देव आणि ख्रिस्त यांजवरील विश्वास अबाधित ठेवा
कलस्सैकरांस पत्र यातील ठळक मुद्दे
तारणप्राप्तीसाठी यहोवा देव व येशू ख्रिस्तावरील विश्वास अत्यावश्यक आहे. पण अशा प्रकारातील विश्वास अबाधित ठेवणे हेही एक आव्हान आहे. हे कलस्सै या आशिया मायनरमधील इफिस शहराच्या पूर्वेकडे असणाऱ्या मंडळीतील ख्रिश्चनांच्या बाबतीत खरे होते. का बरे? कारण खोट्या ख्रिश्चनांनी तारण हे सुंतेवर, जे काही आम्ही खातो व जे पाळून चालतो त्यावर अवलंबून असते अशा गोष्टींना उचलून धरले होते.
यामुळे हे समजण्याजोगे आहे की, प्रेषिताला कलस्सैमधील ख्रिश्चनांच्या आध्यात्मिक स्वास्थ्याबद्दल काळजी वाटत होती; त्यांनी देव व ख्रिस्तावरील आपला विश्वास अबाधित ठेवावा हे तो इच्छित होता. या कारणास्तव, रोममधील त्याच्या बंदिवासाच्या शेवटाला (इ. स. ६०-६१च्या सुमारास) त्याने कलस्सैकरांना असे पत्र लिहिले ज्याचा मसुदा, चुकीच्या दृष्टीकोनाचे निराकरण कसे करावे व त्यांच्या विश्वासास उभारावे हा होता. आपणही त्याच्या प्रेमळ शब्दांकडून काही फायदा होऊ शकतो का ते पाहू या.
ख्रिस्ताच्या स्थानाची गुणग्राहकता
पौलाने आपल्या पत्राच्या आरंभाला येशूच्या स्थानाविषयीच्या गुणग्राहकतेविषयी ठळकपणे लिहिले. (१:१–२:१२) ख्रिस्तावरील त्यांच्या विश्वासाविषयी तसेच समविश्वासूंबद्दलच्या प्रीतीविषयी त्याने कलस्सैकरांची प्रशंसा केली. पौलाने ख्रिस्ताच्या ज्येष्ठत्वाविषयी, ज्याच्याद्वारे सर्व गोष्टींची निर्मिती करण्यात आली याप्रकाराने माहिती दिली. तसेच तो मंडळीच्या मस्तकपदी आहे व मृतातून पुनरुत्थान पावलेल्यातील प्रथमफळ असल्याचे स्पष्ट केले. ख्रिस्ताद्वारे देवाबरोबरील समेट घडून आला व त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ज्ञान व बुद्धी ही आहे. हे सर्व लक्षात घेता, ख्रिश्चनांनी मनुष्यांच्या संप्रदायाप्रमाणे असलेले ज्ञान व भूलथापा याकरवी कोणी हिरावून नेऊ नये म्हणून ख्रिस्तामध्ये वाटचाल करीत राहिले पाहिजे.
देवाने ख्रिस्ताद्वारे नियमशास्त्र वाटेवरुन काढून टाकले. (२:१३-२३) ज्या वधस्तंभावर येशू मेला त्यावरच ते जणू लाक्षणिकपणे खिळण्यात आले. नियमशास्त्रातील गरजा तर “भावी गोष्टींचे प्रतिबिंब” होत्या, पण सत्य “तर ख्रिस्ताचे आहे.” यास्तव ख्रिस्ताला घट्ट धरुन राहून, ते कोणाही मनुष्यास स्वर्गीय अमर जीवनाचे दान हिरावू देणार नव्हते.
देव व ख्रिस्ताची आवड राखणे
यानंतर पौल कलस्सैकरांना नवे मनुष्यपण धारण करण्यास व येशू ख्रिस्ताच्या अधिपत्याच्या अधीन होण्यास आर्जवितो. (३:१-१७) वरील गोष्टींकडे आपले मन लावून त्यांना आपल्या जीवनात आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य द्यावयाचे होते. याकरिता चुकीच्या चित्तवृत्तीत व बोलण्यामध्ये सर्वस्वी बदल करण्यास हवे होते. त्यांनी स्वतःठायी करूणायुक्त हृदय, नम्रभाव व प्रीती यांजसारखे गुण संपादित केल्यास ते केवढे आशीर्वादित ठरणार होते! सर्व काही येशूच्या नामाने केल्यास व त्याच्याचद्वारे देवाचे उपकारस्मरण केल्यास ख्रिस्ताची शांती त्यांच्या अंतःकरणावर राज्य करु शकेल.
यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांच्या खऱ्या आवडीने ख्रिश्चनांच्या इतरांसोबतच्या नातेसंबंधावर देखील परिणाम घडवून आणण्यास हवा. (३:१८–४:१८) बायका, नवरे, लेकरे, गुलाम व धनी या सर्वांनी देवाचे भय मनी बाळगून व ख्रिस्तासोबत अंकित राहून आपापली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. शिवाय प्रार्थनेत तत्पर व सूज्ञतेतील वाटचाल केवढ्या निकडीची आहे!
पौलाने कलस्सैकरांना लिहिलेले पत्र आमचे त्या खोट्या शिकवणूकींना टाळण्यात मदत करू शकते ज्या आम्हास जीवनाच्या दानास मुकवू शकतात. यहोवा देव व त्याचा पुत्र यांच्या अधिकारपदास ओळखून असावे हे जे प्रेषिताने जोरदारपणे सांगितले त्याचा इतरांबरोबरील आमच्या व्यवहारावर चांगला प्रभाव पाडला जाऊ शकतो. शिवाय देव आणि ख्रिस्त यांच्यावरील आमच्या विश्वासास टिकवून ठेवल्यास समृद्ध आशीर्वाद मिळण्याची शाश्वती आम्हास दिलेली आहे.
[३२ पानांवरील चित्रं]
लावदिकीयाचे पत्रः “हे पत्र तुमच्यात वाचून दाखविल्यानंतर,” पौलाने कलस्सैकरांना लिहिले, “लावदिकीयातील मंडळ्यातही वाचण्यात यावे, व लावदिकीयास गेलेले पत्र आणवून तुम्हीही वाचावे, अशी व्यवस्था करा.” (कलस्सैकर ४:१६) आशिया मानयरच्या पश्चिम भागाकडे लावदिकीया नावाचे समृद्ध शहर होते. ते महामार्गांनी फिलदेल्फिया तसेच इफिस शहरांशी जोडलेले होते. कदाचित पौल इफिसमध्ये कार्य करीत असताना लावदिकीया येथे पोहंचला असेल, तरी तो तेथे सेवा करू शकला नसेल. त्याने लावदिकीयातील ख्रिश्चनांना एक पत्र पाठविले. काही टिकाकारांच्या मते ते इफिसकरांस पाठविलेल्या पत्राची नक्कल असावी. लावदिकियांस लिहिलेले पत्र पवित्र शास्त्रात नाही. कदाचित आजच्याकरिता त्यात काही नसेल; किंवा इतर शास्त्रीय पत्रात जे मुद्दे सांगितले आहेत तेच यात परत दिलेले असावेत.
[चित्रं]
लावदिकीयातील अवशेष