वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ९/१ पृ. २१-२९
  • शुद्ध वाणी उपासकांच्या समुदायास एकत्र करते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शुद्ध वाणी उपासकांच्या समुदायास एकत्र करते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “सर्व लोकांसाठी शुद्ध वाणी”
  • शुद्ध वाणी शिकणे
  • बळकट आध्यात्मिक अन्‍न
  • शुद्ध वाणी बोलणे म्हणजे बंधूप्रीती दाखवणे
  • शुद्ध वाणी बोलणे म्हणजे आमच्या वर्तणूकीकडे लक्ष देणे
  • कुटुंबासाठी शुद्ध वाणीचा सल्ला
  • इतरांशी शुद्ध वाणी बोलणे
  • अधिवेशनातील प्रकाशने
  • जाहीर भाषण आणि समारोपाचे विवेचन
  • शुद्ध वाणी बोलत राहा व सर्वदा जिवंत राहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • तुम्ही “शुद्ध वाणी” अस्खलितपणे बोलत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • शुद्ध वाणीने एकवटलेले व्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • “शुद्ध वाणी” प्रांतिय अधिवेशन चुकवू नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ९/१ पृ. २१-२९

शुद्ध वाणी उपासकांच्या समुदायास एकत्र करते

देवाने दिलेली शुद्ध वाणी ख्रिस्ती एकतेचे बळ आहे व त्याचा पुरावा, ६४ देशातील यहोवाचे साक्षीदार पश्‍चिम बर्लिनमध्ये मंगळवार ते शुक्रवार, जुलै २४ ते २७, १९९० या काळात साक्षीदारांच्या अधिवेशनात एकत्रित झाले तेव्हा अगदी स्पष्टपणे दिसला.

पोलंडमध्ये १९८९ च्या उन्हाळ्यात “ईश्‍वरी भक्‍ती” हे प्रांतिय अधिवेशन भरवले गेले तेव्हा रशिया व झेकोस्लाव्हीयामधून हजारो प्रतिनिधी आले होते, पण यावेळी पूर्व जर्मनीमधून काही शेकडो लोकच आले होते. तेव्हापासून राजकीय स्थितीत हे जग कितीतरी बदलले आहे! कारण या खेपेला पूर्व जर्मनीतील अंदाजे ३०,००० सदस्य पश्‍चिम बर्लिनच्या ऑलिंपिया स्टेडियममध्ये भेटू शकले. हे अधिवेशन जगात इतरत्र जी शेकडो अधिवेशने साधारणतः गुरुवार ते रविवारपर्यंत भरली होती त्या नमुन्याचे होते.

मंगळवारच्या उद्‌घाटनच्या स्वागतपर भाषणात अध्यक्षांनी १९१९ पासून शुद्ध वाणीत यहोवाच्या साक्षीदारांची प्रगति घडविण्यात अधिवेशनांनी जी भूमिका पार पाडली आहे त्याविषयीचे कथन केले. हे अधिवेशन देखील उपस्थितांना त्यांची शुद्ध वाणी बोलण्याची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करील व त्यानुसार जीवन जगण्याची मदत करील असे वक्त्यांनी म्हटले. त्यांनी उपस्थितांना ही जाणीव करून दिली की, पेहरावाद्वारे व वागणुकीद्वारे यहोवाचे लोक, शुद्ध वाणी बोलण्यात कितपत प्रगति केली आहे हे दाखवून देतात.

“सर्व लोकांसाठी शुद्ध वाणी”

अधिवेशनाचे प्रमुख भाषण हे वर नमूद असणाऱ्‍या विषयावरच आधारलेले होते हे यथार्थच होते. ते सफन्या ३:९ वर आधारलेले होते, जेथे देवाने अभिवचन दिले आहेः “मी राष्ट्रांसाठी शुद्ध वाणी देईन व यहोवाची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा एकचित्ताने धावा करतील.” देवाबद्दलचे सत्य, त्याचे उद्देश याविषयीची योग्य समज व गुणग्राहकता यांचा शुद्ध वाणीत समावेश होतो. केवळ यहोवा देवच आपल्या पवित्र आत्म्याद्वारे या वाणीचा पुरवठा करू शकतो. सर्व अनैतिक गोष्टींपासून शुद्ध असणारी ही शुद्ध वाणी शिकताना सत्याबद्दलचे प्रेम हेच आमचे ध्येय असले पाहिजे.

तसेच, शुद्ध वाणी बोलणे म्हणजे कोणा विशिष्ट शब्दभांडाराचा उपयोग करणे नव्हे. याऐवजी, आम्ही जे बोलतो त्यानुसार आमची जीवनपद्धत असण्यास हवी. वस्तुतः आमच्या आवाजातील पातळी, चेहऱ्‍यावरील हावभाव व इतर आविर्भाव हे देखील महत्त्वाचे आहेत, कारण आम्ही अंतःकरणातून कसे आहोत याचे ते प्रतिबिंब असते. या शुद्ध वाणीचा विस्तार करण्यासाठी आमचे अभ्यासाचे नियमित वेळापत्रक हवे व नियमितपणे मंडळीच्या सर्व सभांना उपस्थित राहण्यास हवे.

शुद्ध वाणी शिकणे

मंगळवारच्या दुपारच्या भाषणाद्वारे शुद्ध वाणी शिकणे म्हणजे “मूलभूत गोष्टींपासून प्रौढतेप्रत प्रगति करणे” यावर जोर दिला गेला. आमची आध्यात्मिक वाढ व्हावयाची आहे तर वृद्धी ही महत्त्वाची आहे. याचाच अर्थ असा की, आध्यात्मिक प्रगतिसाठी ज्या योजना आहेत त्यांचा फायदा करून घेणे व रोजच्या जीवनात पवित्र शास्त्राची तत्त्वे लागू करणे होय.

शुद्ध वाणीत प्रवीण होण्यासाठी आम्ही “यहोवाने शिकवलेले” असे व्हावयास पाहिजे. गुरुवार सकाळच्या परिसंवादात हाच विषय घेतला गेला. पहिल्या वक्त्याने दाखविले की, हे ‘येशूच्या उदाहरणाद्वारे कसे विवेचीत झाले.’ येशूला यहोवा देवाकडून शिकवले गेले होते हे त्याच्या शब्दांनी व कृतीने प्रकट झाले. त्याने जे शिक्षण दिले त्याचे आम्ही अनुकरण करण्यास हवे. येशू जसा पित्याच्या इच्छेप्रमाणे नेहमी करत असे तसेच आम्हीही वागले पाहिजे.

नंतरच्या वक्त्यांनी हे दाखवून दिले की, यहोवा देव, सभा तसेच संमेलने यांच्याद्वारे कसे शिक्षण देतो. पाचही सभांद्वारे आम्हाला फायदा होत असतो व म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये. प्रत्येक सभा ही आमच्या आध्यात्मिक प्रगतिसाठी महत्त्वाची असते. याचप्रमाणे यहोवा देव विभागीय संमेलने, प्रांतिय अधिवेशन व खास अधिवेशन याद्वारेही शिक्षण देत असतो. या सर्वांकडून फायदा मिळविण्यासाठी आम्ही एकाग्रतेने ऐकले पाहिजे व शिकलो त्याप्रमाणे कृती केली पाहिजे.

या चर्चासत्रानंतर “व्यक्‍तीगत अभ्यासासाठी त्याग करणे” ह्‍या विषयावर भाषण झाले. त्यासाठी वेळ काढता यावा म्हणून आम्ही इफिसकरांस पत्र ५:१५, १६ मध्ये सांगितल्याप्रमाणे कमी महत्त्वाच्या गोष्टींपासून वेळ विकत घेण्याच्या सूचनेकडे लक्ष दिले पाहिजे.

शुद्ध वाणी शिकण्याचे ध्येय समर्पण व बाप्तिस्मा हे होय. “शुद्ध वाणी शिकणाऱ्‍यांचा बाप्तिस्मा” या भाषणात याच सत्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. ही वाणी पुष्कळांना समर्पण व बाप्तिस्मा याकडे निरवीत आहे. तथापि, यानंतर त्या व्यक्‍तीने आवेशाने सुवार्तेचा प्रचार करून येशूच्या उदाहरणास अनुसरले पाहिजे, नवे व्यक्‍तीमत्व धारण करून ते राखले पाहिजे आणि स्वतःला जगापासून वेगळे ठेवले पाहिजे.

बळकट आध्यात्मिक अन्‍न

भविष्यवादित नाटकांच्या पूर्णतेवर आधारीत असणाऱ्‍या विषयांद्वारे उपस्थितांना बळकट आध्यात्मिक अन्‍नाचा लाभ घडून मोठा आनंद झाला. गुरुवार दुपारची दोन भाषणे यहेज्केलच्या भविष्यवादावर आधारीत होती. पहिल्या, “यहोवाचा वैभवी रथ पुढे कूच करीत आहे,” या भाषणात, भव्य, दिव्य व भयप्रेरित रथ खूपच जोराने पुढे जात असल्याचे वर्णन करण्यात आले. ते यहोवाच्या स्वर्गीय संस्थेला सूचित असून यहोवा तो रथ चालवीत आहे याचा अर्थ, तो आपल्या संस्थेची प्रत्येक हालचाल मार्गदर्शित करीत आहे, व तिचा वापर आपल्या उद्देशांना पूर्ण करण्यासाठी करीत आहे असा स्पष्ट केला गेला. यहेज्केल १९१९ पासूनच्या शेष वर्गाचे प्रतिनिधित्व करीत आहे. विशेष म्हणजे, १९३५ पासून यांना “मोठा लोकसमुदाय” येऊन मिळाला आहे.—प्रकटीकरण ७:९.

यानंतरचे भाषण “दृश्‍य संस्थेबरोबर आपली मजल ठेवा” या विषयावर होते. देवाची दृश्‍य संस्था ही त्याच्या वैभवी रथरुपी संस्थेसोबत आपली मजल ठेवीत आहे यात काही शंका नाही. यहेज्केलने केले त्याप्रमाणे आज यहोवाच्या सेवकांनी, जरी मतभेद, उपहास व विरोध यांचा सामना करावा लागला तरी भविष्यवादित नेमणूक आज्ञाधारकपणे पूर्ण केली पाहिजे. आपली मजल ठेवल्यामुळे आता आशीर्वाद तर मिळतीलच, परंतु देवाच्या वेगाने येणाऱ्‍या नवीन राज्यातील सार्वकालिक जीवनही मिळेल.

शुक्रवारी सकाळी बळकट आध्यात्मिक अन्‍नाचा पुरवठा यशयाच्या २८ व्या अध्यायावर आधारीत असलेल्या तीन भाषणांद्वारे दिला गेला. पहिल्या भाषणाने प्राचीन इस्राएल व यहुदा यातील आध्यात्मिक दृष्टीने झिंगलेले लोक हे ख्रिस्ती धर्मजगतातील आध्यात्मिक रितीने झिंगलेल्या लोकांना चित्रित करते हे जोरदारपणे दाखविले. जसे पूर्वीच्या झिंगणाऱ्‍यांना यहोवाचा प्रतिकूल न्यायदंड मिळाला तसाच ख्रिस्तीधर्मजगताला देखील मिळणार.

यानंतरचे भाषण, “त्यांचा आश्रय—एक लबाडी!” हे होते. यात कडक इशारा देण्यात आलाः प्राचीन यहूदाने मिसरवर आपली विश्‍वस्तता राखल्यामुळे जसा त्याला व्यर्थ आश्रय मिळाला तसाच ख्रिस्ती धर्मजगत आजच्या काळातील राजकीय सत्तांसोबत जे संगनमत करून आहे त्याचेही तसेच होणार. यशयाच्या २८ व्या अध्यायावरील तिसरे भाषण, “यहोवाच्या असामान्य कार्याचा इशारा देत राहा,” देवाच्या लोकांना उद्देशून देण्यात आले. यहोवा देव ख्रिस्ती धर्मजगताचे जे काही करणार ते विलक्षण किंवा असामान्यच म्हणावे लागेल, कारण त्याला तो खरोखरी आश्‍चर्याचा धक्काच असणार. आज यहोवा अभिषिक्‍त अशा छोट्या कळपाला व ४० लाख “दुसरी मेंढरे” यांच्यासाठी गौरवयुक्‍त मुकुट आहे. (योहान १०:१६) वक्त्याने हेलावून सोडणाऱ्‍या शब्दांनी समारोप केलाः “आमचा उत्साह, निश्‍चय, एकनिष्ठता व पूर्ण स्तुती यहोवा देवाला सतत मिळो!”

शुद्ध वाणी बोलणे म्हणजे बंधूप्रीती दाखवणे

बुधवारी दुपारी उपस्थितांच्या लक्षात आणले होते की, शुद्ध वाणी बोलणे म्हणजे “अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे” हे आहे. त्या अनाथ मुलांना वैयक्‍तीक तालीम दिली जाऊ शकते. तसेच विधवांच्या बाबतीत सांगण्यात आले की, अशांना सहानुभूतीपर शब्दांनी, आपल्या ख्रिस्ती कार्यहालचालीमध्ये तसेच सामाजिक मेळाव्यात त्यांना एकत्र आणून आणि खरीच गरज आहे तर अशांना भौतिक चीजवस्तुंचे साहाय्य देऊन आपली आस्था प्रकट करता येईल. यामध्ये घेतलेल्या मुलाखतींद्वारे हे कसे साध्य करण्यात आले त्याची प्रचिती देण्यात आली.

गुरुवारी दुपारी अंतःकरणास उबविणारे आणखी एक भाषण झालेः “ख्रिस्ती जन एकमेकांची कशी काळजी करतात.” वादळ, भूकंपाने नुकसान झाल्यास, अधिकाऱ्‍यांना पत्र लिहीण्याची गरज असते तेव्हा आणि जेव्हा स्थानिक गरजा उद्‌भवतात अशा वेळी यहोवाच्या साक्षीदारांनी एकमेकांना काळजी करण्याचा चांगला अहवाल राखला आहे. पण तेच, मानवी अपूर्णत्वामुळे जेथे मतभेद होतात तेथे येशूने मत्तय ५:२३, २४ व १८:१५-१७ मधील दिलेल्या सूचनांचा अवलंब करावा. जेथे बांधवामध्ये व्यावसायिक संबंध असतात तेथे परस्परांचा आदर करण्याची व आस्था बाळगण्याची गरज आहे. त्यामुळे मालक अथवा नोकर हे परस्परांच्या आध्यात्मिक नातेसंबंधाचा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत.

शुद्ध वाणी बोलणे म्हणजे आमच्या वर्तणूकीकडे लक्ष देणे

आमच्या वर्तणूकीकडे लक्ष देण्याबाबत वारंवार जोर दिला गेला. मंगळवारी पहिले वक्‍ते ज्याविषयी बोलले त्याची मध्यवर्ती कल्पना होतीः “देवाचे वचन ऐकणे व पाळणे.” त्यांनी म्हटले की, अधिवेशनाला येण्याची दोन कारणे आहेतः एक म्हणजे अचूक ज्ञान प्राप्त करून घेणे व त्या ज्ञानानुसार वागण्यास प्रवृत्त होणे.

बुधवारी सकाळी झालेल्या पहिल्या भाषणाच्या शिर्षकात एक शोधक प्रश्‍न टाकला होताः “ख्रिस्ताने ‘वाईटाचा वीट मानला’—तुम्ही?” नीतीमत्तेवर प्रेम करणे पुरेसे नाही, तर चांगली विवेकबुद्धी राखण्यासाठी, यहोवा देवासोबत चांगले नातेसंबंध ठेवण्यासाठी, त्याच्या नावाला निंदा आणू नये म्हणून आणि भ्रष्टता व मृत्यु ही अनीतीची फळे न मिळण्यासाठी आम्ही अनीतीचा द्वेष केला पाहिजे.

त्याच्या अगदी जवळचाच विषय असलेली पुढची प्रस्तुती होतीः “जगीक मनोकल्पनांचा धिक्कार करा, राज्याच्या वास्तवतेचा अवलंब करा.” सैतान, हव्वा व पतन पावलेले दूत यांनी मनोकल्पनांचा पाठलाग केला व स्वतःवर विनाश आणला. जगीक मनोकल्पनांमध्ये भौतिक गोष्टींची स्वप्ने, निषिद्ध आचारात समाविष्ट होणे या गोष्टी येतात, ज्या केवळ निराशाच नव्हे तर अधिक गंभीर पातकांकडे निरवतात. या मनोकल्पनांचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही अभ्यास, प्रार्थना, सभांना उपस्थिती व क्षेत्रकार्य करणे याद्वारे देवाच्या राज्याच्या वास्तवतेचा पाठलाग केला पाहिजे.

सरळ स्वरुपाचे ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी बुधवारी दुपारी दिलेल्या भाषणातील सल्ला की, “ख्रिस्तीजनहो, आपल्या आर्थिक मर्यादेत जीवन जगा,” ऐकला पाहिजे. यात जर अपयश आले तर आम्हावर शारीरिकरित्या व आध्यात्मिकरित्या घातक परिणाम घडतील. यासाठी सूज्ञतेचा हाच मार्ग होऊ शकेल की, एखाद्याने निष्कारण कर्ज न घेता स्वतःच्या स्वार्थी इच्छांना लगाम लावला पाहिजे. एक यथार्थ खर्चाचे अंदाजपत्रक आखून ते अवलंबिले पाहिजे. आम्ही सर्वदा ईश्‍वरी भक्‍ती वाढवली पाहिजे. आपणापाशी असणाऱ्‍या गोष्टीत संतुष्ट राहाणे हे मोठी धन्यता देते.—१ तीमथ्य ६:६-८.

मंगळवारचे भाषण, “तुमचे मित्र यहोवाचे मित्र आहेत का?” याने आमच्या सहवासाकडे लक्ष देण्याचे महत्त्व दाखवले. ज्यांनी ख्रिस्तासारखे व्यक्‍तीमत्त्व धारण केले आहे व जे आवेशाने प्रचार कार्य करीत आहेत असेच आपले मित्र निवडावे. जगीक मित्र हे देवाचे मित्र नाहीत, त्यामुळे त्यांच्यात मिसळल्यावर आम्हाला इजा झाल्यावाचून राहणार नाही. मंडळीत देखील आम्ही आपला सहवास उत्कर्षकारक होण्यासाठी निवडक असले पाहिजे.

वर्तणूकीबद्दल वर दिलेल्या सल्ल्याचा शिरोबिंदू आधुनिक नाटकाद्वारे रेखांकित करण्यात आला. त्याचे शीर्षक होतेः “दियाबलाच्या कुयुक्त्यांबरोबर सामना देणे.”

कुटुंबासाठी शुद्ध वाणीचा सल्ला

ज्याची अत्यंत जरुरी होती असे भाषण, “पालकहो, आपल्या कर्तव्यांची पूर्तता करा!“ बुधवारी दिले गेले. पालकांना स्वतः देवाची काय इच्छा आहे ते माहीत असले पाहिजे व आपल्या कुवतीप्रमाणे त्यांनी ती करण्याचा नेटाने प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी मुलांमध्ये देवाचा शब्द ठसवला पाहिजे. मुलांना ख्रिस्ती सभा व जाहीर प्रचार कार्य यांना नेणे केवळ पुरेसे नाही. तर त्यांना यहोवावर प्रेम करण्यास व ईश्‍वरी गोष्टी करण्यातील सूज्ञता दाखवली पाहिजे.

यानंतर, “आमच्या काळातील कुटुंब” हा परिसंवाद झाला. पहिल्या वक्त्याने दाखविले की, कुटुंबाचा उगम हा देवाकडून आहे. बापांनी आध्यात्मिक गोष्टींचे नियमित दळणवळण ठेवले पाहिजे. माता चांगल्या गृहिणी असल्या पाहिजेत, व मुलांनी आपल्या पालकांचे सहकार्य करून यहोवाला आदर प्रदर्शित केलाच पाहिजे.

पुढच्या वक्त्याने सांगितले की, कुटुंब “शत्रूच्या हल्ल्याखाली” आहे. आर्थिक दबाव समस्या वाढवीत आहेत. कामाच्या जागी चुकीच्या मोहामुळे वाहवत जाण्याचा संभव असतो. विविध माध्यमांद्वारे हिंसाचार, बेकायदेशीर लैंगिक व्यवहार व भौतिक गोष्टींचा मोह वाढवला जातो. या कारणामुळे सूचनांना लहानपणापासून सुरवात केली पाहिजे. जगीक परिणामांपासून दूर राहण्यासाठी कठोर परिश्रमांची आवश्‍यकता आहे. वॉचटावर संस्थेने पुरविलेल्या ईश्‍वरशासित उपकरणांचा चांगला वापर करण्यास हवा.

कुटुंबाचे “नवीन जगात बचावून जाणे,” या नंतरच्या भाषणाने पालकांवरील गंभीर जबाबदांऱ्‍याबद्दल आणखी पुष्टी मांडली. मुलांची तालीम ही अगदी मनापासून केली पाहिजे. कुटुंबाचा पवित्र शास्त्र अभ्यास व तो कसा करावा याविषयी सुंदर सल्ला देण्यात आला. हे सर्व मुलांच्या अंतःकरणाप्रत पोहंचण्यासाठी आहे. केवळ यामुळेच पालक व मुले नवीन जगात एक कुटुंब या नात्याने एकत्र बचावतील.

पुष्कळ साक्षीदार ज्या कौटुंबिक स्थितीत आहेत त्याला अनुलक्षून “विभक्‍त घरात सहकार्याने राहणे” या भाषणात सुंदर सल्ला दिला गेला. अशा परिस्थितीतील बांधवांना हा सल्ला मिळाला की विश्‍वासात नसलेला त्यांचा वैवाहिक सोबती कधीतरी विश्‍वास ग्रहण करू शकेल ही आशा कधीही गमावू नका. विश्‍वासात नसणाऱ्‍या आपल्या सोबत्याबरोबर वेळ घालवा आणि ख्रिस्ती सोबत्याच्या आवश्‍यक त्या सर्व गरजा पूर्ण करीत आहात याची खात्री करून घ्या. तुम्हाला वडीलजन किंवा जे अशा विभक्‍त घरात राहात आहेत त्यांच्याकडून मदत मिळू शकेल.

इतरांशी शुद्ध वाणी बोलणे

आम्हाला मिळालेल्या संधीचा इतरांना शुद्ध वाणी शिकवण्यासाठी उपयोग केला पाहिजे याकडे विशेष लक्ष वेधवले गेले. या कारणामुळे बुधवारी सकाळी उपस्थितांनी “तुमचा मोलवान वेळ सूज्ञतेने वापरा,” हे भाषण ऐकले. हे करण्यासाठी मत्तय ६:३३ मध्ये सांगितलेल्या गोष्टींच्या अनुषंगाने पहिल्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. तेथे म्हटले आहेः “तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा.” हे करण्यामध्ये वैयक्‍तीक अभ्यासासाठी, सर्व सभांना उपस्थित राहण्यासाठी व क्षेत्रकार्यास नियमितपणे येण्यासाठी वेळ काढणे जरुरीचे आहे. याचा अर्थ, सुखासीन, कमी महत्त्वाच्या गोष्टीपासून वेळ काढून घेतला पाहिजे. ही गोष्ट अनेक लोक कसे करीत आहेत हे कित्येक मुलाखतींद्वारे स्पष्ट करण्यात आले.

आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत हे कधीही विसरु नये. गुरुवारी दुपारी विविध प्रात्यक्षिकांद्वारे व “हरप्रसंगी शुद्ध वाणी बोलत राहा,” या भाषणामध्ये याच विषयावर अधिक भर देण्यात आला. हे, रस्त्यावरील साक्षीकार्य, अनौपचारिक साक्षीकार्य आणि दूरध्वनीद्वारे कसे करता येईल ते त्या प्रात्यक्षिकांद्वारे दाखविले गेले. यहोवा देव तसेच आमचे शेजारी यांविषयी असणारी निःस्वार्थ प्रीती मिळणाऱ्‍या संधीचा उपयोग शुद्ध वाणी बोलण्याकडे करण्यासाठी चालना देईल.

या विषयाशी संलग्न असणारा पुढचा विषय, “हार न मानणाऱ्‍यांसाठी आशीर्वाद” हा होता. ख्रिस्ती धर्मराज्याच्या अगदी विरुद्ध बाजूस यहोवाच्या साक्षीदारांची जागतिक शैक्षणिक कार्य करणारी संस्था उभी आहे. आम्ही शासकीय विरोध, सगळीकडे पसरलेले औदासिन्य व आर्थिक समस्या या दबावांचा प्रतिकार केला पाहिजे. रिझनिंग फ्रॉम द स्क्रिपचर्स या पुस्तकावर आधारीत असणाऱ्‍या प्रात्यक्षिकांनी या दबावावर कशी मात करता येईल ते दाखवून दिले.

प्रोत्साहनयुक्‍त आवेशाचा प्रचार या रुपात एक पवित्र शास्त्रीय नाटक प्रस्तुत करण्यात आले. देवाची इच्छा आवेशाने पूर्ण करणे हा त्याचा विषय होता. यहोवाच्या नावाबद्दल येहू किती आवेशी होता व आज आम्ही देवाच्या कामात तसेच धैर्य व आवेश दाखवणे केवढ्या महत्त्वाचे आहे हे त्यामध्ये चित्रित करण्यात आले.

अधिवेशनातील प्रकाशने

या अधिवेशनाच्या वेळी इंग्रजी व जर्मन भाषेतील दोन विशेष प्रकाशने प्रसिद्ध करण्यात आली. पहिले प्रकाशन “रक्‍ताने तुमचे जीवन वाचविणे—ते कसे?” या भाषणाला जोडून प्रकाशित करण्यात आले. वक्त्याने आरंभाला रक्‍त संक्रमणात कोणते धोके आहेत ते विशद केले. त्यांनी म्हटले की, वाया गेलेल्या रक्‍ताची भरपाई करण्यासाठी रक्‍ताशिवाय अनेक पर्याय आहेत. यहोवाचे साक्षीदार, रक्‍त आरोग्यवर्धक नाही म्हणून नव्हे तर त्याचा स्वीकार करणे त्यांना अपवित्र करते म्हणून रक्‍तापासून दूर राहतात. ते प्रदुषित असते म्हणून नव्हे तर ते देवास बहुमूल्य वाटते म्हणून ते दूर राहतात. जीवनदायी रक्‍त खरेच कोणते असेल तर ते येशू ख्रिस्ताने खंडणी म्हणून वाहिलेले त्याचे रक्‍त होय. शेवटी वक्त्याने, रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते? हे ३२ पानी माहितीपत्रक प्रसिद्ध करून सर्वांना आनंदित केले.

दुसरे महत्त्वाचे प्रकाशन “अहो, लोकहो, यहोवाचा शोध करा,” या भाषणाच्या अनुषंगाने प्रसिद्ध झाले. बहुतेक लोक देवाचा शोध घेत नाहीत. आज वेगवेगळे धर्म अस्तित्वात आहेत ते हेच दाखवून देतात की, माणसाने देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे देवाचा शोध घेण्याचा त्याचा मार्ग किती चुकीचा बनला गेला. दर वर्षी हाती मिळणाऱ्‍या आमच्या स्मृती भोजनाच्या अहवालावरुन दिसते की, यहोवाच्या बाजूला उभे राहण्यासाठी लाखो लोकांना मदत देण्याची गरज आहे. यशया ५५:६, ७ दाखविते की, यहोवा हा खरेपणाने प्रेमळ व दयाळू आहे. तो “भरपूर क्षमा करण्यास” तयार आहे. त्याचे साक्षीदार या नात्याने आम्हाला शुद्ध वाणी देण्यात आली आहे ज्यामुळे इतरांनीही आमच्यामध्ये सामील होऊन देवाची सेवा खांद्याला खांदा लावून करावी यासाठी त्यांना मदत देता येईल.

लोकसंख्येच्या चळवळीमुळे देवाच्या लोकांपुढे एक आव्हानच उभे राहिले आहे. या कारणामुळे आमच्या क्षेत्रात सर्व प्रकारातील धर्म जोपासणारे लोक आढळून येऊ शकतील. आम्ही हिंदू, बौद्ध, शिंतो व इतर धर्माच्या लोकांना मदत देऊ शकू यासाठी संस्थेने आम्हाला मॅनकाइण्डस्‌ सर्च फॉर गॉड हे ३८४ पृष्ठांचे नवे प्रकाशन हाती दिले आहे. ते ख्रिस्ती धर्मजगताबाहेर असणाऱ्‍या प्रमुख धर्मांचे मूलभूत शिक्षण अधिकृतरित्या स्पष्ट करते. पण ते, ख्रिस्ती धर्मजगतात असणाऱ्‍या खोट्या धर्माच्या अहवालाचाही मागोवा घेते. वेगवेगळे धर्म जोपासण्याचा दावा करणाऱ्‍या लोकांसोबत पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याचा मार्ग हे पुस्तक मोकळा करते.

जाहीर भाषण आणि समारोपाचे विवेचन

“शुद्ध वाणीने एकवटलेले व्हा,” हा शुक्रवारी झालेल्या जाहीर भाषणाचा विषय होता. वक्त्याने दाखविले की, आज जरी ३,००० भाषा एकत्रीकरण घडवून आणण्यात अडथळा बनत आहेत तरी ही शुद्ध वाणी ऐक्याचा सामर्थ्यशाली स्रोत आहे. तिने बाबेलच्या चुकीच्या शिक्षणापासून यहोवाच्या साक्षीदारांचे रक्षण केले आहे, त्यांना जीवन व रक्‍त याविषयाचा आदर करण्यात शिकवले आहे, तसेच शारीरिक व आध्यात्मिक रितीने फायदा देणाऱ्‍या पवित्र शास्त्रीय तत्त्वांनुरुप जीवन व्यतित करण्यात मदत दिली आहे. सर्वांनी ही शुद्ध वाणी शिकून घेऊन ती बोलण्याची गरज विचारात घेतली पाहिजे, कारण तसे करणारेच हर्मगिदोनातून वाचू शकतील. सफन्या २:१-३ मधील सल्ला ऐकण्यात वेळ वाया जाऊ देऊ नका.

“प्रार्थनेत तत्पर राहा,” यावर काही सुंदर शास्त्रवचनीय सल्ला प्रस्तुत केल्यावर “शुद्ध वाणीच्या सहमतात आपली वाटचाल ठेवा,” हे समारोपाचे भाषण झाले. शुद्ध वाणीच्या सहमतात चालणाऱ्‍यांच्या संख्येत वृद्धी होत आहे. अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्‍यांनी शुद्ध वाणीविषयी त्यांना वाटणारी कदर आपली स्वच्छता, टापटीपपणा, व संघटनात्मक सहमत याद्वारे प्रकट केला. नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेली प्रकाशने देखील सर्व यहोवाच्या साक्षीदारांना ही शुद्ध वाणी अधिक परिणामकारकपणे प्रसारीत करण्यात मदत देईल.

अधिवेशनाच्या शेवटल्या वक्त्यांनी आम्हा सर्वांना सहनशीलतेची किती गरज आहे त्याची आठवण करून दिली. त्यांनी म्हटले की, या अधिवेशनाचा परिणाम आम्ही सर्वांनी निश्‍चयी होऊन दृढतेने पुढे जात राहण्यात दिसला पाहिजे. शेवटी त्यांनी या शब्दात समारोप केलाः “देवाने दिलेल्या शुद्ध वाणीनुरुप आपण आपली वाटचाल ठेवू या; म्हणजे आम्हाला आपला प्रेमळ स्वर्गीय पिता यहोवा देवाचे आता व सदासर्वकाळासाठी गौरव करता येईल.” (w91 1/15)

[२२, २३ पानावरील चौकट]

१. ऑलिम्पिया स्टेडियम, पश्‍चिम बर्लिन

२. अधिवेशनाचा छापील कार्यक्रम

३. पूर्व जर्मनीतील प्रतिनिधी दोनशे बसमधून आले

४. छापील प्रकाशने मिळविण्यात पोलिश प्रतिनिधींना मोठा आनंद झाला

५. फुलांच्या सजावटीमुळे एकंदर दृश्‍याला उजळपणा आला

६. पश्‍चिम बर्लिनच्या कार्यक्रमात नियमन मंडळाचे एक सदस्य ए. डी. श्रोडर

[२४ पानावरील चौकट]

पश्‍चिम बर्लिन येथील अधिवेशनातील उपस्थितीचा उच्चांक ४४,५३२ होता व १,०१८ लोकांचा बाप्तिस्मा झाला. ऑलिम्पिया स्टेडियममधून बाप्तिस्मा घेणाऱ्‍या उमेदवारांना बाहेर पडण्यास १९ मिनिटे लागली व या सर्ववेळी उपस्थितांकडून सतत आनंदाचा जल्लोष होत होता. इंग्रजी भाषेसाठी एक खास विभाग होता. येथे ६,००० लोकांना सबंध कार्यक्रम आपल्या भाषेतून ऐकावयास मिळाला. या अधिवेशनात पोलंडमधून ४,५०० प्रतिनिधी आले होते; दोन दिवशी दुपारच्या मध्यंतरात यांच्या फायद्यासाठी नियमन मंडळाच्या सदस्यांनी भाषणे दिली.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा