‘धीर धरणारे ते धन्य’
१. १९१४ पासून जगातील कोणत्या परिस्थितीने मत्तय २४:३-८ मधील वचनांची पूर्णता होत असल्याचे दाखविले आहे, आणि लिग ऑफ नेशन्स तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचा कोणता दावा अपयशी ठरला?
द प्रेसेंट एज् या आपल्या पुस्तकात रॉबर्ट निसबेट म्हणतात की, “१९१४ पासून थोडाफार विश्राम न घेता सतत पंच्याहत्तर वर्षे युद्ध चालत आले आहे.” होय, येशू ख्रिस्ताने आमच्या अंतसमयासाठी भाकित केले होते की, “लढाया . . . व लढायांच्या आवया” ऐकाल, ज्यात महायुद्धे आली. (मत्तय २४:३-८) “युद्ध कायमचे दूर करावे” यासाठी १९२० मध्ये लीग ऑफ नेशन्सला सामोरे आणण्यात आले. पण या लिगला केवढे अपयश आले! पुढे १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची प्रस्थापना “युद्धाच्या पीडेपासून पुढच्या पिढीचे संरक्षण करावे” या हेतूने झाली. पण मॅक्स हॅरेलसन यांच्या फायर्स ऑल अराऊंड द हॉरिझन या पुस्तकात म्हटले आहे: “दुसरे जागतिक महायुद्ध संपल्यानंतर जगात कोठेही मारामारी नाही असा एक दिवस दिसला नाही.”
२. जागतिक परिस्थितीविषयी काही लोक काय विचारतात, पण आम्ही कोणता प्रश्न विचारावा?
२ या दैन्यावस्थेत दहशतवाद, हिंसाचार, भ्रष्टाचार, दारिद्र्य, मादक द्रव्य आणि भयानक पीडा या सर्व वाईट गोष्टी अधिकच भर घालतात. काही विचारतील: ‘या सर्व त्रस्त स्थितीतून मानवजात कशी निभावेल?’ पण आम्ही हे अत्यंत महत्त्वपूर्णतेने विचारू शकतो: ‘देव, त्याच्या पृथ्वीवरील सृष्टीला जे बिघडविले जात आहे ते कसे सहन करीत आहे? तो दुष्ट माणसांना या पृथ्वीची नासाडी कितपत करू देणार व याद्वारे आपल्या मोलवान नावाची कोठपर्यंत निंदा होऊ देणार?’
३. (अ) यशया संदेष्ट्याने कोणता प्रश्न विचारला व का? (ब) यहोवाने काय उत्तर दिले आणि याद्वारे आमच्या काळाविषयी काय सूचित होते?
३ यशया संदेष्ट्याने असाच प्रश्न विचारला. त्याला यहोवाकडून आपल्या समाजातील लोकांना एक संदेश सांगण्याची नियुक्ती देण्यात आली होती. पण त्याला आगाऊच सांगण्यात आले होते की, लोक त्याचे आणि त्याला पाठलिलेल्या देवाचे ऐकणार नाहीत. या कारणामुळेच यशयाने हे विचारले: “हे यहोवा, असे कोठवर?” होय, या कठीण हृदयाच्या लोकांना यशया किती काळ प्रचार करणार होता आणि त्यांचा त्याच्या संदेशाच्या बाबतीत मिळत असलेला नकार यहोवा किती काळ सहन करीत राहणार होता? यहोवाने उत्तर दिले: “नगरे निर्जन होतील, घरे निर्मनुष्य होतील, जमीन ओसाड व वैराण होईल, . . . तोवर.” (यशया ६:८-११) याचप्रमाणे आजही, यहोवा जगावर त्याचा न्यायदंड बजाविण्याची वेळ येईपर्यंत त्याच्यासंबंधाने होत असलेली सर्व निंदा सहन करणार. जगात देवाच्या वचनाचा प्रामुख्याने धिक्कार करणारा घटक आहे, ख्रिस्तीधर्मराज्य.
४. ईयोबाच्या धीराचा कोणता परिणाम दिसला, व यामुळे आज आपल्याला कोणती खात्री मिळते?
४ यहोवा बऱ्याच काळापासून सैतानाच्या टोमण्यांना सहन करीत आला आहे. सुमारे ३,६०० वर्षांआधी विश्वासू ईयोबानेही सहन केले. त्यांने सैतानाच्या आव्हानाला की, परिक्षाप्रसंगात तो टिकून राहणार नाही याला खोडून टाकले. यामुळे यहोवाचे अंतःकरण किती आनंदी झाले असावे! (ईयोब २:६-१०; २७:५; नीतीसूत्रे २७:११) येशूचा दूधभाऊ याकोब यानेही नंतर हेच म्हटले: “पहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा यहोवाचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. ह्यावरून यहोवा फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हास दिसून आले.” आजही जे याचप्रमाणे यहोवासोबत सहन करीत आहेत अशांना आनंदी प्रतिफळ मिळेल.—याकोब ५:११.
५. आज देवाच्या लोकांकरिता धीर जरूरीचा असेल हे येशूने कसे दाखविले, आणि कोणते काम करीत असताना या धीराचे प्रदर्शन करावे लागेल?
५ आमच्या काळी हयात असलेल्या देवाच्या लोकांना धीराची आवश्यकता राहील असे येशूने स्पष्टरित्या सूचित केले. “व्यवस्थीकरणाची समाप्ती” याविषयीच्या चिन्हाचे भाकित करताना तो म्हणाला: “शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल.” पण काय करण्यात टिकेल? येशूचे पुढचेच शब्द त्याचे उत्तरे देतात: “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल.” (मत्तय २४:३, १३, १४) तेव्हा ‘शेवट येईल.’—पहा मार्क १३:१०, १३; लूक २१:१७-१९.
यहोवाने का घीर धरला आहे
६. यहोवा धीराविषयीचे उल्लेखनीय उदाहरण का आहे, आणि त्याने जो धीर दाखविला तो कोणत्या एका कारणामुळे?
६ प्रेषित पौलाने हे विवेचीत केले की, “आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या धीराने त्याने . . . वागवून घेतले.” (रोमकर ९:२२) ती क्रोधाची पात्रे म्हणजे दुष्ट. याच्या अस्तित्वाविषयी यहोवाने धीर का दाखवला? एक कारण म्हणजे: मानवी शासन मानवाच्या निर्माणकर्त्यापासून वेगळे राहून निश्चितपणे अपयशी ठरणार हे दाखवून द्यावे. (यिर्मया १०:२३) लवकरच जेव्हा हे सिद्ध होईल की केवळ देवच येशूच्या राजवटीद्वारे मानवी कुटुंबांना शांती, सुसूत्रीपणा व सौख्यता प्रदान करू शकतो तेव्हा त्याचे सार्वभौमत्व गौरविण्यात येईल.—स्तोत्रसंहिता ३७:९-११; ४५:१, ६, ७.
७. आणखी कोणत्या एका कारणास्तव यहोवाने धीर दाखविला, आणि यामुळे १९३०शी च्या काळापासून लाखोंना कोणता फायदा मिळाला आहे?
७ यहोवाने धीर दाखविण्यामागील आणखी एक कारण म्हणजे “दयेच्या पात्राविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी.” (रोमकर ९:२३) ही दयेची पात्रे म्हणजे सचोटी टिकविणारे अभिषिक जन, ज्यांना ख्रिस्त येशूसोबत स्वर्गीय राज्यात राज्य करण्यासाठी “पृथ्वीवरून विकत घेण्यात आले आहे.” या १,४४,००० जणांवर प्रेषितांच्या काळापासून शिक्का मारण्याचे काम सुरू झाले. ते आता संपलेले आहे. (प्रकटीकरण ७:३; १४:१, ४) आणि पाहा! १९३० शी पासून यहोवाच्या धीरामुळेच इतर हजारो जणांचे, “सर्व राष्ट्रे . . . यातील मोठा लोकसमुदाय” याचे एकत्रीकरण घडविण्यात आले आहे. या लोकसमुदायाला मोठ्या संकटातून बचावून नंदनवन बनलेल्या पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाचे वतन मिळेल या भवितव्यामुळे मोठा आनंद होत आहे. (प्रकटीकरण ७:४, ९, १०, १३-१९) त्या मोठ्या लोकसमुदायापैकी तुम्ही आहात का? जर आहात तर यहोवाने आतापर्यंत क्रोधाच्या पात्रांच्या बाबतीत जो धीर दाखविला त्याविषयी तुम्हाला आनंद वाटत नाही का?
धीराचे प्रतिफळ
८. आम्हा सर्वांनाच धीराची का आवश्यकता आहे, आणि धीराविषयी कोणाच्या उदाहरणाकडे आपण लक्षपूर्वक पाहत असावे?
८ आम्हाला अभिवचने मिळवून घ्यावयाची आहेत तर सर्वांनीच धीर दाखविण्याची गरज आहे. हे मूलभूत सत्य इब्रीकरांस पत्र १०:३६ मध्ये प्रस्तुत केल्यावर प्रेषित पौल प्राचीन काळच्या मोठ्या “साक्षीरुपी मेघा”च्या अप्रतिम विश्वास व धीर याबद्दल सविस्तर चर्चा करतो. यानंतर तो आम्हास सल्ला देतो की आम्ही “आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता” येशूने आपली अंतःकरणपूर्वक असलेली सेवा टिकवून ठेवली; त्याने प्रतिफळावरील आपली दृष्टी कदापि ढळू दिली नाही. त्याचे हे उदाहरण आपल्यालाही धीर धरण्याविषयी केवढे बळ देते!—इब्रीकर १२:१, २.
९. धीराच्या आधुनिक काळच्या उदाहरणांमुळे काय परिणाम झाला?
९ धीराविषयी आधुनिक काळातही भरपूर उदाहरणे आहेत. तुम्हाला स्वतःला उल्लेखनीय धीर प्रदर्शित करणाऱ्या बंधूभगिनींची माहिती असेल. त्यांच्या धीरामुळेच आम्हाला किती उत्तेजन मिळाले! शिवाय दरवर्षी यहोवाचे साक्षीदार आपल्या जागतिक कार्याविषयीचा अहवाल वॉचटावर संस्थेला कळवितात तेव्हा धीर व सचोटीचे आणखी थरारक वृत्तांत प्राप्त होत असतात. जानेवारी १, १९९० च्या द वॉचटावर अंकात पृष्ठ २०-२३ वर आढळणारा तक्ता साक्षीदारांनी ‘आपल्या विश्वासात सहनशीलतेची भर घातली’ त्यामुळे १९८९ मध्ये केवढे मोठे कार्य उरकले त्याचा गोषवारा पुरवितो.—२ पैत्र १:५, ६.
आमचे भव्य वर्ष
१०. (अ) १९८९ मध्ये किती देश व बेटांनी राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात सहभाग घेतला, आणि किती जणांनी यात भाग घेतला? (ब) महिन्याला सरासरी किती पायनियरांनी अहवाल दिला, आणि क्षेत्रकार्यात एकूण किती तास खर्च केले गेले?
१० हा तक्ता दाखवितो त्याप्रमाणे २१२ राष्ट्रे व बेटे यांनी यहोवाच्या आगमन होणाऱ्या राज्याचा प्रचार करण्यात सहभाग घेतला. टेहळणी बुरूजचे प्रिय वाचकहो, या भव्य कार्यात ज्या ३७,८७,१८८ जणांनी भाग घेतला त्यामध्ये तुम्ही होता का? या कार्यात दर महिन्याला सरासरी म्हणून ज्या ८,०८,१०४ पायनियरांनी अहवाल दिला त्यामध्ये तुम्ही होता का? १९८९ मध्ये गोलार्धव्याप्त रूपात उरकलेल्या ८३,५४,२६,५३८ तासांच्या कार्यात तुमचा कितीही सहभाग असला तरीही तुम्ही आनंद करण्याजोगे कारण आहे.—स्तोत्रसंहिता १०४:३३, ३४; फिलिप्पैकरांस ४:४.
११. (अ) गेल्या वर्षीच्या मार्च २२ रोजीच्या कोणत्या उस्थितीमुळे आम्हाला आनंदाचे कारण मिळते, व का? (ब) किती जणांचा बाप्तिस्मा झाला, आणि तक्त्यात याविषयी कोणते देश उल्लेखनीय असल्याचे दिसतात?
११ होय, आनंदी व्हा; कारण गेल्या वर्षीच्या मार्च २२ रोजी येशूच्या मृत्युच्या स्मारकविधीच्या सभेला जागतिकपणे ९४,७९,०६४ इतकी उपस्थिती होती! जर उपस्थितांपैकीच्या मेंढरासमान आस्थेवाईकांना प्रेमळपणे कळपात संभाळले, त्यांनी यहोवाची सेवा नियमित करावी म्हणून मार्गदर्शन दिले तर आणखी ५६,९१,८७६ अधिक राज्याचे घोषक बनतील. आम्ही त्यांना मदत देऊ शकू का? (योहान १०:१६; प्रकटीकरण ७:९, १५) प्रत्यक्षात बरेच जण चांगला प्रतिसाद दाखवीत आहेत, व हे १९८९ च्या कार्यवर्षात एकंदर २,६३,८५५ इतक्या नव्या साक्षीदारांचा जो बाप्तिस्मा त्याकरवी सूचित होते.
१२. तक्त्यात ज्याविषयीचे प्रगटन नाही त्या (अ) वॉचटावर संस्थेचे छापखाने आणि (ब) मासिक वितरण आणि वर्गण्या यांजविषयी काय वैशिष्ट्ये सांगता येतील?
१२ काही वैशिष्ट्ये आपल्याला या तक्त्यात दिसणार नाही. पवित्र शास्त्रे, पुस्तके, माहितीपत्रेके, मासिके याविषयीची तृष्णा मोठी अनिवार होती. यामुळेच, न्यूयॉर्क येथील वॉचटावरच्या छापखान्यात ३,५८,११,००० पवित्र शास्त्रे, पुस्तके व माहितीपत्रके यांच्या छपाईसाठी २५,९९९ टन कागद वापरण्यात आला. ही १९८८ पेक्षा १०१ टक्के वाढ होती. वॉचटावर संस्थेच्या जर्मनी, इटली व जपान या देशात असणाऱ्या मोठ्या छापखान्यांनी अधीक पाळ्या करून “विश्वासू व बुद्धीमान दासाला” अध्यात्मिक “अन्न यथाकाळी देता” यावे म्हणून त्यांना मोठी मदत केली. (मत्तय २४:४५) एप्रिल व मे महिन्यादरम्यान कित्येक देशात मासिकांचे उल्लेखनीय वितरण व वर्गण्यांची प्राप्ती झाली. त्यावेळी वॉचटावरच्या “मोठी बाबेल” यावरील लेखांचे जोरदारपणे वितरण करण्यात आले. (प्रकटीकरण १७:५) या वर्षीच्या एप्रिल व मे महिन्यांच्या दरम्यान साहाय्यक पायनियर व इतर साक्षीदार जगातील क्षेत्रात टोळासारखे गेले असतील यात काही शंका नाही. यामुळे १९९० च्या कार्यवर्षात हा साक्षीकार्याचा मोठा उच्चांक असेल अशी आम्ही अपेक्षा धरू शकतो.—पडताळा यशया ४०:३१; रोमकर १२:११, १२.
१३. गेल्या वर्षी ज्यांचा उल्लेख करता आला नाही असे कोणते देश आता यादीत आले आहेत? विवेचीत करा.
१३ आता पुन्हा तक्त्याकडे पहा. तुम्हाला असे काही देश दिसतात का ज्यांची नावे मागील वर्षीच्या तक्त्यात नव्हती? होय! हंगेरी व पोलंड हे असे देश आहेत जेथे आम्हाला अलिकडेच मान्यता मिळाली आहे. यहोवाच्या साक्षीदारांविषयी ही मान्यता दाखविली म्हणून तेथील देशाच्या अधिकाऱ्यांचे आम्ही कृतज्ञ आहोत. याकरता जगभरातील आमच्या बंधवांनी ज्या प्रार्थना केल्या होत्या त्या सफळ झाल्या असे म्हणता येईल, कारण यामुळेच “पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण” करू शकतो.—१ तीमथ्य २:१, २.
१४. पोलंडमध्ये झालेल्या “ईश्वरी भक्ती” प्रांतिय अधिवेशानाची काही ठळक वैशिष्ट्ये सांगा.
१४ “ईश्वरी भक्ती!” होय, हे “ईश्वरी भक्ती” प्रांतिय अधिवेशन गेल्या ऑगस्टमध्ये पोलंडमध्ये तीन जागी भरवता आले! आमच्या ९१,२०४ पोलंडच्या बांधवांना केवढे आश्चर्यकारक यजमानासारखे वाटले असावे! (इब्रीकर १३:१, २, १६) तो जणू चमत्कारच घडला. झेक, जर्मन, रशियन व इतर हजारो बांधवांना बस, गाडी एवढेच काय पण पायीही येण्याचा परवाना मिळू शकला. आणखी काही हजारोजण अमेरिका, पश्चिम युरोप पॅसिफिक महासागरातील बेटे तसेच जपान येथून विमानाने आले. मोठमोठी स्टेडियम आमच्या बांधवांनी झाडून स्वच्छ केली. चोर्सो येथे ६५,७१०, पोझनन येथे ४०,४४२ आणि वारसॉ येथे ६०,३६६ एवढी उपस्थिती होती—एकंदर १,६६,५१८ उपस्थिती! प्रत्येक जागी बाप्तिस्मा विधीच्या देखाव्यामुळे सर्वांच्याच डोळ्यातून आनंदाश्रु ओघळले. पोझनन येथे एका ९ वर्षांच्या व ९० वर्षांच्या व्यक्तीचा बाप्तिस्मा झाला. तिन्ही अधिवेशनात एकंदर ६,०९३ जणांचा बाप्तिस्मा झाला, त्यात पुष्कळ नवयौवनात असलेले युवक होते. यापैकीचे पुष्कळ अशा देशातून आले होते जेथे धर्म हा वयस्करांसोबतच लयास जाईल असे बोलले जात होते. पण देववचनावर आधारीत असलेला खरा धर्म लयास जाणारच नाही! (पडताळा स्तोत्रसंहिता १४८:१२, १३; प्रे. कृत्ये २:४१; ४:४.) आमच्या पूर्व युरोपातील बांधवांच्या धीराला केवढे अद्भुत प्रतिफळ मिळाले!
छळामध्येही विश्वासूपणा
१५. लेबननमधील आमच्या बांधवांनी धीर व दृढ निर्धार कसा दाखविला व याचे कोणते सुंदर परिणाम मिळाले?
१५ प्रेषित पौलाप्रमाणेच यहोवाच्या साक्षीदारांना पुष्कळ व विविध परिस्थितीत धीर दाखविण्याचे आव्हान उभे राहते. (२ करिंथकर ११:२४-२७) लेबननमध्ये मुलकी युद्धे उद्भवतात. आमचे बंधू यांना कसा प्रतिसाद दाखवितात? अचल व निर्धाराने. १९८९ वर्षांत बऱ्याच बॉम्बचा मारा झाला व तो प्रखर होता तरी आमच्या बंधूनी मंद न होण्याचा निर्धार राखला. बेरुतमधील एक मंडळी कळविते: “आठवड्याच्या दर दिवशी सायंकाळच्या कार्याकरिता नियमित गटाची व्यवस्था करण्यात आली. सुरक्षेची स्थिती कठीण होती तरी आमचे बंधू निराश झाले नाहीत. आम्ही पूर्वीपेक्षा अधिक क्षेत्र उरकू शकलो. एप्रिलमध्ये आम्ही पायनियरांमध्ये उच्चांक गाठला. नवीन पवित्र शास्त्र अभ्यास सुरु झाले, आणि अधिक मासिके व पुस्तकांचे वितरण झाले.”
१६. जेथे कोणी साक्षीदार नव्हता अशा गावी सुवार्ता आणण्यात कोलंबियातील आमच्या बांधवांनी कसा धीर दाखविला?
१६ मादक द्रव्यांची ने-आण व हिंसाचार यामुळे कोलंबिया वृत्तामध्ये झळकू लागले. तथापि, तेथील विश्वासू ख्रिश्चनांच्या धीरामुळेही बरेच काही वृत्त मिळाले. अलिकडेच काही खास पायनियरांना सुमारे दहा हजार किंवा अधिक लोकवस्तीच्या ३१ गावात कार्य करण्यास पाठविण्यात आले. येथे कोणीही साक्षीदार नव्हता. एका गावात जेव्हा गावकऱ्यांना कळले की ही पायनियर तेथे काही महिन्यांच्या कालावधीपुरते आहेत, तेव्हा त्यांनी पायनियरांना अधिक काळ राहण्याची विनंति केली. दुसऱ्या एका गावात १८ आस्थेवाईक लोकांनी तीन महिन्यांच्या कालावधीत पायनिरांकडून मिळालेल्या आध्यात्मिक मदतविषयी आपली रसिकता व्यक्त करणाऱ्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आणि अधिक मदतीची मागणी केली. त्यांनी म्हटले: “ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.” तेव्हा, या दोन्ही प्रकरणात, तेथील आस्था अधिक जोपासण्यासाठी अधिक काळ राहण्याची मुभा देण्यात आली हे निर्विवाद घडले. अशा या दूरच्या क्षेत्रावर आस्था वाढविणे यासाठी धीर लागतो, पण यात परिश्रमाने कार्य करणाऱ्या पायनियरांना समृद्ध आशीर्वाद मिळतो.
१७, १८. (अ) यहोवाच्या साक्षीदारांनी इटलीमध्ये कोणत्या परिस्थितीत धीर दाखविला? (ब) साक्षीदारांविरुद्ध लबाड्या पसरविण्यात आल्या तरी त्यांनी त्याचा कसा सामना केला?
१७ इटलीमध्ये यहोवाच्या साक्षीदारांना पाळकांचा कटु विरोध सहन करावा लागतो, पण यहोवाच्या मदतीनेच ते टिकून राहिले आहेत. कित्येक चर्चमधून या पाळकांनी दारावर लावण्याचे स्टिकर्स आपल्या सभासदांना दिले, ज्यामध्ये यहोवाच्या साक्षीदारांनी दार ठोठावू नये असा मजकूर होता. एका विशिष्ट क्षेत्रात ते स्टिकर्स घरोघर लावण्यासाठी या पाळकांनी काही युवकांना हाताशी धरले. यांनी सर्वत्र ते स्टिकर्स लावले—साक्षीदार कुटुंबांच्या दारीसुद्धा! तथापि, या हालचालीमुळे साक्षीदार घाबरले नाहीत, उलट त्यांनी या स्टिकर्सचा वापर संभाषण सुरू करण्यासाठी केला. या प्रकरणाला वृत्तपत्रे व राष्ट्रीय दूरदर्शनकरवी बरीच प्रसिद्धी मिळाली, ज्यात परधर्माविषयी जी असहिष्णुता दाखविली गेली त्याविषयी बरेच ताशेरे झाडण्यात आहे आणि ही युक्ती वापरण्यात आली ती चर्चच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे असेही प्रतिपादित करण्यात आले. एका महाविद्यालयीन प्राध्यापकांना साक्षीदारांविरुद्ध वापरलेल्या या स्टिकर्समुळे खूपच वाईट वाटले व त्यांनी द वॉचटावर आणि अवेक! या मासिकांची वार्षिक वर्गणी भरली.
१८ यहोवाच्या लोकांविरुद्ध खोट्या गोष्टी पसरविण्यात इटलीतील कॅथोलिक चर्च धर्मत्याग्यांचा वापर करते, पण ही युक्तीही सफळ ठरलेली नाही, कारण १,७२,३८२ प्रचारकांची चांगली ख्याति लोकांमध्ये आहे. भेट देणाऱ्या साक्षीदारांना एक माणसाने म्हटले की, पूर्वीच्या साक्षीदारांनी आमच्याविषयी लिहिलेल्या वाईट गोष्टी त्याच्या वाचण्यात आल्या. या कारणामुळेच जेव्हा त्याचा भाऊ साक्षीदार बनला तेव्हा त्याने कटू विरोध दाखविण्यास आरंभ केला. तरीपण थोड्याच अवधीनंतर त्याने हे पाहिले की त्याच्या भावाने धर्मबदल केल्यामुळे त्याजवर केवढा चांगला परिणाम घडून आला होता. तेव्हा हा गृहस्थ विस्मयात पडला. त्याने विचार केला: ‘जे इतके वाईट आहे त्याला इतके चांगले परिणाम कसे निष्पण्ण करून दाखविता येतील?’ यासाठीच, त्याने आता भेट देत असलेल्या साक्षीदारांकडून पवित्र शास्त्र अभ्यासाची विचारणा केली.—पडताळा कलस्सैकर ३:८-१०.
बेपर्वाई वृत्तीविरुद्ध लढत देणे
१९, २०. (अ) फिनलंडमधील साक्षीदारांना कोणत्या परिस्थितीमुळे आपला धीर दाखवावा लागला, आणि चर्चने जे मतदान घेतले त्यात कोणती अर्थपूर्ण गोष्ट दिसली? (ब) सुवार्तेचा प्रचार करीत असताना धीर हा केवढा महत्त्वाचा आहे हे एक अनुभव कसे दाखविते?
१९ ज्या देशात साक्षीदार आपली भेट सारखी देत राहतात अशा ठिकाणी सुवार्तेविषयी बेपर्वाई वृत्ती साधारणपणे दिसून येते. हीच गोष्ट फिनलंडमध्ये घडली. या देशातील चर्चने मतदानाकरवी हे पाहिले की, त्यांच्या ७० टक्के लोकांना साक्षीदारांनी त्यांच्या घरी दिलेल्या भेटी आवडत नाहीत. परंतु, ३० टक्के लोकांनी आपला जोरदार प्रतिकार दर्शलिला नाही आणि यापैकीच्या ४ टक्क्यांनी तर असे म्हटले की त्यांना यहोवाचे साक्षीदार आवडतात. ही तर अर्थपूर्ण संख्या आहे, कारण फिनलंडची ४ टक्के लोकवस्ती २,००,००० लोक होत. याची सध्याच्या १७,३०३ प्रचारकांसोबत तुलना करून पहा!
२० क्षेत्रकार्यात असणाऱ्या एका प्रचारकाला या मतदानाची माहिती कळविली गेली आणि घरमालकाने विचारले: “आमच्या ७० टक्के लोकांना तुम्ही आवडत नाही हे तुम्हाला दिसत नाही का? तर मग, तुम्ही आमच्या दारी का येता?” प्रचारकाने उत्तर दिले: “होय, ते मला समजते. पण याच मतदानात तुम्हाला दिसेल की, निदान ४ टक्के लोकांना आम्ही आवडतो. आम्ही त्या लोकांचा शोध घेत आहोत. ते प्रमाण जरी १ टक्का इतके असते तरीही आम्ही घरोघरी जाऊन त्यांचा शोध घेत राहिलो असतो.” घरमालकाने क्षणभर विचार केला व म्हटले: “तर मग, तुमचा संदेश त्यांच्यासाठी इतका महत्त्वपूर्ण आहे का?” प्रचारकाने घरमालकालाच प्रश्न करून म्हटले: “तुमची तो ऐकण्याची तयारी आहे का?” घरमालकाने लगेच सुवार्तेविषयी आपली आस्था प्रदर्शित केली.
भविष्यात काय राखलेले आहे
२१. (अ) आम्हाला या व्यवस्थीकरणात कसल्या प्रकारची लढत द्यावयाची आहे, व का? (ब) आम्हाला काय सहन करावे लागेल, आणि हबक्कुकचा भविष्यवाद आम्हाला कशाची खात्रा देतो?
२१ आज, आम्हाबद्दल काय? आम्ही यहोवा व येशू ख्रिस्तासोबत शेवट येईपर्यंत धीर राखून ठेवण्याचा निर्धार करून आहोत का? तो अधिक काळासाठी दाखवावा लागणार नाही, पण आम्ही धीर धरला पाहिजे! सैतानी जगाची अनैतिकता, भ्रष्टता व द्वेष आम्हापुढे सभोवर असताना आम्हाला या व्यवस्थीकरणात मोठी लढत द्यावयाची आहे. (यहुदा ३, २०, २१) आम्हाला या किंवा त्या छळात टिकून रहावयाचे आहे. सध्याही आमचे हजारो बांधव तुरुंगात आहेत व काहींना बरीच मारहाण सहन करावी लागते. हे बांधव, आम्ही त्यांच्यासाठी ज्या प्रार्थना करीत आहोत त्याविषयी कृतज्ञ आहेत. (२ थेस्सलनीकाकर ३:१, २) लवकरच, हे सद्य व्यवस्थीकरण राहणार नाही! हबक्कुकने तेच म्हटले: “हा दृष्टांत नेमिलेल्या समायासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे. तो फसवावयाचा नाही; त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पाहा, तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही.”—हबक्कुक २:३.
२२. संदेष्ट्यांचा धीर व ईयोबाची सहनता आपण अनुसरली तर कोणता परिणाम लाभण्याची आपल्याला निश्चित खात्री धरता येईल?
२२ शिष्य याकोब आम्हाला प्रेमळपणे सांगतो: “बंधूंनो, जे संदेष्टे यहोवाच्या नावाने बोलले त्यांचे दुःखसहन व त्यांचा धीर ह्याविषयीचा कित्ता घ्या.” आम्ही यशया, यिर्मया, दानिएल व इतरांप्रमाणेच यहोवाच्या नामाने बोलत असता त्यांच्यासारखेच सचोटी-रक्षक बनू शकतो. ईयोबाप्रमाणे आपल्याला सहन करता येईल. त्याच्या धीरामुळे त्याला केवढ्या समृद्धपणे आशीर्वादित करण्यात आले! याचप्रमाणे, आम्हीही शेवटपर्यंत धीर धरून राहिलो तर यहोवाची दया व चांगुलपणा आम्हाला अतुलनीय आशीर्वाद देईल. याकोबाचे पुढील शब्द आम्हा प्रत्येकाच्या बाबतीत पूर्ण होवोत: “पाहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो.”—याकोब ५:१०, ११; ईयोब ४२:१०-१३.
तुम्ही काय उत्तर द्याल?
◻ येशूने धीराविषयीची कोणती गरज जोर देऊन सांगितली?
◻ यहोवाने कशामुळे धीर दाखविला?
◻ १९८९ मध्ये जे भव्य कार्य उरकण्यात आले त्यामधील ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत?
◻ पोलंडमधील आमच्या बंधवांच्या धीराला कसे प्रतिफळ मिळाले?
◻ लेबनन, कोलंबिया व व इटालीतील साक्षीदारांनी छळामध्ये कसा विश्वासूपणा दाखविला?