वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ६/१ पृ. ७
  • यहोवाने त्याचे नाव का प्रकट केले?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाने त्याचे नाव का प्रकट केले?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या थोर नावाचे गौरव करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • देवाचं नाव
    सावध राहा!—२०१७
  • देवाचं नाव काय आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • देवाचे नाव प्रकट करणे
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ६/१ पृ. ७

यहोवाने त्याचे नाव का प्रकट केले?

पोलंडमध्ये १९६४ साली प्रसिद्ध झालेल्या “जुना करार” यावरील विवेचन या पुस्तकाने या प्रश्‍नाचे उत्तर अगदी विचारप्रवर्तक रितीने दिले आहे. रोमन कॅथोलिक चर्चच्या विद्यमाने ल्यूबीन विद्यापिठात प्राध्यापक असणारे डॉ. स्टॅनिस्लॉ लॅच यांनी हे विदित केलेः

“मुक्‍तता पावलेले लोक देवाचे नाव लोकांपुढे सादर करण्यासाठी जबाबदार आहेत.” “विदेशी लोकांनी याहवे [यहोवा] नावाचे गौरव करावे व त्यांनी त्याची विटंबना करू नये” यासाठी इस्राएलांनी प्रयत्न करण्याची जबाबदारी त्यांजवर होती. “याहवे या नावाला अर्थ आहे. . . . या नावाचा स्वीकार करण्यासंबंधाने जग किती प्रतिसाद देते त्यावर त्याचा न्याय केला जाईल.” प्राध्यापकांनी असेही सांगितलेः “याहवे हे नाव सर्व राष्ट्रात थोर होईल . . . ते संपूर्ण जगात पसरले जाईल. मोशाने त्या नावाचा . . . असा अर्थ केला.”

होय, मलाखी १:११ असा भविष्यवाद करतेः “‘राष्ट्रांमध्ये माझे नाव थोर आहे,’ असे सेनाधीश यहोवा म्हणतो.” तर मग, “जो कोणी यहोवाचे नाव घेऊन त्याचा धावा करील, तो तरेल,” अशी घोषणा जगभर कोण करीत आहेत? यहोवाचे साक्षीदार! होय, “त्याच्या नावासाठी असणारे लोक,” “त्याचे नाव घेणाऱ्‍या” लोकांविषयी लोक जी प्रतिक्रिया व्यक्‍त करतील त्यावर त्यांचा जीवन वा मरणासाठी न्याय करण्यात येईल. तर मग, यहोवा व त्याचे साक्षीदार याविषयी तुमची कोणती प्रतिक्रिया आहे?—प्रे. कृत्ये २:२१; १५:१४; पडताळा मलाखी ३:१६-१८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा