धर्म अभिरुचीचा अभाव का?
“धर्मविना मनुष्य हे जणू खिडकीविना घर यासारखे आहे,” असे एका जपानी गृहस्थाने त्याच्या मुलास, मितसुओ याला, धर्माबाबत बोधपर सूचना देण्याच्या गरजेत म्हटले होते. तथापि, मितसुओ याने त्याच्या वडीलांच्या शब्दांकडे तितकेसे गंभीरतेने लक्ष दिले नाही. आणि, जसे इतरत्र आहे, तसेच, जपानमध्येही अशा वृत्तीच्या लोकांची संख्या सतत वाढत आहे. ते ‘खिडकीविना घर’चा सराव करीत असता, त्यांच्या जीवनात धर्मज्योतीचा प्रकाश पाडून घेण्यात अगदीच अल्पसा प्रतिसाद देत आहेत.
यास्तव, ज्यावेळी जपानमध्ये राष्ट्रीय चालचलणूक आढावा घेण्यात आला त्यावेळी नागरिकांपैकी ६९ टक्के लोकांनी हा दावा केला की, ते स्वतःस धार्मिक असल्याचे मानीत नाही. तरुणांमध्ये तर ही संख्या अधिक आहे. याचप्रमाणे, थायलँडसारख्या कर्मठ बुद्ध राष्ट्रात महापालिकेच्या परिसरात राहणाऱ्यापैकी ७५ टक्के लोक बुद्ध मंदिरी जात नाहीत. इंग्लंडमध्ये गेल्या ३० वर्षात आठ अँग्लीकन चर्चेस निरुपयोगी पडलीत या कारणाने बंद करण्यात आली.
जपानमध्ये जरी अद्याप धर्माचा पगडा आपले स्वामित्व गाजवीत आहे, तरी वेळप्रसंगीच त्यांना, जणू एखाद्या मूल्यावान चायनावस्तुला प्रदर्शनार्थ बाहेर काढतात तसे क्वचित पाळले जाते; जसे विवाहप्रसंगी किंवा अंत्यविधी उरकण्यास. स्थानिक संस्कृती तसेच कौटुंबिक मिळकतीची जोपासना करण्यात धर्म हा जितकी अधिक मोलाची भूमिका पार पाडतो; तितकी आध्यात्मिक ज्ञानप्रसारार्थ पाडीत नाही; अनेकांच्या दृष्टीकोणात धर्म हा केवळ दुर्बळ आणि आपग्रस्ताकरिता फसवे औषध आहे; कारण त्याकडून काही निश्चित फायदे प्राप्त आहेत का हे पाहण्यात ते अपुरे पडतात. ‘धर्म हा, जर आपणापाशी पुरेसा वेळ आहे किंवा त्याची जर आवश्यकता भासते तर ठीक आहे,’ असे काहींचे मत आहे. पण तुम्हास स्वतःसही खात्री असण्यास हवी की मजपाशी आपला चरितार्थ चालविण्याची तसेच सर्व बिले चुकते करण्याची, हिम्मत आहे. या औदासिन्यते मागील कारण काय असावे? तशी तर अनेक कारणे देता येतील. पहिले, सामाजिक परिस्थिती. अनेक तरुणांना अगदी मोजकीच धार्मिक तालीम किंवा तीही मिळत नाही. मग यात नवल ते काय की, त्यांच्यापैकीच्या अनेकांची वाढ, जो समाज आधिभौतिकतेवर जोर देऊन असतो अशांचेमध्ये होऊन तेही भौतिकवादीय प्रौढ बनतात.
काही राष्ट्रांत, चित्रवाणीवरील सुवार्तिकांचे तसेच इतर सन्मान्य धर्मपुढाऱ्यांचे हाव व अनैतिकतेने माखलेली कुप्रसिद्ध वर्तणूकीनेही लोकांना धर्मापासून दुरावले आहे. शिवाय, धर्माने स्वतःस राजकीय व लष्करी घडामोडीतही गोवून घेतले आहे. याचे उदाहरण, जपानमधील शिंतोई धर्माबाबत जे काही घडले त्यात दिसून आले. “महायुद्धातील [दुसऱ्या महायुद्धातील] ऑगस्ट १९४५ मधील परजयाचे अंतसोबत, शिंतो पवित्रस्थानांना अति बिकट अवस्थेला तोंड द्यावे लागले.” असे जपानी धर्मांच्या ज्ञानकोशाने हेरले. शिंतो, ज्यांनी महायुद्धाच्या औत्सुक्यास चेतावले, आणि विजयाचे अभिवचन दिले, त्यांनी लोकांस निराश केले. मग, देव किंवा बुद्ध अस्तित्वातच नाहीत या तत्त्वज्ञानाचा प्रचार वेगाने झाला.
तथापि, आम्ही खरोखरीच अशा स्वार्थी आणि येथे व आता, सारख्या आकुंचित दृष्टीकोनात समाधान मानून राहावे का? बहुतेकांठायी चौकस विचारी मन असते. त्याच्याठायी हे जाणून घेण्याची उत्कट इच्छा असते की, ते कोठून आले, ते कोठे जात आहेत, ते का जगत आहेत, आणि जगावे ते कसे, किंवा त्यांचेठायी एक कल्पना घोळते की, “या सर्व गोष्टी गुढार्थिक आहेत,” यामुळे ते समाधानी नाहीत. एवढेच काय पण, बर्तांड रसेलसारखे नास्तिकही, “एका अशा व्याधिग्रस्त दुःखाबद्दल उव्वाच करतात की, त्याला जग आपणामध्ये सामावून घेऊ शकत नाही; अशा गोष्टींचा हा शोध आहे,” असेही ते म्हणतात. खरा धर्म, ते संशोधन पुरे करू शकेल. पण कसे? असे कोणते प्रमाण आहे की, कोणा धर्मास, तेवढा गंभीर असल्याचे समजावे.