वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ३/१ पृ. ४-७
  • धर्माला एवढे गंभीर का घ्यावे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धर्माला एवढे गंभीर का घ्यावे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • गंभीरतेने दखल घेण्याजोगा धर्म
  • खऱ्‍या धर्माची “फळे”
  • खऱ्‍या धर्माच्या सरावाने होणारे अनंतकालिक फायदे
  • योग्य धर्म तुम्हाला सापडला का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?
    धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?
  • देवाला मान्य असलेली उपासना
    बायबल नेमके काय शिकवते?
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ३/१ पृ. ४-७

धर्माला एवढे गंभीर का घ्यावे?

“मनुष्य केवळ भाकरीने जगू शकत नाही.” (मत्तय ४:४, द न्यू इंग्लिश बायबल) या काव्यमय शब्दांचे अवतरण मानवाच्या अशा एका गरजेस स्पर्श करते ज्यावरील दृष्टीकोण गमाविलेला आहे. ते हे सूचित करते की आम्हाठायी आध्यात्मिकतेचीही क्षुधा असते व तिलाही शमविणे आहे. ह्‍या कारणास्तव, ज्याने ते शब्द उच्चारले, त्या येशू ख्रिस्ताने असेही म्हटलेः “जे आपल्याकरिता देवाची गरज ओळखून असतात ते केवढे धन्य.”—मत्तय ५:३, न्यू.इं.बा.

आम्हाठायीची “देवाची गरज,” केवळ धर्म पुरी करु शकेल. आमचा उगम, उद्देश आणि जीवनामागील अर्थ यासारख्या आमच्या मूलभूत प्रश्‍नांची केवळ उत्तरे केवळ धर्म देऊ शकतो. शिवाय, केवळ धर्म हाच आमच्या जीवनास खरा अर्थ आणि मूळ हेतू जोडू शकतो. पण कोणताही धर्म हे सर्व आम्हाकरिता साध्य करू शकणार नाही. येशूने एका शमरोनी स्त्रीला हे म्हटले होतेः “खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील.” (योहान ४:२३) खरेपणाने (सत्याने) उपासना करणे याचा अर्थ, वेळप्रसंगांना महत्त्व देणाऱ्‍या संस्कृती व धार्मिक विधी, यांचेपेक्षा अधिक काही, होतो. कारण त्या, त्यांचेवर विसंबून राहणाऱ्‍यांना, तत्कालिन दिलासा जरुर देतात, पण सोबतच आध्यात्मिकतेत भूकेले ठेवतात.

उदाहरणार्थ, जपानमधील अमेरिकेचे राजदूत, एड्‌वीन ओ. रेच्‌र म्हणालेः “शिंतो आणि बुद्ध धर्म हे अनेकांकरिता अर्थभरीत विश्‍वासाऐवजी, अधिकपणे चालिरिती आणि परंपरायता बनली आहे. बरे, असे मानू की, बहुतेक जपानी लोक हा मार्ग पसंद करतात. पण अलिकडेच जपानमध्ये एक “नवीन धर्म” गट उदयास येऊन ते परंपरेच्या धर्माबद्दल वाढती असंतुष्टता प्रदर्शित करीतात.

या “नवीन धर्म” यांच कल देवाकडे नसून त्यांच्या त्या वैयक्‍तीक आध्यात्मिक आकर्षण असणाऱ्‍यांकडे असतो. त्यांच्यापैकी अनेक धर्मनेते हा दावा करतात की ते ईश्‍वरप्रेरित आहेत. पण सर्वसाधारणपणे त्यांच्या शिकवणी बुद्ध, शिंतो, तसेच इतर श्रद्धांवर आधारीत असतात व त्यांना संस्थापकाच्या तत्त्वांचा गाढ मुलामा चढविलेला असतो. त्यांच्या आर्जविण्यात सहसा अधिक चांगल्या जीवनाचे वचन शिवाय गूढ किंवा बरे करण्याची शक्‍ती आपणाठायी असल्याचा दावा असतो. पण काय असले हे धर्म हा पुरावा देतात का की, त्यांच्या निष्ठावान अनुयायांस ते “आत्म्याने व खरेपणाने” उपासना करण्याची शिकवण देत आहेत? क्वचितच. कारण एक गोष्ट निश्‍चित की, धार्मिक तत्त्वप्रणाली आज आहेत तर उद्या नष्ट. त्यांचे लोपते रुप, त्यांची गंभीरतेत दखल घेण्यास पुरेसे कारण पुरवीत नाही.

गंभीरतेने दखल घेण्याजोगा धर्म

अर्थात, असाही एक धर्म आहे, जो इतर कोणाही उपासनेच्या स्वरुपात अधिक पुरातन आहे. तो बायबलमध्ये शिकवलेला धर्म आहे. बायबलच्या लिखाणास सुमारे ३५ शतकापूर्वी सुरवात झाली; व त्याच्या सुरवातीच्या काही अध्यायात टिकवून ठेवलेला “इतिहास” त्याच्याही पूर्वीच्या हजारो वर्षाआधीचा आहे.a त्यात धर्माच्या उगमाची सर्वात पुरातन नोंद सापडते. तीच, बायबलच्या धर्मास गंभीरपणे विचारात घेण्यास पुरेसे कारण पुरविते.

अमेरिकन ज्ञानकोश बायबलबद्दल म्हणतोः “त्याचा प्रकाश सबंध जगभरात पसरलेला आहे. आता त्याजकडे नीतीविषयक तसेच धार्मिक कोषागार या दृष्टीकोणातून पाहिले जाते; ज्याची अक्षयी शिकवण, जसजशा सुसंस्कृत जगताच्या आशा वाढत आहेत त्यात अधिक मोलाची भर पाडण्याची अभिवचने देते. पण तेच, जर एखादे पुस्तक खरोखरी खऱ्‍या धर्माचे विश्‍वस्त मार्गदर्शक आहे, तर ते सर्व सत्य शोधकांपर्यंत सुलभतेत उपलब्ध असावे असेच आपण अपेक्षिणार नाही का?

हेच बायबलबाबतचे सत्य आहे. ते संपूर्ण किंवा काही भागांचे असे १,९२८ भाषेत अनुवादित आहे; शिवाय इतिहासात ते सर्वात अधिक खपणारे पुस्तक आहे. शिवाय ऐतिहासिक तसेच विज्ञानशास्त्रीय दृष्ट्या ते विश्‍वसनीय असल्याचे सिद्ध झालेले आहे. भूगर्भसंशोधन आणि इतिहास यांनी बायबलमधील भविष्यवाद अचूकतेत पूर्ण झाल्याची ग्वाही दिलेली आहे. ते सर्व प्रकारच्या भूतविद्येपासून, गुढवादापासून आणि गुप्त ज्ञानापासून स्वतंत्र आहे. हे सर्व, बायबलचा जो स्वदावा आहे की, ते प्रेरित आहे, त्याजशी सुसंगत आहे.b—२ तीमथ्य ३:१६.

खऱ्‍या धर्माची “फळे”

आम्ही बायबल पाळून चालतो असे अनेक धर्म दावा करीत नाहीत का? शिवाय, जे, आपण ख्रिश्‍चन असल्याचे हक्काने सांगतात अशांचेपैकी बहुतेकांमध्ये भांडणे, शत्रूत्व तसेच ढोंगीपणा हे केवढ्या प्रमाणात दिसून येतात? होय; पण यामुळे बायबलला धिक्कारावे हे पुरेसे कारण नाही. येशू ख्रिस्ताने स्वतः सूचित केले आहे की, आपण ख्रिश्‍चन आहोत असे हक्काने सांगणाऱ्‍यांपैकी बहुसंख्यांकास देव धिक्कारील. (पहा मत्तय ७:१३, १४, २१-२३.) मग कशाप्रकारे एखाद्यास बायबलमध्ये शिकवलेल्या खऱ्‍या धर्मास पाळून चालणाऱ्‍या लोकांची ओळख होऊ शकेल? येशूने उत्तर दिलेः “त्यांच्या फळावरुन त्यांस ओळखाल. काटेरी झाडावरुन द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडावरुन अंजीर काढितात काय? त्याप्रमाणे प्रत्येक चांगले झाड चांगले फळ देते, आणि वाईट झाड वाईट फळ देते. यास्तव, तुम्ही त्यांच्या फळावरुन त्यांस ओळखाल.”—मत्तय ७:१६, १७, २०.

होय, खरा धर्म ही एक अशी महान शक्‍ती असण्यास हवी जी तिच्या उपासकांमध्ये फायदेकारक गुणधर्म उत्पादित करू शकेल. एक उदाहरण पाहू. ॲकीनोरी नामे जपानी मनुष्य, त्याच्याच शब्दात म्हणतो की तो “चढाओढीच्या आत्म्याचे ठळक उदाहरण होता. विश्‍वविद्यालयातील उच्च शिक्षणक्रम आणि एका मशहूर कंपनीत चांगल्या पदाची जागा मिळवून त्याने आपली उद्दिष्टे साध्य केली. धर्मास आपल्या जीवनात स्थान असावे याची त्याला गरज भासली नाही. कारण धर्म हा, ज्यांना जीवनात दुबळे म्हणून कुबडीची गरज भासते अशांचेकरिता आहे,” असे त्याचे मत होते.

सर्वकाही तोवर अगदी सुरक्षित चालले होते की, ताण आणि थकवा यांच्यामुळे त्याला एका असाध्या रोगाने पछाडले. त्याची मान मुरगळली आणि डाव्या खांद्याकडे त्याची हनुवटी “थिजली.” ॲकीनोरीचे बरेचसे मित्र होते पण विपत्काली ते निष्क्रिय ठरले. (पडताळा नीतीसूत्रे १७:१७.) यामुळे तो मद्यपानाच्या खोल खाईत पडला, एवढेच काय पण आत्महत्त्येचा विचार करू लागला.

दरम्यानच्या काळात ॲकीनोरीच्या पत्नीने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली. एके दिवशी बोलण्याच्या ओघात तिने त्याला गलतीकर ६:७ या शास्त्रवचनाचा सारांश सांगितला; ज्यात असे वाचतोः “मनुष्य जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” ते शब्द त्याच्या मनास स्पर्शले. ॲकीनोरी तिजसोबत अभ्यासास बसू लागला व जे काही तो त्यातून शिकला त्याकरवी जीवनावरील त्याच्या दृष्टीकोनात बदल झाला. ॲकीनोरीच्या दृष्टीकोनात जसजसा उज्वलितपणा येऊ लागला तसतसा मनावरील दुर्बलतेचा ताण नाहीसा झाला! जसे बायबलमधील नीतीसूत्र म्हणतेः “शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे.” (नीतीसूत्रे १४:३०) होय, खरा धर्म नेहमी चांगले फळ उत्पादित करतो.

तोशीरो हा एक दुसरा जपानी गृहस्थ जो हे अनुभविण्यास आला की, खरा धर्म हा चांगुलतेमागील बदल घडविणारी शक्‍ती आहे तो कसा? जरी तो हा विश्‍वास बाळगून होता की, धर्मपालन हे मोलाचे आहे तरी त्याबाबतीत त्याने काहीच केले नव्हते. तर त्याचे सर्व लक्ष स्वतःचे घर मिळविण्याकडे लागून होते. ते उद्दिष्ठ जरी साध्य झाले तरी तेवढ्यावरच त्याची तृप्ती झाली नाही. त्याउप्पर त्याने त्याच्या कामावर पाहिले तर सभोवताली सर्रासपणे अप्रामाणिकतेच्या कृत्यांचे थैमान माजले होते. शिवाय त्यायोगे वैयक्‍तीक वाईट नातेसंबंधातील संगती उत्पन्‍न झाल्या होत्या. जे काही त्याने पाहिले त्यामुळे तोशीरोला किळस आली.

एके दिवशी त्याच्या पत्नीने स्थानिक यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीतील एका वडीलास त्याची भेट घेण्यास आमंत्रण दिले. तोशीरोन विनाविलंब हे ओळखले की, हे वडील त्याच्या मित्रांपेक्षा निराळे आहेत. कारण? हे वडील अगदी प्रांजळपणे बायबलमधील नीतीतत्त्वांना आपल्या जीवनात लागू करून होते. यामुळे मनावर परिणाम होऊन तोशीरोन बायबल अभ्यास करण्याचे आमंत्रण स्वीकारले शिवाय त्याने बायबलमधील धर्मास आपल्या जीवनाचा मार्ग बनविला.

आम्ही आपणासही यहोवाच्या साक्षीदारांशी ओळख करून घेण्याचे आमंत्रण देतो. त्यांची “फळे” हा पुरावा देतात की, ते “आत्म्याने व खरेपणाने” उपासना करणारे आहेत. बायबलच्या शिकवणी त्यांच्या जीवनात राबविण्याकरिता ते परिश्रम उचलतात. वैयक्‍तीतरित्या जरी ते पूर्णत्वापासून दूर असले तरी गट या नाते ते हे प्रदर्शित करतात की खरा धर्म हा चांगुलतेकरिता केवढा बलाढ्य आध्यात्मिक शक्‍तिपूरक आहे.

आज साक्षीदार असलेल्यापैकी लक्षावधी एकेकाळी त्यांच्या जीवनक्रमणाबद्दल केवढे असंतुष्ट होते. पण बायबलमधील नीतीतत्त्वे लागू करण्याने अनेकांस स्वतःठायी उल्लेखनीय बदल करता आले. बायबल जिला “आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती” असे संबोधिते तिचे बिजारोपण म्हणजेच “प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन,” हे गुण साध्य करण्याचा त्यांना वैयक्‍तीक आनंद प्राप्त झाला.—गलतीकर ५:२२, २३.

खऱ्‍या धर्माच्या सरावाने होणारे अनंतकालिक फायदे

अर्थात, खऱ्‍या धर्माने मनुष्यपणात बदल तसेच वैयक्‍तित समस्यात सुकरता ही साध्य करण्यापेक्षाही अधिक असे काही केले पाहिजे. जागतिक समस्या, जशा की, प्रदूषण, अणुशस्त्र युद्धाचा धोका आणि वातावरणाच्या दूषित परिणामामुळे, आमच्या या सुंदरशा गृहाचा विध्वंस करण्याच्या धमक्या आर्थिक समस्या करोडोंच्या सौख्यानंदावर आणि स्वास्थ्यावर दबाव आणीत आहेत. मग जर या जागतिक समस्या सोडविण्यात कोणतीच आशा पुरवीत नसेल तर अशा कोणाही धर्माचा गंभीरपणे विचार करणे नको.

बायबलचा धर्म तशी आशा पुरवितो. देवाने त्याच्या स्वर्गीय सरकारच्या किंवा “राज्य” वर्चस्वाखाली नीतीमान नवीन जगाची स्थापना करण्याचे अभिवचन दिले आहे. (मत्तय ६:९, १०; २ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:३, ४) हे राज्य सबंध मानवजातीतील क्लेशांच्या निर्मूलनातील एक उत्तम उपाय ठरेल. शिवाय, जगभर जे असे लाभदायक बदल घडतील त्यांच्या शाश्‍वतीबाबत बायबल आम्हास निसंशय करतेः “जग व त्याची वासना ही नाहीतशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” होय, सौख्यानंदातील अनंतकाळचे जीवन हीच प्रत्येक खऱ्‍या ख्रिश्‍चनाठायीची आशा आहे. (१ योहान २:१७) पण, जे सर्व खऱ्‍या धर्माचा गंभीरपणे सराव करीत आहेत केवळ अशांचाच येणाऱ्‍या राज्यामार्फत फायदा होईल. यास्तव, आम्ही आपणास उद्युक्‍त करतो की, बायबलच्या अभ्यासास गंभीरपणे सुरवात करा.c (योहान १७:३) जसजसा आपण देववचनांच्या प्रकाशास तुमच्या जीवनात प्रकाशू द्याल तसतसा तुम्हास मोठ्या आनंदाचा अनुभव येऊ लागेल; कारण ‘देवाबद्दलची तुमची गरज, ओघाओघाने पुरी होत राहील. खरेच, तुम्ही धर्माची, खऱ्‍या धर्माची एवढ्या गंभीरतेत निवड केली म्हणून अनंतकालिक आशीर्वादांचे हक्कदार बनला.

[तळटीपा]

a उदाहरणार्थ, पाहा उत्पत्ती २:४; ५:१; ६:९.

b अधिक माहिती, या मासिकाच्या प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या द बायबल—इज इट गॉडस्‌ वर्ड ऑर मॅन्स? या पुस्तकातून मिळू शकेल.

c यहोवाचे साक्षीदार, याबाबतीत आपले सहाय्य करण्यात आनंदाने तयार आहेत. या मासिकाच्या प्रकाशनांशी किंवा आपल्या परिसरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक मंडळीशी संपर्क साधल्यास मोफत घरगुती बायबल अभ्यासास सुरवात करता येईल.

[५ पानांवरील चित्रं]

बायबल, जे आज १,९०० पेक्षा अधिक भाषेत उपलब्ध आहे, ते ईश्‍वरप्रेरित असल्याच्या, त्याच्या हक्काने सांगण्यात, दृढ आहे

[७ पानांवरील चित्रं]

बायबलचा धर्म, स्वर्गीय सरकारच्या वर्चस्वाखाली जगभरात शांतीच्या व्यवस्थीकरणाची आशा पुढे ठेवितो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा