वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 ११/१ पृ. १८-२२
  • देवाचे वचन सत्य आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाचे वचन सत्य आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • वागणूकीद्वारे साक्ष
  • पवित्र शास्त्रातील क्षेष्ठ ज्ञान
  • पवित्र शास्त्रातील सल्ला—अप्रतिम सूज्ञतेचा
  • आमच्या दीर्घकालीन कल्याणासाठी
  • जीवनातील कठीण समस्या
  • ‘जगाच्या बुद्धीमुळे’ फसू नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • खरी बुद्धी मोठ्याने हाक मारत आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • “बुद्धिमानांचे शब्द लक्ष देऊन ऐक”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • समाधानी जीवनाकरता काही उपयुक्‍त सूचना
    समाधानी जीवन कसे मिळवता येईल?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 ११/१ पृ. १८-२२

देवाचे वचन सत्य आहे

“तू सत्यात त्यांस पवित्र कर; तुझे वचन हेच सत्य आहे.”—योहान १७:१७.

१. स्तोत्रकर्त्याने पवित्र शास्त्राविषयी कोणता दृष्टीकोण धरला होता, पण आज पुष्कळ जण त्याच्याकडे कसे पाहतात?

“तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे.” (स्तोत्रसंहिता ११९:१०५) असे इब्री स्तोत्रकर्त्यांने म्हटले. देववनचनाविषयीचा असा हा आदर आज केवळ थोड्या लोकांपाशीच आहे. आजच्या या विसाव्या शतकात देवाचे वचन आपल्याला पवित्र शास्त्र लिखाणात उपलब्ध आहे. त्याचा अनुवाद आज अधिकाधिक भाषेत झालेला असून त्याचे वितरणही इतिहासात इतर कोणत्याही पुस्तकाचे झाले नसेल इतके झाले आहे व होत आहे. एवढे असताही पुष्कळजण त्याला आपल्या मार्गावरील प्रकाश या नात्याने स्वीकारीत नाही. स्वतः ख्रिस्ती असल्याचा दावा करणारे बहुतेक जण सुद्धा, पवित्र शास्त्राला त्यांचा मार्ग उजळवू देण्यापेक्षा अधिकांशाने स्वतःच्या कल्पानांना अनुसरणे त्यांना बरे वाटते.—२ तीमथ्य ३:५.

२, ३. यहोवाचे साक्षीदार पवित्र शास्त्राकडे कोणत्या दृष्टीने बघतात, आणि यामुळे त्यांना कोणते लाभ मिळाले आहेत?

२ पण आम्ही, यहोवाचे साक्षीदार हा मार्ग चोखाळत नाही. आम्ही पूर्णपणे स्तोत्रकर्त्याशी सहमत आहोत. आमच्यासाठी पवित्रशास्त्र हे देवाने दिलेले मार्गदर्शक असल्याचे मानतो. आम्हाला ठाऊक आहे की, “प्रत्येक ईश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक व नीतीशिक्षण याकरिता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६) आज पुष्कळ जण नैतिकता व वागणूक या विषयीच्या बऱ्‍याच संशोधनाच्या खटपटीत आहेत, पण आम्ही ते करू इच्छित नाही. याविषयी बरोबर काय आहे ते आम्हाला ठाऊक आहे कारण ते प्रत्यक्षात पवित्र शास्त्र आम्हाला सांगते.

३ यामुळे आम्हाला खूप लाभ मिळाले आहेत. आम्हाला यहोवाची ओळख घडली असून त्याचा ही पृथ्वी व मानवजात याविषयीच्या भव्य उद्देशांची माहितीही आम्हाला समजली आहे, यामुळे आम्हाला तसेच आमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी एक तेजोमय भवितव्य समोर उभे आहे हे आम्हाला आत्मविश्‍वासाने वाटते. आम्ही त्या स्तोत्रकर्त्यासोबत पूर्णपणे सहमत आहोत, ज्याने असे म्हटले होते की, “अहाहा, तुझे शास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर त्याकडे माझे लक्ष लागलेले असते. तुझ्या आज्ञा आपल्या वैऱ्‍यांच्या पेक्षा मला शहाणे करतात, कारण त्या सदोदित माझ्याजवळच आहेत.”—स्तोत्रसंहिता ११९:९७, ९८.

वागणूकीद्वारे साक्ष

४. पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे असे ओळखल्यामुळे आपल्यावर कोणते कर्तव्य येते?

४ या कारणास्तव, येशूने आपल्या स्वर्गीय पित्याला उद्देशून केलेल्या प्रार्थनेत, “तुझे वचन सत्य आहे,” असे जे म्हटले आहेत त्याच्याशी सहमत असण्याचे प्रत्येक कारण आहे. (योहान १७:१७) पण अशा या कबूलीमुळे आम्हावर काही कर्तव्य येते. देवाचे वचन सत्य आहे ही माहिती आम्ही इतरांना कळविली पाहिजे. ते त्यांनी समजून घेतल्यामुळे त्यांनाही, आम्ही अनुभवीत असलेल्या आशीर्वादांचा अनुभव घेता येईल. तर मग, त्यांची मदत आम्हाला कशी करता येईल? एक गोष्ट म्हणजे यासाठी आपल्याला आपल्या दररोजच्या जीवनात पवित्र शास्त्र तत्त्वांचा अवलंब हर तऱ्‍हेने केला पाहिजे. त्यामुळे नम्रजनांना पवित्र शास्त्राचा मार्ग केवढा उत्तम आहे ते दिसू शकेल.

५. आमच्या वागणूकीद्वारे उत्तम साक्ष दिली जावी याविषयी पेत्राने कोणता सल्ला दिला?

५ अगदी हेच प्रेषित पेत्राने आपल्याला उपदेशात सारांशरित्या सांगितले. त्याने ख्रिस्ती स्त्रियांना, त्यांच्या विश्‍वासात नसणाऱ्‍या पतींच्या अनुषंगाने सल्ला देताना म्हटले होते: “स्त्रियांनो, तुम्ही . . . आपल्या पतीच्या अधीन असा; यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले तरी तुमचे भिडस्तपणाचे पवित्र वर्तन पाहून बोलण्यावाचून . . . वर्तनाने त्यांना मिळवून घेण्यात यावे.” (१ पेत्र ३:१, २) याचप्रमाणे त्याने सर्व ख्रिश्‍चनांना—पुरुष, स्त्रिया व मुले—पुढील सल्ला देताना, वर सांगण्यात आलेले तत्त्वच त्याच्या ध्यानी असावे. तो म्हणाला: “विदेशी लोकात आपले आचरण चांगले ठेवा. यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हाविरुद्ध दुर्भाषण करतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे.”—१ पेत्र २:१२; ३:१६.

पवित्र शास्त्रातील क्षेष्ठ ज्ञान

६. आम्ही इतरांमध्ये पवित्र शास्त्राविषयी रसिकता वाढवू शकतो हे पाहण्यात पेत्र आम्हाला कोणती मदत देतो?

६ याचप्रमाणे पेत्राने आणखी एक सल्ला दिला. त्याचा अवलंब केल्यास ख्रिस्ती जन इतरांना पवित्र शास्त्राविषयी रसिकता वाढविण्याची मदत देऊ शकतात. पेत्र म्हणाला: “ख्रिस्त प्रभु याला आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुम्हामध्ये जी आशा आहे तिची विचारपूस करणाऱ्‍या प्रत्येक इसमाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भिडेने द्या.” (१ पेत्र ३:१५) ख्रिस्ती उपाध्यायांना पवित्र शास्त्राविषयी समर्थन करता आले पाहिजे व ते देवाचे वचन आहे असे स्पष्टीकरण देता आले पाहिजे. हे त्यांना कसे करता येईल?

७. पवित्र शास्त्राविषयीची कोणती वस्तुस्थिती ते देवाचे वचन असल्याची ग्वाही देते?

७ नीतीसूत्राच्या पुस्तकात याचे सबळ कारण आम्हाला मिळते. तेथे आम्ही वाचतो: “माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील, आपला कान ज्ञानाकडे देशील, . . . तर यहोवाच्या भयाची तुला जाणीव होईल; आणि देवविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. कारण ज्ञान यहोवा देतो, त्याच्या मुखातून ज्ञान व सूज्ञता येतात.” (नीतीसूत्रे २:१-६) पवित्र शास्त्रातील पृष्ठांत देवाचे स्वतःचे ज्ञान आपल्याला दिसते. एखाद्या प्रांजळ व्यक्‍तीला जेव्हा हे सखोल ज्ञान उमगते तेव्हा पवित्र शास्त्र हे मानवी ज्ञानापेक्षा कितीतरी अधिक पटीने श्रेष्ठ आहे हे त्याला खात्रीने वाटू लागते.

८, ९. संपत्तीच्या प्राप्तीविषयी समतोल दृष्टीकोण राखला पाहिजे ही पवित्र शास्त्रातील सूचना वाजवी व बरोबर असल्याचे कसे दिसते?

८ त्याची काही उदारणे लक्षात घ्या. आज जीवनात यश संपादन हे प्रामुख्यत्वे आर्थिकदृष्ट्या तोलण्यात येते. माणूस जितके अधिक संपादन करतो तितका तो अधिक यशस्वी असे मानले जाते. तथापि, पवित्र शास्त्र भौतिक गोष्टींवर अधिक जोर देण्याविरुद्ध इशारा देते. प्रेषित पौलाने लिहिले: “जे धनवान होऊ पाहतात, ते परीक्षेत, पाशात आणि माणसांच्या नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्‍या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ हा सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्‍वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.”—१ तीमथ्य ६:९, १०; तसेच मत्तय ६:२४ पडताळा.

९ हा इशारा किती योग्य आहे ते अनुभवाने सिद्ध झाले आहे. एका मनोविकारतज्ज्ञांचे असे परीक्षण आहे: “सर्वश्रेष्ठ तसेच श्रीमंत बनणे हे तुम्हाला आंतरिक समाधान, तृप्तता तसेच खरेपणाने आदरणीय किंवा इतरांची प्रीती मिळवून देत नाही.” होय, जे आपले सर्व परिश्रम धनाच्या प्राप्तीसाठी खर्च करीत राहतात अशांना शेवटी कटु व त्रस्त झाल्याचे वाटू लागते. पवित्र शास्त्रवचने पैशांचे मूल्य जाणत असले तर ते अधिक महत्त्वपूर्ण गोष्टीकडे निर्देश करते. ते म्हणते: “ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाही आश्रय देणारा आहे; तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की, ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करते.”—उपदेशक ७:१२.

१०. आम्ही आपल्या सहवासाविषयी दक्षता राखावी या पवित्र शास्त्राच्या सल्ल्याकडे आपण का लक्ष दिले पाहिजे?

१० अशाप्रकारे पवित्र शास्त्रात विविध बोध आहेत. आणखी एक असा आहे: “सूज्ञांचे सोबत धर म्हणजे सूज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीतीसूत्रे १३:२०) हे देखील अनुभवाने खरे असल्याचे सिद्ध झाले. समवयीन सोबत्यांच्या दबावाने कितीतरी युवकांना मद्यप्राशन, मादक द्रव्ये व अनैतिकता यांच्या आहारी नेले. जे घाणेरडी भाषा बोलणाऱ्‍या लोकांच्या संगतीत राहतात ते देखील तशीच भाषा आपल्या तोंडावाटे बोलू लागतात. आपल्या प्रापंचिक नोकरीत बरेच जण चोऱ्‍या करतात, कारण ते म्हणतात: ‘प्रत्येकजण तेच करतो.’ खरेच, पवित्र शास्त्र म्हणते ते अगदी खरे आहे: “कुसंगतिने नीती बिघडते.”—१ करिंथकर १५:३३.

११. सुवर्ण नियमाचे पालन करण्यामागील सूज्ञता मनोवैज्ञानिकांच्या अभ्यासाने कशी दाखवली?

११ पवित्र शास्त्रात आढळणाऱ्‍या एका अप्रतिम सल्ला म्हणजे सुवर्णनियम. तो असा आहे: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२) मानवजातीने हा नियम पाळला असता तर आज जग खरेच चांगले स्थळ बनले असते. तरीपण, सर्वसाधारण मानवजात या नियमाचे पालन करीत नसले तरीही तुम्हाला ते व्यक्‍तीशः करता येईल. ते का बरे? कारण इतरांची काळजी करावी व त्यांच्याविषयी चिंता बाळगावी अशी आपली घडण आहे. (प्रे. कृत्ये २०:३५) इतरांना मदत केल्यावर त्यांची प्रतिक्रिया कशी असते ते पहावे यासाठी आमेरिकेत एक चाचणी केली गेली. तेव्हा त्या मनोवैज्ञानिकांच्या अभ्यासाने हे दाखविले: “जसे आपण स्वतःची काळजी घेतो तशीच इतरांची घेणे हा मानवी स्वभाव आहे.”—मत्तय २२:३९.

पवित्र शास्त्रातील सल्ला—अप्रतिम सूज्ञतेचा

१२. अशी एक कोणती गोष्ट आहे जी पवित्र शास्त्राला अप्रतिम बनवते?

१२ आज पवित्र शास्त्राबाहेर इतर उगमाकडून सल्ला मिळू शकतो. वर्तमानपत्रात विविध स्वरुपाचे सल्ले दिले जातात आणि बाजारात सल्लाविषयक बरीच पुस्तके उपलब्ध आहेत. याखेरीज, मनोविकारतज्ञ, व्यावसायिक सल्लागार व इतर आहेत, जे विविध क्षेत्रातील सल्ला देऊ शकतात. पण पवित्र शास्त्र येथेही तीन प्रकारात अप्रतिम दिसून येते. पहिली गोष्टी ही की, त्यातील सूचना नेहमीच लाभदायक ठरते. ती नुसती तत्त्वप्रणाली नाही व शिवाय त्यातील सूचना कोणासही हानीकारक नाही. जो पवित्र शास्त्रातील सल्ला पाळतो तो स्तोत्रकर्त्याने देवाला केलेल्या या प्रार्थनेशी नक्कीच सहमत होईल: “तुझे निर्बंध अगदी विश्‍वासपात्र आहेत.”—स्तोत्रसंहिता ९३:५, न्यू. व.

१३. मानवी उगमाकडील ज्ञानापेक्षा पवित्र शास्त्र हे अतिश्रेष्ठ प्रकारातील आहे हे कशावरून दिसते?

१३ दुसरी गोष्टी ही की, पवित्र शास्त्र काळाच्या परिक्षेत टिकून राहिले आहे. (१ पेत्र १:२५; यशया ४०:८) मानवी उगमाकडील सल्ला सतत बदलत असतो, आणि जो या वर्षी प्रचलित आहे त्याविषयी पुढल्या वर्षी टिका करण्यात येते. पवित्र शास्त्राचे लिखाण जरी २,००० वर्षांपूर्वी संपले तरी त्यात सर्वांत सूज्ञ असा सल्ला आजही उपलब्ध आहे; आणि त्यामधील वचनाचा सार्वत्रिक अवलंब होऊ शकतो. आम्ही आफ्रिका, आशिया, दक्षिण वा उत्तर अमेरिका, युरोप किंवा समुद्रातील बेटे यात राहणारे असलो तरी पवित्र शास्त्राची वचने आम्हा सर्वांना सारखीच लागू होतात.

१४. देवाच्या वचनातील सूचना उच्च प्रतीच्या कशा आहेत?

१४ शेवटी, पवित्र शास्त्रातील सल्ल्यांचा जो दीर्घ पल्ला आहे तो अतुलनीय आहे. पवित्र शास्त्रातील एक नीतीसूत्र म्हणते: “ज्ञान यहोवा स्वतः देतो.” यास्तव, आम्हाला कोणाही प्रकारातील निर्णय घ्यायचा असेल वा कोणतीही समस्या उभी राहिली असेल तरी पवित्र शास्त्रात असे सूज्ञान आहे जे त्या प्रत्येक प्रकरणात आमची मदत करते. (नीतीसूत्रे २:६) मुले, नवयुवक, पालक, वडीलधारी मंडळी, कर्मचारी, मालक, अधिकारपदावरील लोक या सर्वांना हे दिसेल की, पवित्र शास्त्रातील सूज्ञान त्यांना लागू होणारे आहे. (नीतीसूत्रे ४:११) येशू व त्याच्या प्रेषितांच्या काळी ज्ञात नसणाऱ्‍या परिस्थितीशी आम्हाला सामना द्यावा लागत असला तरी पवित्र शास्त्राने सादर केलेला सल्ला लागू होतो. उदाहरणार्थ मागे पहिल्या शतकात तंबाखूचे धूम्रपान हे मध्येपूर्वेत अपरिचित होते. आज ते जगव्याप्त आहे. तथापि, जो, ‘कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाण्याचे टाळावे’ व ‘देहाच्या व आत्म्याच्या अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध राखावे’ या पवित्र शास्त्राच्या सूचना लक्षात घेईल तो ही सवय टाळील; कारण ती व्यसनाधीन करणारी व आरोग्यास हानिकारक आहे.—१ करिंथकर ६:१२; २ करिंथकर ७:१.

आमच्या दीर्घकालीन कल्याणासाठी

१५. पुष्कळ जण पवित्र शास्त्र कालबाह्‍य झाले आहे असे का समजतात?

१५ पुष्कळ आज असे म्हणतात की, पवित्र शास्त्र हे कालबाह्‍य झाले आहे व ते आजच्या २० व्या शतकामध्ये अप्रासंगिक आहे. तथापि, असे म्हणण्यामागील कारण हे असावे की, त्यांना जे ऐकण्याची इच्छा असते ते पवित्र शास्त्र सांगत नाही. शास्त्रवचनीय सल्ला अनुसरल्याने आमचा दीर्घकालीन फायदा होतो हे खरे आहे पण यासाठी सहनशीलता, शिस्त आणि स्व-त्याग अशा गुणांची गरज आहे आणि खरे पाहता हे गुण जगात इतके प्रसिद्ध नाहीत; त्याला तर सर्व गोष्टींची पूर्ति त्वरित हवी असते.—नीतीसूत्रे १:१-३.

१६, १७. लैंगिक नैतिकतेविषयीचे कोणते श्रेष्ठ दर्जे पवित्र शास्त्र घालून देते, आणि याचे आधुनिक जगाकरवी कसे दुर्लक्ष होत आहे?

१६ उदाहरणादाखल, लैंगिक सदाचार घ्या. शास्त्रनचनीय दर्जे अगदी कडक आहेत. लैंगिक समागमाचे स्थान केवळ विवाहात आहे आणि विवाहाबाहेर अशा सर्व जवळीकी साधण्याची मनाई आहे. आम्ही वाचतो: “जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे, . . . ह्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (१ करिंथकर ६:९, १०) याशिवाय ख्रिश्‍चनांच्या बाबतीत पवित्र शास्त्र हे अपेक्षिते की त्यांनी एकपत्नीव्रत असावे, म्हणजे एका स्त्रीला एकच पती असावा. (१ तीमथ्यी ३:२) कधी कधी अशी फारच तुरळक प्रकरणे निघतील जेथे घटस्फोट किंवा फारकत याला मुभा दिली जाईल, तरी पवित्रशास्त्र म्हणते की, विवाहबंधन हे जीवनभरचे असते. येशूने स्वतः म्हटले होते: “उत्पन्‍नकर्त्याने सुरवातीलाच नरनारी अशी ती निर्माण केली व म्हटले: ‘पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील व ती दोघे एकदेह होतील.’ . . . ह्‍यामुळे ती पुढे दोन नव्हत, तर एकदेह अशी आहे. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”—मत्तय १९:४-६, ९; १ करिंथकर ७:१२-१६.

१७ आज या दर्जांचे सर्वत्र बहुतेक दुर्लक्ष होत आहे. लैंगिक आचार स्वैरवृत्तीने आचरले जातात. प्रणयाराधनेच्या काळातील युवकांनी केलेला शरीरसंबंध साधारण समजला जातो. याचप्रमाणे विवाह न करता वैवाहिक स्वरूपाचे जीवन कंठणे हे स्वीकृत होत आहे. विवाहीत जोडप्यात निषिद्ध लैंगिक आचार हा असाधारण नाही. तसेच घटस्फोट हा आधुनिक जगात जणू व्याधिसारखा पछाडला आहे. अशाप्रकारे या अनिर्बंधित दर्जांनी सौख्यानंद आणला नाही. जे वाईट परिणाम दिसून आले त्यावरून हे सिद्ध झाले की, पवित्र शास्त्र कडक नैतिक दर्जे जोपासावे असे जे म्हणत होते ते अगदी योग्य आहे.

१८, १९. नैतिकतेविषयी यहोवाने ठरविलेल्या दर्जांकडे सारासारपणे दुर्लक्ष केल्यामुळे काय परिणाम उद्‌भवले आहेत?

१८ लेडिस्‌ होम जर्नन म्हणते: “एकोणिसशे साठी व सत्तरीच्या काळात लैंगित गोष्टींवर जो भर देण्यात आला होता त्याने मानवास सौख्यानंद न देता गंभीर मानवी दैन्यावस्था आणली.” ही “गंभीर मानवी दैन्यावस्था” यात पालकांनी घटस्फोट घेतल्यामुळे मुलांना ज्या कठीण काळास तोंड द्यावे लागले तसेच प्रौढांना जी खोल भावनिक इजा झाली त्यांचे वर्णन देतो. त्यामध्ये एक पालकीय कुटुंबांची वाढ तसेच तरुण अशा सड्या कुमारी मातांचाही समावेश आहे ज्या अद्याप आपल्या बाल्यावस्थेतून बाहेर पडल्या नव्हत्या. याखेरीज, त्यात लैंगिकदृष्ट्या संक्रमित होणारे आजार म्हणजे जननेंद्रियांना येणाऱ्‍या पुटकळ्या, परमा रोग, गर्मी रोग, तसेच एडस्‌ याही गोष्टी त्यात समाविष्ठ आहेत.

१९ या दृष्टीकोणातून समाजशास्त्राच्या एका प्राध्यापकांनी म्हटले: “आमच्या नागरिकांची तसेच त्यांना हव्या असणाऱ्‍या स्वातंत्र्याच्या हक्कास प्रतिसादात्मक ठरणारी गरज म्हणजे विवाहपूर्व लैंगिक संबंध वर्ज्य करणे या धोरणास उंचावून धरणे हे फायद्याचे होणार की नाही हे समजण्याइतके आपण प्रौढ झालो आहोत असे मला वाटते. रोगमुक्‍तता, अनैच्छिक गर्भधारणेपासून मोकळीक हे ते आम्हाला हवे असणारे स्वातंत्र्य आहे.” पवित्र शास्त्र अगदी उचितपणे म्हणते: “जो पुरुष यहोवाला आपला भावविषय करितो, आणि गर्विष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वाऱ्‍यास उभा राहात नाही तो धन्य.” (स्तोत्रसंहिता ४०:४) ज्यांचा पवित्र शास्त्राच्या ज्ञानावर भाव आहे ते पवित्र शास्त्राचा अवमान करणाऱ्‍यांच्या लबाड्या तसेच स्वैर नैतिक नियम आनंद मिळवून देतो असे म्हणणाऱ्‍या लोकांच्या फसवणूकीला बळी पडणार नाहीत. पवित्र शास्त्राचे सूज्ञ दर्जे जरी कडक असले तरी ते भल्यासाठीच आहेत.

जीवनातील कठीण समस्या

२०. ज्यांना आपल्या जीवनात गरीबीत राहावे लागत आहे अशांना कोणती पवित्र शास्त्रीय तत्त्वे लाभदायक असल्याचे दिसून आले आहेत?

२० जीवनात आम्हाला ज्या कठीण समस्या सामोऱ्‍या येतात त्याची हाताळणी सूज्ञपणे करण्यासाठी पवित्र शास्त्र आम्हाला साहाय्य देते. उदाहरणार्थ, कित्येक देशात ख्रिस्तीजन अगदी गरीब स्थितीत राहात आहेत. असे असले तरीही ते गरीबीशी सामना देऊन आनंद मिळवीत आहेत. ते कसे? देवाच्या प्रेरित वचनातील सल्ल्याचे अबलंबन करून. स्तोत्रसंहिता ५५:२२ मध्ये लिखित असणारे सांत्वनदायक शब्द ते मोठ्या गंभीरपणे घेतात: “तू आपला भार यहोवावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल.” धीर धरून राहावे यासाठी ते देवावर विसंबून राहतात. मग, ते पवित्र शास्त्रीय तत्त्वांचा अनवंब करून धुम्रपान तसेच मद्यपान यासारख्या घातक व वायफळ सवया टाळतात. ते, पवित्र शास्त्र शिफाररस करते त्याप्रमाणे उद्योगी आहेत; यामुळे आपल्या कुटुंबाचा चरितार्थ साधता येतो हे त्यांना दिसून आले आहे. पण तेच, आळशी वा काम करण्यास नाकारणारे खूप कष्टात राहतात. (नीतीसूत्रे ६:६-११; १०:२६) याशिवाय ते पवित्र शास्त्रातील हा सल्ला मानतात की, “दुष्कर्म्यांवर जळफळू नको.” (स्तोत्रसंहिता ३७:१) यामुळेच ते जुगार खेळणे व माद्रक द्रव्यांची ने-आण व विक्री करणे यासारख्या गुन्हेगारी कृत्यात सहभागी होत नाहीत. या गोष्टी त्यांच्या समस्यांवर त्वरित “उपाय” कदाचित सादर करतील, पण याचे दीर्घकालीन परिणाम मात्र कडू असतात.

२१, २२. (अ) एका ख्रिस्ती स्त्रीने पवित्र शास्त्रामधून कशी मदत व सांत्वन मिळविले? (ब) पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे हे आणखी कोणत्या एका गोष्टीमुळे आम्हाला समजून येते?

२१ जे खरेच गरीब आहेत अशांनी पवित्र शास्त्राचे अनुकरण केल्यामुळे खरोखरी लाभ घडतो का? होय, हे बऱ्‍याच अनुभवाद्वारे सिद्ध झाले आहे. आशियात राहणारी एक विधवा लिहिते: “मी दारिद्र्‌य रेषेजवळचे जीवन व्यतित करीत आहे, पण मी जळफळत नाही किंवा निष्ठुर बनले नाही. पवित्र शास्त्रातील सत्याने मजमध्ये सरळ दृष्टीकोण उत्पन्‍न केला आहे.” येशू ख्रिस्ताने दिलेले लक्षवेधी अभिवचन तिच्या बाबतीत पूर्ण होत आहे असे ती म्हणते. येशूने म्हटले होते: “तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळविण्याची खटपट करा, म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील.” (मत्तय ६:३३) ती साक्ष देते की, आपल्या जीवनात प्रथम देवाची सेवा ठेवल्यामुळे तिला नेहमीच या किंवा त्या उगमाकडून जीवनाविषयक भौतिक गरजा प्राप्त होतात. तिची ख्रिस्ती सेवा तिला सन्मान देते व तिच्या जीवनात असे ध्येय देते जी तिला आपल्या गरीबीत सहनशील राहण्यास मदत करते.

२२ होय, पवित्र शास्त्रातील खोल ज्ञान, ते खरेच देवाचे वचन असल्याचे दाखवते. मानवनिर्मित असणारे कोणतेही पुस्तक जीवनाच्या विविध प्रकाराविषयी तितक्या सखोलपणे व बरोबर रितीने मार्गदर्शन देऊ शकत नाही. पण पवित्र शास्त्राविषयी आणखी एक गोष्ट आहे जी त्याचा उगम ईश्‍वरी असल्याचे दर्शविते. त्याजमध्ये लोकांना चांगले बनवण्याचे सामर्थ्य आहे. याच गोष्टीविषयीची चर्चा आपण पुढील लेखात करू या.

तुम्हाला विवेचीत करता येईल का?

◻ यहोवाच्या साक्षीदारांनी पवित्र शास्त्राला देवाचे वचन या अर्थी स्वीकारल्यामुळे त्यांना कोणकोणत्या पद्धतीने आशीर्वाद मिळाला आहे?

◻ देवाच्या वचनावर विश्‍वास ठेवत असल्यामुळे आम्हावर कोणते कर्तव्य आहे, आणि आमची वागणूक हे कर्तव्य बजावण्यास आम्हाला कशी मदत देते?

◻ पवित्र शास्त्राचा सूज्ञ सल्ला हा कशामुळे मानवी मसलतीपेक्षा श्रेष्ठ ठरतो?

◻ पवित्र शास्त्राच्या ज्ञानाची खोली दाखविणारी काही उदाहरणे कोणती आहेत?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा