“बरे करताना खचू नका”
थेस्सलनीकाकरांच्या दुसऱ्या पत्रातील ठळक वैशिष्ट्ये
मासेदोनियातील शहर थेस्सलनीका येथील ख्रिश्चनांविषयी प्रेषित पौलाला जी चिंता वाटत होती तिने त्याला त्यांना दुसरे पत्र लिहावयास उद्युक्त केले. हे साधारण इ. स. ५१ मध्ये लिहिण्यात आले. येशू ख्रिस्ताचे आगमन जवळ येऊन ठेपले आहे असे मंडळीतील काहीजण चुकीने म्हणत होते. कदाचित एखादे दुसरे पत्र पौलाकडून आले आहे अशी त्यांनी चुकीने समजून करून घेऊन “यहोवाचा दिवस” आलेला आहे अशी धारणा करून घेतली असावी.—२ थेस्सलनीकाकर २:१, २.
यासाठीच थेस्सलनीकाकरातील काही जणांची विचारशैली सुधरविण्याची गरज होती. आपल्या दुसऱ्या पत्रात पौलाने त्यांच्या विश्वासाच्या वाढीविषयी, वाढत्या प्रेमाविषयी व विश्वासू सहनशीलतेबद्दल प्रशंसा केली. त्याने दाखविले की, येशूच्या आगमनाआधी धर्मत्याग दिसून येईल. तेव्हा समोर कठीण काळ होता व यासाठी प्रेषिताचे हे पत्र त्याने त्यात लिहिलेली ही सूचना पाळून चालण्यात त्यांना मदत देणार होती की, “बरे करताना खचू नका.” (२ थेस्सलनीकाकर ३:१३) पौलाचे शब्द याच मार्गाने आमची मदत करू शकतात.
ख्रिस्ताचे प्रकटीकरण व उपस्थिती
पौलाने प्रथमतः संकटातून सुटका याविषयी म्हटले. (१:१-१२) ही ‘प्रभु येशू आपल्या सामर्थ्यवान दूतांसह प्रगट होण्याच्या समयी’ होईल. मग, जे सुवार्ता मानीत नाहीत अशांचा सार्वकालचा नाश केला जाईल. आज आमचा छळ होत असता या गोष्टींचे स्मरण करणे आम्हास समाधान देऊ शकते.
पुढे पौलाने दर्शविले की, ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या आधी “धर्मत्यागी पुरुष” कोण आहे ते प्रकटविण्यात येईल. (२:१-१७) “यहोवाचा दिवस” जणू आलाच आहे असे भासविणाऱ्या कोणाही संदेशाकरवी थेस्सलनीकाकरांनी दचकून जाण्याची गरज नव्हती. प्रथमतः धर्मत्याग प्रकट होईल आणि धर्मत्यागी पुरुष सामोरा येईल. त्यानंतर येशू त्याला आपल्या उपस्थितीच्या समयी नष्ट करणार आहे. मध्यंतरात पौलाने हे प्रार्थिले की देव व ख्रिस्त थेस्सलनीकाकरांच्या अंतःकरणाला सांत्वन देवो व त्यांना “प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत स्थिर करो.”
अव्यवस्थितपणे वागणाऱ्यांना हाताळणे
पौलाने यानंतर मंडळीत अव्यवस्थितपणे वागणाऱ्यांना कसे हाताळावे त्याविषयीच्या सूचना दिल्या. (३:१-१८) प्रभु थेस्सलनीकाकरांना दृढ करील व तो त्यांना दियाबल सैतान या दुष्टापासून राखील हा आत्मविश्वास व्यक्त केला. पण त्यांनी स्वतः आपल्या आध्यात्मिक लाभास्तव काही पावले उचलण्यास हवी होती. त्यांनी अव्यवस्थितपणे वागणाऱ्यांपासून, इतरांच्या कामात ढवळाढवळ करणाऱ्या आणि काम करण्याचे नाकारणाऱ्या लोकांपासून स्वतःला वेगळे ठेवायचे होते. “कोणाला काम करायची इच्छा नसेल तर,” पौल म्हणाला की, “त्याने खाऊही नये.” अशा लोकांना चिन्हांकित करायचे होते व यांच्याशी कसलाही सलोखा राखायचा नव्हता, तरी त्यांना बंधू या नात्याने सल्ला देणे जरुरीचे होते. बरे ते करण्यात विश्वासू थेस्सलनीकाकर ख्रिस्ती बांधवांनी खचून जायचे नव्हते, तसेच पौलाने हे इच्छिले की, प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा त्यांच्यासोबत सदोदित राहो.
पौलाने थेस्सलनीकाकरांना लिहिलेले दुसरे पत्र आज यहोवाच्या साक्षीदारांना ही हमी देते की, त्यांना त्यांच्या संकटातून मुक्तता ही नक्की मिळेल. हे, ख्रिस्त व त्याचे दूत, सुवार्ता न मानणाऱ्यांचा सूड उगवतील तेव्हा घडेल. तसेच “धर्मत्यागी पुरुष” (ख्रिस्ती धर्मजगतातील धार्मिक पुढाऱ्यांचा वर्ग) आणि सर्व खोटा धर्म हे लवकरच लयास जातील हे जाणणे विश्वासाची बळकटी करते. मध्यंतरात, आपण पौलाने दिलेली सूचना की, बरे ते करण्यात खचू नये, याचे पालन करीत राहू या.
[३२ पानावरील चौकट/चित्र]
यहोवाच्या वचनाची त्वरेने प्रगति घडते: “आम्हासाठी प्रार्थना करीत जा,” असे पौलाने लिहिले, ते अशासाठी की, “तुमच्यामध्ये झाल्याप्रमाणे यहोवाच्या वचनाची त्वरेने [किंवा, “जलदपणे”] प्रगति व्हावी व त्याचे गौरव व्हावे.” (२ थेस्सलनीकाकरांस ३:१; किंग्डम इंटरलिनियर) काही प्रामाण्यांचे असे म्हणणे आहे की, येथे पौल शर्यतीत जलद गतीने धावणाऱ्या स्पर्धकाची समांतरता घेत होता. हे जरी अनिश्चित वाटत असले तरी पौलाने थेस्सलनीकाकर ख्रिश्चनांना प्रार्थना करण्याची विनंती केली होती की ज्यामुळे त्याला व त्याच्या सोबतीत असणाऱ्या सहकाऱ्यांना सत्याचे वचन तातडीने व कोठलाही अडथळा न घडता प्रसारीत करता यावे. देव अशा प्रार्थनांना उत्तर देतो व यामुळेच या शेवटल्या काळात सुवार्तेचा प्रसार तातडीने होत असता त्याच्या वचनाची “त्वरेने प्रगति” घडते. यहोवाच्या वचनाचे देखील विश्वासू जनांतर्फे “गौरव होते,” किंवा त्याला आदराने मानले जाते कारण ज्यांनी ते स्वीकारले होते त्या थेस्सलनीकाकरांच्या बाबतीत जे घडले तसेच येथेही ते “तारणासाठी देवाचे सामर्थ” असे घडते. (रोमकर १:१६; १ थेस्सलनीकाकर २:१३) आज देव राज्य-घोषकांना आशीर्वाद देत आहे व आपल्या उपासकांची संख्या त्वरेने वाढवीत आहे याचा आम्हाला केवढा आनंद वाटतो!—यशया ६०:२२.