपली गती राखताना आम्ही देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाला संवेदनात्मक असले पाहिजे. (पडताळा फिलिप्पैकर २:१३.) आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत तर आपण वैभवी रथ ज्या दिशेने जात आहे त्याच दिशेने पुढे गेले पाहिजे. आम्ही कधीही विरुद्ध मार्गाने प्रगमन करावयास नको. ज्या मार्गाने जाण्याचे मार्गदर्शन आपल्याला दिले जाते त्यानेच आपण गेले पाहिजे. यामुळे, मंडळीत फूट पडणार नाही.—१ करिंथकर १:१०.
१९. (अ) जसे वैभवी रथाच्या चाकांना सर्वत्र डोळे होते तसे यहोवाच्या लोकांनी कशाविषयी जागृत असावयास हवे? (ब) सध्याच्या गोंधळाच्या काळात आपले कोणते मार्गाक्रमण राहिले पाहिजे?
१९ देवाच्या रथाच्या चाकांना सर्वत्र असणारे डोळे जागृततेची सूचकता दर्शवतात. जशी स्वर्गीय संस्था जागृत आहे तसेच आपण देखील यहोवाच्या पृथ्वीवरील संस्थेला आपले पाठबळ देण्यासाठी जागृत असले पाहिजे. आम्ही स्थानिक वडीलांना सहकार्य देऊन मंडळीच्या स्तरावर हे पाठबळ दाखवू शकतो. (इब्रीयांस १३:१७) सध्याच्या गोंधळाच्या काळात ख्रिश्चनांनी यहोवाच्या संस्थेच्या अगदी निकट राहिले पाहिजे. घडणाऱ्या घटनांबद्दल आम्ही स्वतःचे मतप्रतिपादन करु नये, कारण तसे झाल्यास आपण यहोवाच्या वैभवी रथासोबत आपले प्रगमन करीत नाही हे दिसेल. याकरता, आपण स्वतःला नेहमी हेच विचारु याः ‘हा वैभवी रथ कोणत्या दिशेने जात आहे?’ आपण देवाच्या दृश्य संस्थेच्या बरोबरीने जात राहिलो तर अदृश्य संस्थेसोबत देखील पुढे जात राहू.
२०. प्रेषित पौल फिलिप्पैकर ३:१३-१६ मध्ये कोणती सुंदर सूचना देतो?
२० याबाबतीत पौलाने हे लिहिलेः “बंधुजनहो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात आणले असे मानीत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करुन व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, ख्रिस्त येशूमध्ये देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे धावतो. हेच एक माझे काम आहे. तर जितके आपण प्रौढ आहो, तितक्यांनी हाच भाव धरावा; आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी दुसरा भाव धरला तर देव तेही तुम्हाला प्रकट करील. इतकेच की, आपण ज्या नियमाने इतकी मजल मारली त्याच नियमाने पुढे चालावे.”—फिलिप्पैकर ३:१३-१६.
२१. कोणता नियम राखल्यामुळे आपल्याला देवाच्या संस्थेसोबत आध्यात्मिक प्रगती राखता येणे शक्य आहे?
२१ येथे “नियम” हा जो शब्द आहे तो, जेथून आपल्याला मुक्त ठेवता येणार नाही अशा वाईट आचाराला अनुसरुन नाही. यहोवाच्या साक्षीदारांना चांगला नियम आहे की, ज्यामुळे ते आपली आध्यात्मिक प्रगती करू शकतात. तो व्यक्तीगत पवित्र शास्त्र अभ्यासात सहभागी होण्याचा, सभांना उपस्थित राहण्याचा, देवाच्या राज्याचा नियमित रितीने प्रचार करीत राहण्याचा आणि देवाच्या स्वर्गीय संस्थेचे गुण परावर्तित करीत राहण्याचा नियम आहे. या नियमामुळे त्यांना यहोवाच्या वैभवी रथरुपी संस्थेचे नेतृत्व अनुसरता येते. अशा मार्गात टिकून राहिल्यामुळे आपल्याला एकतर स्वर्गातील अमर जीवनाचे बक्षिस किंवा नंदनवन बनलेल्या पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाचे बक्षिस मिळवण्याचे ध्येय गाठता येईल.
२२. (अ) अभिषिक्त शेष तसेच दुसरी मेंढरे यांचा मोठा लोकसमुदाय यांनी संघटीतरित्या एक होण्यासाठी काय केले पहिजे? (ब) यहोवाच्या नजरेतून काय सुटत नाही?
२२ योहान १०:१६ सुचविते त्याप्रमाणे “दुसरी मेंढरे” व यहेज्केल वर्ग एक संघटित संस्था असेल. या कारणास्तव, यहोवाच्या संस्थेतील सर्वांनीच यहेज्केलच्या पहिल्या अध्यायातील लिखित करण्यात आलेल्या दृष्टांताच्या अर्थसूचकतेबद्दल पूर्ण समज राखणे जरुरीचे आहे. यामुळे त्यांना देवाच्या वैभवी रथासोबत आपली वाटचाल राखता येईल. त्याचा दृष्टांत आपल्याला देवाच्या दृश्य तसेच अदृश्य संस्थेसोबत पुढे जात राहण्याची रसिकता वाढविण्याची मदत करतो. हेही लक्षात असू द्या की, यहोवाचे नेत्र “अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात व जे कोणी सात्त्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट” करीत असतो. (२ इतिहास १६:९) यहोवाच्या नजरेतून एकही गोष्ट सुटत नाही. खासपणे, त्याच्या विश्वव्याप्त सार्वभौमत्वाला गौरविण्याच्या उद्देशाला अनुलक्षून असणारे काहीही त्याच्या नजरेतून सुटत नाही.
२३. यहोवाचा वैभवी रथ पुढे प्रगमन करीत असता आपण काय केले पाहिजे?
२३ यहोवाचा वैभवी रथ आज निश्चितपणे पुढे जात आहे. रथावर विराजमान झालेल्या त्या वैभवी व्यक्तीद्वारे लवकरच सर्व काही वैभवयुक्त होईल व यामुळे त्याला विश्वाचा सार्वभौम सत्ताधारी असे गौरव मिळेल. त्याचे सेराफ, करुब, आणि दिव्यदूत हे सर्व आमच्या जगभर चाललेल्या मोठ्या प्रचारकार्यास पाठबळ देत आहेत. तेव्हा आपणही यहोवाच्या स्वर्गीय संस्थेसोबत पुढे जाऊ या. पण त्या वेगाने जात असलेल्या वैभवी रथासोबत आम्हाला आपली मजल कशी राखता येईल? याच गोष्टीची चर्चा आपल्याला पुढील अंकात आढळेल.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ यहेज्केलने बघितलेल्या चार प्राण्यांद्वारे कोणत्या गुणांचे प्रतिनिधित्व करण्यात आले?
◻ यहोवाचा वैभवी रथ कशाचे चित्र देतो?
◻ देवाचा संदेष्टा यहेज्केल कोणाचे चित्र आहे?
◻ यहोवाच्या वैभवी रथाच्या समजावणूकीने यहेज्केल वर्ग व मोठा लोकसमुदाय याजवर कसा परिणाम झाला?