वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 १२/१ पृ. ३१
  • तुम्हास आठवते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हास आठवते का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही त्रैक्य मानावे का? या माहितीपत्रकाच्या अभ्यासाचे प्रश्‍न
    आमची राज्य सेवा—१९९०
  • ती पवित्र शास्त्राची स्पष्ट शिकवण आहे का?
    तुम्ही त्रैक्य मानावे का?
  • त्रैक्याचे स्पष्टीकरण कसे देण्यात येते?
    तुम्ही त्रैक्य मानावे का?
  • त्रैक्याच्या तत्त्वाची कशी वाढ झाली?
    तुम्ही त्रैक्य मानावे का?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 १२/१ पृ. ३१

तुम्हास आठवते का?

तुम्ही टेहळणी बुरुजच्या अलिकडील अंकांचे काळजीपूर्वक वाचन केले आहे काय? असल्यास पुढील मुद्दे तुमच्या लक्षात येऊ शकतील:

◻ यहोवाच्या साक्षीदारांच्या आणि ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकवर्गाच्या शिकवणीत कोणता मोठा फरक आहे?

यहोवाचे साक्षीदार देवाच्या वचनाच्या अधिकाराने शिकवतात, पण ख्रिस्ती धर्मजगतातील पाळक आपले शिक्षण बाबेल व मिसर यापासून चालत आलेल्या मूर्तिपूजक धार्मिक संप्रदायांवर आधारलेले असे देतात.—११/९१, पृष्ठ २५.

◻ गलतीकरांस पत्र ५:२२, २३ मध्ये उल्लेखिलेल्या देवाच्या आत्म्याच्या नऊ फळांपैकी प्रीती हा का सर्वश्रेष्ठ आहे?

देवाच्या आत्म्याची इतर आठ फळे, प्रीती ह्‍या पहिल्या उल्लेखिण्यात आलेल्या गुणाचे विविध प्रदर्शन किंवा प्रकार आहेत. आत्म्याची ही सर्व फळे जरुरीची आहेत, पण आम्हाठायी प्रीतीचा अभाव असल्यास त्यांच्याकडून आम्हास कसलाही लाभ होऊ शकणार नाही. (१ करिंथकर १३:३)—१२/९१, पृष्ठ १४.

◻ येशूने आपल्या शिष्यांना, “आम्हास परिक्षेत आणू नकोस,” असे प्रार्थिण्यास शिकवले तेव्हा त्याचा अर्थ काय होता? (मत्तय ६:१३)

यहोवा आपल्याला पाप करण्यासाठी मोहित करतो असा या शब्दांचा अर्थ घेऊ नये. उलटपक्षी, परिक्षा आल्यास किंवा देवाची अवज्ञा करण्याचा दबाव आल्यास त्याला बळी पडू न देण्यासाठी यहोवाला प्रार्थना करु शकतो. आम्ही आमच्या पित्याला आमची पावले मार्गदर्शित करण्याची विनंती करू शकतो की, ज्यामुळे आम्हास सहन न होणारी अशी परिक्षा आम्हावर येणार नाही. (१ करिंथकर १०:१३)—९/९१, पृष्ठ २०.

◻ एखाद्या व्यक्‍तीचा केव्हा बाप्तिस्मा होण्यास हवा?

देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी जेव्हा एखादा स्वतःचे यहोवाला ख्रिस्त येशूद्वारे पूर्ण रुपाचे, अटीविना व बिनशर्त स्वरुपाचे समर्पण करतो तेव्हा बाप्तिस्म्याचे पाऊल उचलले पाहिजे.—९/९१, पृष्ठ ३१.

◻ नोहाच्या विश्‍वासाने जगाचा कसा धिक्कार केला? (इब्री. ११:७)

नोहाचा आज्ञाधारकपणा व नीतीमान कृत्ये यांनी हे दाखविले की, तो व त्याच्या कुटुंबाच्या व्यतिरिक्‍त इतरांचाही, जर यांनी आपले जीवनाक्रमण बदलविले असते तर बचाव होऊ शकला असता. नोहाला स्वतःच्या अपूर्ण शरीराकडून, सभोवतालच्या जगाकडून तसेच दियाबलाचा दबाव होता तरी तरी देवास संतुष्ट करणारे जीवन व्यतित करता येणे शक्य आहे असे नोहाने सिद्ध करून दाखविले.—१०/९१, पृष्ठ १९.

◻ शारीरिक आजार, नैराश्‍य, आणि आर्थिक तणाव यांच्याशी सामना देत असता एखाद्या ख्रिश्‍चनाला आपला आनंद कसा टिकवता येईल?

देवाचे वचन आवश्‍यक असणारे सांत्वन व मार्गदर्शन देते. स्तोत्रांचे वाचन करणे किंवा ती ऐकणे हे आवश्‍यक असणारा तजेला मिळवून देते. दावीद आम्हाला सूचना करतोः “तू आपला भार परमेश्‍वरावर [यहोवा, न्यू.व.] टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल.” याशिवाय, यहोवा “प्रार्थना ऐकणारा” देव आहे अशी तो आम्हाला खात्री देतो. (स्तोत्रसंहिता ५५:२२; ६५:२) यहोवाची संस्था आपल्या प्रकाशनांमार्फत तसेच मंडळीच्या वडीलजनांद्वारे आपल्याला, आमच्या समस्यांच्या सामना करण्यात मदत देण्यात सर्वदा तयार आहे.—४/९१, पृष्ठे १४-१५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा