वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ६/१ पृ. ४-७
  • लोभविरहीत जगाची कल्पना करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लोभविरहीत जगाची कल्पना करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • शिक्षणाद्वारे लोभाचे निर्मूलन
  • पवित्र शास्त्रीय सत्ये कार्यान्वित होतात
  • लोभविरहीत नवे जग
  • “लोभाचे युग”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • लोभाचा पाश टाळण्यामध्ये यशस्वी व्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • आपण सैतानाच्या पाशांतून सुटू शकतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • यहोवाचा आवाज नेहमी ऐकत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ६/१ पृ. ४-७

लोभविरहीत जगाची कल्पना करा

लोक स्पर्धा करण्याऐवजी एकमेकांना सहकार्य करीत आहेत अशा जगाची तुम्ही कल्पना करू शकता का? लोक इतरांना कोठे आपल्याप्रमाणेच वागवतील आणि इतरांकडूनही तीच अपेक्षा धरतील? हेच तर लोभविरहीत जगाचे गुणलक्षण आहे. ते खरेच कसे जग असेल! ते खरेच येईल का? होय, ते येईल. पण हा हावरटपणा, जो लोकात इतका खोलवर भिनला आहे, त्याचे निर्मूलन कसे करता येईल?

याचे उत्तर मिळविण्यासाठी या लोभाचे मूळ आम्ही समजावून घेतले पाहिजे. पवित्र शास्त्र दाखविते की, मानवी वंशाचा हा नेहमीचा गुण नव्हता. संदेष्टा मोशे आम्हाला आठवण करून देतो की, लोभासारखा अवगुण प्रारंभी प्रथम मानवात नव्हता, तो लोभरहित निर्मात्याची परिपूर्ण निर्मिती होता. मोशे म्हणतोः “तो दुर्ग आहे, त्याची कृती परिपूर्ण आहे, त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत.” मग, हा लोभ कोठून उदयास आला? पहिल्या मानवी जोडप्याने याची स्वतःमध्ये वाढ होण्यास मुभा दिली. देवाने मनाई केलेल्या फळाचा स्वाद घेण्याद्वारे जे काही मिळणार त्या आशेने स्वतःठायी लोभ जडविला, आणि आपली सुंदर पत्नी गमावू नये म्हणून आदामाने तिच्याविषयी लोभ जडविला. मोशेने जे पुढे म्हटले त्यामध्ये आदाम व हव्वेच्या विषयीचेही तथ्य होतेः “ते बिघडले आहेत; हे त्याचे पुत्र नव्हेत, हा त्यांचा दोष आहे.”—अनुवाद ३२:४, ५; १ तीमथ्य २:१४.

नोहाच्या काळातील जगव्याप्त जलप्रलयापर्यंत हा लोभ व लालसा इतकी विकोपाला गेली होती की, “पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार झाली आहे व त्यांच्या मनातील येणाऱ्‍या विचारांच्या सर्व कल्पना एकसारख्या वाईट आहेत” असे दिसून आले.—उत्पत्ती ६:५.

लोभाची ही प्रबळ प्रवृत्ती मानवात आजतागायत चालूच आहे व ती या कृतघ्न व लोभी समाजात कळसाला पोहंचत आहे.

शिक्षणाद्वारे लोभाचे निर्मूलन

लोभाची मानवात जशी वाढ होत गेली तशी ती कमीही होण्याची शक्यता आहे. या लोभावर विजय मिळवता येईल. परंतु हे घडण्यासाठी योग्य शिक्षण व तालीम, ज्यामध्ये योग्य मार्गदर्शनार्थ व अनुसरण्यासाठी वागणूकीचे नियम आहेत त्यांची जरुरी आहे. हे तुम्हाला आकर्षक वाटेल, पण अशा प्रकारचे शिक्षण कोण देऊ शकेल व त्याबरोबरच जे शिकलो त्याचे अवलंबन होत आहे व जरुर पडल्यास ते करायला लावले जात आहे हे कोण बघणार?

अशा शिक्षणाचा मूळारंभ हा अर्थातच अशा उगमापासून व्हावयाला हवा जो स्वतःच लोभरहित आहे. अशा या शिक्षणापासून परतफेडीची अपेक्षा वा अंतःस्थ हेतू नसावा. याखेरीज, शिक्षणाच्या व्यावहारिकतेची उपयुक्‍तता याचे मोल देखील शिकविण्यात यावे. जो शिकणारा आहे त्याची, असे हे जीवन शक्य आहे इतकीच नव्हे तर हा स्वीकृत मार्ग असून त्यामुळे स्वतःला व इतरांनाही लाभ घडेल अशी खात्री झाली पाहिजे.

केवळ स्वर्गीय देवच अशाप्रकारचे शिक्षण देऊ शकतो. कारण इतकी पात्रता व पार्श्‍वभूमि कोणत्या मानवाला किंवा पृथ्वीवरील संस्थेला आहे? “सर्वांनी पाप केले आहे व ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत,” या पवित्र शास्त्रीय सत्याच्या आधारावर सर्वच माणसे अपात्र ठरत आहेत.—रोमकर ३:२३.

ही आनंदाची गोष्ट आहे की, स्वर्गीचा देव यहोवा हा त्याचे पाठ्यपुस्तक व नियमावली असणाऱ्‍या पवित्र शास्त्रामधून अशा प्रकारचे शिक्षण देत आहे. त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त या पृथ्वीवर असताना त्याने देखील याच शिक्षणाचा पुरस्कार केला होता. येशूच्या प्रसिद्ध डोंगरावरील प्रवचनाच्या मध्याला त्याने अशा जीवनी मार्गाचे भाष्य केले जो त्याच्या बहुतेक श्रोत्यांना मोठा अचंब्याचा वाटला, पण त्यात निस्वार्थपणा व तोही एखाद्याच्या शत्रू वा विरोधकांविषयी, समाविष्ट होता. येशूने म्हटलेः “तुम्ही आपल्या वैऱ्‍यावर प्रीती करा व जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे. कारण तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवितो आणि नीतीमानांवर व अनीतीमानांवर पाऊस पाडितो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ ते काय? जकातदारही तसेच करतात ना?”—मत्तय ५:४४-४६.

येशूच्या पृथ्वीवरील कार्यातील एक भाग होता की, निःस्वार्थी शिक्षकांना तयार करणे की मग ते देखील या लोभविरहीत जीवनी मार्गाचे इतरांना शिक्षण देऊ शकतील. येशूच्या मृत्यु व पुनरुत्थानानंतर काही काळाने प्रेषित पौल हा अशाच शिक्षकांपैकी एक बनला. त्याच्या पुष्कळशा प्रेरित पत्रातून त्याने लोभ दूर करण्यास सांगितले आहे. उदाहरणार्थ, इफिसकरांना त्याने असे लिहिलेः “पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्‍यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये.”—इफिसकर ५:३.

त्याचप्रमाणे आजसुद्धा यहोवाचे साक्षीदार या लोभी प्रवृत्तीला दडपून टाकण्याचे शिक्षण लोकांना देत आहेत. मग, काही काळातच हेही पुढे जाण्यास व इतरांना या भक्‍तीमान मार्गाविषयी शिक्षण देण्यास पात्र ठरतील.

पवित्र शास्त्रीय सत्ये कार्यान्वित होतात

पण, तुम्ही विचारालः ‘ज्यात हा लोभ पूर्णपणे जडलेला आहे तो अपूर्ण मानव याला आपल्या व्यक्‍तीमत्वातून उपटून काढू शकेल का?’ होय, तो हे करू शकेल. अर्थातच, पूर्ण रुपात नव्हे, पण एका लक्षणीय मर्यादेपर्यंत नक्कीच. त्याचे उदाहरण आपण लक्षात घेऊ या.

स्पेनमध्ये एक सराईत चोर राहात होता. चोरीच्या वस्तुंनी त्याचे घर गच्च भरले होते. मग, त्याने यहोवाच्या साक्षीदारांबरोबर पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु केला. याचा परिणाम हा झाला की, त्याचा विवेक त्याला बोचू लागला. त्याने त्या चोरलेल्या वस्तु त्यांच्या मालकांना परत देण्याचे ठरविले. तो आपल्या पूर्वीच्या मालकाकडे गेला व त्याच्याकडून नवीन धुलाई यंत्र चोरल्याचे त्याने कबूल केले. त्या मालकावर त्याच्या बदललेल्या वर्तनाचा इतका प्रभाव पडला की, पोलिसांना कळविण्याऐवजी त्याने त्याला त्या धुलाई यंत्राची किंमत भरावयास सांगितले.

पुढे या सुधारलेल्या चोराने जे जे आठवत होते त्या सगळ्यांना भेटून त्यांच्या वस्तु परत करण्याचा निश्‍चय केला. त्याने भेट दिलेल्या प्रत्येकाला पवित्र शास्त्रीय तत्त्वांना लागू केल्यामुळे त्याजमध्ये झालेल्या बदलाविषयी आश्‍चर्य वाटले.

आता एक अवघड समस्या त्याच्यापुढे आली. त्याच्यापाशी अद्याप राहिलेल्या बऱ्‍याच वस्तुंचे मालक त्याला आठवले नाही, त्यामुळे त्याने यहोवाची प्रार्थना केली व पोलिस ठाण्यावर जाऊन तेथे त्याने मोटारीतून चोरलेले सहा स्टिरिओ रेडिओ परत केले. पोलिसांना तर खूपच आश्‍चर्य वाटले, कारण या माणसाचे रेकॉर्ड स्वच्छ होते. तेव्हा त्यांनी त्याला दंड व थोड्या काळाचा तुरुंगवास देण्याचे ठरवले.

या पूर्वीच्या चोराची सद्‌सद्विवेक बुद्धी आता स्वच्छ आहे. यहोवाच्या साक्षीदारांच्या जगव्याप्त मंडळीत सामावून घेण्यासाठी त्याने त्याच्या गुन्हेगारी जीवनाचा व लोभाचा त्याग केलेला आहे.

अशी हजारो उदाहरणे देता येतील. असा बदल करून घेणाऱ्‍यांची संख्या पृथ्वीच्या पाठीवर थोडी असली तरी ज्यांनी तो केला आहे ते, पवित्र शास्त्रीय तत्त्वांचे पालन केल्यामुळे जे काही चांगले घडते त्याच्या शक्‍तीचा प्रत्यय देत आहेत.

जसजशी वर्षे जात आहेत तसतसे पुष्कळ लोक या जीवनाच्या मार्गाला अनुसरत आहेत. संपूर्ण पृथ्वीवर यहोवाच्या साक्षीदारांच्या ६०,००० पेक्षा अधिक मंडळ्यामध्ये पवित्र शास्त्रीय मार्गदर्शन मिळत आहे. या जगात हयात असलेल्या लाखो लोकांतून लोभाचे उच्चाटन करून जगाचे संपूर्णपणे परिवर्तन करण्याची अपेक्षा यहोवाचे साक्षीदार धरीत नाहीत. तथापि, पवित्र शास्त्रीय भविष्यवाद दाखवून देतो की, लवकरच पृथ्वी ही लोभविरहीत जीवनाच्या मार्गाने व्यापून जाईल!

लोभविरहीत नवे जग

येणाऱ्‍या नवीन जगात लोभ व स्वार्थाला मुळीच स्थान नसणार. प्रेषित पेत्र आपल्याला सांगतो की, धार्मिकता हे केवळ “नवे आकाश” याचेच नव्हे तर “नवी पृथ्वी” याचेही गुणलक्षण असेल. (२ पेत्र ३:१३) लोभ हा आजार, दुःख व मरण यांच्या बरोबरच नष्ट झालेली गतकाळातील गोष्ट ठरेल.—प्रकटीकरण २१:४.

यास्तव, तुम्ही, सध्याच्या वाढत्या हावरटपणामुळे तसेच सभोवतालच्या स्वार्थी जीवनाक्रमणामुळे दुःखी झाला असाल तर धीर धरा! लवकरच खरोखरीच्या येत असलेल्या नव्या जगात जीवन व्यतित करण्यासाठी आत्ताच सुरवात करा. देवाच्या मदतीने तुमच्या स्वतःच्या जीवनातून या लोभाला समूळ नष्ट करण्याचा कसोशीने प्रयत्न करा. ख्रिस्ती जीवनक्रमणाद्वारे आत्ताच उपभोगण्यास मिळणाऱ्‍या लाभांविषयी इतरांना सांगण्यास मदतीचा हात पुढे करा. ‘ज्याविषयी कोणाला स्मरण होणार नाही व जे कोणाच्या ध्यानात येणार नाही’ अशा गोष्टीत हा लोभ विलीन होईल या यहोवा देवाच्या अभिवचनावर आपला संपूर्ण विश्‍वास व भाव ठेवा.—यशया ६५:१७.

[५ पानांवरील चित्रं]

लोभ नव्हे तर निःस्वार्थपणाला चालना देणाऱ्‍या जीवनक्रमाविषयी येशूने बोलणे केले

[७ पानांवरील चित्रं]

लोभविरहीत असणारे जग—लवकरच

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा