“लोभाचे युग”
साधी सर्दी घालविणे मनुष्याला अवघड जाते तर मग, अतिशय बिकट असलेल्या अधाशीपणाच्या आजाराला दूर करणे त्याला कितपत शक्य आहे? लोभ व स्वार्थ ह्या गोष्टी शिकण्याची काहीच जरुरी नाही. कारण बाळपणापासूनच या गोष्टी तेथे असतात. दोन लहान बाळकांचे त्यांच्या खेळण्यासहित खेळत असताना निरिक्षण करा व मग ते तुम्हाला समजून येईल.
व्यक्तीशः असणारी मानवी हाव ही सर्वसामान्य व तितकीच वाईट आहे. परंतु जेव्हा या लोभाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरुप येते तेव्हा लाखो लोकांना हानिकारक परिणाम मिळतो. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय मादक पदार्थांचा व्यापार लक्षात घ्या. एक स्पॅनिश भाषेचे मासिक हा दावा करते की हा जगातील सर्वात प्रचंड असा व्यापार आहे—दरवर्षी ३०० दशकोटी डॉलर्सचा! या मादक पदार्थांच्या दुरुपयोगामुळे लाखो लोकांचे जीवन बरबाद झाले आहे व अगणित तर अकालीच मृत्युमुखी पडले आहेत. मादक पदार्थांच्या व्यापारात होणाऱ्या या भयसूचक वाढीचे मूळ कारण काय असावे बरे? निःसंशये, लोभ.
या अधाशीपणाच्या हेतूच्या बाबतीत द वर्ल्ड प्रेस रिव्ह्यु प्रकाशझोत टाकते. ते कँबिओ १६ या माद्रीदच्या वृत्तपत्राचे अवतरण घेते, जे ठामपणे सांगते की, “मादक पदार्थांच्या विक्रीतील केवळ १० ते १२ टक्क्यांचा नफा उत्पादक राष्ट्रांना मिळतो. यातील आणखी १० टक्के प्रयोगशाळा, वाहने व शस्त्रास्त्रे यात गुंतवणूक करून परत व्यापारी जाळ्यात गुंतवले जातात. . . . उरलेला भाग परत ग्राहक राष्ट्रात व जागतिक बँकव्यवस्थेच्या कर व्यवस्थेत सामील होतो.”
अशाप्रकारे, गरज हे लोभामागील कारण असते आणि ते केवळ गरीब व खालच्या दर्जाच्या लोकातील लक्षण आहे हा दृष्टीकोण खोटा असल्याचे दिसते. वस्तुतः लोभ हा व्याप्त स्वरुपात पसरलेला अवगुण आहे हे स्पष्ट दिसते, कारण तो समाजात सर्वत्र दिसतो आणि ज्यांना काही गरज नसते अशा लोकातही तो दिसून येतो. या लोभाचा आणखी एक विचित्र गुणधर्म म्हणजे तो अत्यंत धूर्त किंवा कावेबाज आहे, इतका की, आयुष्यात सर्वसाधारणपणे तृप्त असलेल्या लोकांना जर अचानकपणे संधी प्रस्तुत केली गेली तर हा लोभ मोठ्या अधाशीपणात प्रकट होतो.
स्तंभलेखक मेग ग्रीनफील्ड खेदाने म्हणतातः “कोणत्याही दिवशी तुम्ही तुमचे वर्तमानपत्र उघडा आणि जेव्हा मोठ्या न्यायलयीन बातम्या, विशेष दंडाधिकारी, धांदल, लुच्चेगिरी आणि फसवेगिरी याविषयी वाचता तेव्हा खरेच निराशाजनक वाटते. काही दोषारोप निराधार आहेत तसेच काही धुडकावून लावले जात असले तरी मला असे दिसते की, ज्या गोष्टी घडू देण्यास अनुमती दिली जाऊ नये अशा गोष्टी लोकांनी केलेल्या असताना देखील त्यांना सोडून दिले जाते. . . . आम्ही आता इतक्या दूरवर आलो आहोत की, आमची परहितनिष्ठा ही बहुतेक स्वैराचार, लोभात बदलली आहे.”
केवढा व्यापक?
विसाव्या शतकातील राहणीमानाच्या दबावामुळे जरी लोभिष्ट वृत्ती वाढत असल्याचे दिसत आहे तरी तो मानवजातीत नवा नाही. लोभ हा इतका व्यापक बनला आहे की, द ख्रिश्चन सेंच्युरी मासिकातील संपादकीय लेखात १९८० च्या दशकाला ते नाव दिले आहे. जसे १९५०शी च्या दशकाला “चिंतेचे युग,” १९७०री च्या दशकाला “मी-पणाचे दशक” म्हणण्यात आले आहे तसे १९८० च्या दशकाला “लोभाचे युग” असे म्हणणे सुसंगत ठरेल असे त्यांना वाटते.
आज जेथे जेथे लोक एकत्र येतात त्या प्रत्येक क्षेत्रात म्हणजे कामावर, शाळेत आणि मोठमोठ्या वसाहती यामध्ये लोभ सर्वत्र दिसून येतो. त्याने आपला भ्रष्टाचारी प्रभाव व्यापार, राजकारण व जगातील प्रमुख धर्मात देखील पाडला आहे.
पुष्कळ वेळा लोभाची वाढ बेकायदेशीर भ्रष्टाचार व फसवणूक येथे दिसते. उदाहरणार्थ, द कॅनबेरा टाईम्स प्रगत जगामध्ये वाहन विम्यातील फसवणूकीतील संशयित म्हणून ऑस्ट्रेलियाकडे बोट दाखविते. ऑस्ट्रेलियाच्या लॉ सोसायटी जर्नल याला पुढील विधानाद्वारे संमती दर्शवीत आहे असे दिसतेः “विमा उतरविलेल्या व्यक्तींकडून केल्या गेलेल्या फसव्या दाव्यांची किंवा किंमत विमा कंपन्या, अप्रत्यक्षपणे विमा धारकाला दरवर्षी लाखो डॉलर्समध्ये द्यावी लागते.” ते नियतकालिक पुढे म्हणतेः “जाळपोळ, बोटींच्या मालधक्क्यावरील लूट, वाहने व घरातील वस्तुंचा विमा या क्षेत्रात ही एक वाढती गंभीर समस्या बनत चालली आहे.”
यासाठीच, लोभाचे कायमचे निर्मूलन होईल या कल्पनेचा लोक उपहास का करतात याची कल्पना येऊ शकेल. त्यांना वाटते की, लोभ हा नेहमीच आमच्या बरोबर राहणार व लोभविरहित जग हे अशक्य कोटीतील स्वप्न आहे.
लोभाचे निर्मूलन होणार
पण कोणत्या आधारावर ते अशक्य वाटणारे विधान करण्यात आले आहे? लोभविरहीत जीवन आधीच संपादण्यात आले आहे या वस्तुस्थितीवर ते आधारीत आहे. हे संपादन अर्थातच अपूर्ण आहे पण योग्य शिक्षण व योग्य ध्येय याकरवी काय घडू शकते ते आम्हाला यातून दिसू शकेल. संपूर्ण जग लोभविरहीत कसे असू शकेल ते आम्हाला पुढील लेख दाखवून देईल.