वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ४/१ पृ. ११
  • बंधुप्रेम कार्यशील असते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बंधुप्रेम कार्यशील असते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रीती व विश्‍वास याविषयीची प्रशंसा
  • फिलेमोन आणि अनेसिम—ख्रिस्ती बंधुत्वात समेट
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • रोममध्ये पौल
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • फिलेमोन रूपरेषा
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • तीत, फिलेमोन व इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रांतील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ४/१ पृ. ११

बंधुप्रेम कार्यशील असते

फिलेमोनाला पत्र यातील ठळक वैशिष्ट्ये

येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना “नवी आज्ञा” दिली होती की, त्याने त्यांच्यावर केली तशी त्यांनी एकमेकांवर प्रीती करावी. (योहान १३:३४, ३५) अशा प्रेमामुळे ते एक दुसऱ्‍यांसाठी मरावयास तयार राहणार होते. होय, बंधुप्रेम इतके दृढ व कार्यशील असते.

आशिया मायनरमधील कलस्सै या शहरातील मंडळीत फिलेमोन हा एक ख्रिस्ती होता. याला हे बंधुप्रेम प्रभावीत करील अशी पौलाला खात्री होती. प्रेमानेच फिलेमोनाला आपले घर ख्रिस्ती सभांच्या वापरासाठी देण्याकरता आधीच उद्युक्‍त केले होते. फिलेमोनचा दास अनेसिम त्याच्यापासून पळून आला होता. कदाचित त्याने पैसे चोरून तो रोमपर्यंत प्रवास करीत आला असावा व येथेच त्याची व पौलाची गाठ पडली व त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला.

आता इ. स. ६०-६१ च्या सुमाराला रोममध्ये कैदेत असताना पौलाने खासपणे फिलेमोन याला पत्र लिहिले. यामध्ये त्याने फिलेमोनला अनेसिम परत आल्यावर त्याला बंधुभावाच्या आत्म्याने परत स्वीकारण्याचे आर्जविले. हे पत्र वाचून बघा आणि पहा की, येथे कनवाळूपणा व चातुर्य याचे केवढे चांगले उदाहरण दिसते, जे यहोवाच्या लोकांना अनुकरण्यासाठी उत्तम आहे.

प्रीती व विश्‍वास याविषयीची प्रशंसा

फिलेमोन व इतरांना उद्देशून सांगताना पौल प्रथमतः प्रशंसा करतो. (वचने १-७) फिलेमोनने ख्रिस्त, सर्व पवित्र जन याविषयी दाखविलेली प्रीती तसेच त्याचा विश्‍वास याबद्दल पौलाने ऐकले होते. यामुळे पौलाने यहोवाचे आभार मानले व त्याला बराच आनंद झाला व समाधान लाभले. आज जे प्रीती व विश्‍वास यांचे उदाहरण आहेत त्यांची आम्ही व्यक्‍तीगतपणे प्रशंसा करतो का? आम्ही ती केली पाहिजे.

सहख्रिश्‍चनांसोबत व्यवहार राखताना प्रीतीच्या आधारावर आर्जव करणे हे बहुधा ऐच्छिक ठरते हे पौलाच्या शब्दांवरून कळते. (वचने ८-१४) आपल्या चातुर्यपूर्ण पावित्र्यानंतर प्रेषिताने म्हटले की, त्याला फिलेमोनला ‘योग्य ते करण्याची आज्ञा करून सांगता येत होते’ तरी त्याला विनंती करून सांगणे हे बरे वाटले. पण कशाबद्दल? अशाच कनवाळू रितीने अनेसिमचा परत स्वीकार करणे! अनेसिम पौलाची जी उपयुक्‍त सेवा करीत होता ती त्याला पुढेही घेता आली असती पण फिलेमोनच्या संमतीशिवाय तो ती स्वीकारणार नव्हता.

वरवर भासणारी असंमतीकारक घटना ही बहुधा लाभदायक ठरू शकते हे पौल पुढे सुचवितो. (वचने १५-२१) खरे म्हणजे, अनेसिम पळून आला त्यामुळे चांगले घडले गेले. ते का? कारण आता फिलेमोन अनेसिमला एक स्वेच्छापूर्ण, प्रामाणिक व ख्रिस्ती बंधू या रुपात परत स्वीकारु शकत होता. अनेसिम पूर्वीसारखा नाखूष, व अप्रामाणिक दास राहिला नव्हता. पौलाने फिलेमोनला लिहिले की, तो जसा पौलाचा अंगीकार करणार त्याचप्रमाणे अनेसिमचा देखील अंगीकार करावा. अनेसिमने फिलेमोनचे काही नुकसान केले असल्यास त्याची भरपाई देण्याची पौलाने हमी दिली. फिलेमोनने अजून स्वेच्छेने अनेसिमला स्वीकारण्याची तयारी दाखवावी यासाठी पौलाने फिलेमोनला याचे स्मरण दिले की फिलेमोन स्वतः प्रेषिताचा, ख्रिस्ती बनण्याच्या कारणामुळे ऋणी होता. यामुळे पौलाची खात्री झाली की, फिलेमोन, त्याला सांगितले होते त्यापेक्षा अधिक करणार. केवढे हा चातुर्यपूर्ण व प्रेमळ आर्जव! खरेच, आम्ही देखील आमच्या सह ख्रिस्ती बांधवांसोबत असेच वागले पाहिजे.

पौलाने आपल्या पत्राचा समारोप आशा, अभिवादने आणि सदिच्छा याकरवी केला. (वचने २२-२५) आपल्याखातर इतरांनी केलेल्या प्रार्थनांमुळे त्याला लवकरच तुरुंगातून सुटका मिळू शकेल अशी आशा पौलाने धरली. (पौलाने तीमथ्याला लिहिलेले पत्र दाखविते त्याप्रमाणे या प्रार्थनांनुरुप त्याला उत्तर मिळाले.) आपले पत्र संपविताना पौल शुभेच्छा कळवितो व म्हणतो की, येशू ख्रिस्ताची कृपा फिलेमोनने दाखविलेल्या आत्म्यासोबत तसेच यहोवाच्या इतर उपासकांबरोबर राहो.

[११ पानावरील चौकट/चित्रं]

दासापेक्षा श्रेष्ठः फिलेमोनचा पळून गेलेला दास अनेसिम याच्या परतीविषयी पौलाने म्हटले “तो . . . काही काळ वेगळा झाला असेल यासाठी की, त्याने नेहमीसाठी तुझे व्हावे; त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ, प्रिय बंधु असे व्हावे; मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर देहदृष्ट्या व प्रभूच्या ठायी याहून किती तरी अधिक तो प्रिय असावा.” (फिलेमोन १५, १६) रोमी साम्राज्यात बादशाही सरकारमार्फत दास करण्यात येत होते आणि पौलाने या “वरिष्ठ अधिकारी” याविषयी आपली मान्यता दाखविली. (रोमकर १३:१-७) त्याने दासांच्या बंडाळीविषयी चालना दिली नाही तर अशा विशिष्ठांना ख्रिस्ती या नात्याने आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळविण्यात मदत केली. दासांनी आपल्या धन्याच्या अधीन राहावे या स्वतःच दिलेल्या सूचनेनुरुप पौलाने अनेसिमला परत फिलेमोनकडे पाठविले. (कलस्सैकर ३:२२-२४; तीत २:९, १०) अनेसिम हा आता जगातील दासापेक्षा श्रेष्ठ होता. तो आता प्रिय असा समविश्‍वासू बनला होता. तो अधिक चांगला दास या नात्याने फिलेमोनला सापेक्ष अधीनता दाखविणार होता व त्याची वागणूक ही ईश्‍वरी तत्त्वे व आणि बंधुप्रेमाचे प्रदर्शन यानुरुप राहणार होती.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा