सार्वकालिक जीवनासाठी नेमलेल्या लोकांचा शोध घ्या
“जितके सार्वकालिक जीवनसाठी नेमलेले होते, तितक्यांनी विश्वास धरिला.”—प्रे. कृत्ये १३:४८.
१. मानवी हृदयाच्या बाबतीत यहोवाठायी कोणती क्षमता आहे?
यहोवा देव अंतःकरणात असणाऱ्या गोष्टींचे वाचन करू शकतो. ही गोष्ट, शमुवेल संदेष्टा, इशायच्या एका मुलाचा इस्राएलावरील राजा होण्यासाठी अभिषेक करण्याकरता गेला तेव्हा स्पष्ट दिसली. एलियाब आला तेव्हा शमुवेलाने त्याला “न्याहाळून पाहून म्हटले: ‘ . . . हाच परमेश्वराचा [यहोवा, न्यू.व.] अभिषिक्त होय.’ पण परमेश्वराने [यहोवा, न्यू.व.] शमुवेलास म्हटले: ‘तू त्याच्या स्वरुपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरुप पाहतो; पण परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] हृदय पाहतो.’” मग, शमुवेलाला दावीद, जो ‘देवाच्या मनासारखा’ असल्याचे दिसले, त्याचा अभिषेक करण्यासाठी निरवले गेले.—१ शमुवेल १३:१३, १४; १६:४-१३.
२. कोणा व्यक्तीच्या लाक्षणिक हृदयात काय मुळावलेले असते, आणि याबद्दल आपण शास्त्रवचनात काय वाचतो?
२ प्रत्येक व्यक्ती कोणती ना कोणती तरी विशिष्ट गुणलक्षणे व्यक्त करीत असतो. त्याच्या लाक्षणिक हृदयात विशिष्ट मनोवृत्ती जडलेली असते. (मत्तय १२:३४, ३५; १५:१८-२०) या कारणामुळे आम्ही काही लोकांबद्दल असे वाचतो की, त्यांच्या “हृदयात कलह भरला” आहे. (स्तोत्रसंहिता ५५:२१) तसेच, “क्रोधाविष्ट मनुष्याकडून बहुत अपराध घडतात,” असेही आपल्याला सांगण्यात आले आहे. शिवाय आम्ही वाचतो की, “असे पुष्कळ मित्र असतात की, जे तुकडे तुकडे करतात; परंतु एखादा असा मित्र असतो की, तो आपल्या बंधूपेक्षाही आपणास धरुन राहतो.” (नीतीसूत्रे १८:२४; २९:२२) बहुतेक जण प्राचीन अंत्युखियातील पिसिदिया येथील लोकांप्रमाणे आहेत ही चांगले गोष्ट आहे. यहोवाने तारणासंबंधाने जी व्यवस्था केली आहे ती ऐकून ते “हर्षयुक्त झाले, आणि त्यांनी देवाच्या [यहोवा, न्यू.व.] वचनाचा महिमा वर्णिला. तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमिलेले होते तितक्यांनी विश्वास धरिला.”—प्रे. कृत्ये १३:४४-४८.
विश्वास धरणारे “अंतःकरणाचे शुद्ध” असतात
३, ४. (अ) अंतःकरणाचे शुद्ध कोण आहेत? (ब) जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला कसे बघतात?
३ अंत्युखियातील ते विश्वासधारक बाप्तिस्मा घेतलेले ख्रिस्ती बनले आणि त्यांच्यातील विश्वासू जन स्वतःला येशूचे हे शब्द लावू शकले: “जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.” (मत्तय ५:८) पण हे “अंतःकरणाचे शुद्ध” कोण आहेत? ते कसे ‘देवाला बघतात’?
४ अंतःकरणाचे शुद्ध असणारे लोक आतून शुद्ध असतात. त्यांना रसिकता, कनवाळूपणा, इच्छा व हेतू यांची शुद्धता असते. (१ तीमथ्य १:५) ते सध्या देवाला पाहतात ते या अर्थी की, तो त्यांना सचोटी रक्षक या दृष्टीकोणातून बघतो व त्यांच्यावतीने हालचाल करतो. (पडताळा निर्गम ३३:२०; ईयोब १९:२६; ४२:५) येथे “पाहणे,” याकरता जो ग्रीक शब्द आला आहे त्याचा “मनाने बघणे, समजणे, जाणणे” असाही अर्थ होतो. वस्तुतः येशूने देवाच्या व्यक्तीमत्वास पूर्ण प्रकाराने परावर्तित केले असल्यामुळे, “अंतःकरणाचे शुद्ध” असणारे लोक त्या व्यक्तीमत्वास समजून घेण्याचा आनंद घेतात. ते ख्रिस्त व त्याच्या पापक्षालनार्थाच्या यज्ञार्पणावर आपला विश्वास ठेवितात, आपल्या पापांची क्षमा मिळवितात आणि देवाला स्वीकृत असणारी सेवा सादर करतात. (योहान १४:७-९; इफिसकर १:७) अभिषिक्त जनांसाठी देवाला बघण्याचा कळस, त्यांचे स्वर्गीय पुनरुत्थान होऊन ते समक्ष देवाला व ख्रिस्ताला पाहतात, तेव्हा गाठण्यात येतो. (२ करिंथकर १:२१, २२; १ योहान ३:२) तथापि, जे सर्व अंतःकरणाने शुद्ध आहेत अशांना अचूक ज्ञान व खरी भक्ती याद्वारे देवाला बघता येईल. (स्तोत्रसंहिता २४:३, ४; १ योहान ३:६; ३ योहान ११) अशांना एकतर स्वर्गात किंवा नंदनवनमय पृथ्वीवर सार्वकालिक जीवन नेमलेले आहे.—लूक २३:४३; १ करिंथकर १५:५०-५७; १ पेत्र १:३-५.
५. एखाद्याला विश्वासधारी तसेच येशू ख्रिस्ताचा खरा अनुयायी कसे होता येईल?
५ जे सार्वकालिक जीवनसाठी नेमलेले नाहीत असे विश्वास धरणारे होणार नाहीत. त्यांना विश्वास धरता येणे अशक्य आहे. (२ थेस्सलनीकाकर ३:२) शिवाय, जर कोणी आपल्याला शिकविण्यालायक बनवीत नाही तर तो येशू ख्रिस्ताचा खरा अनुयायी होऊ शकत नाही. अंतःकरणे बघणारा यहोवा त्या नम्रजनांना आकर्षवीत असतो. (योहान ६:४१-४७) अर्थात, यहोवाचे साक्षीदार घरोघरचे कार्य करीत असताना कोणाचाही पूर्वन्याय करीत नाहीत. त्यांना अंतःकरणाचे वाचन करता येत नाही, त्यामुळे ते परिणाम देवाच्या प्रेमळ हाती सोपवितात.
६. (अ) घरोघरच्या सेवकपणातील व्यक्तीगत संपर्काबाबत काय म्हणण्यात आले आहे? (ब) सार्वकालिक जीवनासाठी नेमलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांना मदत मिळावी याकरता कोणत्या तरतुदी पुरविण्यात आल्या आहेत?
६ एका प्रामाण्याने अगदी योग्यपणे हे म्हटले आहेः “[पौलाने] जाहीरपणे व घरोघरी सत्य शिकवले. त्याने केवळ व्यासपीठावरुन नव्हे तर व्यक्तीगत संपर्क साधून ख्रिस्ताचा प्रचार केला. बहुतेक वेळा हा व्यक्तीगत संपर्क जिवांना शोधण्याच्या इतर प्रकारांपेक्षा अत्यंत प्रभावी ठरत असतो.” (ऑगस्ट व्हॅन रायन) यहोवाच्या साक्षीदारांना थिऑक्रेटिक मिनिस्ट्री स्कूल गाईडबुक, रिझनिंग फ्रॉम द स्क्रिपचर्स आणि आमची राज्य सेवा ही प्रकाशने भाषण देण्यात तसेच क्षेत्रावरील सेवेत बहुतेक व्यक्तीगत संपर्क साधण्यात मदत देतात. याचप्रमाणे, सेवा सभेतील प्रात्यक्षिके तसेच ईश्वरशासित उपाध्यपणाची शाळा यातील सूचना देखील साहाय्यक ठरतात. जे या शाळेला उपस्थित राहतात अशांना चांगली प्रस्तावना, शास्त्रवचनांचा योग्य वापर करणे, तर्कशुद्ध मांडणी, खात्रीशीर विवाद, उदाहरणांचा वापर आणि प्रभावी समाप्ती या विविध भाषण गुणवत्तेबाबत महत्त्वपूर्ण तालीम मिळत असते. तर आता, देवाचे लोक सार्वकालिक जीवनसाठी नेमलेल्या लोकांचा शोध घेत असता या सूचना त्यांना कशा अधिक प्रभावशाली होऊ शकतात याबद्दल पवित्र शास्त्रात अधिक पुष्टीकारक असे जे स्पष्टीकरण आहे ते आपण पाहू या.
विचार-प्रवर्तक प्रस्तावना
७. डोंगरावरील प्रवचनातील येशूचे प्रास्ताविक शब्द प्रस्तावनेबद्दल काय शिकवतात?
७ घरोघरच्या साक्षीकार्याची तयारी करणाऱ्यांना आस्था निर्माण करू शकणाऱ्या प्रस्तावना कशा मांडता येतील ते येशूच्या उदाहरणाद्वारे शिकता येते. त्याने डोंगरावरील प्रवचनाची सुरवात “धन्य,” अशी नऊ वेळेला केली. उदाहरणार्थ, तो म्हणालाः “आध्यात्मिक गरजांची जाणीव राखणारे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. . . . जे सौम्य ते धन्य, कारण त्यांस पृथ्वीचे वतन मिळेल.” (मत्तय ५:३-१२) ती विधाने थेट व स्पष्ट होती. अशा प्रस्तावनांनी आस्था नक्कीच उभारुन त्यामध्ये श्रोत्यांना सामील करून घेतले असावे, कारण आनंदी असू नये असे कोणाला वाटत असते?
८. घरोघरच्या सेवकपणात संभाषणाचा विषय कसा प्रस्तुत करण्यास हवा?
८ घरोघरच्या सेवकपणात उपयोगात आणला जाणारा संभाषणाचा कोणताही विषय सरळ, सुखावह रितीने प्रस्तुत केला पाहिजे. अशा प्रकारातील धक्कादायक प्रस्तावना कोणीही वापरु नये की, “मी बाहेरील अंतराळातून तुम्हासाठी संदेश आणला आहे.” सुवार्तेला स्वर्गीय उगम आहे हे खरे, पण अशा प्रकारात सादर केलेली प्रस्तावना घरमालकाला, आपण या साक्षीदाराचे ऐकून घ्यावे की, होता होईल तितक्या लवकर घालवावे या संभ्रमात पाडील.
देवाचे वचन योग्यपणे हाताळणे
९. (अ) सेवकपणात शास्त्रवचनांची प्रस्तुति, वाचन व अवलंब कसा केला जाण्यास हवा? (ब) येशूने प्रश्नांचा जो वापर केला त्याबद्दल कोणते उदाहरण देण्यात आले आहे?
९ व्यासपीठाप्रमाणेच क्षेत्रसेवेत देखील शास्त्रवचनांची प्रस्तुति योग्यपणे केली जावी, ती आवश्यक तेथे जोर देऊन वाचली पाहिजेत, आणि स्पष्ट व अचूक मार्गाने लागू केली पाहिजे. एखाद्या शास्त्रवचनीय मुद्याबाबत घरमालकाला विचार करण्यासाठी मांडण्यात आलेले प्रश्न देखील साहाय्यक ठरू शकतील. येथे पुन्हा येशूची शिकवण पद्धत सूचनात्मक आहे. एके प्रसंगी, मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत असणाऱ्याने येशूला विचारलेः “गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?” याला उत्तर देताना येशूने विचारलेः “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू काय वाचितोस?” या प्रश्नाचे उत्तर तो माणूस देऊ शकेल हे येशूला निश्चये माहीत होते. आणि त्यानेही बरोबर उत्तर दिले. तो म्हणालाः “‘तू आपला देव परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] याजवर पूर्ण मनाने [“अंतःकरणाने,” न्यू.व.], पूर्ण जिवाने, पूर्ण शक्तीने व पूर्ण बुद्धीने प्रीती कर,’ आणि ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’” यामुळे येशूला त्याला शाबासकी द्यावी लागली व संभाषण पुढे चालू राहिले.—लूक १०:२५-३७.
१०. संभाषणाच्या विषयाबाबत एखाद्याने काय लक्षात ठेवण्यास हवे, आणि घरमालकाला प्रश्न विचारताना कोणती गोष्ट टाळावी?
१० घरोघरचे साक्षीकार्य करणाऱ्यांनी संभाषणाच्या विषयावर जोर दिला पाहिजे आणि या विषयाबद्दल जी शास्त्रवचने वाचण्यात येत आहेत त्यामागील कारण स्पष्ट करण्यास हवे. वस्तुतः घरमालकाच्या अंतःकरणाप्रत पोहंचण्याचा साक्षीदाराचा प्रयत्न असल्यामुळे त्याने त्याला विचलीत करणारे प्रश्न विचारण्याचे टाळावे. देवाच्या वचनाचा वापर करताना ‘आपले बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे.’—कलस्सैकर ४:६.
११. चुकीचे दृष्टीकोण खोडून टाकण्यात वापरण्यात येणाऱ्या शास्त्रवचनांच्या बाबतीत आम्हाला, सैतानाने येशूच्या घेतलेल्या परिक्षेत कोणते उदाहरण दिसते?
११ खासपणे, जेव्हा पुनर्भेट घेतो तेव्हा शास्त्रवचने खरेपणाने जे म्हणतात किंवा त्यांचा जो खरा अर्थ आहे तो दाखवून चुकीचे दृष्टीकोण खोडण्याची गरज येते. येशूने असेच काही सैतानाबाबत केले. सैतानाने त्याला म्हटले होतेः “तू देवाचे पुत्र असल्यास [मंदिराच्या कंगोऱ्यावरुन, आत्महत्त्या घडावी म्हणून] खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे: ‘तो आपल्या दूतांस तुजविषयी आज्ञा करील, आणि तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील.” सैतानाद्वारे अवतरीत करण्यात आलेले हे स्तोत्रसंहिता ९१:११, १२ मधील वचन, देवाने दिलेली देणगी, जीवन याला धोक्यात घालण्याचे समर्थन पुरवीत नाही. अशाप्रकारे जीवनाशी खेळ करून यहोवाची परिक्षा घेणे हे चुकीचे आहे असे जाणून येशूने सैतानाला म्हटलेः “आणखी, असे लिहिले आहेः ‘प्रभू [यहोवा, न्यू.व.] जो तुझा देव त्याची परिक्षा पाहू नको.’” (मत्तय ४:५-७) अर्थात, सैतानाला सत्याची चाड नाही. पण जेव्हा, सर्वसाधारण लोक असा काही चुकीचा दृष्टीकोण प्रदर्शित करतात, ज्यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगति खुंटण्याची शक्यता आहे, तेव्हा देवाच्या वचनाच्या सेवकाने, शास्त्रवचने काय म्हणतात व त्यांचा काय अर्थ होतो ते अगदी चतुरपणे दाखविले पाहिजे. हे, “सत्याचे वचन नीट सांगणे” याचा एक भाग आहे. हाच, ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेत शिकवण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण धड्यांपैकी एक आहे.—२ तीमथ्य २:१५.
खात्री पटविणे याचे विशिष्ठ स्थान आहे
१२, १३. सेवकपणात खात्री पटविणे का योग्यतेचे आहे?
१२ खात्री पटविणे याला ख्रिस्ती सेवकपणात योग्य स्थान आहे. उदाहरणार्थ, पौलाने आपला सहकारी तीमथ्य याला त्याची “ज्याविषयी . . . खात्री झाली” त्या शिकलेल्या गोष्टी धरुन राहण्याचे प्रोत्साहन दिले. (२ तीमथ्य ३:१४) पौल करिंथमध्ये “दर शब्बाथ दिवशी सभास्थानात वाद करून यहूद्यांची व हेल्लेण्यांची खात्री पटवीत असे.” (प्रे. कृत्ये १८:१-४, न्यू.व.) इफिसमध्ये त्याने ‘देवाच्या राज्याविषयी भाषणे दिली व प्रमाण पटविले.’ (प्रे. कृत्ये १९:८) आणि रोममध्ये तो घरकैदी होता तेव्हा या प्रेषिताने लोकांना येऊन भेटण्यास सांगितले व त्यांना साक्ष देऊन त्यांची ‘खात्री पटविली,’ व यामुळे काही जण विश्वासधारी बनले.—प्रे. कृत्ये २८:२३, २४.
१३ साक्षीदारांनी कितीही खात्रीशीरपणे आपली साक्ष देण्याचा प्रयत्न केला तरी अर्थातच, जे सार्वकालिक जीवनसाठी नेमलेले आहेत असेच लोक विश्वास ठेवतील. खात्रीशीर विवाद आणि स्पष्ट रुपाचे स्पष्टीकरण चतुरपणे सादर केल्यामुळे यांना विश्वास ठेवण्यासारखे करता येईल. पण याबाबतीत त्यांना आणखी काय साहाय्यक ठरू शकेल?
तर्कशुद्ध व पटण्याजोगे
१४. (अ) तर्कशुद्ध, सुसंगत प्रस्तुतीकरणात कशाचा समावेश असतो? (ब) विवाद पटण्याजोगा करण्यासाठी कशाची हाक असते?
१४ ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेत ज्या एका संभाषणाच्या गुणावर जोर देण्यात आलेला आहे तो आहे, तर्कशुद्ध, सुसंगत प्रस्तुतीकरण. यामध्ये सर्व प्रमुख कल्पना व त्याजशी संबंधित असणारे साहित्य व्यवहारी क्रमाने मांडण्याचा समावेश होतो. शिवाय पटण्याजोगा विवाद देखील महत्त्वाचा आहे, ज्यात चांगला पाया घालणे व सबळ आधार पुरविणे हे येते. तसेच सर्वसाधारण स्तराचा उपयोग करून श्रोत्यांना विचार करावयास प्रवृत्त करणे, ते मुद्दे पुरेशा प्रमाणात प्रस्तुत करणे आणि व त्याचा अवलंब परिणामकारकपणे लागू करणे हेही याजशी संबंधित आहे. याबद्दल शास्त्रवचने मार्गदर्शन देतात.
१५. (अ) पौलाने मार्स टेकडीवर बोलताना कसे लक्ष आकर्षून घेतले व कसा सर्वसाधारण आधार प्रस्थापिला? (ब) पौलाच्या भाषणात आपल्याला तर्कशुद्ध, सुसंगत प्रस्तुतीकरण होते हे कसे दिसते?
१५ पौलाने प्राचीन अथेन्स शहरातील मार्स टेकडीवर त्याचे जे प्रख्यात भाषण दिले त्यामध्ये संभाषणाची ही गुणवत्ता दिसून येते. (प्रे. कृत्ये १७:२२-३१) त्याच्या प्रस्तावनेने श्रोत्यांचे लक्ष एकाग्र केले आणि एक सर्वसाधारण पाया प्रस्थापित केला. कारण तो म्हणालाः “अहो अथेनैकरांनो, तुम्ही देवदैवताला फार मान देणारे आहा असे मला दिसते.” त्यांना तर हे ऐकून मोठी स्तुती वाटली असावी यात काही शंका नाही. यानंतर, पौलाने “अज्ञात देवाला” समर्पित असलेल्या वेदीचा उल्लेख केल्यावर त्याने तर्कशुद्ध, सुसंगत प्रस्तुतीकरणाने व पटण्याजोग्या विवादाद्वारे आपले भाषण पुढे चालविले. त्याने म्हटले की, त्यांना ठाऊक नसणाऱ्या या देवाने “जग व त्यातले अवघे केले.” अथेना किंवा इतर हेल्लेणी दैवतांप्रमाणे हा ‘हातांनी बांधलेल्या मंदिरात राहात नाही, आणि मनुष्यांच्या हातांनी त्याची सेवा घडावी असे नाही.’ प्रेषिताने पुढे म्हटे की, याच देवाने आम्हाला जीवन दिले व तो आम्हाला चाचपडत ठेवत नाही. यानंतर पौलाने विवाद केला की, ज्याने अजाणपणे मूर्तीला आळविण्याच्या काळाची उपेक्षा केली तो आमचा निर्माणकर्ता आता ‘सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा असे सांगतो.’ यामुळे या तर्कशुद्ध मुद्याकडे निरवले गेले की, ‘देव आपल्या नियुक्त मनुष्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतीमत्त्वाने करील. त्याने त्या मनुष्याला मेलेल्यामधून उठविले आहे.’ वस्तुतः पौल “येशू व पुनरुत्थान याविषयी सुवार्ता” सांगत असल्यामुळे त्या अथेनैकरांना, तो न्यायाधीश येशू ख्रिस्त असेल हे समजू शकेल.—प्रे. कृत्ये १७:१८.
१६. पौलाने मार्स टेकडीवर केलेले भाषण तसेच ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेत मिळणारी तालीम याद्वारे एखाद्याच्या सेवेवर कोणता परिणाम घडू शकतो?
१६ हे खरे की पौल मार्स टेकडीवर घरोघरचे साक्षीकार्य करीत नव्हता. पण या भाषणापासून आणि ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेत मिळणारी तालीम याद्वारे यहोवाचे साक्षीदार पुष्कळ काही शिकून घेऊ शकतात व आपले सेवकपण अधिक वाढवू शकतात. होय, या सर्वांमुळे त्यांना अधिक प्रभावी सेवक बनता येते. पौलाने तर्कशुद्ध प्रस्तुतीकरण व खात्रीशीर विवाद प्रस्तुत केल्यामुळे काही अथेनैकरांना विश्वास धरण्यासाठी वळविण्यात आले.—प्रे. कृत्ये १७:३२-३४.
बोधप्रद उदाहरणे वापरा
१७. सेवकपणात कोणत्या प्रकारच्या उदाहरणांचा उपयोग केला जाण्यास हवा?
१७ ईश्वरशासित उपाध्यपणाची शाळा देवाच्या सेवकांना घरोघरच्या साक्षीकार्यात तसेच सेवेच्या इतर प्रकारात चांगली उदाहरणे वापरण्यात मदत करते. महत्त्वपूर्ण मुद्यांवर जोर देण्यासाठी साधी व चांगली उदाहरणे उपयुक्त ठरतात. ही उदाहरणे साक्षीदारांनी परिचित असणाऱ्या परिस्थितीतून निवडावी व त्याचा अवलंब काळजीपूर्वक स्पष्ट करावा. येशूने दिलेल्या उदाहरणांनी या गोष्टींची पूर्ति केली.
१८. सेवकपणात मत्तय १३:४५, ४६ कसे उपयुक्त असल्याचे सिद्ध होऊ शकते?
१८ उदाहरणार्थ, येशूचे हे शब्द लक्षात घ्या: “स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणीएका व्यापाऱ्यासारिखे आहे. त्याला एक अति मोलवान मोती आढळल्यावर त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले.” (मत्तय १३:४५, ४६) मोती हे कालव किंवा मऊ शरीर असलेल्या प्राण्याच्या कवचामध्ये सापडणारे बहुमोल रत्न आहे. पण यापैकीचे काही मोतीच केवळ “उत्तम” असतात. त्या एका मोत्याची किंमत समजण्यात आवश्यक असणारी समज त्या व्यापाऱ्याठायी होती व म्हणूनच त्याने तो मोती मिळवण्यासाठी आपले सर्वस्व विकण्याची तयारी दाखवली. अशाच प्रकारे, एखाद्या पुनर्भेटीच्या किंवा पवित्र शास्त्राभ्यासाच्या वेळी या उदाहरणाचा वापर, ज्याला देवाच्या राज्याची खरीच कदर आहे तो त्या व्यापाऱ्यासारखा असेल हे दाखवण्यासाठी केला जाऊ शकतो. असा व्यक्ती आपल्या जीवनात देवाच्या राज्याला अग्रगण्य स्थान देईल; त्याला इतर सर्व गोष्टी त्यागाच्या वाटतील.
कृति करण्याच्या प्रेरणेने समारोप करा
१९. घरोघरच्या सेवकपणात समाप्तीने घरमालकाला काय दाखवून दिले पाहिजे?
१९ ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेत देवाच्या लोकांना हेही शिकायला मिळते की, एखादे भाषण किंवा चर्चा हिच्या समाप्तीचा संबंध थेटपणे विषयाशी असला पाहिजे व या समाप्तीने श्रोत्यांना काय करावे ते आणि ते करण्याची चालना दिली पाहिजे. घरोघरच्या सेवकपणात घरमालकाला काय केले पाहिजे, जसे की, एखादे पवित्र शास्त्रीय प्रकाशन घ्यावे, किंवा पुनर्भेटीस होकार द्यावा ते स्पष्टरुपात कळले पाहिजे.
२०. कृति करण्याची प्रेरणा देणाऱ्या समाप्तीचे कोणते चांगले उदाहरण आपल्याला मत्तय ७:२४-२७ मध्ये सापडते?
२० याबाबतीत येशूने डोंगरावरील प्रवचनाची केलेली समाप्ती चांगल उदाहरण देते. अगदी सहज समजू शकणाऱ्या उदाहरणाने येशूने दाखविले की, त्याची वचने ऐकून घेणे हा सूज्ञतेचा मार्ग असणार. त्याने असा समारोप केलाः “यास्तव, जो प्रत्येक जण माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वर्ततो तो कोणा एका शहाण्या मनुष्यासारिखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधिले. मग, पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला. तरी ते पडले नाही. कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो प्रत्येक जण माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वर्तत नाही, तो कोणाएका मूर्ख मनुष्यासारिखा ठरेल. त्याने आपल घर वाळूवर बांधिले. मग, पाऊस पडला, पूर आला व वाराही सुटला व त्या घरास लागला. तेव्हा ते कोसळले व फारच जोराने पडले.” (मत्तय ७:२४-२७) हे, देवाच्या सेवकांनी घरमालकास कृति करण्याची प्रेरणा दिली पाहिजे हे किती चांगलेपणाने दाखवते!
२१. आमच्या या चर्चेने काय चित्रित केले, पण काय ओळखण्यास हवे?
२१ वर नमूद करण्यात आलेले मुद्दे, ईश्वशासित उपाध्यपणाची शाळा पुष्कळांना प्रशिक्षित असे राज्याचे घोषक बनण्यासाठी कशी मदत करू शकते ते स्पष्ट करतात. अर्थातच, आमची पात्रता ही देवाकडून आहे. (२ करिंथकर ३:४-६) तसेच एखादा सेवक कितीही निपुण असला तरी जोपर्यंत देव लोकांना ख्रिस्तामार्फत आकर्षित करीत नाही, तोपर्यंत त्यांना विश्वासधारी बनण्यासाठी मन वळवता येणार नाही. (योहान १४:६) तरीही, देवाच्या लोकांनी यहोवाने पुरविलेल्या सर्व आध्यात्मिक तरतुदींचा स्वतःसाठी लाभ मिळवून घ्यावा, ज्यामुळे सार्वकालिक जीवनासाठी योग्य प्रवृतिच्या लोकांचा शोध घेता येईल.
तुमचे उत्तर काय आहे?
▫ “अंतःकरणाचे शुद्ध” कोण आहेत व ते कसे “देवाला पाहतील”?
▫ घरोघरच्या कार्यात राज्याचा संदेश प्रस्तुत करताना कोणत्या गोष्टी विचारात ठेवल्या पाहिजे?
▫ सेवकपणात देवाच्या वचनाची कशी योग्यपणे हाताळणी करता येईल?
▫ क्षेत्रकार्यात तर्कशुद्ध व खात्री पटविणारी प्रस्तुति करण्यास कशाने मदत होईल?
▫ सेवकपणात जी उदाहरणे वापरायची असतात त्याबद्दल काय लक्षात ठेवण्यास हवे?
▫ साक्षीकार्यात जो समारोप करण्यात येतो त्याला कशाची जोड असण्यास हवी?
[११ पानांवरील चित्रं]
येशूने म्हटले की, जे “अंतःकरणाचे शुद्ध” ते देवाला “पाहतील.” याचा काय अर्थ होत होता?
[१३ पानांवरील चित्रं]
शास्त्रवचनांची प्रस्तुति योग्यपणे केली पाहिजे, त्याचे वाचन आवश्यक तो जोर देऊन करावे आणि त्यांना स्पष्ट व अचूक रितीने लागू करण्यास हवे