वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ४/१ पृ. १३-१८
  • मन व शरीर यांना शुद्ध राखा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मन व शरीर यांना शुद्ध राखा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मानसिक शुद्धता
  • व्यक्‍तीगत आरोग्य
  • नीटनेटकी घरे व मोटार गाड्या
  • आध्यात्मिक यज्ञार्पणे वाहत असता शुद्धता
  • क्षेत्रकार्य व सभा यासाठी टापटीप व स्वच्छता
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ४/१ पृ. १३-१८

मन व शरीर यांना शुद्ध राखा

“आपल्या शरीरांचा जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करा.”—रोमकर १२:१.

१. प्रेषित पौलाच्या मते मन व शरीर यांची शुद्धता का महत्त्वाची आहे?

यहोवा या पवित्र देवाची सेवा करू इच्छिणाऱ्‍याने स्वतःला आध्यात्मिक तसेच नैतिक रितीने शुद्ध ठेवण्यास हवे. यामध्ये मन व शरीराची शुद्धता ही आहेच. हे सद्य व्यवस्थीकरण जसे आहे त्यामधून येणाऱ्‍या लोकांनी यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्या वैचारिक सवया व व्यक्‍तीगत सवयात देखील बदल घडविला पाहिजे. प्रेषित पौलाने रोम येथील ख्रिश्‍चनांना हे लिहिलेः “यास्तव बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हास विनवितो की, तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा. ही तुमची विचारपूर्वकतेची सेवा आहे. या युगाबरोबर समरुप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे समजून घ्यावे.” (रोमकर १२:१, २) तर मग, मनाची व शरीराची शुद्धता यात काय काय समाविष्ट आहे?

मानसिक शुद्धता

२. आमचे डोळे व अंतःकरण आपल्याला कोणते स्वैराचरण करावयास लावू शकतात, व हे टाळण्यासाठी कशाची आवश्‍यकता आहे?

२ आमचे डोळे व अंतःकरण हे, आम्ही त्यांच्यावर ताबा ठेवला नाही तर, आम्हाला स्वैराचारात गुरफटू शकतात हे नियमशास्त्र देण्याच्या काळाआधी विश्‍वासू ईयोबाने दाखवून दिले. त्याने म्हटलेः “मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे. मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ? माझे मन कोणा स्त्रीला पाहून लंपट झाले असेल . . . तर . . . हे दुष्कर्म आहे. हा न्यायाधिशांनी शिक्षा करण्याजोगा गुन्हा आहे.” (ईयोब ३१:१, ९-११) आमचे डोळे भिरभिरणारे असले व अंतःकरण चंचल असले तर आम्ही स्वतःला मानसिक शिस्त, “अंतर्दृष्टी देणारी शिस्त” लावण्यास हवी.—नीतीसूत्रे १:३.

३, ४. (अ) दाविद व बथशेबाचे उदाहरण काय दाखविते, आणि वाईट गोष्टींच्या विचारांची सवय काढून टाकण्यासाठी कशाची जरूरी आहे? (ब) ख्रिस्ती वडीलांनी खासपणे का दक्षता घ्यावी?

३ दाविद राजाच्या डोळ्यांनी त्याला बथशेबा हिजसोबत व्यभिचार करण्यास प्रवृत्त केले. (२ शमुवेल ११:२, ४) हे उदाहरण दाखविते की, यहोवा ज्यांचा वापर आपल्या जबाबदार कार्यास्तव करीत आहे त्यांनी आपल्या मनाला शिस्त लावली नाही तर ते पापात पडू शकतात. आपल्या वैचारिक सवया बदलण्यासाठी पराकाष्ठेच्या प्रयत्नाची गरज असणार. या प्रयत्नांसोबत यहोवाकडे मदतीसाठी कळकळीची प्रार्थना करण्यास हवी. बथशेबासोबत आचरलेल्या पापाविषयी पश्‍चाताप दाखविल्यावर दाविदाने प्रार्थिलेः “हे देवा, माझ्याठायी शुद्ध हृदय उत्पन्‍न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.”—स्तोत्रसंहिता ५१:१०.

४ ज्यामुळे गंभीर पाप आचरले जाते त्या चुकीच्या इच्छांना आपल्या विचारात तरळू न देण्याची ख्रिस्ती वडीलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. (याकोब १:१४, १५) तीमथ्य या ख्रिस्ती वडीलाला पौलाने लिहिलेः “शुद्ध अंतःकरणातील चांगल्या विवेक भावनातील व निष्कपट विश्‍वासातील प्रीती असणे हा आज्ञेचा हेतु आहे.” (१ तीमथ्य १:५) कोणा वडीलाने आपले डोळे भिरभिरत ठेवून आपल्या अंतःकरणात काही वाईट गोष्टी आचरण्याचे बेत करावेत व तेव्हाच आपली आध्यात्मिक कर्तव्ये पार पाडीत राहावे हे दांभिकपणाचे आहे.

५. मनाची शुद्धता राखण्यासाठी काय टाळले पाहिजे?

५ आम्ही सर्वांनीच ख्रिस्ती या नात्याने आमचे मन शुद्ध ठेवण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न राखावा. याचा अर्थ हा आहे की, ज्यामुळे आमचे विचार भ्रष्टावले जातात असे चित्रपट, दूरदर्शवरील कार्यक्रम किंवा वाचनाचे साहित्य टाळावे. जे “सत्य, . . . न्याय्य, . . . शुद्ध” आहे त्यावर आपले विचार राखून ठेवण्याच्या साततच्या प्रयत्नावरच आपले मानसिक आरोग्य अवलंबून आहे. प्रेषित पौल पुढे म्हणतोः “जो काही सद्‌गुण, जी काही स्तुति त्यांचे मनन करा.”—फिलिप्पैकर ४:८.

व्यक्‍तीगत आरोग्य

६. (अ) लेवीय पुस्तकातून उदाहरणे देऊन सांगा की, इस्राएलांच्या बाबतीत व्यक्‍तीगत तसेच सामूहिक आरोग्य कसे अपेक्षिले जात होते. (ब) या नियमांचा उद्देश काय होता?

६ इंग्रजीत असे म्हणण्यात येते की, “ईश्‍वरीयत्वानंतर शुद्धतेचा क्रमांक येतो.” हे खरे असू शकते की, नैतिक तसेच शारीरिकरित्या शुद्ध असणारा कोणी ईश्‍वरीय असतोच असे नाही. पण ईश्‍वरी भक्‍तीच्या लोकांनी मात्र नैतिकदृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या शुद्ध असलेच पाहिजे. सांसर्गित घरे शुद्ध ठेवण्यावर तसेच विविध अशुद्धतेमध्ये अंघोळ करण्याविषयी मोशेच्या नियमशास्त्रात सविस्तर नियम देण्यात आले होते. (पहा लेवीय अध्याय १४ व १५.) सर्व इस्राएलांनी आपणाबाबत पवित्र असल्याचे सिद्ध करण्याची गरज होती. (लेवीय १९:२) इनसाईट ऑन द स्क्रिपचर्स हे प्रकाशन म्हणतेः “देवाने [इस्राएलांना] आहार, आरोग्य व नैतिकविषयक दिलेले नियम त्यांना त्यांचे वेगळेपण तसेच देवाला पवित्रपण याविषयी सतत स्मरण देत होते.”—खंड १, पृष्ठ ११२८.

७. यहोवाच्या साक्षीदारांविषयी एक लोक या नात्याने काय खरे आहे, पण काही फिरत्या देखरेख्यांनी काय कळवले आहे?

७ यहोवाचे साक्षीदार एकंदरीत लोक या अर्थी बाबेलच्या खोट्या धर्माने डागाळण्यापासून शुद्ध आहेत व ते आपणामध्ये कसल्याही नैतिक स्वरुपाच्या अशुद्ध गोष्टींना थारा देत नाहीत, तरी फिरत्या देखरेख्यांकडील अहवाल हे सांगतात की, काही जण आपले व्यक्‍तीगत आरोग्य व टापटीप यांच्याकडे लक्ष देत नाहीत. या संबंधाने देखील आपण शुद्ध आहोत हे आपल्याला कसे खात्रीपूर्वक सांगता येईल बरे? सर्व ख्रिस्ती घरांसाठी बेथेलगृहे ही चांगली उदाहरणे आहेत. बेथेल याचा अर्थ “देवाचे घर” असा आहे.

८, ९. (अ) बेथेल कुटुंबात येणाऱ्‍या नव्या सदस्यांसाठी कोणती सूचना दिली जाते? (ब) बेथेल गृहात अनुसरल्या जाणाऱ्‍या कोणत्या तत्त्वांनी प्रत्येक ख्रिस्ती घरात आपला प्रभाव पाडला पाहिजे?

८ वॉचटावर संस्थेचे मुख्यालय किंवा त्याच्या जगभरातील कोणाही शाखा दप्तराचा सदस्य होतो तेव्हा त्याला नियमन मंडळामार्फत तयार करण्यात आलेले एक माहितीपत्रक देण्यात येते. हे प्रकाशन त्या सदस्याला, कामाची सवय व व्यक्‍तीगत सवय याविषयी त्याच्याकडून काय अपेक्षिण्यात येईल त्याची माहिती विवेचीत करते. “खोलीची काळजी व स्वच्छता” या मथळ्याखाली ते म्हणतेः “बेथेल जीवन उच्च शारीरिक, नैतिक व आध्यात्मिक दर्जे जोपासण्याचे आव्हान करते. बेथेलमध्ये असणाऱ्‍या प्रत्येकाने स्वतः तसेच तो राहतो त्या खोलीची स्वच्छता राखण्याची काळजी राखली पाहिजे. यामुळे चांगल्या आरोग्याला हातभार मिळतो. घाणेरडे राहण्याचे कोणतेही कारण नाही. दररोज अंघोळ करणे ही चांगली सवय आहे. . . . जेवणाआधी हात धुणे आवश्‍यक आहे व सर्वांच्या बाबतीत अपेक्षिले जाते. आपल्या खोलीतील साथीदार तसेच खोलीची निगा राखणाऱ्‍या कामगारास लक्षात ठेवून प्रत्येकदा हात धुण्याची जागा वापरानंतर स्वच्छ ठेवली आहे हे पाहिले पाहिजे.”

९ बेथेलगृहात शौचालये अत्यंत काळजीपूर्वक स्वच्छ ठेवली जातात तसेच जे यांचा वापर करतात अशांना आपले हात त्वरित धुण्यासाठी सोय पुरविलेली असते. बेथेल कुटुंबाच्या सदस्यांना शौचालये वापरानंतर स्वच्छ ठेवण्यास सांगितले जाते, याचा अर्थ हा की, ती पाण्याच्या झोताने नीट घुतली गेली आहे हे पाहणे. हे करण्यामुळे नंतर येणाऱ्‍या व्यक्‍तीसाठी किंवा खोलीची निगा राखणाऱ्‍या संबंधाने विचार राखला जातो. अशा प्रकारच्या या सुंदर व प्रेमळ तत्त्वाने प्रत्येक ख्रिस्ती घरात आपला प्रभाव चालविण्यास नको का?

१०. (अ) स्वतःला व मुलांना स्वच्छ ठेवण्यासाठी मोठमोठी स्नानगृहे का जरूरीची नाहीत? (ब) इस्राएलातील कोणते नियम आरोग्यास चालना देणारे होते, व आज यहोवाच्या लोकांना यापासून काय धडा शिकता येतो?

१० हे खरे की, देशादेशातील परिस्थिती ही भिन्‍न आहे. काही ठिकाणी अंघोळीचे भांडे किंवा शॉवर देखील नसतो. पण सर्वसाधारणपणे बोलायचे तर स्वतःसाठी तसेच आपल्या परिवाराच्या अंघोळीसाठी पाणी व साबण या वस्तु सर्वसाधारणपणे उपलब्ध असू शकतात.a जगभरात कित्येक घरांमध्ये मैला-घाण वाहून नेणारी व्यवस्था नाही. तरीपण हा मैला जमिनीत पुरुन नष्ट केला जाऊ शकतो व हेच इस्राएलात लष्करी छावण्यातही करण्यात येत होते. (अनुवाद २३:१२, १३) याखेरीज, छावणीत व्यतित केल्या जाणाऱ्‍या जीवनपद्धतीविषयी यहोवाने जे नियम दिले होते त्यामध्ये वेळोवेळी कपडे धुणे, अंघोळ करणे, रोगाचे जलद निदान व उपचार, शवांची योग्य हाताळणी आणि पाणी व अन्‍नसाठा शुद्ध ठेवणे यांचा समावेश होता. या सर्व नियमांमुळे देशाच्या आरोग्याला बळकटी मिळाली. मग, आज यहोवाच्या लोकांनी आपल्या व्यक्‍तीगत सवयांच्या मध्ये निष्काळजी असावे का?—रोमकर १५:४.

नीटनेटकी घरे व मोटार गाड्या

११. (अ) ख्रिस्ती घर कितीही लहान असले तरी त्याविषयी काय दिसून आले पाहिजे? (ब) बेथेल कुटुंबाच्या सर्व सदस्यांकडून कोणत्या सहकार्याची अपेक्षा असते?

११ आमची घरे, मग ती कितीही छोटी का असेना, व्यवस्थित व नीटनेटकी राहू शकतात; पण यासाठी कुटुंबीय स्तरावर उत्तम संघटना उभारली पाहिजे. ख्रिस्ती मातेने शक्य आहे तितका वेळ आध्यात्मिक गोष्टीत घालविण्यासाठी द्यावा, ज्यामध्ये तिचे प्रचारकार्यही समाविष्ट राहील. याचा अर्थ हा की, कौटुंबिक सदस्यांनी गबाळेपणाने आपले कपडे, पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके इत्यादि गोष्टी इकडेतिकडे टाकून देऊन आपल्या कामास निघून जावे व मग, मातेने ते सर्व निस्तरीत बसावे व घर स्वच्छ ठेवावे हे काही जरुरीचे नाही. बेथेलमध्ये जरी खोलीची निगा राखणारे आहेत तरी कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याने आपला बिछाना नीट करावा व सकाळी बाहेर पडण्याआधी खोली टापटीप ठेवावी हे अपेक्षिले जाते. आमची नीटनेटकी व स्वच्छ राज्य सभागृहे आणि संमेलन सभागृहे पाहून सर्वांनाच मोठे नवल वाटत असते. तसेच आम्ही राहतो त्या घरांनी देखील आपण यहोवाच्या स्वच्छ व पवित्र लोकांचे भाग आहोत ही साक्ष द्यावी!

१२, १३. (अ) यहोवाच्या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्‍या वाहनांविषयी कोणती सूचना देण्यात आली आहे व हे अधिक वेळ घेणारे का नसावे? (ब) शारीरिकरित्या शुद्ध राहण्यात तसेच घरे व वाहने नीटनेटकी व स्वच्छ ठेवण्यामागील आध्यात्मिक कारण काय आहे?

१२ यहोवाचे पुष्कळ सेवक आज सभांना व क्षेत्र कार्याला जाण्यासाठी मोटारगाड्या व इतर वाहने वापरतात. काही देशात मोटार ही तर यहोवाची सेवा करण्यामध्ये जवळजवळ महत्त्वपूर्ण अशीच वस्तु झाली आहे. तसे आहे ती आमच्या घराप्रमाणेच नीट व स्वच्छ ठेवण्यास हवी. हे खरे की, जगातील लोक या साधनांच्या अति काळजीसाठी जो वेळ खर्च करीत असतात तितका ख्रिश्‍चनांनी करण्याची गरज नाही. तरीपण, अति न करता यहोवाच्या सेवकांनी आपले वाहन व्यवहार्यपणे स्वच्छ व सुव्यवस्थित ठेवले पाहिजे. काही देशात मोटारीस वाहनकेंद्रात धुणे हे खर्चिक किंवा वेळ घेणारे नाही. मोटारीच्या आतील भागाच्या सफाईबद्दल म्हटल्यास केवळ दहा मिनिटे स्वच्छता व टापटीप करण्यामुळे अगदी आश्‍चर्यकारक गोष्ट होते. वडील व उपाध्य सेवकांनी याविषयी खासपणे उदाहरणशील असले पाहिजे, कारण ते क्षेत्रकार्यासाठी सहसा प्रचारकांना आपल्या वाहनात घेऊन जात असतात. एखादा प्रचारक कोणा आस्थेवाईक माणसाला सभेला घेऊन जाण्यासाठी मोटरीत घेतो पण हे आढळते की ती घाण व अव्यवस्थित आहे तर ती काही चांगली साक्ष ठरत नाही.

१३ अशा प्रकारे, आम्ही स्वतःला शारीरिकरित्या स्वच्छ ठेवून, आमची घरे व वाहने यांना स्वच्छ व टापटीप ठेवून स्वतः यहोवाच्या शुद्ध संस्थेचे सदस्य या नात्याने त्याचा सन्मान करीत असतो.

आध्यात्मिक यज्ञार्पणे वाहत असता शुद्धता

१४. इस्राएलात विधिपूर्वक शुद्धतेविषयीचे कोणते नियम होते, व हे नियम काय सूचित करतात?

१४ इस्राएलामध्ये उपासनेच्या बाबतीत विधीपूर्वक स्वच्छता जरुरीची होती, ती न केल्यास मृत्युदंड मिळे. यहोवाने मोशे व अहरोन यांना म्हटले होतेः “तुम्ही इस्राएल लोकांस त्यांच्या अशुद्धतेपासून दूर ठेवा, म्हणजे त्यांच्याठायी असलेले माझे निवासस्थान ते भ्रष्ट करणार नाहीत, आणि आपल्या अशुद्धतेत सापडून मरावयाचे नाहीत.” (लेवीय १५:३१) प्रायश्‍चित्ताच्या दिवशी तर प्रमुख याजकाला आपले अंग पाण्याने दोनदा धुवावे लागत असे. (लेवीय १६:४, २३, २४) निवासमंडपात असणारे पितळेचे मोठे गंगाळ व नंतर मंदिरातील गंगाळसागर याजकांना यहोवाची अर्पणे वाहण्याआधी अंघोळ करण्यासाठी पाणी पुरवीत. (निर्गम ३०:१७-२१; २ इतिहास ४:६) पण सर्वसाधारण इस्राएलांबाबत काय होते? ते कोणाही कारणास्तव जर विधिपूर्वक अशुद्ध झाले तर त्यांना बाहेर घालवीत आणि शुद्ध होण्याच्या गरजा पूर्ण करीपर्यंत त्यांना मंडळीत येण्यास वाव नसे. (गणना १९:११-२२) हे सर्व यावर जोर देऊन सांगते की, जे पवित्र देव यहोवा याची भक्‍ती करतात त्यांनी शारीरिक रितीने शुद्ध असावयास हवे.

१५. आज प्राण्यांच्या यज्ञार्पणांची का गरज नाही, पण यामुळे कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

१५ आज यहोवाच्या सेवकांना कोणा पृथ्वीवरील मंदिरात जनावरांचे यज्ञार्पण करण्याची गरज नाही. नियमशास्त्रात असणाऱ्‍या यज्ञार्पणांची बदली आता “येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या अर्पणाने” केलेली आहे. (इब्रीयांस १०:८-१०) आम्ही “आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना” करतो. (योहान ४:२३, २४) मग याचा अर्थ, यहोवा या आमच्या पवित्र देवाला आता काही यज्ञार्पण देण्याची गरज नाही? तसेच शुद्धता ही इस्राएलांच्या बाबतीत जितकी आवश्‍यक होती तितकी ती आज आवश्‍यक नाही का?

१६. मलाखी ३:३, ४मध्ये देण्यात आलेला भविष्यवाद १९१८ पासून अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या बाबतीत कसा पूर्ण होत आला आहे, आणि ते यहोवास स्वीकृत होणारे असे कोणते यज्ञार्पण अर्पित आहेत?

१६ मलाखीचा भविष्यवाद दाखवितो की, शेवटल्या काळात पृथ्वीवर हयात असणाऱ्‍या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची मंदिराच्या कामासाठी स्वच्छता किंवा शुद्धता केली जाईल. हे शुद्धतेचे काम १९१८ मध्ये सुरु झाले असे इतिहास दर्शवितो. १९१९ पासून अभिषिक्‍त शेष खऱ्‍या अर्थाने, “धर्माने यहोवाला बलि अर्पण करणारे” बनले आणि त्यांनी वाहिलेली दाने ‘यहोवाला आवडली.’ (मलाखी ३:३, ४) अशाप्रकारे ते “देवाला आवडणारे असे आध्यात्मिक स्वरुपाचे यज्ञ येशू ख्रिस्ताच्या द्वारे” अपर्ण करू शकतात. (१ पेत्र २:५) प्रेषित पौलाने हे लिहिले की, “आपण त्याच्याच द्वारे देवाला उपकारस्मरणरुपी यज्ञ निरंतर अर्पावा, हा यज्ञ त्याचे नाव जाहीरपणे घोषित करणाऱ्‍या ओठांचे फळ आहे.”—इब्रीयांस १३:१५.

१७. “मोठा लोकसमुदाय” हा जरी राजकीय याजकगण याचा भाग नसला तरी त्यांनी शारीरिक, मानसिक, नैतिक व आध्यात्मिक रित्या का शुद्ध राहिले पाहिजे?

१७ “मोठा लोकसमुदाय” याला मंदिरातील याजक सेवेसाठी अभिषिक्‍त शेषांप्रमाणे पाचारण करण्यात आलेले नसले तरी ते त्याच्या आध्यात्मिक मंदिराच्या या पृथ्वीवरील अंगणात राहून “[यहोवाला] रात्रंदिवस पवित्र सेवा” सादर करीत आहेत. (प्रकटीकरण ७:९, १०, १५) आम्हाला आठवत असेल की, प्रथम निवासमंडपात व नंतर मंदिरामध्ये उपासनेत सहभागी होता यावे यासाठी अयाजकीय इस्राएलांना विधिपूर्वक शुद्धता करावी लागे. याचप्रमाणे, दुसरी मेंढरे याच्या मोठ्या लोकसमुदायाला मंदिरात सेवा करायची आहे व शेषांसोबत मिळून ‘देवाला उपकारस्मरणरुपी यज्ञ अर्पण करावयाचा आहे’ व ‘त्याचे नाव जाहीरपणे घोषित करावयाचे आहे’ तर त्यांनी शारीरिक, मानसिक, नैतिक व आध्यात्मिक रित्या शुद्ध राहिलेच पाहिजे.

क्षेत्रकार्य व सभा यासाठी टापटीप व स्वच्छता

१८. जाहीर साक्षीकार्यात भाग घेताना तसेच सभेला उपस्थित राहताना आमची स्वतःची शुद्धता, कपडे आणि पायतणे याविषयी आम्ही कोणती काळजी घ्यावी?

१८ याचा व्यावहारिकपणे काय अर्थ होतो? हाच की, जर आपण शरीराने स्वच्छ नसलो व साजेसा पेहराव केलेला नाही तर मग, घरोघरच्या कार्यात, रस्त्यावरील साक्षीकार्यात, किंवा कोणाच्या घरी अभ्यासाला गेलो तर यहोवाचे प्रतिनिधित्व करण्यात लायक नसणारे व त्याचा अनादर करणारे आहोत असे दाखवू. यामुळे आम्ही या गोष्टींना क्षुल्लक समजता कामा नये. त्याविषयी काळजीपूर्वक विचार करावा म्हणजे यहोवाचे नाम असणाऱ्‍या उपाध्यपणात आपल्याला योग्यरित्या त्याचे प्रतिनिधित्व करता येईल. आमचे कपडे महाग असण्याची गरज नाही, तर ते स्वच्छ, चांगली निवड दर्शविणारे, व सभ्य असावेत. आमची पायतणे देखील चांगली, दुरुस्तीची व चांगली दिसणारी असावीत. तसेच मंडळीच्या सर्व सभांमध्ये आणि पुस्तक अभ्यासाला सुद्धा आमची शरीरे स्वच्छ असावीत आणि आम्ही योग्य पेहराव घातलेला असावा.

१९. ख्रिस्ती उपाध्याय या नात्याने आमचे शुद्ध व नीटनेटके स्वरुप यामुळे कोणते आध्यात्मिक लाभ घडतात?

१९ साक्षीकार्यात भाग घेताना तसेच सभेला उपस्थित असताना आमचे स्वच्छ व नीटनेटके स्वरुप हे “आमचा तारणारा देव, याच्या शिक्षणाला शोभा” आणण्याचा एक मार्ग आहे. (तीत २:१०) ती स्वतःच साक्ष होते. आमची स्वच्छता व टापटीपणा यामुळे लोक खूपच प्रभावीत झाले आणि यामुळे त्यांनी यहोवाने नीतीमान नव्या आकाशाचा व स्वच्छ केलेल्या पृथ्वीबद्दल राखलेला उद्देश ऐकण्यास कान दिला.—२ पेत्र ३:१३.

२०. मन व शरीर यात शुद्ध राहण्याद्वारे आणखी कोणती उत्तम फलप्राप्ती मिळते?

२० यहोवाचे शुद्ध असणारे नवे व्यवस्थीकरण जवळ येत असता आम्ही, आमच्या विचारात व काही व्यक्‍तीगत सवयीत सुधारणा करण्याची गरज आहे का याचे परिक्षण करून पहावे. पौलाने लिहिलेः “तुमच्या देहस्वभावाच्या दुर्बलतेमुळे, मनुष्य व्यवहाराप्रमाणे मी बोलतो, जसे तुम्ही आपले अवयव अर्धम करण्याकरता, अमंगळपण व अधर्म यांस दास असे समर्पण केले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरता नीतीमत्त्वाला समर्पण करा.” (रोमकर ६:१९) आध्यात्मिक शुद्धता तसेच शारीरिक स्वच्छता आताही उत्तम फलप्राप्ती देते, “पवित्रीकरणाची फलप्राप्ती . . . व [नंतर] सार्वकालचे जीवन.” (रोमकर ६:२२) या कारणास्तव, आपण आपली शरीरे ‘जिवंत, पवित्र व देवाला स्वीकृत अशी अर्पण करीत असता’ आपल्या मनाची व शरीराची शुद्धता राखू या.—रोमकर १२:१.

[तळटीपा]

a कठीण काळात आरोग्य कसे राखावे याच्या व्यावहारिक सूचनेसाठी अवेक! मासिकाच्या सप्टेंबर २२, १९८८ मधील पृष्ठे ८-११ मध्ये देण्यात आलेला “मिटींग द चॅलेंज ऑफ क्लीननेस” हा लेख पहा.

आठवणीसाठी मुद्दे

◻ आमचे डोळे व अंतःकरण आम्हाला स्वैराचारी वागणूकीत कसे अडकवू शकतात?

◻ यहोवाकडील आरोग्यविषयक सामूहिक तसेच वैयक्‍तीक कायद्यांचे पालन करण्यामुळे इस्राएलांना कोणते फायदे मिळाले?

◻ बेथेलगृहात अनुसरण्यात येणारी कोणती तत्त्वे ख्रिस्ती घरांमध्ये अमलात आणली पाहिजेत?

◻ आमच्या स्वरुपाबद्दल आम्ही खासपणे कोठे काळजीपूर्वक राहिले पाहिजे?

◻ यहोवाच्या सेवकांनी आपली घरे तसेच वाहने स्वच्छ व नीटनेटकी ठेवण्यासंबंधाची कोणती आध्यात्मिक कारणे आहेत?

[१५ पानांवरील चित्रं]

“बेथेल जीवन उच्च शारीरिक, नैतिक व आध्यात्मिक दर्जे जोपासण्याचे आव्हान करते”

[१६ पानांवरील चित्रं]

अविचारी कौटुंबिक सदस्यांनी केलेल्या घाणीमुळे मातेने स्वच्छतेकरता दर दिवशी अधिक वेळ खर्च करीत बसण्याची काही जरूरी आहे का?

[१७ पानांवरील चित्रं]

फक्‍त दहा मिनिटात मोटारीतील आतील स्वच्छता करून बरेच आश्‍चर्यकारक काम करता येते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा