वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ४/१ पृ. १२-१३
  • ख्रिस्ती उपासना का श्रेष्ठ आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ती उपासना का श्रेष्ठ आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ख्रिस्त हा दिव्यदूत व मोशपेक्षा श्रेष्ठ
  • ख्रिस्ती देवाच्या विश्रांतीमध्ये प्रवेश करतात
  • श्रेष्ठ स्वरुपाचे याजकत्व व करार
  • विश्‍वास जरुरीचा आहे!
  • दुसरी मेंढरे आणि नवा करार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • यहोवास संतुष्ट करणारी अर्पणे सादर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • नव्या कराराकरवी मोठे आशीर्वाद
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • सर्व मानवांच्या फायद्यासाठी एक राजकीय याजकगण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ४/१ पृ. १२-१३

ख्रिस्ती उपासना का श्रेष्ठ आहे

इब्री लोकांस पत्र यातील ठळक वैशिष्ट्ये

यहोवा देवाने आपल्या पुत्राला, येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवर पाठविले तेव्हा त्याच्याद्वारे त्याने उपासनेमधील श्रेष्ठ प्रकार प्रस्तुत केला. याचे कारण हे की, येशू, ख्रिस्ती धर्माचा संस्थापक हा देवदूत व संदेष्टा मोशे यापेक्षा श्रेष्ठ आहे. ख्रिस्ताचे याजकत्व हे तुलनेत बघता, प्राचीन इस्राएलातील लेव्यांच्या याजकत्वापेक्षा खूपच श्रेष्ठ आहे. याशिवाय येशूचे यज्ञार्पण हे मोशेच्या नियमशास्त्राखाली जी प्राण्यांची यज्ञार्पणे होत त्यापेक्षा अत्यंत श्रेष्ठ आहे.

हे मुद्दे इब्रीयांस पत्र यामध्ये चर्चिण्यात आले आहेत. हे पत्र प्रेषित पौलाने रोमध्ये असताना इ. स. ६१ च्या सुमारास लिहिले आणि यहूदियात राहणाऱ्‍या विश्‍वासधारी इब्री लोकांना पाठविले. आरंभापासूनच ग्रीक तसेच आशियाई ख्रिस्तीजनांनी ते पत्र पौलाचे आहे असे मानले होते व हे लेखकाचा इब्री शास्त्रवचनांशी असलेला सूक्ष्म परिचय तसेच त्याने विषयाची केलेली व्यवहार्य मांडणी या गोष्टीवरून सूचित होते व ही लक्षणे पौलाठायी होती. यहुद्यांना त्याच्याविषयी तिरस्कार वाटत होता त्यामुळे व तो “परराष्ट्रीयांचा प्रेषित” आहे असे ओळखले जात असल्यामुळे त्याने आपले नाव पत्रात नमूद केले नसावे. (रोमकर ११:१३) तर आता पौलाने इब्रीयांस लिहिलेल्या पत्रात ख्रिस्ती धर्माचे जे श्रेष्ठ पैलू दिसतात त्यांच्याकडे आपण बारकाईने पाहू या.

ख्रिस्त हा दिव्यदूत व मोशपेक्षा श्रेष्ठ

पहिल्यांदाच देवाच्या पुत्राचा श्रेष्ठपणा दाखविण्यात आला आहे. (१:१–३:६) दिव्यदूत त्याला प्रणाम करतात आणि त्याची बादशाही राजवट देवावर अवलंबून आहे. या कारणास्तव पुत्राने जे काही सांगितले आहे त्याकडे आपण वाजवीपेक्षा अधिक लक्ष दिले पाहिजे. याखेरीज, आपण हेही लक्षात ठेवले पाहिजे दिव्यदूतांपेक्षा किंचित कमी करण्यात आलेल्या येशू या मनुष्याला आता त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ करण्यात आले आहे व त्याला भावी काळच्या पृथ्वीवरील वसाहतींवर अधिकार सोपविण्यात आला आहे.

येशू ख्रिस्त हा मोशेपेक्षाही श्रेष्ठ आहे. तो कसा? मोशे हा देवाच्या इस्राएली घरात केवळ सेवक असा होता. पण यहोवा देवाने येशूला तर सबंध घराण्यावर किंवा देवाच्या लोकांच्या मंडळीवर नेमले आहे.

ख्रिस्ती देवाच्या विश्रांतीमध्ये प्रवेश करतात

यानंतर, प्रेषित हे स्पष्ट करतो की, देवाच्या विश्रांतीमध्ये प्रवेश मिळवता येतो. (३:७–४:१३) मिसराच्या गुलामगिरीतून मुक्‍त झालेले इस्राएल लोक बंडखोरी व विश्‍वासाची उणीव यामुळे त्यात प्रवेश मिळविण्यात अपयशी ठरले. पण आपण देवावर विश्‍वास प्रदर्शित केला आणि ख्रिस्तास आज्ञाधारकपणे अनुसरले तर त्या विश्रांतीमध्ये प्रवेश मिळवू शकतो. त्यामुळे आठवड्याच्या शब्बाथाचा अनुभव घेण्याऐवजी आपण सर्व स्वार्थी कामापासून विसावा मिळवण्याचा श्रेष्ठ आशीर्वाद प्रतिदिनी अनुभवीत राहू.

देवाचे वचन जे, “कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण आणि जीव व आत्मा . . . ह्‍यांना भेदून आरपार जाणारे” आहे त्यामध्ये देवाच्या विश्रांतीमध्ये प्रवेश हे अभिवचन दिलेले आहे. देवाचे वचन भावना व कल्पना यांचे परिक्षण करून शारीरिक इच्छा व मानसिक विचार यांना वेगळे करते. (पडताळा रोमकर ७:२५.) आमचा “जीव” किंवा जीवन ईश्‍वरी “आत्मा” वा प्रवृत्त्या यांजशी जडलेला आहे तर मग, आपल्याला देवाच्या विश्रांतीमध्ये प्रवेश मिळवता येऊ शकेल.

श्रेष्ठ स्वरुपाचे याजकत्व व करार

यानंतर पौल ख्रिस्ताच्या याजकपणाचे श्रेष्ठत्व तसेच नव्या कराराचे श्रेष्ठत्व याविषयीची माहिती देतो. (४:१४—१०:३१) पापी मानवजातीविषयी निष्पाप येशू ख्रिस्ताला कळवळा वाटतो, त्याचे कारण म्हणजे, त्याची सर्व बाबतीत आमच्याप्रमाणे पारख झालेली आहे. याशिवाय, देवाने त्याला “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक” असे नियुक्‍त केले आहे. येशूठायी अविनाशी जीवन आहे त्यामुळे त्याला उद्धारक कार्यासाठी वारसाची गरज नाही; हे लेवी प्रमुख याजकांविषयी नव्हते. त्याने प्राण्यांचे यज्ञ अर्पण करण्याची गरज नाही, कारण त्याने अत्यंत श्रेष्ठ स्वरुपाचे आपलेच मानवी शरीर बलिदान केले आणि आपल्या रक्‍ताचे मूल्य सोबत घेऊन स्वर्गात प्रवेश मिळविला.

येशूच्या कराराने स्थापिण्यात आलेला नवा करार हा नियमशास्त्र करारापेक्षा श्रेष्ठ आहे. नव्या करारात असलेल्या लोकांच्या अंतःकरणात देवाचे नियम लिहिलेले आहेत व ते आपल्या पापांची क्षमा अनुभवतात. (यिर्मया ३१:३१-३४) याविषयी त्यांना वाटणारी कृतज्ञता त्यांना आपल्या आशेची ग्वाही देण्यास तसेच आपल्या समविश्‍वासू बांधवांसोबत एकत्रित होण्यासाठी चालना देते. जे स्वेच्छेने पाप करीत राहतात अशांना यांच्यासारखा पापांची क्षमा होणारा यज्ञ राहिला नाही.

विश्‍वास जरुरीचा आहे!

श्रेष्ठ अशा नव्या करारापासून फायदा मिळविण्यासाठी विश्‍वासाची जरुरी आहे. (१०:३२—१२:२९) याचप्रमाणे यहोवाने दिलेल्या अभिवचनांची प्राप्ती मिळविण्यासाठी धीराची गरज आहे. आपल्याला धीर धरण्यास उत्तेजन मिळावे यासाठी आम्हाभोवती ख्रिस्तपूर्व साक्षीदारांचा ‘मोठा मेघ’ पसरला आहे. तरीपण छळामध्ये आपण येशूचे निर्दोष जीवनाक्रमण खासपणे लक्षात घेतले पाहिजे. देव आम्हावर जी काही परिक्षा येऊ देण्याची मुभा देतो ती आम्हास शिस्त लावण्यासाठी असते व यामुळे धार्मिकतेचे शांतीदायक फळ मिळते. यहोवाच्या अभिवचनांच्या खात्रीलायकतेने आम्हाला आमची पवित्र सेवा त्याला “ईश्‍वरी भय व आदराने” करण्याचा निश्‍चय वाढविला पाहिजे.

पौल सूचनेद्वारे समारोप करतो. (१३:१-२५) विश्‍वासाने आम्हाला बंधूप्रेम, पाहुणचार, त्रास सहन करीत असलेल्या समविश्‍वासूंचा विचार राखण्यास, विवाह आदरणीय ठेवण्यास, आणि “जवळ आहे तेवढ्यातच तृप्त” राहण्यास चालना दिली पाहिजे. मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍यांच्या विश्‍वासाचे आम्ही अनुकरण करावे व त्यांच्या आज्ञा मानाव्या. याखेरीज, आम्ही धर्मत्याग टाळावा, येशूने सहन केलेली निंदा सहन करावी, “स्तुतीचा यज्ञ . . . देवाला नित्य अर्पावा,” आणि चांगले ते करीत राहावे. या गोष्टी खऱ्‍या ख्रिस्ती धर्माच्या श्रेष्ठ पैलूंमधील आहेत.

[१३ पानावरील चौकट/चित्रं]

विविध बाप्तिस्मेः इस्राएलांच्या निवासमंडपात केल्या जाणाऱ्‍या उपासनेत “खाणे, पिणे व नाना प्रकारची क्षालने (बाप्तिस्मे)” हे प्रकार होते. (इब्रीयांस ९:९, १०) ही क्षालने किंवा बाप्तिस्मे मोशेच्या नियमशास्त्रामध्ये सांगितलेली विधिपूर्वक होणारी धुणी होती. घाण झालेली भांडी धुतली जात तसेच वस्त्रे धुणे व अंघोळ करणे ही सांप्रदायिक स्वच्छता अनुसरली जात असे. (लेवीय ११:३२; १४:८, ९; १५:५) याजक अंघोळ करीत, होमार्पणाशी संबंधित असणाऱ्‍या गोष्टीही पाण्यात बुडवल्या जात. (निर्गम २९:४; ३०:१७-२१; लेवीय १:१३; २ इतिहास ४:६) पण या ‘नाना प्रकारची क्षालने’ यामध्ये मशीहा आला तेव्हा यहुदी जी प्रथा आचरीत, म्हणजे, ‘पेले, घागरी, पितळेची भांडी धुणे’ यांचा समावेश नव्हता. तसेच इब्रीयांस ९:१० हे बाप्तिस्मा करणारा योहान याने दिलेला पाण्याचा बाप्तिस्मा आणि ख्रिस्ती या नात्याने देवास केलेल्या समर्पणाचा बाप्तिस्मा यांना उल्लेखित नाही.—मत्तय २८:१९, २०; मार्क ७:४; लूक ३:३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा